Author: Admin

  • Chaitra Navratri Yatra Preparations । “चंद्रपूरची महाकाली यात्रा: भक्तांसाठी सज्ज होतेय सुविधांची मांदियाळी!”

    Chaitra Navratri Yatra Preparations

    Chaitra Navratri Yatra Preparations : ३ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्रातील यात्रेसाठी चंद्रपूरात येणाऱ्या यात्रेकरूंना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी युद्धस्तरावर काम करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यात्रा काही दिवसांवर आली असताना, परिसरातील तयारीची पाहणी करताना त्यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला आहे. हे काम नियोजनबद्ध पद्धतीने करून यात्रेची तयारी पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. Chandrapur Mahakali Yatra 2025

    चंद्रपूर वन अकादमीमध्ये भ्रष्टाचाराचा डोंगर, आप ने केला गंभीर आरोप

    यावेळी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, शहर अभियंता विजय बोरिकर, उपशहर अभियंता रवींद्र हजारे, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, अभियंता रविंद्र कळंबे, शाखा अभियंता आशिष भारती, शहर स्वच्छता अधिकारी डॉ. अमोल शेडके, स्वच्छता निरीक्षक भूपेश गोटे यांच्यासह श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टचे सचिव अजय जयस्वाल, सुनील महाकाले, बलराम डोडाणी, संजय बुरघाटे, तुषार सोम, भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष दशरथ सिंग ठाकूर, रघुवीर अहिर, माजी नगरसेवक प्रदिप किरमे, राम जंगम, पराग  मेलोडे आदिंची उपस्थिती होती. 

    chandrapur yatra facilities

    यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविक, पर्यटक आणि व्यापारी वर्ग चंद्रपूर येथे येतात. त्यामुळे सुव्यवस्थित पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि वैद्यकीय सेवा सुरळीत राहाव्यात, यावर आमदार किशोर जोरगेवार यांनी भर दिला. यात्रेकरूंना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागांनी पूर्वनियोजन करावे, असे निर्देश यावेळी आमदार जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी यात्रा परिसर, मंदीर परिसर, वाहन पार्किंग व्यवस्था, नव्याने सुरु करण्यात आलेले पर्यायी मार्ग आणि इतर भागांची पाहणी केली. Chandrapur Yatra Facilities

    यात्रा परिसराची पाहणी करताना मुख्य रस्ते, पर्यायी मार्ग, मंडप, स्वच्छतागृहे, पार्किंग व्यवस्था आणि पाण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. यात्रेच्या कालावधीत पुरेसा पिण्याच्या पाण्याचा साठा असावा आणि परिसराची स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीचे नियोजन करण्यात यावे. पार्किंगच्या ठिकाणी शिस्तबद्धता असावी. गर्दीच्या ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात ठेवावीत, आपत्कालीन परिस्थितीसाठी अधिकच्या रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात. मंडप, मंदिर परिसर आणि प्रमुख रस्त्यांवर निर्बाध वीजपुरवठा राहावा, यासाठी दक्षता घेण्यात यावी यात्रा काळात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही नियंत्रण, स्वयंसेवकांची नेमणूक यासारख्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्यात.

    यात्रेच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, सर्व सोयी-सुविधा वेळेत आणि सुरळीत मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने अधिक तत्परतेने काम करावे. यात्रेकरूंना कोणतीही अडचण होणार नाही, याची काळजी घ्यावी. यात्रा हा श्रद्धेचा आणि भक्तीचा महोत्सव आहे. तो आनंददायी आणि सुरक्षित व्हावा, हीच आमची जबाबदारी आहे.

    हजारो भाविक भक्तिभावाने या पवित्र स्थळी येणार आहेत. त्यांच्या सुरक्षिततेची, सुविधांची आणि सोयींची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे ही यात्रा निर्विघ्न पार पडावी, यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन समर्पित भावनेने कार्य करणे गरजेचे आहे. प्रशासन, स्थानिक स्वयंसेवक, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन या यात्रेचे उत्कृष्ट नियोजन करावे. यात्रा सुरळीत पार पडेल आणि भाविकांना उत्तम सुविधा मिळतील, यासाठी आपण सर्वांनी जबाबदारीने कार्य करावे, अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी केल्या आहेत. Mahakali Yatra Cleanliness

  • fire proximity suit । चंद्रपूरमध्ये अग्निशमन दलाला नव्या कवचाचे वरदान – फायर प्रॉक्सिमिटी सूटचे वाटप

    fire proximity suit

    fire proximity suit : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने चंद्रपूर जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत येथे कार्यरत असलेल्या अग्निशमन दलातील जवानांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते फायर प्रॉक्झिमिटी सूट ( fire proximity suit ) चे वितरण करण्यात आले.

    उपरवाही येथील जिल्हा परिषद शाळेला जिल्हाधिकारी गौडा यांची भेट

    यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, नगर प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख, तसेच ब्रम्हपूरी, वरोरा, बल्लारपूर, राजुरा, भद्रावती, चिमूर येथील नगर परिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या कामाचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

    काय आहे फायर प्रॉक्झिमिटी सूट : हे अग्निशामक आणि इतर धोक्याच्या परिस्थितीत काम करणाऱ्या व्यक्तींना उच्च तापमानापासून आणि ज्वालांपासून संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले विशेष सुरक्षा उपकरण आहे, ज्याला चांदीचा बंकर सूट असेही म्हणतात.

    फायर प्रॉक्सिमिटी सूटचे उपयोग

    अग्निशामकांना संरक्षण : अग्निशामक (firefighter) आग विझवण्याच्या कामात थेट ज्वालांच्या संपर्कात येतात, अशा स्थितीत त्यांना या सूटमुळे उष्णतेपासून आणि जाळणाऱ्या पदार्थांपासून संरक्षण मिळते. firefighter protective suit

    धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्यांना संरक्षण : ज्वालामुखीशास्त्रज्ञ, औद्योगिक कामगार आणि इतर धोक्याच्या परिस्थितीत काम करणाऱ्यांना या सूटमुळे उष्णता आणि ज्वालांपासून संरक्षण मिळते.

    विमान बचाव आणि अग्निशमन (ARFF) मध्ये वापर : विमान बचाव आणि अग्निशमन (ARFF) मध्ये, ≈500 °F (260 °C) पर्यंत वातावरणीय उष्णता संरक्षण प्रदान करण्यासाठी प्रॉक्सिमिटी सूट वापरले जातात.

    आगीत अडकलेल्या लोकांना मदत : अग्निशामक या सूटचा वापर करून आगीत अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढू शकतात.

    हा सूट अग्निशमन जवानांना कोणत्याही फ्लेशओव्हरपासून अर्थात आगीच्या ज्वालांपासून वाचवेल. या सूटचे सर्व भाग युरोपीयन मानकांनुसार प्रमाणित करण्यात आले आहेत. सूटमध्ये जॅकेट, पॅन्ट हुड, हातमोजे, हेल्मेट आणि बूट यांचा समावेश आहे.

  • Majhi Shala Sundar Shala । शाळांमध्ये शिक्षणासोबत कौशल्यविकासावर भर – जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीने वाढला आत्मविश्वास!

    Majhi Shala Sundar Shala

    Majhi Shala Sundar Shala : 100 दिवस कृती आराखडयाअंतर्गत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी  आठवडयातून किमान दोन दिवस  क्षेत्रीय भेटी दरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या प्रकल्पांना भेटी देऊन कामाच्या प्रगतीची पाहणी करावी, अशा राज्य शासनाच्या सुचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

    चंद्रपूर वन अकादमी मध्ये अंतर्गत भ्रष्टाचार

     ‘मुख्यमंत्री माझी, शाळा सुंदर शाळा’ टप्पा-2 सन 2024-25  अंतर्गत जिल्हयात दुसरा क्रमांक मिळाला आहे. या शाळेत नाविन्यपूर्ण ‍विज्ञान व गणित प्रयोगशाळेतुन शिक्षण, इकोक्लब सदस्यामार्फत पर्यावरण जागृती व संरक्षण, मतदान जागृतीसाठी विद्यार्थ्यांचे पथकाद्वारे सादरीकरण, एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत उपक्रम, बाल  वाचनालय नियमित वापर, सावित्रीबाई फुले बचत बँकेच्या माध्यमातुन आर्थिक देवाण घेवाण, विपुल भारत अंतर्गत माता-पालक गटाची स्थापना व गट कार्यरत, आशा व अंगणवाडी सेविका मार्फत किशोर वयीन मुलींना मार्गदर्शन,  निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम राबविण्यात येतात. government education schemes for rural schools

    यावेळी जिल्हाधिका-यांनी शाळेत सुरु असलेल्या  प्रशंसनीय उपक्रमाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच विद्यार्थ्यांचे कौतुकसुध्दा केले. भेटी दरम्यान उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, तहसीलदार पल्लवी आखाडे, संवर्ग विकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी  आदी उपस्थित होते.

  • government job fair for youth । यशस्वी करिअरसाठी कौशल्य आत्मसात करा – आमदार जोरगेवार यांचा मौल्यवान सल्ला

    government job fair for youth

    government job fair for youth : आजचा पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून तरुणाईच्या भविष्याला दिशा देणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. तरुणांच्या मनात असलेली ऊर्जा आणि उद्योजकतेची वृत्ती योग्य दिशेने वळवली, तर आपण आपल्या समाजाच्या सर्वांगीण प्रगतीला हातभार लावू शकतो. कौशल्य विकास हाच भविष्यातील यशाचा मंत्र असून रोजगार मेळावे हे कौशल्य आणि संधीचा सेतू आहेत, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. employment fair for freshers

    चंद्रपुरातील ग्रामीण भागात दारू तस्करीचे नेटवर्क

    जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर, मॉडल करिअर सेंटर, चंद्रपूर आणि जनशिक्षण संस्थान-२, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपुरातील जनशिक्षण संस्था येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी संजय पवार, जनशिक्षण संस्थानचे संचालक अमोल गायकवाड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतूराज सुर्या, बँक ऑफ महाराष्ट्रचे एल.डी.एम. राजू नंदनवार, कर्मवीर भाऊराव पाटील संस्थेचे अध्यक्ष भाऊराव झाडे, सुभाष ढोंबरे, प्रशिक्षण केंद्राचे सहायक आयुक्त भैयाजी येरणे, रोषण गभाले आदी मान्यवर उपस्थित होते. skill development opportunities in Maharashtra

    यावेळी बोलताना आमदार जोरगेवार पुढे म्हणाले की, आजचा हा मेळावा आपल्या तरुण पिढीसाठी आशेचा किरण आहे. रोजगार मिळवण्याइतकेच रोजगार निर्माण करणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे तरुणांनी कौशल्य प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करावा. शासनाच्या विविध योजना आणि मार्गदर्शन केंद्रांचा लाभ घ्यावा. आज येथे अनेक प्रतिष्ठित नियोक्ते सहभागी झाले आहेत, ज्यांनी आपल्या तरुणांना संधी दिली आहे. या संधीचे सोने करा, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मेहनत घ्या आणि कौशल्य आत्मसात करा असे आवाहन त्यांनी केले.

    employment fair for freshers

    हा रोजगार मेळावा म्हणजे फक्त नोकरी मिळवण्यासाठीचा मंच नाही, तर नव्या संधींचे दरवाजे खुलं करणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. आजच्या युगात शिक्षणासोबतच कौशल्यविकास आणि योग्य मार्गदर्शनाला विशेष महत्त्व आहे. केवळ पदवी मिळवून रोजगार मिळतोच असे नाही, तर योग्य कौशल्य असणाऱ्या युवकांना उद्योगजगतात मागणी आहे. आजचे उत्तम आयोजनामुळे जिल्ह्यातील अनेक बेरोजगार तरुणांना त्यांच्या क्षमतेनुसार संधी मिळणार आहे, असेही आमदार जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला नियोक्ते, युवक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • cockfight betting police action । कोंबडा लढतीवर पोलिसांचा छापा! लाखोंचा जुगार उघड, चार आरोपी अटकेत

    cockfight betting police action

    cockfight betting police action : कोरपना पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोंबडा लढतीवर हारजीत चा जुगार खेळणाऱ्या कोंबडा बाजारावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड मारत एकूण २ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, या प्रकरणी ४ आरोपींवर जुगार प्रतिबंधित कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

    चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोंबड्याची झुंज लावत त्यावर पैसे लावत जुगार खेळल्या जातो, काही पोलीस पथक कारवाई करण्यात यशस्वी होतात तर काही यांच्यापर्यंत पोहचू शकत नाही. cockfight gambling raid Maharashtra

    वन अकादमीमध्ये भ्रष्टाचार, आपने मुख्य वनसंरक्षकांवर लावला आरोप

    कोरपना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोणी गावात कोंबडा झुंजीवर पैसे लावत जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने कोंबडा बाजारावर धाड मारली.

    अचानक पडलेल्या धाडीने जुगार खेळणारे सैरावैरा पळू लागले मात्र यामधील ४० वर्षीय अमोल साधूजी खरवडे, २९ वर्षीय संजय शालिक क्षीरसागर राहणार कोरपना, ५४ वर्षीय अनिल किसन बेलेकर राहणार यवतमाळ, ४६ वर्षीय राजेंद्र नानाजी खिरटकर राहणार यवतमाळ हे पोलिसांच्या हाती लागले.

    आरोपींजवळून रोख रक्कम, ४ जिवंत कोंबडे, ४ मोटारसायकल सह एकूण २ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपीवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कलम १२ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतुर्त्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, बलराम झाडोकर, संतोष निंभोरकर, पोलीस पथकातील कर्मचारी किशोर वैरागडे, अजय बागेसर, जय सिंग, संतोष येलपुलवार, प्रमोद कोटनाके, मिलिंद जांभुळे व दिनेश अराडे यांनी केली.

  • police raid on liquor transport । 12 लाखांच्या दारू तस्करीत कोण आहे ‘बिग बॉस’? पोलिसांचा शोध सुरू

    police raid on liquor transport

    police raid on liquor transport : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना त्याठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारूचा पुरवठा होत आहे, अवैध दारू पुरवठ्याचे मूल, सावली व गोंडपिपरी हे मूळ केंद्र आहे. आणि दारूचा पुरवठा आजपासून नाहीतर अनेक वर्षांपासून बेधडकपणे सुरु आहे. अजूनही या दारू पुरवठ्यावर ठोस अशी कारवाई झालेली नाही. alcohol smuggling routes in Maharashtra

    शिवद्रोही प्रशांत कोरटकर ला चंद्रपुरात कुणी मदत केली? त्यांना अटक करा

    २७ मार्च रोजी मूल पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली कि चारचाकी वाहनातून दारूची अवैध वाहतूक होत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी भूजला ते बेंबाळ या मार्गावर नाकाबंदी केली.

    त्यावेळी बेंबाळ कडून चांदापूर फाट्याकडे चारचाकी वाहन क्रमांक mh ३४ cd ७११६ हे येताना दिसले, वाहनाला थांबवित झडती घेतली असता लाखो रुपयांची विदेशी दारू सदर वाहनात आढळली पोलिसांनी वाहन चालक ४० वर्षीय खुशाल भैयाजी बांगडे ला ताब्यात घेत विचारपूस केली, त्याने ह्या दारूच्या अवैध वाहतुकीमागे बल्लारपूर येथील पवन जयस्वाल व व्याहाळ येथील राज बिअर बारचे संचालक निखिल मंडलवार यांचे नावे सांगितली. पोलिसांनी या कारवाईत वाहनसहित एकूण १२ लाख ९१ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. foreign liquor seized Maharashtra

    चंद्रपुरातील संडे मार्केट बंद

    पोलिसानी इतर २ आरोपींचा शोध घेणे सुरु केले आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे व परिविक्षाधीन अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली जमीर खान पठाण व नरेश कोडापे यांनी केली.

  • Chandrapur forest academy corruption probe । वन अकादमीत भ्रष्टाचाराचा डोंगर! ‘आप’चा मुख्य वनसंरक्षकांवर गंभीर आरोप

    Chandrapur forest academy corruption probe

    Chandrapur forest academy corruption probe : चंद्रपूर: येथील वन अकादमीतील सरकारी निधीतून खरेदी केलेल्या लाखो रुपयांच्या उपकरणांची नासाडी झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आम आदमी पक्षाने (आप) मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रेड्डी यांनी हा भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ‘आप’ने केली आहे.

    शिवद्रोही प्रशांत कोरटकर ला सहकार्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

    ‘आप’चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कूडे, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे आणि युवा संघटन मंत्री मनीष राऊत यांनी मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांना याबाबत तक्रार अर्ज दिला आहे. वन अकादमीतील सरकारी क्वार्टर्समध्ये निष्काळजीपणे टाकून दिलेल्या लाखो रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणे, औषध किट्स आणि इतर साहित्याची तत्काळ चौकशी करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. Srinivas Reddy forest officer allegations

    चंद्रपुरातील संडे मार्केट बंद

    वन अकादमीतील एका बंद खोलीत सापडलेल्या साहित्यात स्नेक बाईट उपचार किट्स, प्रथमोपचार किट्स, हार्ड डिस्क, माईक्स, कॅटरेज आणि इतर महत्त्वाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे अनेक बॉक्स होते. ही सर्व उत्पादने नवीन पॅकिंगमध्ये असूनही त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ लागल्यामुळे त्यांची नासाडी झाली आहे. सरकारी निधीतून खरेदी केलेली ही लाखो रुपयांची उत्पादने अशा स्थितीत सापडणे हे निष्काळजीपणाचे आणि भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण आहे, असा आरोप ‘आप’ने केला आहे. Maharashtra forest equipment wastage case

    या प्रकरणी घटनास्थळी जाण्यास रेड्डी यांनी नकार दिल्याने ‘आप’चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार आणि रेड्डी यांच्यात जोरदार वाद झाला. राईकवार यांनी या भ्रष्टाचाराची जबाबदारी स्वीकारून तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली, मात्र रेड्डी यांनी उडवाउडवीची उत्तरे देत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. वाद वाढल्याने रेड्डी यांनी पोलिसांना पाचारण करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आल्यावरही ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी ठाम भूमिका घेत घटनास्थळी पंचनामा करून संपूर्ण चौकशीची मागणी केली.

    maharashtra forest equipment wastage case

    राईकवार यांनी रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. याच प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि नंतर त्यांना निलंबितही करण्यात आले होते. अमरावतीतील भाजप नेत्यांनीही रेड्डी यांच्याविरोधात सबळ पुरावे असल्याचे आयपीएस अधिकाऱ्यांसमोर मांडले होते. Forest academy government funds misuse

    चंद्रपूर जिल्ह्यात अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची नियुक्ती करून प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराची उधळी लावली आहे, असा आरोप राईकवार यांनी केला आहे. रेड्डी यांच्या अमरावतीतील कार्यकाळात झालेल्या गंभीर भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांना पुन्हा चंद्रपूरमध्ये नियुक्त करणे हे स्थानिक प्रशासन आणि राजकीय दबावाचा परिणाम आहे, असा आरोपही त्यांनी केला. Chandrapur forest officer suspension demand

    forest academy government funds misuse

    या प्रकरणी रेड्डी यांची चौकशी करून निलंबन करावे, वन अकादमीतील सर्व खरेदीसंबंधी संपूर्ण ऑडिट करून भ्रष्टाचार बाहेर काढावा, या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत आणि सरकारी निधीची वाया गेलेली रक्कम जबाबदार अधिकाऱ्यांकडून वसूल करावी, अशी मागणी ‘आप’ने केली आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी आणि कारवाई न झाल्यास ‘आप’ मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • Chandrapur protest against Prashant Koratkar । फरार कोरटकरला चंद्रपूरमध्ये मदत करणारे कोण? – हॉटेल चालक व अधिकाऱ्यांची चौकशी होणार!

    Chandrapur protest against Prashant Koratkar

    Chandrapur protest against Prashant Koratkar : शिवद्रोही प्रशांत कोरटकर यांनी प्रसिद्ध इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत कोल्हापूर यांना फोनवरून धमकी देत असताना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अनेक आक्षेपार्य विधान केले. याचा राग अनावर होऊन कोल्हापूर येथील शिवप्रेमी नागरिकांनी प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

    आगामी सणांच्या पार्शवभूमीवर प्रशासनाची महत्वाची बैठक

    प्रशांत कोरटकर या विकृत व्यक्तीने पोलिसांपुढे शरण जाऊन चौकशीस मदत करण्याच्या ऐवजी एक महिनाभर फरार राहून त्यांनी केलेले वक्तव्य हे चुकीचे होते तसेच जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करणारे होते हे सिद्ध केले आहे. प्रशांत कोरटकर फरार असताना चंद्रपूर येथे येऊन दोन दिवस मुक्कामास होता. तो ज्या हॉटेलमध्ये मुक्कामास होता त्या हॉटेल मालकास हा व्यक्ती फरार आहे व पोलीस याच्या शोधात आहे हे माहीत असताना देखील तेथे वास्तव्यास कसे ठेवले? हा मोठा गंभीर प्रश्न आहे. Who is Prashant Koratkar?

    सोबतच दोन व्यक्तींनी त्याला येथे राहण्याची तसेच चंद्रपूर येथून तेलंगणामध्ये पळून जाण्याची संपूर्ण व्यवस्था केली. त्याला भेटायला पोलिस अधिकारी सुद्धा गेले होते अशी माहिती समोर येत आहे. ज्याप्रमाणे प्रशांत कोरटकर यांनी संपूर्ण जगभरातील शिवप्रेमींचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा अवमान केला. त्याचप्रमाणे त्यांना संरक्षण देऊन व सोबत करून वरील दोन व्यक्ती, पोलिस अधिकारी व येथील त्याला आश्रय देणारा हॉटेल चालक यांनी देखील शिवरायांच्या अवमानामध्ये प्रशांत कोरटकर यांची सोबत केल्याची आम्ही सर्व चंद्रपूरकर शिवप्रेमी नागरिकांची भावना झालेली आहे. म्हणून याची दखल घेऊन तात्काळ या सर्वांना अटक करावे व त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. Shivaji Maharaj controversy news

    तसेच एका फरार आरोपीला ज्यांनी आपल्या हॉटेलमध्ये आश्रय दिला त्या हॉटेलचे व्यावसायिक प्रमाणपत्र रद्द करून हॉटेलवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रा. डॉ. दिलीप चौधरी, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, नवनाथ देवकर, लोक स्वराज फाउंडेशन, नीलकंठ पावडे, कुणबी समाज संघटना, संदीप गिर्हे, जिल्हाप्रमुख शिवसेना (उबाठा) अशोक मस्के, स्वतंत्र मजदूर युनियन, प्रमोद देरकर, जिल्हाध्यक्ष लोक स्वराज पार्टी, प्रा. डॉ. योगेश दुधपचारे, इतिहास अभ्यासक, विनोद थेरे, महानगराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, अतुल टोंगे, संभाजी ब्रिगेड, ॲड. देवा पाचभाई, विदर्भ अध्यक्ष सरपंच संघटना, प्रा. डॉ. किरणकुमार मनुरे, अभ्यासक, दीपक जेऊरकर, प्रदेश उपाध्यक्ष मराठा सेवा संघ, प्रा. डॉ. सुभाष गिरडे, अभ्यासक, राजेश ठाकरे, सुजित पेंडोर, गणेश ठाकूर, राकेश कालेश्वर, इत्यादी विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  • Chandrapur festival safety guidelines । चंद्रपूर सणांच्या रंगात: शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक!

    Chandrapur festival safety guidelines

    Chandrapur festival safety guidelines :  चंद्रपूर हा शांतताप्रिय जिल्हा आहे. जिल्ह्याचा हा लौकिक कायम ठेवणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आगामी काळात गुढीपाडवा, रमजान ईद, श्रीराम नवमी, महाकाली यात्रा, हनुमान जयंती, महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे आदी सण साजरे होणार आहे. हे सर्व सण अतिशय आनंदाने आणि शांततेत साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

    महावितरणची मोहीम, वीज बिल भरले नाहीतर वीज पुरवठा खंडित

    जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या वतीने जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,  महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, सहाय्यक पोलिस अधीक्षक नियोमी साटम, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते. Chandrapur peace committee meeting

    चंद्रपुरात वाहतुकीचा खेळखंडोबा

    सर्वधर्मीय सण साजरे करताना प्रत्येकाने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, प्रत्येकाला आपले धार्मिक सण साजरे करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिला आहे. मात्र सण साजरे करताना इतरांना त्रास होऊ नये, याची काळजी सुद्धा घ्यावी. नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना होणार नाही, यासाठी सर्वांनी सतर्क रहावे. गल्ली, मोहल्ला, सोसायटी येथील सर्वांना शांततेचे महत्व समजून सांगावे. सोशल मीडियाचा वापर हा चांगला आणि वाईटसुद्धा होऊ शकतो. Chandrapur social media awareness

    प्रत्येकाने जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करावा. आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा हा कदाचित जिल्हा, राज्य किंवा देशाबाहेरचा सुद्धा राहू शकतो. मात्र अशा पोस्टमुळे आपल्या जिल्ह्यात काही दुष्परिणाम होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. आपापल्या ग्रुपमध्ये सर्वांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.

    जिल्हा प्रशासनाचे नियम पाळा – पोलीस अधीक्षक सुदर्शन

    पोलिस अधीक्षक श्री. सुदर्शन म्हणाले, चंद्रपूर जिल्हा हा शांततेसाठी ओळखला जातो. सर्वधर्मीय सण साजरे करताना येथील गुन्ह्यांची संख्या नगण्य आहे. नागपूरच्या घटनेवर जिल्हा पोलिस प्रशासन अतिशय अलर्ट असून जागोजागी बैठकांचे सत्र सुरू आहे. आपल्या परिसरात युवकांना सोशल मीडियाचे दुष्परिणाम समजून सांगावे. बऱ्याचशा पालकांना आपली मुलं सोशल मीडियावर काय करतात, याची कल्पना नसते. त्यामुळेच जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने विविध जनजागृती  उपक्रम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाचे नियम सर्वांनी पाळावेत  व प्रशासनाला सहकार्य करावे. कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. सुदर्शन यांनी केले. Chandrapur festival rumor control

    मनपा आयुक्त विपीन पालीवाल म्हणाले, सदस्यांच्या सूचनेनुसार सर्वधर्मीय सणांमध्ये पाणीपुरवठा नियमित होणार आहे. रामनवमीच्या दिवशी शहरातील संडे मार्केट बंद राहील. तसेच महाकाली यात्रेपूर्वी शहरातील  रस्ते चांगले होणार असून रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

    chandrapur Peace committee meeting

    अशा आहेत नागरिकांच्या सूचना –  सणानिमित्त शहरातील पाणीपुरवठा नियमित व्हावा, सण साजरे करताना इतर धर्मीयांच्या भावना दुखावू नये याची सर्वांनी काळजी घ्यावी, सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, आक्षेपार्ह पोस्टवर नियंत्रण ठेवावे, शहरातील रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करावी, अवैध धंद्यांना आळा घालावा, मिरवणुकीचे आयोजन करणाऱ्या प्रमुख प्रतिनिधींची जिल्हा प्रशासनाने बैठक घ्यावी. Chandrapur community group meeting

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांनी केले. आभार पोलिस निरीक्षक योगेश पारधी यांनी मानले. बैठकीला उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, पोलिस पाटील, दक्षता समितीचे सदस्य व जिल्हास्तरीय शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

  • Maharashtra electricity bill recovery । महावितरणचा इशारा! थकित वीजबिल भरले नाही तर वीजपुरवठा होणार खंडित

    Maharashtra electricity bill recovery

    Maharashtra electricity bill recovery : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळ कार्यालयातर्फे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात वीजबिल वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. चालू व थकीत वीजबिल भरण्याकरिता ही मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली जात असून, मार्च महिन्यात महावितरणला 23 कोटी रुपयांची वसुली साध्य करायची आहे. Electricity bill payment deadlines in Maharashtra

    चंद्रपुरात वाहतुकीचा खेळखंडोबा

    विशेष वीजबिल भरणा सुविधा – सुट्टीच्या दिवशीही केंद्र सुरू

    महावितरणच्या ग्राहकांसाठी 29, 30 आणि 31 मार्च या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र खुले ठेवण्यात येणार आहेत. तसेच, ग्राहकांना महावितरणच्या संकेतस्थळावर (Website) आणि मोबाईल ॲपद्वारे घरबसल्या वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे.

    थकबाकीदार ग्राहकांसाठी कारवाईचा इशारा!

    थकित वीजबिल असलेल्या ग्राहकांना प्रथम फोनद्वारे माहिती दिली जात आहे. त्यानंतरही बिल न भरल्यास प्रत्यक्ष भेटीद्वारे त्यांना सूचित करण्यात येत आहे. जर ग्राहकांनी सहकार्य केले नाही, तर वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

    पोलीस संरक्षणासह वीजबिल वसुली मोहीम

    वीजबिल वसुली मोहिमेस कोणताही अडथळा येऊ नये म्हणून आवश्यकतेनुसार ठिकठिकाणी पोलीस संरक्षण देखील घेतले जात आहे.

    ग्राहकांना महत्त्वाचे आवाहन

    महावितरणने सर्व ग्राहकांना मार्च 2025 अखेरीस चालू व थकीत वीजबिल भरून वीजपुरवठा खंडित होण्यापासून वंचित राहण्याचे आवाहन केले आहे. Electricity bill payment centers open on holidays

    महावितरणचे मुख्य अभियंता श्री. हरीश गजबे यांनी ग्राहकांना नियमित वीजबिल भरण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून कोणत्याही गैरसोयीशिवाय वीजपुरवठा सुरळीत राहील.

    📢 महत्वाचे:
    ✔ वीजबिल भरणा केंद्र – 29, 30, 31 मार्च रोजी खुले
    ✔ मोबाईल ॲप व वेबसाइटद्वारे ऑनलाइन बिल भरणा उपलब्ध
    ✔ थकबाकीदार ग्राहकांचे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू

    ग्राहकांनी सहकार्य करून वेळेत वीजबिल भरण्याचे महावितरणतर्फे आवाहन करण्यात आले आहे.