Author: Admin

  • Zolgensma injection For Ayush । 💔 बाळाचा जीव केवळ ‘एका इंजेक्शन’वर – पण किंमत तब्बल ₹16 कोटी!

    Zolgensma injection For Ayush

    Zolgensma injection For Ayush : चंद्रपूर – शहरातील भिवापूर वॉर्डातील गवळी मोहल्ला येथील रहिवासी अर्जुन गजर यांना चार महिन्यांचा मुलगा आयुष आहे, जो स्पाइनल मस्क्युलर अ‍ॅट्रोफी नावाच्या गंभीर आजाराने ग्रस्त आहे. हा गंभीर आजार लाखोंपैकी एकाला होतो. त्याच्या उपचारासाठी 1 इंजेक्शनचा खर्च 16 कोटी रुपये असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. जे फक्त एकदाच दिल्याने बाळ तंदुरूस्त होऊ शकते. परंतु हा खर्च मजूर म्हणून काम करणाया या असहाय्य वडिलांच्या क्षमतेपलीकडे आहे. SMA disease injection

    ताडोबा जंगलात वाघाने बछड्याला केले ठार

    ४ महिन्याच्या आयुष साठी वडिलांची धडपड

    अर्जुन चार महिन्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अर्जुनने त्याचा मुलगा आयुषला वाचवण्यासाठी सामाजिक, सेवाभावी, स्वयंसेवी संस्थां कडून आर्थिक मदतीची विनंती केली आहे. तसेच, असहाय्य वडिलांनी माहिती दिली की त्यांनी लोकप्रतिनिधींमार्फत मोदी सरकारकडे त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी मदत मागितली असल्याची माहिती पत्रपरिषदेत दिली. वडील अर्जुन गजर यांनी सांगितले की, आयुषचा जन्म 26 जानेवारी 2025 रोजी चंद्रपुर सरकारी रुग्णालयात झाला. त्यानंतर तो त्याला घरी घेऊन आले.

    Powered by myUpchar

    15 दिवसांनंतरही आयुषने कोणतीही हालचाल केली नसल्याने मुलाला डॉ. मोहुर्ले यांच्याकडे नेण्यात आले. या काळात आयुषला वारंवार न्यूमोनियाचा त्रास होत होता. उपचार करूनही तो बरा होत नव्हता. दरम्यान, सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी आयुषवर मुंबईतील वाडिया रुग्णालयात उपचार केले जातील अशी माहिती दिली. दरम्यान, मुलाला नागपूरच्या एनएसएच क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि त्याचे रक्त तपासणीसाठी बंगळुरूला पाठवण्यात आले. parents appeal for SMA treatment donation

    इंजेक्शनचा खर्च १६ कोटी रुपये

    अहवालात असे दिसून आले की मुलाला स्पाइनल मस्क्युलर अ‍ॅट्रोफी नावाच्या गंभीर आजाराने ग्रासले होते. नागपूरमधील डॉक्टरांनी त्यांना सांगितले की हा आजार लाखो मुलांपैकी एकाला होतो. डॉक्टरांनी सांगितले की त्याच्या उपचारासाठी इंजेक्शनचा खर्च 16 कोटी रुपये असेल. आणि ते एकदाच दिल्याने बाळ तंदुरूस्त होऊ शकेल परंतु हा खर्च अर्जुनच्या आवाक्याबाहेर आहे. स्पाइनल मस्क्युलर अ‍ॅट्रोफी (SMA) हा एक अनुवांशिक आजार आहे जो पाठीचा कणा आणि नसा यांना प्रभावित करतो, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात. हा रोग प्रामुख्याने मोटर न्यूरॉन्सवर परिणाम करतो जे स्नायूंवर नियंत्रण ठेवणाया चेतापेशी असतात.

    मुलाने त्याच्या शरीरावरचा ताबा गमावला आहे आणि आता तो त्याचे हात, पाय आणि मान व्यवस्थित हाताळू शकत नाही. मुलाच्या रडण्याचा आवाजही बाहेर येत नाही. यासाठी 16 कोटी रुपयांचे झोल्गेसमा इंजेक्शन आवश्यक आहे. ते ही 16 महिन्यांचे आत बाळाला द्यायचे आहे. हे इंजेक्शन जितक्या लवकर दिले जाईल तितके बाळ बरे होण्याची शक्यता जास्त असेल. योग्य उपचार न मिळाल्यास अशी मुले सहसा फक्त दोन वर्षे जगतात. help for Zolgensma injection cost

    दानशूर लोकांकडून आर्थिक मदतीची अपेक्षा

    अर्जुन गजर म्हणाले की, या आजाराने ग्रस्त असलेल्या अनेक मुलांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यांना प्रशासना व्यतिरिक्त, दानशूर लोकांनीही सहकार्य केले आहे. अशा परिस्थितीत, त्याला पूर्ण आशा आहे की त्याच्या मुलाचा जीव वाचेल. त्यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्याकडे तक्रार केली आहे.

  • tiger kills cub in buffer zone 2025 । ताडोबा प्रादेशिक जंगलात वाघाचा बछड्यावर हल्ला, बछड्याचा मृत्यू

    tiger kills cub in buffer zone 2025

    tiger kills cub in buffer zone 2025 : चंद्रपूर – ताडोबाच्या बफर झोनला लागून असलेल्या प्रादेशीक वनविकास महामंडळाच्या चिमुर तालुक्यातील महालगाव बिटातील जंगलात (कंपाटमेंट नंबर 21) मध्ये वाघाने एका बच्छड्याला ठार केल्याची घटना समोर आली आहे. काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून प्रादेशीक जंगलातून पर्यटन सफारी आटोपून येत असताना काही पर्यटकांच्या ही घटना लक्षात आली. 

    चिमूर हादरलं, तिघांनी तरुणीवर केला सामूहिक बलात्कार

    ताडोबा व्यतिरिक्त चिमुर तालुक्यात असलेल्या  प्रादेशीक वनविकास महामंडळाच्या जंगलात पर्यटन सफारी सुरू आहे. ताडोबा अभयारण्याच्या बफर झोनला लागून असलेल्या चिमुर तालुक्यातील खडसंगी वनपरिक्षेत्रातील महालगाव बिटात काही दिवसांपासून तिन बच्छड्यासह एक वाघिण भ्रमंती करताना वनविभागाला आढळून येत आहे. वनविभागाच्या ट्रॅप कॅमेरामध्ये ही ती दिसून आली आहे. wildlife conflict tiger cub death Maharashtra

    ती कुठून आली हे वनविभागालाच माहित नाही, परंतु पर्यटकांना मात्र तिचे दर्शन होत असताना काल सोमवारी (19 मे) सायंकाळी महालगाव बिटातील कंपाटमेंट क्रं. 21 मध्ये उरकुडपार तलावाजवळ दु:खद घटना समोर आली. वाघासोबत एका सात महिण्याच्या मादी बच्छड्याची झुंज झाली. यामध्ये वाघाने बच्छड्याला ठिकठिकाणी केलेल्या गंभिर दुखापतीत सात महिण्याचा मादी बच्छडा ठार झाला. वाघ आणि बच्छड्यामध्ये झालेल्या झुंजीनंतर वाघ त्या बच्छड्याला तोंडात नेत असताना काही पर्यटकांना दिसून आले. त्यामुळे या घटनेची माहिती सर्वत्र पसरली.

    बफर झोन मध्ये २ वाघांची एंट्री

    वनविभागाला सदर घटनेची माहिती झाल्यानंतर विभागीय व्यवस्थापनक मोटकर, वनपरिक्षेत्राधिकारी सोनुरकर, वनपरिक्षेत्राधिकारी देऊरकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. परिसर आणि मृतदेहाची पहाणी केल्यानंतर वाघाच्या झुंजीत बच्छड्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. विशेष म्हणजे या प्रादेशीक वनात ताडोबात दोन वाघ आल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकीच एकाने त्या बच्छड्याला ठार केल्याचा संशय वनविभागाला आहे. 5 महिन्यात आतापर्यंत एकूण 6 वाघाचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये झुंज व नैसर्गिक मृत्यूचा समावेश आहे.

    Powered by myUpchar

    उमरेड कऱ्हांडला मधून बच्छड्यांसह जान्हवी नावाची वाघिण आल्याची चर्चा

    चिमूर तालुक्यातील प्रोदशीक वनविकास मंडळाच्या जंगलात काल ज्या बच्छड्याचा वाघासोबत झालेल्या झुंजीत मृत्यू झाला. ती वाघिण काही दिवसापासून या जंगलात नव्यानेच आली आहे. तिचे वनविभाग व पर्यटकांनाही दर्शन झाले आहे. परंतु ती कुठून आली हे सांगणे कठिण असल्याचे वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु सध्या जी चर्चा सुरू आहे, त्यानुसार उमरेड कऱ्हांडला अभयरण्यातून तिन बच्छ्ड्यांसह ती वाघिण आल्याची चर्चा सुरू आहे. new tiger arrival in Chimur forest Maharashtra

    जान्हवी नावाची ती वाघिण असल्याचे सांगितले जात आहे. याच प्रादेशीक वनाला ताडोबा अभयारण्याचा बफर झोन लागून आहे. त्यामुळे त्या ठिकाणावरून दोन वाघाची प्रादेशीक वनात एन्ट्री झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे कलुवा नावाच्या वाघाने त्या बच्छड्याला ठार केल्याची चर्चा आहे. परंतु नावाबाबत मात्र अधिकाऱ्यांनी सांगण्यास नकार दिला. प्रादेशीक वनातील एन्ट्री झालेल्या त्या वाघांनी काल एका बच्छड्याला ठार केल्यानंतर त्या अन्य दोन बच्छड्यांच्या जिवाला तर धोका नाही ना अशी चर्चा पर्यटकांमध्ये सुरू आहे.  जिव धोक्यात असल्याचेही बोलल्या जात आहे. 

  • Kishor Jorgewar visit to fire affected shop । आमदार जोरगेवार यांनी जेबी आर्ट्स ची केली पाहणी

    Kishor Jorgewar visit to fire affected shop

    Kishor Jorgewar visit to fire affected shop : चंद्रपूर – शहरातील जनता कॉलेज परिसरात पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत प्रसिद्ध ‘जेबी आर्ट अँड स्टेशनरी’ हे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. या आगीत अंदाजे ५० लाख रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दुकान मालकाला आर्थिक मदत केली आहे. Kishor Jorgewar inspection at fire site

    उच्च रक्तदाब म्हणजे सायलेंट किलर

    या धक्कादायक घटनेनंतर शहरातील व्यावसायिक व नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी दुकानमालक धकाते यांची भेट घेत घटनेची माहिती घेतली आहे.

    दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू असून, फायर ब्रिगेडने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत संपूर्ण दुकान भस्मसात झाले होते. शहरातील व्यावसायिक वर्गात या घटनेमुळे चिंता पसरली आहे. सुरक्षितता आणि दुकानांच्या संरक्षक उपाययोजनांबाबत नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.

    संयुक्त उपाययोजना करा

    आमदार किशोर जोरगेवार यांनीही अशा घटना टाळण्यासाठी प्रशासन आणि व्यापारी वर्गाने संयुक्तरित्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी माजी नगरसेवक पप्पू देशमुख, प्रकाश देवतळे, तुषार सोम, मनोज पाल, श्याम हेडाऊ यांचीही उपस्थिती होती.

  • high blood pressure awareness program 2025 । “उच्च रक्तदाब म्हणजे सायलेंट किलर; जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंध”

    high blood pressure awareness program 2025

    high blood pressure awareness program 2025 : चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जागतिक उच्च रक्तदाब दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, डॉ. निखील भागवत उपस्थित होते.

    जिल्हा प्रशासनाची अंमली पदार्थविरोधात मोहीम

    यावेळी डॉ. चिंचोळे म्हणाले, उच्च रक्तदाब हा सर्वांसाठी हानीकारक आजार आहे. जास्त मीठ, चरबीयुक्त पदार्थ आणि प्रक्रिया केलेले अन्न सेवन केल्याने तसेच मद्यपान, धुम्रपान तंबाखुयुक्त पदार्थाचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब होतो. त्यामुळे ब्रेन स्ट्रोक, हार्ट अटॅक, किडनीचे आजार, पक्षाघात (लकवा) आणि डोळयाचे आजार होऊन अंधत्व येऊ शकते व इतर गंभीर आजार होण्याची शक्यता जास्त असते.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक डॉ. पद्मजा बोरकर यांनी केले. संचालन समुपदेशक रामेश्वर बारसागडे यांनी तर आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय राठोड यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा तंबाखु नियंत्रण सल्लागार डॉ. स्वेता सावलीकर, अधिपरिचारीका माया आत्राम, पाठ्यनिर्देशिका प्रज्ञा अंबादे व रिना कन्नाके, सुविधा काकडे, स्टॉफ नर्स प्राची काहिलकर तसेच रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, नर्सिंग विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

    Powered by myUpchar

    उच्च रक्तदाबाची लक्षणे

     डोकेदुखी, सतत किंवा तीव्र वेदना, छातीत दुखणे, श्वास लागणे किंवा हदयाची धडधड होणे, चेहरा लाल होणे किंवा डोळे चमकणे, घाबरटपणा होणे इत्यादी आहेत. वरील प्रमाणे लक्षणे दिसून आल्यास तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालय किंवा खाजगी रग्णालयात तपासणी करून निदान करावे. silent killer high blood pressure symptoms

    अशी घ्या काळजी :

     उच्च रक्तदाबाचे डॉक्टरांकडुन निदान झाल्यास डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार नियमीतपणे औषधोपचार घेणे. तसेच आजारापासून दूर राहण्याकरिता नियमितपणे व्यायाम, जीवनशैलीत बदल करणे, तसेच ताणतणाव दूर करण्याकरिता दिनचर्यामध्ये गाणे ऐकणे, पेपर वाचणे, पोहणे, पायी चालणे, इत्यादी चांगल्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. how to control high blood pressure naturally

    2025 ची थीम

     या वर्षाची थीम ‘तुमचा रक्तदाब अचुक मोजा, त्याला नियंत्रित ठेवा, दीर्घायुष्य जगा’ अशी आहे. उच्च रक्तदाब हा सायलेंट किलर आहे. जोपर्यंत आपण तपासणी करत नाही, तोपर्यंत स्वतःला माहित पडत नाही. करिता 30 वर्षावरील सर्व व्यक्तिनी/नागरीकांनी आपल्या नजिकच्या शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन रक्तदाब तपासणी करून घ्यावी.

  • district administration against drug abuse । अंमली पदार्थ रोखण्यासाठी ‘वन स्ट्राइक’ धोरण राबवणार – जिल्हाधिकारी

    district administration against drug abuse

    district administration against drug abuse : चंद्रपूर : अंमली पदार्थाचे सेवन म्हणजे मृत्युला आमंत्रण आहे. आजची युवा पिढी या सेवनाच्या आहारी जाऊ नये, यासाठी अंमली पदार्थाच्या सेवनमुळे मानवी जीवनावर होणा-या दुष्परिणामाबाबत लोकांमध्ये जनजागृती करा. तसेच जिल्ह्यात अंमली पदार्थाची वाहतुक, साठवणूक आणि विक्री प्रतिबंधासाठी संबंधित यंत्रणांनी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले.

    चल आजीच्या घरी सोडतो म्हणत शेतात नेले आणि नको ते घडलं

    जिल्हाधिकारी कार्यालयात नार्को – कोऑर्डिनेशन समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, केंद्रीय जीएसटी विभागाचे अधिक्षक विजयकुमार, पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, प्रदीप मडावी आदी उपस्थित होते.

    Powered by myUpchar

    शाळा – महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांकडून अंमली पदार्थ, दारु, तंबाखुचे सेवन होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत शिक्षण विभागाने मॅरेथॉन रॅली, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पथनाट्य व इतर माध्यमातून जनजागृती करावी. पोलिस विभागाच्या सहकार्याने शाळा – महाविद्यालयात कार्यशाळा आयोजित कराव्या. यासाठी वर्षभराचे योग्य नियेाजन करावे.

    अचानक भेटी द्या

    अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यात असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच मेडीकल स्टोअर्सला अचानक भेटी देऊन प्रतिबंधित ड्रग्ज विक्री होत आहे की कसे, याची तपासणी करावी. drug abuse awareness campaign in schools

    शेतकऱ्यांना अवगत करा

    जिल्ह्यात तसेच आंतरराज्य सीमेवरील शेतीमध्ये खसखस किंवा गांजा पिकाची लागवड होणार नाही, याबाबत शेतक-यांना अवगत करावे. सोबतच ग्रामस्तरावरील कृषी अधिका-यांकडून पाहणी करण्यात यावी. टपालाद्वारे येणा-या पार्सलमध्ये काही अंमली पदार्थाबाबत संशय आला तर तात्काळ पोलिसांना कळवावे. खाजगी वाहनाद्वारे येणारी टपाल, पार्सल, कुरीअर अकस्मितपणे तपासावे. एमआयडीसी परिसरात किती कारखाने आहेत, तेथे प्रतिबंधित उत्पादन होते काय, तसेच बंद असलेल्या कारखान्यांची संयुक्तरित्या तपासणी करावी, आदी सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या. police action on drug trafficking

    बैठकीचे सादरीकरण पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी केले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  • international standard museum proposal । चंद्रपूरच्या वारशाला ‘घर’ मिळणार? खासदारांनी मांडला ऐतिहासिक प्रस्ताव

    international standard museum proposal

    international standard museum proposal : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी एका भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालयाची उभारणी करावी, अशी मागणी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आज जिल्हाधिकारी विनय गौंडा यांची भेट घेऊन या  संग्रहालयचा प्रस्ताव तयार करण्याची विनंती केली आहे.  

    चिमूर तालुका हादरला

    चंद्रपूर हा ऐतिहासिक जिल्हा

    खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, “चंद्रपूर जिल्हा हा ऐतिहासिक, पुरातत्त्वीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून एक समृद्ध व गौरवशाली परिसर आहे. येथे प्राचीन मंदिरांचे अवशेष, शिलालेख, धातू व दगडी मूर्ती, प्राचीन वास्तू आणि स्थापत्यशैलीचा अनमोल ठेवा आजही अस्तित्वात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक मूर्ती व पुरावस्तू सापडल्या आहेत.” tourism potential of Chandrapur

    Powered by myUpchar

    त्या पुढे म्हणाल्या, “जिल्ह्यात एक सुसज्ज संग्रहालय नसल्यामुळे अनेक ऐतिहासिक वस्तू आणि कलाकृती योग्य देखभालीअभावी दुर्लक्षित आहेत. त्यामुळे या सर्वांना एकाच ठिकाणी आणून त्यांचे योग्य प्रदर्शन करणे गरजेचे आहे. या संग्रहालयातून केवळ जिल्ह्याच्या इतिहासाची माहिती मिळेल असे नाही, तर ते शिक्षण आणि संशोधनाचे केंद्र म्हणूनही विकसित होऊ शकेल.”

    केंद्र व राज्य सरकार सोबत पाठपुरावा

    खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि संबंधित विभागांना तातडीने या मागणीची दखल घेऊन चंद्रपूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. त्यांनी यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्याची आणि जागेची निवड प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याची गरज व्यक्त केली आहे.

    या संग्रहालयाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याची पर्यटन क्षमता वाढण्यास मदत होईल, तसेच स्थानिक कलाकारांना आणि कारागिरांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आणि सामाजिक संस्थांना या महत्त्वपूर्ण मागणीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

  • local crime news from Maharashtra । ‘घरी सोडतो’ म्हणत शेतात नेलं आणि… चिमुरमध्ये तरुणीवर तिघांकडून अत्याचार

    local crime news from Maharashtra

    local crime news from Maharashtra : चिमूर – चिमुर शहरातून पायी जाणाऱ्या एका तरूणीला मोटारसाकलने आजीच्या घरी पोहचवून देत असल्याचे सांगून पाच किमी अंतरावरील दूर शेतशिवारात नेऊन सामुहिक अत्याचार केल्याची घटना चिमुर शहारात उघडकीस आली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक जण फरार झाला असून पोलिस मागावर आहेत. प्रतीक सुनील साठोणे (वय २६), विक्की उर्फ विक्रांत खुशाल साठोणे (वय २९), रा. वर्ष नेताजी वार्ड, अंकित संजय काकडे (वय ३१) असे आरोपींचे नाव आहे.

    Powered by myUpchar

    वाघाच्या दहशतीला झुगारून जंगलात रंगला जुगार

    चल आजीच्या घरी सोडतो आणि….


    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमूर शहरातीलच एक तरूणी आपल्या आजीचे घरी दुसऱ्या वार्डात पायी चालली असताना आरोपी युवक प्रतीक सुनील साठोणे यांने त्या तरूणी जवळ जावून आजीच्या घरी सोडून देण्याचा विश्वास दाखविला. त्यामुळे तरूणी मोटारसाकलवर बसली, परंतु आरोपीने तिला आजीच्या घरी न सोडता शहरापासून द5 किमी दूर अंतरावरील तळोधी नाईक गावाच्या शेत शिवारातील झोपडीत नेऊन अत्याचार केला. त्यानंतर अन्य आरोपी विक्की उर्फ विक्रांत खुशाल साठोणे व अंकित संजय काकडे या दोघांनी तेथे जाऊन पीडितेवर अत्याचार केला. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. girl raped in village news

    २ आरोपीना अटक एक पसार


    काल सोमवारी (२० मे) पिडीत तरूणीने चिमुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी विरोधात कलम 64, 70 (1), 351 (2), 3 (5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात प्रतीक सुनील साठोणे (वय २६), विक्की उर्फ विक्रांत खुशाल साठोणे (वय २९), रा. वर्ष नेताजी वार्ड यांना अटक करण्यात आली आहे तर अंकित संजय काकडे (वय ३१) फरार झाला आहे. त्याच्या मागावर चिमूर पोलिस आहेत. या घटेनचा तपास पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीप्ती मरकाम करीत आहेत.

  • Unidentified Man Found Dead । चंद्रपूरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला; ओळख पटवण्याचे आव्हान

    Unidentified Man Found Dead

    Unidentified Man Found Dead : चंद्रपूर, दि. 18 मे 2025: महाकाली मंदिर परिसरातील भैरवनाथ मंदिराजवळ दिनांक 18 मे 2025 रोजी दुपारी 2:00 वाजता एक अज्ञात व्यक्ती (वय अंदाजे 40 वर्ष) बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी त्याच्याजवळील सामानाची तपासणी केली असता, कोणतेही ओळखपत्र आढळून आले नाही. त्याला तातडीने चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

    अल्पवयीन बालकाला दुचाकी चोरी प्रकरणी घेतले ताब्यात

    मृतकाचे वर्णन:

    • वय: अंदाजे 40 वर्ष
    • उंची: 166 सेंटीमीटर
    • रंग: काळा सावळा
    • वस्त्र परिधान: चौकडीचा फुल शर्ट, गळ्यात पांढरा दुपट्टा, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट
    • विशेष ओळख: हातात स्टीलचे कडे, उजव्या हातावर कन्नड किंवा ओडिया भाषेत लेखन आणि ओम गोंदलेले, डाव्या हातावर डिझाईन गोंदलेले

    सदर मृतकाचे प्रेत सध्या चंद्रपूर येथील सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी मृतकाच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी सर्वसामान्यांना आवाहन केले आहे. यासंदर्भात कोणतीही माहिती असल्यास कृपया खालील पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा:

    • पीएसआय विजय मुके: मोबाईल क्र. 9923401065
    • पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके: मोबाईल क्र. 9767103829
  • juvenile motorcycle theft case । चोरीच्या दुचाकीसह अल्पवयीन ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई!

    juvenile motorcycle theft case

    juvenile motorcycle theft case : जिल्ह्यात सुरु असलेल्या गुन्हेगारी जगतामध्ये महिला, पुरुष व आता विधी संघर्ष बाल्कनी एंट्री मारली आहे, घरफोडी असो कि मारहाण या गुन्हेगारीत अल्पवयीन बालके सहभाग घेत असताना निदर्शनास येत आहे. अश्याच दुचाकी चोरी प्रकरणी स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाने विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले आहे.

    वाघाची दहशत झुगारून जंगलात रंगला जुगार

    १८ मे रोजी चंद्रपूर रेल्वे स्टेशन चौकात एक विधी संघर्ष बालक विना नम्बरची दुचाकी वाहन विक्री करीता आणली, त्या दुचाकीसाठी तो ग्राहक शोधत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.

    Powered by myUpchar

    नागपुरात अनेक गुन्हे दाखल

    पोलिसांनी सापळा रचत त्या बालकाला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून २ मोपेड वाहन क्रमांक mh34 cp 1191, mh49 au 8109 जप्त केली. सादर बालकाविरुद्ध नागपूर शहरात अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहे. underage motorbike theft arrest

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे व शशांक बदामवार यांनी केली.

  • card gambling in jungle । वाघाच्या दहशतीतही जंगलात ५२ पत्त्यांचा जुगार! पोलिसांनी ११ जणांना पकडलं

    card gambling in jungle

    card gambling in jungle : भिसी – भिसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाघाई जंगलात ५२ पत्त्यांचा जुगार खेळत असताना एकूण ११ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली, यावेळी मोबाईल, तीन दुचाकी असा एकूण ३ लक्ष १९ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    खासदार धानोरकर यांच्या पाठपुराव्याला यश, हाताला पुन्हा काम भेटणार

    सध्या जिल्ह्यात वाघाची दहशत सुरु आहे, ८ दिवसात ८ नागरिकांची वाघाने शिकार केल्याची घटना घडली, मात्र वाघाच्या दहशतीला न घाबरता ११ जुगार बहाद्दरांनी थेट जंगलात जाऊन ५२ पत्त्यांचा जुगार सुरु केला. local crime branch gambling raid forest

    Powered by myUpchar

    जंगलात रंगला जुगार

    मात्र हि माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली असता १८ मे रोजी जुगार अड्ड्यावर धाड मारीत तब्बल ११ जुगार बहाद्दरांना जुगार खेळताना अटक करण्यात आली. ११ जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनिय अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष निभोरकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी नितीन कुरेवार, नितीन साळवे, जय सिंह, गणेश मोहुर्ले, संतोष येलपुलवार, गणेश भोयर, गोपाळ आतकुलवार व नितीन रायपुरे यांनी केली. जुगार प्रकरणाचा पुढील तपास भिसी पोलीस करीत आहे.