Author: Admin

  • woman attacked for mangalsutra in Maharashtra । वृद्धेवर क्रूर हल्ला! सोन्याचं मंगळसूत्र हिसकावलं; चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    woman attacked for mangalsutra in Maharashtra

    woman attacked for mangalsutra in Maharashtra : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील मोरवाही मध्ये वृद्ध महिलेला मारहाण करीत ४० हजारांचा माल अज्ञातांनी चोरून नेला होता, याबाबत पोलिसात तक्रार झाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने तपास करीत दोन आरोपीना अटक केली आहे.

    राजू रेड्डी गोळीबार प्रकरणी पोलिसांचा अहवाल

    घटना काय?

    २० मे रोजी ६५ वर्षीय वृद्ध महिला धृपताबाई प्रल्हाद रायपुरे या घरी झोपेत असताना मध्यरात्री सुमारे १ वाजता दोघांनी घरात प्रवेश करीत महिलेच्या तोंडावर हाताबुक्क्यांनी व काठीने मारहाण करीत जखमी केले व त्या महिलेच्या गळ्यातील ४ ग्राम सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. youth arrested for gold chain robbery

    सदर प्रकरणी धृपताबाई यांनी मूल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेने कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपास करीत २२ वर्षीय प्रनिकेत दिलीप शेंडे व १९ वर्षीय तनिष्क ओम मंडलेकर दोघे राहणार ताडाळा रोड वॉर्ड क्रमांक ११ यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता दोघांनी सदर गुन्हयाची कबुली दिली.

    मध्यप्रदेशात केली मंगळसूत्राची विक्री

    या गुन्ह्यात दोघांचा साथीदार नयन रामटेके यांच्यासह मिळून हा गुन्हा केला असे दोघांनी सांगितले, चोरीचे मंगळसूत्र मध्यप्रदेश राज्यातील नयनपूर येथे विकल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही आरोपीना अटक करीत मूल पोलिसांच्या हवाली केले. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे. नयन रामटेके याचा पोलीस शोध घेत आहे. Chandrapur local crime update

    सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी धनराज करकाडे, सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, चेतन गज्जलवार, प्रशांत नागोसे, प्रफुल गारघाटे, किशोर वाकाटे व शशांक बदामवार यांनी केली.

  • tiger attack compensation policy Maharashtra । वाघ हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबाना वनविभागाकडून तातडीची आर्थिक मदत!, आमदार वडेट्टीवार यांची आक्रमकता

    tiger attack compensation policy Maharashtra

    tiger attack compensation policy Maharashtra : चंद्रपूर – मागील एक महिन्याच्या कालावधीत सिंदेवाही तालुक्यातील तेंदुपत्ता हंगामा दरम्यान वाघ हल्यात 4 जणांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनांमुळे सदर परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. अशा भयावह परिस्थितीत विधिमंडळ पक्षनेते तथा लोकलेखा समिती अध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार यांनी मृतकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना शासनाच्या वतीने मिळणारी मदत तातडीने देण्याचे आदेश दिले होते. तर आज वनविभागाच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात विधिमंडळ पक्षनेते तथा लोकलेखा समिती अध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत धनादेशाचे वितरण करण्यात आले. (MLA Vijay Wadettiwar tiger attack relief) सोबतच मानव – वन्यजीव संघर्षावर उपाययोजना यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.

    राजू रेड्डी गोळीबार प्रकरणी पोलिसांचा खुलासा

    वडेट्टीवार यांची आक्रमक भूमिका

    वनपरिक्षेत्र सिंदेवाही अंतर्गत तालुक्यातील जाटलापूर येथील शामराव अर्जुन मंगाम यांचा दि.25 एप्रिल रोजी वाघ हल्यात मृत्यू झाला होता. तर दि.10 मे रोजी मेंढामlल येथील सारिका शालिक शेंडे, कांता बुधाजी चौधरी, शुभांगी मनोज चौधरी, या तीनही महिलांचा तेंदुपत्ता संकलन करण्याकरिता गेल्या असता वाघिणीने चढविलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. सिंदेवाही तालुक्यात सलग सुरू असलेल्या मानव – वन्यजीव संघर्षावर (human wildlife conflict compensation Maharashtra) विधिमंडळ पक्षनेते तथा लोकलेखा समिती अध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेत नरभक्षक वाघांना त्वरित जेरबंद करून, परिसरात नियमित गस्त व अन्य उपाय योजना करण्याचे तातडीने निर्देश दिले. यावर वनविभागाने तात्काळ अंमलबजावणी करीत गेल्या 10 दिवसाच्या आत नरभक्षक वाघीण ,व तिच्या बछड्याला तसेच नरभक्षक वाघाला जेरबंद केले.

    ४५ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण

    आज सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात विधिमंडळ पक्षनेते तथा लोकलेखा समिती अध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वाघ हल्यात मृत पावलेल्या कुटुंबीयांच्या वारसांना ध्येय असलेले एकूण 45 लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. (Chandrapur tiger attack relief fund) सोबतच भविष्यात मानव – वन्यजीव संघर्षाच्या घटना घडू नये याकरिता वनविभागाने ठोस पावले उचलून विशेष उपाययोजना करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांनी गेल्या दहा दिवसात वनविभागाच्या वतीने जेरबंद करण्यात आलेल्या एक मादी वाघ, बछडा व एक नरभक्षक वाघ , तसेच नियमित गस्त , व इतर उपाययोजनांबाबत समाधानकारक माहिती दिली.

    याप्रसंगी प्रामुख्याने सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, ब्रम्हपुरी दक्षिण वनवृत्तचे वनपरिक्षेत्र अधिकारी राम शेंडे , तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रमाकांत लोधे, शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील उट्टलवार, तालुका काँग्रेस सहकार क्षेत्राचे मधुकर बोरकर, माजी नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, मेंढामाल ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष वामनराव कोकोडे, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष सीमा सहारे, नंदा नरसाळे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अभिजीत मुप्पीडवार , महेश मंडलवार ,सचिन नाडमवार, नगरसेवक पंकज नन्नेवार,श्याम छत्रवाणी, युनुस शेख, पंकज मूलकलवार व वाघ हल्ल्यातील मृतकांच्या कुटुंबीयांचे वारसदार लाभार्थी, वनविभागाची अतिशीघ्र मदत चमू, व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

  • Police probe into fake firing incident । राजू रेड्डी यांच्या घरी गोळीबार प्रकरण! पोलिस तपासातून धक्कादायक सत्य उजेडात

    Police probe into fake firing incident

    Police probe into fake firing incident : चंद्रपूर – ९ मार्च २०२५ रोजी घुग्गुस शहर कांग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावर गोळीबार झाला अशी माहिती सर्वत्र पसरली होती, विशेष बाब म्हणजे त्यानंतर विधानसभा अधिवेशनात आमदार जोरगेवार व आमदार वडेट्टीवार यांनी या घटनेबाबत सरकारचे लक्ष वेधले होते.

    मात्र २ महिन्यांनंतर तो फुसका बार असल्याचे पोलीस अहवालात निष्पन्न झाल्याने सदर गोळीबाराची माहिती पसरवण्याची कुरघोडी कुणी केली? याबाबत आता पुढील तपास पोलीस करीत आहे.

    कांग्रेस घुग्गुस शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरातील पहिल्या मजल्यावरील पोर्च मध्ये काडतुसाच्या समोरील रिकामा केस आढळला होता. पहिल्या मजल्यावर अनुपसिंग चंदेल हे भाड्याने राहतात. Raju Reddy firing case Chandrapur update

    घुग्गुस लोहा पुलियाचे काम होणार सुरु, आमदार जोरगेवार यांच्यामुळे काम होणार सुरु

    कांग्रेस शहर अध्यक्ष रेड्डी यांच्या घरी गोळीबार झाला असल्याची माहिती ९ मार्चला रात्री वाऱ्यासारखी पसरली होती, पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेत तात्काळ रेड्डी यांच्या घरी दाखल झाले. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन हे स्वतः रेड्डी यांच्या घरी पोहचले होते. ९ मार्चला क्रिकेट मॅचचे सर्वत्र प्रसारण सुरु होते.

    पोलिसांचा अहवाल आला, गोळीबार नव्हे तो फुसकाबार

    फॉरेन्सिक टीम, बीडीएस पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व श्वान आणि आरमोरर पथक यांनी रेड्डी यांच्या घरी भेट देत प्राथमिक चौकशी केली. मात्र गोळीबार झाल्याचे काही चिन्ह आढळून आले नाही. त्यामुळे गुन्ह्याची पुष्टी करताना बॅलेस्टिक तज्ज्ञांना पाचारण केले.

    काडतुसाची रिकामी केस कुणाची?

    काडतुसाच्या रिकाम्या केसची ई फॉरेस्निक तपासणी करीता सदर काडतुसाची रिकामी केस पाठविण्यात आली, उपसंचालक, प्रादेशिक न्यायवेधक वैज्ञानिक प्रयोगशाळा गृह विभाग नागपूर यांचा अहवाल प्राप्त झाला त्यामध्ये गोळीबार झाला नाही अशी पुष्टी करण्यात आली.

    पोलिसांनी सदर प्रकरणाचा सखोल तपासही केला मात्र त्यामध्ये गोळीबार झाला असे निष्पन्न झाले नाही मात्र ती काडतुसाची रिकामी केस आली कुठून हा प्रश्न अजूनही पोलिसांच्या तपासात आहे. याबाबत पुढील तपास सुरु आहे.

  • toll-free number to report illegal alcohol sales । आमदाराने पकडली दारू प्रशासन पडले तोंडघशी, आता म्हणतात तक्रार करा

    toll-free number to report illegal alcohol sales

    toll-free number to report illegal alcohol sales : चंद्रपूर – जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती व विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

    राजुरा विधानसभेचे भाजप आमदार देवराव भोंगळे यांनी नागरिकांच्या तक्रारीवर अवैध दारू पकडल्याने चंद्रपूर जिल्हा प्रशासन आता खळबळून जागे झाले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेकठिकाणी अवैध व नकली दारूचा पुरवठा होतो मात्र यावर उत्पादन शुल्क विभाग कारवाई करीत नाही, यावर आमदार भोंगळे यांनी तत्परता दाखविल्याने प्रशासन तोंडघशी पडले आहे.

    नागभीड तालुक्यातील नरभक्षक वाघ अखेर जेरबंद

    या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक रीना जैनबंधू, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा प्रमुख नितीन धार्मिक, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) योगेश पारधी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

    नागरिकांच्या तक्रारींवर कारवाई करा

    बैठकीत पोलिस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध दारूविरोधात राबवलेल्या विविध कारवायांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीवर दोन्ही विभागांनी संयुक्तपणे तात्काळ कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी यावेळी दिले. प्रशासनाच्या तत्परतेमुळे नागरिकांचा यंत्रणांवरील विश्वास वाढेल आणि अवैध दारूमुळे उद्भवणाऱ्या सामाजिक व आरोग्यविषयक समस्यांपासून त्यांना प्रभावी संरक्षण मिळेल, असेही ते म्हणाले. how to report illegal liquor in Maharashtra

    पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे संयुक्त पथक कारवाई करणार

    अवैध दारू निर्मिती व विक्री रोखण्यासाठी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संयुक्त पथक नियमितपणे कारवाईचा आढावा घेईल. तसेच तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करून प्रभावी नियंत्रण ठेवण्यात यावे. अवैध दारूच्या विरोधात जनतेचा सहभाग महत्त्वाचा असल्याने दिलेल्या क्रमांकांवर नागरिकांनी तक्रारी नोंदवाव्यात. जिल्हा प्रशासन अवैध दारू निर्मिती व विक्री रोखण्यासाठी कटीबद्ध असून, सर्व नागरिकांनी या मोहिमेत सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

    तक्रारी करिता क्रमांक

    जिल्हा प्रशासनाचे “वंदे मातरम चांदा” टोल फ्री क्रमांक : 1800-233-8691. राज्य उत्पादन शुल्क विभाग टोल फ्री क्रमांक : 1800-233-9999- व्हाट्सअप क्रमांक : 8422001133).

  • man eater tiger captured । नागभीड तालुक्यातील नरभक्षक वाघ अखेर जेरबंद, २ नागरिकांची केली होती शिकार

    man eater tiger captured

    man eater tiger captured : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात ५ महिन्यात वाघाने अक्षरक्षा धुमाकूळ घातला असून आतापर्यन्त तब्बल २२ नागरिकांचा बळी वाघाने घेतला आहे. मे महिन्यात ९ नागरिकांना वाघाने ठार केले असून यामध्ये तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांचा समावेश आहे. forest conflict

    नागभीड तालुक्यात २ नागरिकांची शिकार करणारा TATR 224 या नर वाघाला २३ मे रोजी सकाळी ११.३० वाजता गंगासागर हेठी बिट, सावर्ला रिट, शासकीय जमीन सर्वे क्र.२ तळोधी-बाळापूर वनपरिक्षेत्र येथे वनविभागाने डार्ट मारीत जेरबंद केले.

    भाजप आमदाराने पकडली अवैध दारू

    २ नागरिकांचा घेतला होता बळी

    नागभीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रात १५ एप्रिल रोजी गंगासागर हेठी येथील मारोती सखाराम बोरकर (वय ४५) व १८ मे रोजी वाढोणा येथील मारोती नकटू शेंडे (वय ६४)या दोघांवर आलेवाही बीट परिसरात हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता  . या घटनेनंतर वनविभागाने वरिष्ठांची परवानगी घेत वाघाला पकडण्यासाठी मोहीम राबवली. आज वनविभागाच्या मोहिमेला यश मिळाले सदर नरभक्षक नर वाघ हा अंदाजे ८ वर्षाचा आहे.

    forest conflict

    सदर नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी या मोहिमेत उपवन संरक्षक राकेश हेपट, सहायक वनसंरक्षक महेश गायकवाड, बायोलॉजिस्ट राकेश अहुजा, डॉ, रविकांत खोब्रागडे, पोलीस दलातील शुटर अजय मराठे, वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण कन्नमवार,अरविंद माने, राजेंद्र भरणे, घनश्याम लोनबले यांनी अथक परिश्रम केले.

  • Ghugus Loha pul । घुग्गुस लोहा पुलाचे काम होणार सुरु, आमदार जोरगेवार सरसावले

    Ghugus Loha pul

    Ghugus Loha pul : घुग्घुस रेल्वे सायडिंग वरील मागील दोन वर्षांपासून बंद असलेल्या लोखंडी पुलाच्या कामास येत्या १० दिवसांत सुरुवात करावी, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

       सदर विषयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, वेकोलि वणी एरियाचे अभियंता जमगाडे, रेल्वे अभियंता राजूरकर, घुग्गुस नगरपरिषदचे दिनेश बावणे, आशिष मासिरकर, सोनल भरडकर, सन्नी खारकर, संजय भोंगळे, अनिल यादव, किरण पूरेली, राजूभाऊ जगताप, सक्कील राईन, दिनेश बोरपे, , संतोष नुन्ने, संजय तिवारी, मयूर कलवल आदींची उपस्थिती होती.

    स्थानिक आमदार निधीतून चंद्रपूर मनपाला मिळाले ३ नवे पाणी टँकर

    नागरिकांना अडचणीचा सामना

    या पुलाच्या बंदमुळे सायडिंग कॉलनीतील नागरिकांना घुग्घुस शहरातील बाजारपेठेत ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे वणी रोडवरील पुलाचे कामही अपूर्ण असल्याने वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. problems faced by locals due to incomplete bridges


        यावेळी बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, हा पूल घुग्घुसच्या जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांपासून महिलांपर्यंत, कामगारांपासून वृद्धांपर्यंत सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कामाची अधिक विलंब सहन केला जाणार नाही. १० दिवसात प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले पाहिजे अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.


      यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनीही प्रशासनाच्या वतीने तातडीने हालचाली करण्याचे आश्वासन दिले. लवकरच रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या समन्वयातून काम सुरु करण्यात येईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

  • mla action against illegal alcohol । गावकऱ्यांची तक्रार, आमदार भोंगळे यांनी पकडली अवैध दारू

    mla action against illegal alcohol

    mla action against illegal alcohol : कोरपना – कोरपना तालुक्यातील दुर्गाडी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या पाहणीदरम्यान ग्रामस्थांनी अवैध दारू विक्रीबाबत तक्रार केल्यानंतर राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनी तत्काळ कारवाई केली.

    महिला कैद्यांना कारागृहात शिक्षेसोबत मिळतेय संधी


    ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गाडी फाट्यालगत राष्ट्रीय महामार्गावरिल एका शेतात अवैध देशी दारू विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. या माहितीची गंभीर दखल घेत आमदार भोंगळे यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. संबंधित ठिकाणी धडक देत त्यांनी कोरपना पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत दोन पेट्या अवैध देशी दारू जप्त केली.

    ही कारवाई ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी आमदार भोंगळे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत सांगितले की, यापुढे अशा प्रकारची अवैध विक्री आढळल्यास त्वरित आणि कठोर कारवाई करण्यात यावी.

    दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले

    या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी आमदारांच्या या तत्परतेचे कौतुक केले असून, गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत केले आहे

  • vocational training for female prisoners । कारागृहात शिक्षेबरोबरच संधीही! महिला कैद्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण सुरू

    vocational training for female prisoners

    vocational training for female prisoners : चंद्रपूर – कारागृह हे केवळ शिक्षा भोगण्याचे ठिकाण राहिलेले नसून, आता ते महिला कैद्यांच्या पुनर्वसनाचे केंद्र बनले आहे. श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था, बल्लारपूर यांनी चंद्रपूर जिल्हा कारागृहातील महिला कैद्यांसाठी मेहंदी, ब्युटी पार्लर, शिवणकाम आणि भरतकामाचे प्रशिक्षण सुरू केले आहे. या उपक्रमामुळे महिला कैद्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, त्यांचे जीवन उजळण्यास मदत मिळत आहे.

    आमदार करण देवतळे यांचा पॉवर प्रोजेक्ट

    या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन तुरुंग अधीक्षक अनुप कुमार कुमारे यांच्या हस्ते झाले. या वेळी पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार, वरिष्ठ तुरुंगाधिकारी नागेश कांबळे, कारागृह शिक्षक संजीव हातवडे, तसेच प्रशिक्षिका कविता डेरकर आणि रीना पोर्टेट उपस्थित होत्या.

    श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था हे केवळ चंद्रपूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील तुरुंगांमध्ये कैद्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे महिला कैद्यांना सुटकेनंतर नवजीवन सुरू करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळते. beauty parlour courses in jail

    आमच्या जीवनात आशेचा किरण

    महिला कैद्यांनीही या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “या प्रशिक्षणामुळे आमच्या अंधाऱ्या जीवनात आशेचा किरण निर्माण झाला आहे. सुटकेनंतर आम्ही हे कौशल्य वापरून आमच्या कुटुंबाचा आधार बनू, तसेच समाजातील इतर महिलांनाही स्वावलंबी बनवण्यासाठी प्रेरणा देऊ.”

    या कार्यक्रमाला महिला कैदी, तुरुंग कर्मचारी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Karan Deotale on lendhala lake project | लेंडाळा तलावाचा कायापालट! आमदार करण देवतळे यांचा ‘पॉवर’ प्रोजेक्ट!

    Karan Deotale on lendhala lake project

    Karan Deotale on lendhala lake project :भद्रावती – भद्रावती शहराच्या हृदयस्थानी असलेला ऐतिहासिक लेंडाळा तलाव लवकरच नव्या रूपात उजळून निघणार आहे. केंद्र सरकारच्या ‘अमृत २.०’ योजनेअंतर्गत १७ कोटी रुपयांचा भव्य प्रकल्प मंजूर झाला असून, या प्रकल्पाच्या मंजुरीमागे आमदार करण देवतळे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि राजकीय इच्छाशक्ती निर्णायक ठरली आहे.

    चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन झाले हायटेक

    लेंडाळा तलाव हा केवळ जलस्रोत नसून शहरवासीयांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग राहिला आहे. या तलावाभोवती अनेक पिढ्यांच्या आठवणी रुजल्या आहेत. मात्र गेल्या काही दशकांत दुर्लक्षित झालेल्या या तलावाच्या संवर्धनाची गरज भासू लागली होती. ही गरज ओळखून आमदार देवतळे यांनी राज्य शासन व केंद्र शासनाच्या नागरी विकास मंत्रालयाशी सातत्याने पत्रव्यवहार केला, बैठका घेतल्या, प्रस्ताव सादर केले. त्यांनी तलावाच्या ऐतिहासिक, पर्यावरणीय आणि सामाजिक महत्त्वावर भर देत हे काम केवळ सौंदर्यीकरणापुरते मर्यादित न ठेवता एकात्मिक विकासाचे दृष्टीकोन सादर केला. Beautification of Lendhala lake

    तलावाचे होणार सौंदर्यीकरण

    या मंजूर प्रकल्पात तलावाची सखोल स्वच्छता, गाळ काढणे, काठाच्या मजबुतीकरणासह संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण, फिरण्यासाठी पायवाटांची निर्मिती, दिव्यांची व्यवस्था, बसण्यासाठी आसन व्यवस्था, पर्यटकांसाठी आकर्षक व्यवस्था आणि शहरवासीयांसाठी विश्रांतीचे उत्तम ठिकाण उभारण्याचे नियोजन आहे. यामुळे या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळणार असून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील.

  • chanda fort railway station upgrade । चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन झाले हायटेक! 🤩

    chanda fort railway station upgrade

    चांदाफोर्ट स्थानकाचा ऐतिहासिक कायापालट हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा परिणाम – आ. किशोर जोरगेवार

    chanda fort railway station upgrade : चंद्रपूर – चांदाफोर्ट स्थानकाचा झालेला कायापालट हा केवळ भौतिक स्वरूपातील बदल नाही, तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे मूर्तस्वरूप आहे. त्यांच्या संकल्पशक्तीमुळे आणि केंद्र शासनाच्या सहकार्यामुळेच आज चंद्रपूरकरांना स्वच्छ, सुसज्ज आणि आधुनिक रेल्वे स्थानक अनुभवता येत आहे. चांदाफोर्ट स्थानकाचा ऐतिहासिक कायापालट हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Amrit Bharat Station scheme Chandrapur

    रेल्वे केवळ प्रवासाचे नाहीतर विकासाचे साधन – खासदार प्रतिभा धानोरकर

    अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत चांदाफोर्ट रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, स्वातंत्र्यसैनिक डॉ. शेषरावजी इंगोले, मुख्य अभियंता बी.व्ही.एस. सुब्रमण्यम, दामोदर मंत्री, पूनम तिवारी, प्रकाश देवतळे, सुभाष कासनगोट्टुवार, विठ्ठल डुकरे, रवी गुरनुले, देवानंद वाढई, मधुसूदन रुगंठा, प्रदीत किरमे, वंदना हातगावकर, मधुकर राहूत, सुदामा यादव, विश्वजित शाहा, नकुल वासमवार, विनोद अनंतवार, कार्तिक बोरेवार, राहुल मोहुर्ले, शेखर शेट्टी, सलीम शेख आदींची उपस्थिती होती.

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात “अमृत भारत स्टेशन योजना” अंतर्गत देशातील १०३ नव्याने पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे लोकार्पण झाले, ही आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब आहे. चांदाफोर्ट स्थानकाचे या यादीत समावेश होणे हे आपल्यासाठी विशेष महत्त्वाचे आहे. चांदा फोर्ट स्थानक हे केवळ एक स्थानक नसून, हे या परिसराचा सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार ठरेल. या स्थानकामुळे स्थानिक नागरिकांना आधुनिक, स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज सेवा मिळतील. आता हे स्थानक अधिक सुरक्षित आणि सुसज्ज सुविधांनी युक्त असेल. स्थानकातील प्रवाशांसाठी नवीन सुविधा, व्हीलचेअर ॲक्सेस, सुसज्ज प्रतीक्षा कक्ष, डिजिटल सिस्टीम्स, एलईडी डिस्प्ले, आधुनिक तिकीट व्यवस्था, स्वच्छतागृहे, आणि व्यावसायिक गरजांसाठी सुलभ मालवाहतूक व्यवस्थापन – या सर्व सुविधा मिळणार आहेत. Benefits of Amrit Bharat scheme in Chandrapur

    केंद्र शासनाच्या सहकार्याने, रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून हे शक्य झाले

     स्थानकासह रस्ते, वीज, पाणी, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी अधिकाधिक योजना राबवण्याचा आमचा प्रयत्न राहील. तसेच या परिसरातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.