Chandrapur Police Seized Weapons । चंद्रपूर शहरातील रस्त्यावर हातात तलवार घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न

Chandrapur Police Seized Weapons

Chandrapur Police Seized Weapons : चंद्रपूर २४ सप्टेंबर २०२५ : रामनगर पोलिसांनी शहरात तलवारी घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी धीरज बबलू यादव (वय ३२, रा. लखमापूर, जि. चंद्रपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून तीन स्टीलच्या तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी त्याचा साथीदार राहुल (रा. लखमापूर) हा मात्र फरार आहे.

वडिलांसमोर मुलावर वाघाचा हल्ला, मुलगा ठार

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात गस्त घालत असताना, त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, काही व्यक्ती तलवारी घेऊन दहशत निर्माण करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव ते आंबेडकर सभागृह परिसरात धीरज यादव हातात तलवार घेऊन लोकांना धमकावत असताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले.

साथीदार पसार

पोलिसांनी त्याच्याकडून ३,००० रुपये किमतीच्या तीन धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात धीरज यादव आणि त्याचा साथीदार राहुल (मो. ७४९९१७२२४) यांच्याविरोधात भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा (अ.क्र. ७७९/२०२५) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय बलराम झाडोकर, पीएसआय संतोष निभोरकर, पीएसआय सर्वेश बेलसरे, पोहेकॉ जय सिंग, सचिन गुरनुले, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे आणि दिनेश अराडे यांच्या पथकाने केली. फरार आरोपी राहुलचा पोलीस शोध घेत आहेत.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *