Tag: Chandrapur crime news 2025

  • Juvenile crime Chandrapur । चंद्रपुरात अल्पवयीन मुलाचा कारनामा; १७ मोबाईल, सोने व दुचाकी जप्त

    Juvenile crime Chandrapur

    Juvenile crime Chandrapur : चंद्रपूर ५ नोव्हेम्बर (News३४) – २२ सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीची घटना घडली होती ज्यामध्ये तब्बल २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरून नेला होता, शहर पोलिसांना या प्रकरणात दीड महिन्यांनी यश मिळाले असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

    २२ सप्टेंबर ला नांदगाव पोडे मध्ये राहणाऱ्या ३४ वर्षीय नीता आकाश आत्राम या आपल्या बिनबा गेट मध्ये राहणाऱ्या आईकडे गेली होती, रात्री घराचा दरवाजा टेकवून नीता आत्राम ह्या झोपी गेल्या असत्या त्यावेळी अज्ञाताने घरी प्रवेश करीत सोनीचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या जिवत्या व रोख रक्कम असा एकूण २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमालावर हात साफ केला.

    Also Read : चंद्रपुरात मनसे पक्षात असंख्य नागरिकांचा प्रवेश

    याबाबत नीता आत्राम यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता तब्बल दीड महिन्याच्या कालावधीनंतर चोरीचा गुन्हा विधिसंघर्ष बालकाने केला असल्याचे निष्पन्न होताच, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी विधिसंघर्ष बालकाकडून १८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. Chandrapur minor theft arrest

    अनेक गुन्हे उघड

    विशेष बाब म्हणजे त्या विधिसंघर्ष बालकाने चंद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी चोरी व इतर गुन्हे केले असल्याची कबुली दिली, आरोपी बालकाकडून दुचाकी क्रमांक MH ३४ BS २४५२ सह तब्बल १७ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल अँपल कंपनीचा लॅपटॉप असा एकूण ३ लाख २३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलटें, विलास निकोडे, संजय धोटे, सचिन बोरकर, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, भावना रामटेके, कप्र्रचंड खरवार, रुपेश पराते, निलेश ढोक, योगेश पिदूरकर, विक्रम मेश्राम, प्रफुल भैसारे, दीपिका झिंगरे व सारिका गौरकार यांनी केली.

  • Chandrapur crime hotspot police patrol | चंद्रपुरात गुन्हेगारी वाढतेयं; पोलीस गस्तीचे काय?

    Chandrapur crime hotspot police patrol

    Chandrapur crime hotspot police patrol : चंद्रपूर 24 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – 22 ऑक्टोबर च्या रात्री चंद्रपुरातील लॉ कॉलेज परिसरात 27 वर्षीय नितेश ठाकरे या युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आरोपीच्या मनात मृतकबद्दल इतका राग होता की त्यांनी नितेश च्या पोटाचा अक्षरशः कोथडा बाहेर काढला होता.

    Also Read : दिवाळी आहे, मला कपडे हवे, कपडे नाही पण त्याचा कोथडा काढला, युवकाची हत्या


    सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे अवघ्या 1 तासात हत्याकांडाचा उलगडा करीत 6 आरोपींना अटक केली.
    चंद्रपुरातील असे अनेक निर्जन ठिकाण आहे जिथे अनेक गुन्हेगारी कार्य सुरू असते, तत्कालीन पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी गुन्हेगारी वृत्तीवर आळा बसावा याकरिता शहरातील निर्जन ठिकाणी नियमित पेट्रोलिंग सुरू केली होती. Chandrapur crime capital


    परदेशी यांची बदली झाली आणि पुन्हा जैसे थे ची स्थिती निर्माण झाली, विशेष बाब म्हणजे तुकुम परिसरातील अतिक्रमण परदेशी यांच्या काळात काढण्यात आले होते, मात्र आज तुकुम हे पूर्वीसारखे झाले, कुणाचेही लक्ष त्याठिकाणी नाही.

    चंद्रपुरातील निर्जन परिसर

    शहरातील लॉ कॉलेज परिसर, बाबूपेठ भागातील डीएड कॉलेजच्या मागील भाग, रामाला तलाव, डॉ.आंबेडकर कॉलेजच्या मागे, दाताला पूल, रामनगर परिसरातील मेडिकल कॉलेजच्या समोरील भाग असे अनेक निर्जन ठिकाण शहरात आहे ज्याठिकाणी पोलिसांची नियमित गस्त आवश्यक आहे.


    लॉ कॉलेज परिसरात सायंकाळ पासून दारू, नशा असे अनेक प्रकार सुरू असतात मात्र त्याठिकाणी पोलिसांची पेट्रोलिंग आता नाममात्र झाली आहे. जर पोलीस नियमितपणे शहरातील निर्जन स्थळी गस्तीचे प्रमाण वाढवतील तर गुन्हेगारीवर काही प्रमाणात आळा नक्की बसणार, मात्र सध्यातरी अशी परिस्थिती चंद्रपुरात नाही.
    सध्या जिल्हा क्राईम कॅपिटल बनत आहे, एमडी पावडर, असंख्य शस्त्र सहज उपलब्ध होऊ लागले आहे, गुन्हेगारी वाढत आहे, मात्र यावर पोलीस विभागाचे नियंत्रण नसल्यासारखे आहे.


    पोलीस विभाग नियमित पणे लॉ कॉलेज परिसरात गस्त करीत असते तर कदाचित नितेश चा जीव वाचला असता.
    काही दिवसांपूर्वी चंद्रपूर शहरात 4 युवकांना बंदूक, माऊझर व खंजर सहित अटक करण्यात आले होते, या प्रकरणातील आरोपी हे मोठा घातपात करण्यासाठी शहरात आले, पोलिसांनी त्यांना आधीच अटक करीत त्यांचा डाव उधळून लावला. शहरात शस्त्रांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत असताना सुद्धा पोलिसांना याबाबत तिळमात्र माहिती का बरं मिळत नाही हा एक न सुटलेला प्रश्नच आहे.

  • Chandrapur gang arrested with weapons : चंद्रपुरात मोठा घातपात टळला; नेमका गेम कुणाचा?

    Chandrapur gang arrested with weapons

    Chandrapur gang arrested with weapons : चंद्रपूर 21 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – ऐन दिवाळीमध्ये चंद्रपुरात मोठा घातपात होण्यापूर्वी पोलिसांनी कारवाई करीत 2 माऊझर सह 2 देशी कट्टे 35 जिवंत काडतुसे व चार खंजर असा शस्त्रसाठा जप्त केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत चन्द्रेश उर्फ छोटू देसराज सूर्यवंशी, बोरिस श्रीनिवास कुसुमा, मुकेश राजू वर्मा उर्फ टँक्यु, अमित बाडूकराम सोनकर सर्व राहणार बल्लारपूर यांना अटक केली अशी माहिती पोलिसांतर्फे मिळाली. Mauser guns seized Chandrapur

    Also Read : चंद्रपुरातील कुख्यात गुन्हेगाराला केले स्थानबद्ध


    ऐन दिवाळीच्या पूर्व संध्येला चंद्रपूर शहर पोलिसांना गस्तीदरम्यान माहिती मिळाली की शहरात देशी कट्टा घेऊन काही इसम येणार आहे.
    माहितीच्या आधारे पोलिसांनी गंजवार्ड मधील दादामिया ट्रान्सपोर्ट समोर सापळा रचला असता 2 चारचाकी व एक दुचाकी वाहनात तब्बल 8 जण त्याठिकाणी आले असता पोलिसांनी 4 जणांना पकडले. त्यापैकी 4 जण पसार झाले.


    पोलिसांनी चारचाकी वाहनांची झडती घेतली असता दोन देशी कट्टे, दोन माऊझर गन, 35 जिवंत काडतुसे, 4 खंजर सह तब्बल 17 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
    शहर पोलिसांनी आरोपींवर भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करीत फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.

    रेकॉर्डवरील छोटू कोण आहे?


    12 जुलै 2021 मध्ये चंद्रपुरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये आकाश उर्फ चिन्ना अंदेवार यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. गोळीबार करणारा आरोपी हा छोटू सूर्यवंशी होता. 3 वर्षांनी 4 जुलै 2024 रोजी रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. pre-Diwali crime crackdown Chandrapur


    सदर वाद हा सुरज बहुरीया हत्याकांडाशी जोडल्या गेला आहे, बहुरीया हत्याकांड प्रकरणी अंदेवार बंधू यांना अटक करण्यात आली होती, त्या खुनाचा बदला घेण्यासाठी सदर गोळीबार घडवून आणला होता.

    live cartridges seizure Chandrapur

    सध्या आकाश अंदेवार यांच्यावर MPDA कलमाखाली कारवाई करण्यात आली असून त्यांची प्रकृती बरी नसल्याने सध्या ते जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे, 20 ऑक्टोबर रोजी दोघेही बंधू सामान्य रुग्णालयात होते, हे विशेष. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 15 इसम चंद्रपुरात दाखल झाले होते, त्यापैकी 8 गंजवार्ड मध्ये तर उर्वरित सामान्य रुग्णालयात रेकी करीत होते. पोलिसांनी वेळीच आरोपींना पकडल्याने मोठा घातपात टळला. मात्र अंदेवार बंधुवर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


    चंद्रपुरात इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्र आले पण त्याची साधी चाहूल पोलिसांना लागली नाही हे विशेष. सदर आरोपी हे अंदेवार बंधुवर हल्ला करण्यासाठी आले होते का? त्यांची संख्या नेमकी किती होती? शस्त्रे कुठून आली? रुग्णालयात कुणी रेकी केली होती का? याबाबत खुलासा पोलीस तपासात होणारचं.

  • Chandrapur Police Seized Weapons । चंद्रपूर शहरातील रस्त्यावर हातात तलवार घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न

    Chandrapur Police Seized Weapons

    Chandrapur Police Seized Weapons : चंद्रपूर २४ सप्टेंबर २०२५ : रामनगर पोलिसांनी शहरात तलवारी घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी धीरज बबलू यादव (वय ३२, रा. लखमापूर, जि. चंद्रपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून तीन स्टीलच्या तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी त्याचा साथीदार राहुल (रा. लखमापूर) हा मात्र फरार आहे.

    वडिलांसमोर मुलावर वाघाचा हल्ला, मुलगा ठार

    स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात गस्त घालत असताना, त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, काही व्यक्ती तलवारी घेऊन दहशत निर्माण करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव ते आंबेडकर सभागृह परिसरात धीरज यादव हातात तलवार घेऊन लोकांना धमकावत असताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले.

    साथीदार पसार

    पोलिसांनी त्याच्याकडून ३,००० रुपये किमतीच्या तीन धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात धीरज यादव आणि त्याचा साथीदार राहुल (मो. ७४९९१७२२४) यांच्याविरोधात भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा (अ.क्र. ७७९/२०२५) दाखल करण्यात आला आहे.

    ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय बलराम झाडोकर, पीएसआय संतोष निभोरकर, पीएसआय सर्वेश बेलसरे, पोहेकॉ जय सिंग, सचिन गुरनुले, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे आणि दिनेश अराडे यांच्या पथकाने केली. फरार आरोपी राहुलचा पोलीस शोध घेत आहेत.

  • chandrapur crime branch action । चंद्रपूर गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई – 24 तासांत 3.38 लाखांचा माल जप्त 🚔

    chandrapur crime branch action

    chandrapur crime branch action : चंद्रपूर ११ सप्टेंबर २०२५ – नवीन घराचे बांधकाम सुरु असताना अज्ञात आरोपींनि घराच्या पेंटिंगसाठी लागणारे पेन्टचे डब्बे व इलेकट्रीक साहित्याची चोरी केल्याची घटना १० सप्टेंबर रोजी पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली, मात्र या प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांच्या आत करीत २ आरोपीना अटक करीत तब्बल ३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    चंद्रपुरातील जटपुरा गेट परिसरात पहाटे धक्कादायक दुर्घटना

    चंद्रपूर जिल्ह्यात चोरी, घरफोडी, अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा मोहीम राबवित आहे, या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकाने १० सप्टेंबर रोजी पेन्टचे डब्बे व इलेकट्रीक साहित्यांची चोरी करणाऱ्या आरोपीना अटक केली. पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या ५४ वर्षीय धीरज ठाकूर यांच्या नव्या घराचे बांधकाम महाकाली नगर २ मध्ये सुरु होते. यावेळी नव्या घरासाठी पेंटिंग व इलेक्ट्रिक फिटिंग साठी लागणारे साहित्य घरी आणून ठेवले होते. मात्र १० सप्टेंबर बुधवारी अज्ञातांनी ते साहित्य लंपास केले. याबाबत ठाकूर यांनी पडोली पोलीस स्टेशनमध्ये याबाबत फिर्याद नोंदवली. quick police action

    गुन्हे शाखेची शिताफी आणि गुन्हा उघड

    गुन्हा दाखल होताच सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या पथकाने सुरु केला, पडोली परिसरात दोघेजण पेन्टचे डब्बे व इलेक्ट्रिक साहित्य विकण्यासाठी फिरत आहे, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने दोघांना ताब्यात घेत विचारपूस केली असता ठाकूर यांच्या घरी झालेली चोरी त्यांनी केली असल्याचे कबूल केले. electric supplies stolen Chandrapur arrest

    गुन्हे शाखेने आरोपी २९ वर्षीय शादाब शब्बीर सैफी राहणार नेरी वार्ड दुर्गापूर व २८ वर्षीय सोहेल कादिर सय्यद नेरी वॉर्ड दुर्गापूर यांना अटक केली, दोघांना पडोली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी गुन्हे शाखेने चोरी केलेला माल व गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा एकूण ३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सपोनि दीपक कांक्रेडवार, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, रजनीकांत पुठ्ठावार, सतीश अवथरे, दीपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, शशांक बदामवार व मिलिंद टेकाम यांनी केली.

  • Chandrapur police mafedrone seizure 57 grams । चंद्रपूरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! ५७ ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज जप्त

    Chandrapur police mafedrone seizure 57 grams

    Chandrapur police mafedrone seizure 57 grams : चंद्रपूर: चंद्रपूर पोलिसांनी अवैध अंमली पदार्थांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि रामनगर पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत रहमतनगर येथील एका कुख्यात गुन्हेगाराकडून ५७.२६० ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) ड्रग्स पावडर जप्त करण्यात आली आहे. या ड्रग्जची किंमत ४ लाख १९ हजार १०० रुपये असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

    वीरुगिरी आंदोलनाला यश

    मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद शादाब अब्दुल रऊफ शेख (रा. रहमतनगर) नावाचा रेकॉर्डवरील गुन्हेगार आपल्या घरात मॅफेड्रॉन ड्रग्जची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे २२ ऑगस्ट रोजी पोलिसांनी सापळा रचून आरोपीच्या घरावर छापा टाकला. NDPS Act Chandrapur arrest

    ५७.२६० ग्रॅम एम.डी. ड्रग्ज पावडर

    छाप्यादरम्यान, पोलिसांना आरोपीकडे ५७.२६० ग्रॅम एम.डी. ड्रग्ज पावडर, दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ९१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

    आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट-१९८५ च्या कलम ८(क) आणि २१(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे, रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. आसिफराजा शेख यांच्यासह दोन्ही विभागांतील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

    या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना अंमली पदार्थांच्या धोक्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन समाजासाठी अत्यंत घातक असून, अशा गैरकृत्यांची माहिती मिळाल्यास चंद्रपूर पोलिसांच्या 7887890100 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.