Chandrapur ganja seizure
Chandrapur ganja seizure : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात अंमली पदार्थाचे मोठे जाळे पसरलेले असून विविध मार्गातून गांजा व मेफेड्रोन पावडर चंद्रपुरात आता सहजपणे उपलब्ध होत आहे, नागपूर नंतर चंद्रपूर सारख्या लहान शहरात या अंमली पदार्थाने आपलं ठाण मांडलं आहे. १६ ऑगस्ट रोजी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने माहितीच्या आधारे तब्बल १ किलो ५८७ ग्राम गांजा पकडला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने २ आरोपीना अटक करीत एकूण १ लाख ७४ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
बाबुपेठ मध्ये मेफेड्रोन पावडरची वाहतूक, दोघांना अटक
१६ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गांजाची वाहतूक होणार अशी गोपनीय माहिती मिळाली होती, गुन्हे शाखेच्या शोध पथकाने रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बंगाली कॅम्प येथे सापळा रचला, यावेळी दुचाकी वाहन क्रमांक एमएच३४ ६९५६ येताना दिसले पोलिसांनी सदर वाहन थांबवित वाहनावर बसलेल्या इसमाच्या बॅगेची झडती घेतली त्यामध्ये १ किलो ५८७ ग्राम गांजा पोलिसांना आढळला.
आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार
पोलिसांनी दुचाकी चालक व मागे बसलेला इसम नामे २१ वर्षीय दीपक राजू भोले व ३२ वर्षीय बिश्वजीत बिमल सिकद्दर राहणार शांतीनगर बंगाली कॅम्प यांना अटक करीत त्यांचेजवळील गांजा व दुचाकी वाहन जप्त करीत आरोपीवर एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेतील आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. Chandrapur drug bust

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, प्रमोद डंभारे व गजानन मडावी यांनी केली.
Leave a Reply