burglary and bike theft solved
burglary and bike theft solved : चंद्रपूर, [17 ऑगस्ट ] – चंद्रपूर शहरातील प्रांतिक कॉलनी, भिवापूर वॉर्ड येथे घडलेली घरफोडी आणि मोटारसायकल चोरीची दोन प्रकरणे चंद्रपूर शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत उघडकीस आणली आहेत. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेला ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
चंद्रपुरात गांजाची वाहतूक करणाऱ्या २ आरोपीना अटक
घटनेचा तपशील:
प्रांतिक कॉलनी, भिवापूर वॉर्ड येथील एका महिलेने १५ ऑगस्ट रोजी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की, ती ११ ऑगस्ट रोजी बाहेरगावी गेली होती. १४ ऑगस्ट रोजी घरी परतल्यानंतर तिला घराचे कुलूप तुटलेले दिसले आणि घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. तात्काळ तक्रार दिल्यानंतर, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (B.N.S.) कलम ३३१(३), ३३१(४), आणि ३०५ नुसार घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
पोलिसांची कारवाई:
गुन्हा दाखल होताच, चंद्रपूर शहर पोलिसांनी तत्परतेने तपासचक्रे फिरवली. गोपनीय माहिती आणि तपास कौशल्याचा वापर करून त्यांनी काही वेळातच आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी सुमित शांताराम अम्राजवार (वय २८) आणि तनवीर कदीर बेग (वय २३), दोघेही रा. भंगाराम वॉर्ड, चंद्रपूर, यांना अटक केली.
न्यायालयातून पोलीस कोठडी रिमांड मिळाल्यानंतर, पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान, आरोपींनी घरफोडीची कबुली दिली आणि त्यांच्याकडून चोरीला गेलेला एकूण रु. २,६१,७६/- किमतीचा ३२.७३० मिलीग्रॅम वजनाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. Chandrapur rapid police action
दुसरा गुन्हा उघडकीस:
याच वेळी, १६ ऑगस्ट रोजी भिवापूर वॉर्ड येथील नारायण चिल्लकेवार यांनी त्यांची मोटारसायकल (क्र. एम.एच. ३४ ए दोड. २०५३) चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी मोटारसायकल चोरी प्रकरणीही अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली. त्यांनी रु. २०,०००/- किमतीची मोटारसायकल चोरल्याची कबुली दिल्याने, या गुन्ह्यातही त्यांना अटक करण्यात आली. burglary and bike theft solved

पोलीस पथकाचे यश:
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे आणि प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वाखालील पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे, पोलीस हवालदार सचिन बोरकर, लक्ष्मण रामटेके, महिला पोलीस हवालदार भावना रामटेके, निकेश ढेंगे, नापोशि. कपूरचंद खरवार, पोअं. जावेद सिद्दिकी, योगेश पिदुरकर, रुपेश पराते, विक्रम मेश्राम, सारिका गौरकार, आणि दीपिका झिंगरे यांचा सहभाग होता.
Leave a Reply