house robbery case solved by local crime branch
house robbery case solved by local crime branch : चिमूर – चिमूर शहरातील प्रगती नगर मध्ये राहणाऱ्या कल्पना गोंननाडे या ६ जुलै रोजी घराला कुलूप लावत बाहेरगावी गेल्या होत्या, ११ जुलै रोजी त्या घरी परत आल्या असत्या घरातील दरवाजा उघडा होता, बेडरूम मधील कपाटातील सोन्याचे दागिने असे एकूण ३८ तोळे ६०० ग्राम किंमत ८ लाख ४९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञातांनी चोरून नेला होता. अज्ञात चोरट्याविरुद्ध चिमूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
डिझल ची अवैध साठवणूक, आरोपीला अटक
गुन्ह्याचे गांभीर्य बघता सदर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने विविध पथके तयार करीत प्रकरणाचा सखोल तपास करीत ४८ तासाच्या आत आरोपीला अटक केली. आरोपीजवळून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. burglary suspects arrested within 48 hours
बादशाह आणि कोब्रा ताब्यात
आरोपी सचिन उर्फ बादशाह संतोष नागराळे राहणार भद्रावती व गोपाल उर्फ बडा कोब्रा जीवन मालकर राहणार श्याम नगर चंद्रपूर यांना अटक करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेने सदर गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यावर तपासाला वेग दिला होता, आव्हानत्मक तपासात गुन्हे शाखेने अत्यंत कसोशीने तपास करीत आरोपीना अटक केली. दोन्ही आरोपीना चिमूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.
सदरची यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी धनराज करकाडे, नितीन रायपुरे, संतोष येलपुलवार, जय सिंह, गणेश मोहुर्ले, नितीन कुरेकार, नितीन साळवे, चेतन गज्जलवार, सचिन गुरनुले, सुरेंद्र महतो, रजनीकांत पुठ्ठावार, सुभाष गौरकार, इम्रान खान, गणेश भोयर व अपर्णा मानकर यांनी केली.
Leave a Reply