inspirational political journey
inspirational political journey : प्रिय बाळूभाऊ,
दिनांक: ४ जुलै, २०२५
आज तुमचा जन्मदिवस. आजच्या दिवशी तुम्हाला आठवताना मन भरून येतंय आणि डोळे पाणावतात. तुम्ही आमच्यातून निघून गेला असलात तरी, तुमची आठवण, तुमचं कार्य, आणि तुमचा कणखर स्वभाव आजही आमच्या मनात तेवढाच जिवंत आहे. आज तुमच्या जयंतीदिनी तुम्हाला आठवताना जाणवतंय की, तुमच्यासारखा लोकनेता पुन्हा होणे नाही – न भूतो न भविष्यति! (Balubhau dhanorkar birthday)
बाळूभाऊ, तुम्ही चंद्रपूरच्या भूमीत जन्माला आलात आणि याच मातीची सेवा करण्यात तुम्ही आपलं आयुष्य वेचलं. तुम्ही फक्त एक खासदार नव्हता, तर आमच्यासाठी एक कार्य, एक प्रेरणा, आणि एक आधारस्तंभ होता. तुम्ही तर बुडणाऱ्या नौकेला योग्य मार्ग दाखवून किनाऱ्यावर आणू शकणारा खंबीर नावाडी होते. एक कार्यक्षम नेतृत्व, एक दूरदृष्टी असलेला नेता, आणि विजयश्री खेचून आणणारा एक उत्कृष्ट आक्रमक योद्धा म्हणूनच आम्ही तुम्हाला ओळखत होतो. तुमच्या प्रत्येक कृतीतून, प्रत्येक निर्णयांतून हेच सिद्ध झाले. Tribute
सुधीर मुनगंटीवार यांचा 15 वर्षाच्या पाठपुराव्याला अखेर यश
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशात पंतप्रधान मोदींची दुसरी लाट असतानाही, तुम्ही चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा क्षेत्रात अपवादात्मक कामगिरी केली. तुम्ही तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर (hansraj ahir) यांचा पराभव करून विजय मिळवला, आणि विशेष म्हणजे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून निवडून आलात. हा विजय केवळ तुमचा नव्हता, तर तो चंद्रपूरच्या सामान्य जनतेचा विजय होता. तुमच्या या विजयाने, तुमची जनतेवरील पकड किती मजबूत होती, हे स्पष्ट झाले.
राजकीय वारसा नसतानाही शिखरापर्यंतचा संघर्षमय प्रवास
राजकारणात यशस्वी होण्यासाठी राजकीय वारसा लागतो, हे एक अलिखित सूत्र आहे. पण बाळूभाऊ, तुम्ही हे सूत्र पूर्णपणे खोटे ठरवले. कोणताही राजकीय वारसा नसताना, तुम्ही केवळ आपल्या स्वकर्तृत्वाने राजकारणात एक अढळ स्थान निर्माण केले. एका सामान्य जिल्हा परिषद शिक्षकाचा मुलगा, औषधनिर्माणशास्त्र पदविका घेऊनही नोकरीच्या मागे न लागता, कपड्याचे दुकान सुरू करून तुम्ही व्यवसायात पदार्पण केले. पण तुमच्या अवतीभवती असलेला अन्याय, गरिबांवर होणारे अत्याचार तुम्हाला स्वस्थ बसू देईना. inspirational political journey
कोणत्याही पदावर नसतानाही, तुम्ही प्रशासनाला धारेवर धरून लोकांच्या समस्या मार्गी लावण्याची तुमची हातोटी सर्वांनी पाहिली. त्यामुळेच तुम्ही स्थानिक लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि पुढे लोकांच्या आग्रहाखातर तुम्ही राजकारणात प्रवेश केला. भद्रावतीसारख्या तालुक्याच्या गावातून सुरू झालेला तुमचा प्रवास, आमदार ते खासदार पदापर्यंतचा हा थक्क करणारा पल्ला खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे.
गेली दोन दशके भारतीय जनता पक्षाची चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात मजबूत पकड होती. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणे आणि प्रस्थापित नेतृत्वांसमोर आव्हान उभे करणे सोपे नव्हते. पण तुम्ही व्यवस्थेतील अन्यायाविरोधात बंड पुकारताना कधीही अन्याय करणाऱ्यांची तमा बाळगली नाही. लोकहितासाठी केलेल्या अनेक आंदोलने आणि मोर्चांमुळे तुमच्याविरोधात अनेक न्यायालयीन केसेस दाखल झाल्या. सामान्य जनतेच्या हितासाठी तुम्ही तुरुंगवासही भोगलात. राजकीय प्रस्थापित कुटुंबांना शह देत, एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा ते खासदार पदापर्यंतचा हा संघर्षमय प्रवास युवकांसाठी एक आदर्श आहे. inspirational political journey
लोकहितासाठी सदैव तत्पर आणि संकटातील आधार
बाळूभाऊ, तुम्ही कायम लोकहितासाठी तत्पर राहिलात. लोकसभेत चंद्रपूर विभागासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मूर्ती विमानतळाच्या कामासाठी तुम्ही आवाज उचलला. त्याचे काम अद्याप सुरू का झाले नाही, असा प्रश्न तुम्ही सरकारला विचारला होता. उड्डाण मंत्री सिंधिया यांनी भूसंपादनाचे काम बाकी असल्याचे सांगितले असता, तुम्ही धावपट्टीची लांबी वाढवल्यास अनेक समस्या सुटतील असे दूरदृष्टीचे उपायही सुचवले होते. Chandrapur airport
कोरोना महामारीच्या काळात तुमच्यातील लोकसेवकाचे रूप अधिक स्पष्ट झाले. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता, ही भयावह परिस्थिती भविष्यात उद्भवू नये म्हणून तुम्ही ऑक्सिजन प्लांट उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तुमच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागात एकाच वेळी ८० बेडवर ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकणारा प्लांट लवकरच पूर्ण झाला आणि त्याचे उद्घाटनही तुमच्या हस्ते झाले होते.
कोरोनाच्या पहिल्या लाटेतही तुम्ही सामान्य जनतेची जेवणासाठी होणारी भटकंती पाहून धान्य किट वाटप केले होते. प्रत्येक तालुक्यात मोठ्या गावांमध्ये शिवभोजन केंद्रे आणि जेवणाचे डब्बे उपलब्ध करून दिले होते. तुमच्या या कार्याची जनसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशंसा झाली होती. तुमच्या मनात सर्वांसाठीच किती आपुलकी होती, हे यातून दिसून येते.
मृत्यूच्या भीतीमुळे मोठे मोठे समाजसेवक आणि राजकारणी मंडळी घरात असताना, दुसऱ्या लाटेतही तुम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, पीपीई किट घालून कोरोना रुग्णांची आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आपुलकीने विचारपूस केली होती. पीपीई किट परिधान करून, तुम्ही कोरोना रुग्णांशी संवाद साधला होता, त्यांच्या गरजा समजून घेतल्या आणि ही लढाई सर्वांनी मिळून लढायची आहे, असे सांगून जनतेचे धैर्य वाढवले होते. तुमचा तो चेहरा, ते बोल आजही आमच्या स्मरणात आहेत.
एक आक्रमक आणि समर्पित नेतृत्व
तुमची कार्यक्षमता पाहून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही तुम्हाला काँग्रेस कार्यकारिणीत स्थान दिले. केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्यांवर तुम्ही जोरदार टीका करत, हे अन्यायकारक कायदे मागे घेण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या हिताचा असो, की कोरोनाविरुद्धचा लढा, तुम्ही जनतेच्या आणि तुमच्या संसदीय क्षेत्राच्या विकासासाठी सदैव तत्पर होता. खासदार धानोरकर हे खूप आक्रमक मानले जात, पण त्यांच्या आक्रमकतेमागे जनतेच्या हिताची तळमळ होती. सदैव आपल्या परिसराचा विकास, जनतेचे हित हे ध्येय बाळगणाऱ्या खासदार बाळू धानोरकर यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. inspirational political journey
तुमचा विजयी रथ इथेच थांबला नाही. तुमच्या विजयानंतर तुमच्या पत्नी प्रतिभा धानोरकरही भरघोस मताधिक्याने आमदार झाल्या, ही तुमच्याच कार्याची आणि जनमानसातील तुमच्या आदराची पावती होती. आमदार असताना तुम्ही वरोरा रुग्णालयात रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवणाची उत्तम सोय होण्याकरिता तुमच्या पुढाकारातून भोजन व्यवस्था सुरू केली होती, जी आजही अव्याहतपणे सुरू आहे. लोकांमध्ये मिसळण्याची तुमची वृत्ती आणि प्रेमळ स्वभाव यामुळे राजकीय विरोधकही आपलेसे होत होते. तुम्ही पक्षीय भेदाभेद न करता, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. inspirational political journey
बाळूभाऊ, तुम्ही आमच्यातून निघून गेलात, पण तुमच्या कार्याची आणि संघर्षाची गाथा आमच्या मनात कायम राहील. तुम्ही घालून दिलेले आदर्श आणि तुमचा कामाचा झपाटा आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील. तुमच्या अचानक जाण्याने चंद्रपूर जिल्ह्याने एक सच्चा लोकसेवक गमावला आहे. तुमची पोकळी भरून काढणे अशक्य आहे.
तुमच्या जन्मदिनी, तुमच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन ! तुमचा आदर्श घेऊन आम्ही नेहमीच वाटचाल करत राहू.
आपला
गोविल मेहरकुरे, चंद्रपूर
Leave a Reply