Chandrapur Dahi Handi utsav : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना एक मोठा आणि उत्साहपूर्ण उत्सव अनुभवता यावा यासाठी ‘द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार’ यांच्या वतीने यावर्षी ‘भाऊंची दहीहंडी उत्सव’ आणि लहान मुलांसाठी ‘भव्य वेशभूषा स्पर्धा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या १७ ऑगस्ट २०२५ रोजी न्यू इंग्लिश हायस्कूल मैदान, वरोरा नाका चौक, चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे. हा उत्सव केवळ दहीहंडीपुरता मर्यादित नसून, यात लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धेची भर घालण्यात आली आहे.
१,५१,००० रोख रक्कम आणि एक चषक
दहीहंडीचा मुख्य कार्यक्रम सायंकाळी ४:०० वाजता सुरू होईल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांसाठी प्रथम पारितोषिक म्हणून १,५१,००० रोख रक्कम आणि एक चषक ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक संघांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. Chandrapur costume contest for kids
या कार्यक्रमासोबतच, ५ ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी एक विशेष ‘भव्य वेशभूषा स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे विषय भारतीय संस्कृती आणि भारतीय इतिहासातील महापुरुष असे ठेवण्यात आले आहेत. लहान मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता ही एक उत्तम संधी आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके दिली जातील, ज्यात प्रथम बक्षीस ५,०००, द्वितीय ३,०००, तृतीय २,००० आणि १० उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील.
दोन्ही कार्यक्रमांच्या अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी कृपया ७९७२३६९०४५ या क्रमांकावर संपर्क साधावा. सदर कार्यक्रम खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहेत. आम्ही चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः गोविंदा पथक व बालकांना या उत्साहात सहभागी होण्याचे आणि कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करते.
आज तुमचा जन्मदिवस. आजच्या दिवशी तुम्हाला आठवताना मन भरून येतंय आणि डोळे पाणावतात. तुम्ही आमच्यातून निघून गेला असलात तरी, तुमची आठवण, तुमचं कार्य, आणि तुमचा कणखर स्वभाव आजही आमच्या मनात तेवढाच जिवंत आहे. आज तुमच्या जयंतीदिनी तुम्हाला आठवताना जाणवतंय की, तुमच्यासारखा लोकनेता पुन्हा होणे नाही – न भूतो न भविष्यति! (Balubhau dhanorkar birthday)
बाळूभाऊ, तुम्ही चंद्रपूरच्या भूमीत जन्माला आलात आणि याच मातीची सेवा करण्यात तुम्ही आपलं आयुष्य वेचलं. तुम्ही फक्त एक खासदार नव्हता, तर आमच्यासाठी एक कार्य, एक प्रेरणा, आणि एक आधारस्तंभ होता. तुम्ही तर बुडणाऱ्या नौकेला योग्य मार्ग दाखवून किनाऱ्यावर आणू शकणारा खंबीर नावाडी होते. एक कार्यक्षम नेतृत्व, एक दूरदृष्टी असलेला नेता, आणि विजयश्री खेचून आणणारा एक उत्कृष्ट आक्रमक योद्धा म्हणूनच आम्ही तुम्हाला ओळखत होतो. तुमच्या प्रत्येक कृतीतून, प्रत्येक निर्णयांतून हेच सिद्ध झाले. Tribute
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशात पंतप्रधान मोदींची दुसरी लाट असतानाही, तुम्ही चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा क्षेत्रात अपवादात्मक कामगिरी केली. तुम्ही तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर (hansraj ahir) यांचा पराभव करून विजय मिळवला, आणि विशेष म्हणजे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून निवडून आलात. हा विजय केवळ तुमचा नव्हता, तर तो चंद्रपूरच्या सामान्य जनतेचा विजय होता. तुमच्या या विजयाने, तुमची जनतेवरील पकड किती मजबूत होती, हे स्पष्ट झाले.
राजकीय वारसा नसतानाही शिखरापर्यंतचा संघर्षमय प्रवास
राजकारणात यशस्वी होण्यासाठी राजकीय वारसा लागतो, हे एक अलिखित सूत्र आहे. पण बाळूभाऊ, तुम्ही हे सूत्र पूर्णपणे खोटे ठरवले. कोणताही राजकीय वारसा नसताना, तुम्ही केवळ आपल्या स्वकर्तृत्वाने राजकारणात एक अढळ स्थान निर्माण केले. एका सामान्य जिल्हा परिषद शिक्षकाचा मुलगा, औषधनिर्माणशास्त्र पदविका घेऊनही नोकरीच्या मागे न लागता, कपड्याचे दुकान सुरू करून तुम्ही व्यवसायात पदार्पण केले. पण तुमच्या अवतीभवती असलेला अन्याय, गरिबांवर होणारे अत्याचार तुम्हाला स्वस्थ बसू देईना. inspirational political journey
कोणत्याही पदावर नसतानाही, तुम्ही प्रशासनाला धारेवर धरून लोकांच्या समस्या मार्गी लावण्याची तुमची हातोटी सर्वांनी पाहिली. त्यामुळेच तुम्ही स्थानिक लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि पुढे लोकांच्या आग्रहाखातर तुम्ही राजकारणात प्रवेश केला. भद्रावतीसारख्या तालुक्याच्या गावातून सुरू झालेला तुमचा प्रवास, आमदार ते खासदार पदापर्यंतचा हा थक्क करणारा पल्ला खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे.
गेली दोन दशके भारतीय जनता पक्षाची चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात मजबूत पकड होती. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणे आणि प्रस्थापित नेतृत्वांसमोर आव्हान उभे करणे सोपे नव्हते. पण तुम्ही व्यवस्थेतील अन्यायाविरोधात बंड पुकारताना कधीही अन्याय करणाऱ्यांची तमा बाळगली नाही. लोकहितासाठी केलेल्या अनेक आंदोलने आणि मोर्चांमुळे तुमच्याविरोधात अनेक न्यायालयीन केसेस दाखल झाल्या. सामान्य जनतेच्या हितासाठी तुम्ही तुरुंगवासही भोगलात. राजकीय प्रस्थापित कुटुंबांना शह देत, एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा ते खासदार पदापर्यंतचा हा संघर्षमय प्रवास युवकांसाठी एक आदर्श आहे. inspirational political journey
लोकहितासाठी सदैव तत्पर आणि संकटातील आधार बाळूभाऊ, तुम्ही कायम लोकहितासाठी तत्पर राहिलात. लोकसभेत चंद्रपूर विभागासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मूर्ती विमानतळाच्या कामासाठी तुम्ही आवाज उचलला. त्याचे काम अद्याप सुरू का झाले नाही, असा प्रश्न तुम्ही सरकारला विचारला होता. उड्डाण मंत्री सिंधिया यांनी भूसंपादनाचे काम बाकी असल्याचे सांगितले असता, तुम्ही धावपट्टीची लांबी वाढवल्यास अनेक समस्या सुटतील असे दूरदृष्टीचे उपायही सुचवले होते. Chandrapur airport
कोरोना महामारीच्या काळात तुमच्यातील लोकसेवकाचे रूप अधिक स्पष्ट झाले. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता, ही भयावह परिस्थिती भविष्यात उद्भवू नये म्हणून तुम्ही ऑक्सिजन प्लांट उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तुमच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागात एकाच वेळी ८० बेडवर ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकणारा प्लांट लवकरच पूर्ण झाला आणि त्याचे उद्घाटनही तुमच्या हस्ते झाले होते.
कोरोनाच्या पहिल्या लाटेतही तुम्ही सामान्य जनतेची जेवणासाठी होणारी भटकंती पाहून धान्य किट वाटप केले होते. प्रत्येक तालुक्यात मोठ्या गावांमध्ये शिवभोजन केंद्रे आणि जेवणाचे डब्बे उपलब्ध करून दिले होते. तुमच्या या कार्याची जनसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशंसा झाली होती. तुमच्या मनात सर्वांसाठीच किती आपुलकी होती, हे यातून दिसून येते.
मृत्यूच्या भीतीमुळे मोठे मोठे समाजसेवक आणि राजकारणी मंडळी घरात असताना, दुसऱ्या लाटेतही तुम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, पीपीई किट घालून कोरोना रुग्णांची आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आपुलकीने विचारपूस केली होती. पीपीई किट परिधान करून, तुम्ही कोरोना रुग्णांशी संवाद साधला होता, त्यांच्या गरजा समजून घेतल्या आणि ही लढाई सर्वांनी मिळून लढायची आहे, असे सांगून जनतेचे धैर्य वाढवले होते. तुमचा तो चेहरा, ते बोल आजही आमच्या स्मरणात आहेत.
एक आक्रमक आणि समर्पित नेतृत्व
तुमची कार्यक्षमता पाहून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही तुम्हाला काँग्रेस कार्यकारिणीत स्थान दिले. केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्यांवर तुम्ही जोरदार टीका करत, हे अन्यायकारक कायदे मागे घेण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या हिताचा असो, की कोरोनाविरुद्धचा लढा, तुम्ही जनतेच्या आणि तुमच्या संसदीय क्षेत्राच्या विकासासाठी सदैव तत्पर होता. खासदार धानोरकर हे खूप आक्रमक मानले जात, पण त्यांच्या आक्रमकतेमागे जनतेच्या हिताची तळमळ होती. सदैव आपल्या परिसराचा विकास, जनतेचे हित हे ध्येय बाळगणाऱ्या खासदार बाळू धानोरकर यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. inspirational political journey
तुमचा विजयी रथ इथेच थांबला नाही. तुमच्या विजयानंतर तुमच्या पत्नी प्रतिभा धानोरकरही भरघोस मताधिक्याने आमदार झाल्या, ही तुमच्याच कार्याची आणि जनमानसातील तुमच्या आदराची पावती होती. आमदार असताना तुम्ही वरोरा रुग्णालयात रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवणाची उत्तम सोय होण्याकरिता तुमच्या पुढाकारातून भोजन व्यवस्था सुरू केली होती, जी आजही अव्याहतपणे सुरू आहे. लोकांमध्ये मिसळण्याची तुमची वृत्ती आणि प्रेमळ स्वभाव यामुळे राजकीय विरोधकही आपलेसे होत होते. तुम्ही पक्षीय भेदाभेद न करता, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. inspirational political journey
बाळूभाऊ, तुम्ही आमच्यातून निघून गेलात, पण तुमच्या कार्याची आणि संघर्षाची गाथा आमच्या मनात कायम राहील. तुम्ही घालून दिलेले आदर्श आणि तुमचा कामाचा झपाटा आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील. तुमच्या अचानक जाण्याने चंद्रपूर जिल्ह्याने एक सच्चा लोकसेवक गमावला आहे. तुमची पोकळी भरून काढणे अशक्य आहे.
तुमच्या जन्मदिनी, तुमच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन ! तुमचा आदर्श घेऊन आम्ही नेहमीच वाटचाल करत राहू.
Balubhau Dhanorkar tribute event : चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय दिवंगत खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘आठवणीतले बाळूभाऊ’ हा पुण्यस्मरण कार्यक्रम काल, शुक्रवार, दिनांक ३० मे २०२५ रोजी सायंकाळी वरोरा येथील शगुन हॉलमध्ये भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. बाळुभाऊंच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नानाभाऊ पटोले होते. त्यांनी बाळुभाऊंच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या लोककल्याणकारी दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित केले.
याप्रसंगी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, खासदार प्रतिभाताई धानोरकर, खासदार नामदेवराव किरसान, माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार सुधाकरजी अडबाले, आमदार अभिजीतजी वंजारी,आमदार किशोर जोरगेवार, आमदार संजयजी दरेकर, आमदार कीर्तीकुमार भांगडीया, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार, माजी आमदार विश्वासजी नांदेकर,
माजी आमदार अविनाश वारजुरकर, माजी आमदार ख्वाजा बेग, रघुवीर अहिर, काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा प्रभारी मुजीब पठाण, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, जिल्हाध्यक्ष रविंद्रजी शिंदे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष संदिप गिहे, मनसे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष नितीनजी मत्ते आणि मनसे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे, सुरजकुमार बोबडे यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. Balubhau Dhanorkar tribute event
कार्यक्रमादरम्यान, बाळुभाऊ धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेल्या योगदानाला सलाम करण्यात आला. अनेक वक्त्यांनी बाळुभाऊंच्या साधेपणाची, व्यापक जनसंपर्काची आणि लोकसेवेच्या त्यांच्या तळमळीची आठवण करून दिली. त्यांच्या आदर्श कार्याची प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा संकल्प यावेळी अनेकांनी केला. MP Balubhau Dhanorkar legacy
शेकडो ऑटोचालकांना विमा संरक्षण कवच आणि सामाजिक उपक्रम
या कार्यक्रमाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी शेकडो ऑटो चालकांना प्रत्येकी दहा लक्ष रुपयांचे विमा संरक्षण कवच प्रदान करण्यात आले. या विमा कवचाची एकूण रक्कम पाच कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. तसेच, सामाजिक उपक्रमांतर्गत कल्पतरू गणेश मंडळास वातानुकूलित शव पेटी भेट देण्यात आली. बाळूभाऊंच्या समाजसेवेच्या वृत्तीचे स्मरण करून देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. Insurance for Indian auto drivers 2025
बाळुभाऊ धानोरकर मित्र परिवाराने चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील सर्व नागरिक, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना आदरांजली वाहिली आणि त्यांच्या स्मृतींना वंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रशांत खुळे यांनी तर प्रास्ताविक पंडित लोंढे केले. प्रवीण काकडे यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम बाळुभाऊंच्या कार्याचे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे स्मरण करणारा एक यशस्वी कार्यक्रम ठरला.
Balu Dhanorkar contributions : चंद्रपूर : स्वतंत्र भारतात आजवर जातनिहाय जनगणना न झाल्यामुळे देशात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक धोरणांची आखणी करताना अनेक समाज घटकांना न्याय मिळत नव्हता. मात्र आता या अन्यायाचा शेवट करत केंद्र सरकारने अखेर जातीनिहाय जनगणना घेण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. या मागणीचा पहिला आवाज चंद्रपूरचे लोकप्रिय दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी उठवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या पहिल्याच भेटीत त्यांनी देशभर जातनिहाय जनगणना घेण्याची ठाम मागणी केली होती. त्यांनी ही मागणी संसदेत आणि माध्यमांतून सातत्याने मांडत ठेवली होती. Caste census in India 2025
धानोरकर यांचा हा मुद्दा सामाजिक न्याय, समता आणि सर्वसमावेशक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. त्यांच्या मागणीकडे केंद्र सरकारने आज मान दिल्याने हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेलं ऐतिहासिक पाऊल ठरतो आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांनी देखील हा मुद्दा वेळोवेळी प्रभावीपणे संसदेत मांडला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि काँग्रेस पक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर केंद्र सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. Caste-based census benefits
या मागणीचा पुढे वारसा चालवत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी व विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील लोकसभेत हीच मागणी ठामपणे मांडली होती.
त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “जातीनिहाय जनगणना ही देशातील वंचित, मागास व उपेक्षित घटकांसाठी योजनांचे अचूक नियोजन करण्यासाठी अत्यावश्यक आहे. ही जनगणना सामाजिक न्यायाच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल ठरेल.”
हा निर्णय केवळ काँग्रेस पक्षाच्या विजयाचा नाही, तर वंचित, मागास आणि कष्टकरी घटकांच्या हक्काच्या लढ्याचा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.
चंद्रपूर : स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट तथा बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटी च्या वतीने आयोजित केलेल्या ‘दांडिया’मध्ये तरुणाई डोलायला लागली आहे. ‘ढोली तारो ढोल बाजे, पंखिडा… पंखिडा…’ अशा विविध गाण्यांवर दांडिया, गरब्याचाच बोलबाला आहे.
भाऊच्या दांडियात अधिकाऱ्यांची उपस्थिती
या उत्सवात जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संचालक जितेंद्र रामगावकर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संचालक पाठक, महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवार, सार्वजनिक बांधकाम मंडळ अधीक्षक अभियंता गाडेगोणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचाले, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चौव्हाण, कार्यकारी अभियंता कुंभे, कृषी अधिकारी शंकरजी तोटावार, पोलीस निरीक्षक राजेश मुळे, गोडसेल्वार, दिलीप माकोडे, संवाद प्रतिष्ठानचे प्रा. विजय बदखल, उद्योजक चंदू वासाडे, प्रा. कीर्तिवर्धन दीक्षित, प्रा. डोहे यांची विशेष उपस्थिती होती. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते वरील अधिकारी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भद्रावती नगर परिषद नगराध्यक्ष अनिल धानोरकर, काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा चंदाताई वैरागडे, महिला काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य – ठेमस्कर, माजी महापौर संगीता अमृतकर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सोहेल रजा, काँग्रेस नेते विनोद अहिरकर, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, काँग्रेस नेते उमाकांत धांडे, चंद्रपूर काँग्रेस तालुका अध्यक्ष श्याम थेरे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दिनेश चोखारे, काँग्रेस नेते महेश मेंढे, ओबीसी नेते उमाकांत धांडे, सामाजिक सामाजिक कार्यकर्ता बसंत सिंग, भद्रावती तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, शहर अध्यक्ष सुरज गावंडे, डॉ. सागर वझे, मोनू चिमुरकर, ओबीसी नेते नरेंद्र बोबडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, काँग्रेस युवा नेते यश दत्तात्रय, माजी नगरसेवक प्रसन्न सिरवार, अजय बल्की, सुरज बोबडे, रतन सिलावार, किशोर हेमके यांची उपस्थिती होती.
या दांडियात आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे. त्यात दोन चॅम्पियन्स ला ई दुचाकी, व रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. यात दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत सहभागी होणार आहेत.
———————————————————
२१ ला प्रिन्स नरुला, २२ ला प्रथमेश परब
चंद्रपूर शहरात भाऊचा दांडियात धूम आहे. यामध्ये तरुणाईचे आकर्षक झालेले प्रिन्स नरुला हे २१ ऑक्टोबर व प्रथमेश परब हे २२ ऑक्टोबर रोजी येणार आहेत.
————————————————————–
मान्यवरांतर्फे बक्षिसांचा पाऊस
ग्रुप दांडियामध्ये स्वर्गीय राजमलजी पुगलिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राजमलजी पुगलिया फाउंडेशन तर्फे १ लाख रुपये, कपल करिता स्वातंत्र सेनानी स्व. उत्तमचंद राजमलची पुगलिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुगलिया परिवारातर्फे ५० हजार रुपयाचे बक्षीस तसेच सोलो (मुलगा) गटाला संवाद प्रतिष्ठानतर्फे ५० हजार, सोलो (मुलगी) ५० हजार, काँग्रेस चंद्रपूर शहर अध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडून लहान ग्रुपचा मुलांना ११ हजार रुपये व लहान मुलींसाठी ११ हजार रुपये तसेच काँग्रेस नेते महेश मेंढे यांच्याकडून ३५ वयावरील (पुरुष) ११ हजार रुपये, ३५ वयावरील (महिला) ११ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
चंद्रपूर : “दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जाण्याने एक सहकारी मी गमावला आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यासोबत राहण्याचे आवाहन खासदार नरेशबाबू पुगलीया यांनी केले.
चंद्रपूर शहरातील भाऊचा दांडिया उत्सवाचे उद्धघाटन माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार नरेशबाबू पुगलिया सपत्नीक आले होते.
दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या उपस्थितीत मागील वर्षी भाऊचा दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु त्यांच्या जाण्याने या उत्सवाचं आयोजन करण्याची जबाबदारी त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यावर आली.
यावेळी त्यांनी पुगलिया कुटुंबियांकडून दांडियातील स्पर्धकांकरिता दीड लाखांची बक्षिसे जाहीर केली. ग्रुप दांडियामध्ये नगरपरिषद चंद्रपूर निर्वाचित प्रथम अध्यक्ष स्व. राजमलजी पुगलिया यांच्या स्मुर्तीप्रित्यर्थ राजमलजी पुगलिया फाउंडेशन, चंद्रपूर तर्फे एक लाख चे प्रथम पुरस्कार व कपल डॉन्स मध्ये ज्या ग्रुपचा प्रथम क्रमांक येईल त्या कपल गृपला स्वतंत्र सेनानी स्व. उत्तमचंद राजमलजी पुगलिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ५० हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
याप्रसंगी आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. परंतु त्यांची क्रीडा, सांस्कृतिक व इतर क्षेत्रात आवड होती. तो वसा पुढे नेण्याकरिता मी पुढे देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
यावेळी चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, भद्रावती नगराध्यक्ष अनिल धानोरकर, काँग्रेस जेष्ठ नेते विनोद दत्तात्रय, यवतमाळ मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे, काँग्रेस नेते गजानन गावंडे, सेवादल जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, इंटक नेते के. के. सिंग, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत दानव, माजी महापौर संगीताताई अमृतकर, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदाताई वैरागडे, अनुसूचित जाती महिला नेत्या अश्विनीताई खोब्रागडे, अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोहेल शेख रजा, इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, वरोरा शहर अध्यक्ष विलास टिपले, भद्रावती शहर अध्यक्ष सुरज गावंडे, वरोरा तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, माजी नगरसेवक अशोक नागापुरे, माजी नगरसेवक देवेंद्र बेले, यवतमाळ महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई आवारी, वसंत जिनींग संचालिका साधनाताई गोहोकार, शारदाताई ठाकरे, संध्याताई गोहोकर, माजी नगरसेवक प्रसन्न सिरवार, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, भालचंद्र दानव, रतन शिलावार, नरेंद्र बोबडे, डॉ. सागर वझे, उमाकांत धांडे, सुरजकुमार बोबडे, मोनू चिमुरकर, सचिन घाटे, प्रमोद मगरे, बसंत सिंग, बाळू चिंचोलकर, सुनंदा धोबे, मीनाक्षी गुजरकर, शालिनी भगत, सौरभ ठोंबरे, मोनू रामटेके यांची उपस्थिती होती.
‘भाऊचा दांडिया’ उत्सवानिमित्त आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे. त्यात दोन चॅम्पियन्स ला ई दुचाकी, व रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. चांदा क्लब ग्राउंडवर २४ ऑगस्ट २०२२ रोजीपर्यंत सायंकाळी सहा ते रात्रौ १० वाजता दांडियाची घूम राहणार आहे. यात दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत सहभागी होणार आहेत. या महोत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ द मराठा चॅरिटेबल स्ट्रट तथा बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटी च्या वतीने करण्यात आले आहे.