Seva Saptah health initiative Chandrapur
Seva Saptah health initiative Chandrapur : चंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जुलै महिन्यात आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सेवा सप्ताह राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून रामबाग मैदानात भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकारी आणि डॉक्टरांच्या संघांसोबत नियोजन बैठक घेतली. free health camp in Chandrapur 2025
या बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेवराव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कराटे, वनविभागाचे सहायक वनसंरक्षक विवेक नाटू, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दीक्षित, आचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे शिंगणे, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. स्वप्निल वावडीकर, नॅशनल कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. पवन अगराडे यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शासकीय निवासी शाळांमध्ये शिक्षक भरती, आजच करा अर्ज
यावेळी भाजपचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य तुषार सोम, माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, प्रकाश देवतळे, अजय जयस्वाल, बलराम डोडानी, मनोज पाल, नामदेव डाहुले, संजय बुरघाटे, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, संदीप आवारी, देवानंद वाढई, रवि गुरनूले, वंदना हातगावकर, सविता दंढारे, सायली येरणे, राजेंद्र अडपेवार, अमोल शेंडे, राशिद हुसेन, नकुल वासमवार, जितेश कुळमेथे, करणसिंह बैस, मंगेश अहिरकर आदींची उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांनी सर्व विभागांनी समन्वय साधत काम करावे आणि शिबिरात रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळेल याची खात्री करावी, असे निर्देश दिले. शिबिराचे स्थळ, सुविधा, आवश्यक वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि पथकांची रचना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गरजू रुग्णांपर्यंत अधिकाधिक आरोग्य सेवा पोहोचवणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. MLA Kishor Jorgewar health camp 2025
आरोग्य शिबिराची तारीख निश्चित होणार
या शिबिरासाठी महापालिका आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, ज्युपिटर हॉस्पिटल, सावंगी मेघे, कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम, श्री सनवरलाल जोधपूर हॉस्पिटल, इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभणार आहे.शिबिराआधी रुग्णांची नोंदणी व प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. गंभीर आजार आढळल्यास शिबिराच्या दिवशी तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला आणि पुढील उपचार दिले जाणार आहेत. याबबत लवकर आरोग्य शिबिराची तारिख निश्चित करण्यात येईल असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
Leave a Reply