Tag: देवेंद्र फडणवीस वाढदिवस

  • Devabhau Jankalyan Seva Saptah । “देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे अनोखे सेलिब्रेशन – ९ दिवसांचा समाजहिताचा महाउत्सव!”

    Devabhau Jankalyan Seva Saptah

    Devabhau Jankalyan Seva Saptah : चंद्रपूर – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (cm devendra fadnavis) यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाला ९ रक्तदान शिबिरे, योग प्रात्यक्षिके, महाआरती आणि वृक्षारोपण कार्यक्रमाने उत्साहात सुरुवात झाली आहे. पुढील नऊ दिवस हा सेवा सप्ताह चालणार असून, यामध्ये विविध धार्मिक, आरोग्यवर्धक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी म्हटले आहे.

    चंद्रपुरात मोरांची शिकार?

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २० जुलै ते २९ जुलै पर्यंत सदर सेवा सप्ताह चालणार आहे. दरम्यान, आज पंजाबी सेवा समिती, कृष्ण नगर समाज मंदिर, बंगाली कॅम्प, पंचशील चौक, घुग्घूस येथील माता मंदिर, श्यामनगर, नूतन व्यायामशाळा, महिला पतंजली योग समिती, भवानजीबाई हायस्कूल येथे रक्तदान शिबिरे पार पडली. यामध्ये जवळपास ३०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

    तर तुकूम येथील लॉ कॉलेज येथे योग-नृत्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मोरवा येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर बायपास मार्गावरील अष्टभुजा मंदिर आणि महाकाली वॉर्डातील सुपर मार्केट येथील दुर्गा मंदिर येथे महाआरती करण्यात आली.

    विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा

    यातील अनेक कार्यक्रमांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्या प्रसंगी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आज या पवित्र कार्याची, देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाची (Devabhau Jankalyan Seva Saptah) सुरुवात करताना आनंद होत आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हा सप्ताह त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजासाठी समर्पित भावनेतून आयोजित करण्यात आला आहे. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी फक्त योजना पुरेशा नसतात, तर त्या योजनांना समर्पित मन, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव लागतो. आपल्या चंद्रपूर मतदारसंघात हा सेवा सप्ताह सुरू करत आहोत, जिथे रक्तदान शिबिरे, योग प्रात्यक्षिके, महाआरती, वृक्षारोपण आणि शैक्षणिक-सामाजिक उपक्रम अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा सुरू झाला आहे.

    chandrapur blood donation

    रक्ताच्या एका थेंबातून कोणाचे तरी जीवन वाचवण्याचे भाग्य आपल्याला मिळत आहे. तसेच, आजच्या योग शिबिरातून आपण आरोग्यविषयी सजगता वाढवत आहोत. वृक्षारोपणाने पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आहोत आणि महाआरतीद्वारे आपल्या परंपरांचा गौरव करत असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.

    या सर्व कार्यक्रमांना भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले. 

  • Seva Saptah health initiative Chandrapur । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहांतर्गत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

    Seva Saptah health initiative Chandrapur

    Seva Saptah health initiative Chandrapur : चंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जुलै महिन्यात आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सेवा सप्ताह राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून रामबाग मैदानात भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकारी आणि डॉक्टरांच्या संघांसोबत नियोजन बैठक घेतली. free health camp in Chandrapur 2025

    या बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेवराव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कराटे, वनविभागाचे सहायक वनसंरक्षक विवेक नाटू, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दीक्षित, आचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे शिंगणे, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. स्वप्निल वावडीकर, नॅशनल कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. पवन अगराडे यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    शासकीय निवासी शाळांमध्ये शिक्षक भरती, आजच करा अर्ज

    यावेळी भाजपचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य तुषार सोम, माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, प्रकाश देवतळे, अजय जयस्वाल, बलराम डोडानी, मनोज पाल, नामदेव डाहुले, संजय बुरघाटे, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, संदीप आवारी, देवानंद वाढई, रवि गुरनूले, वंदना हातगावकर, सविता दंढारे, सायली येरणे, राजेंद्र अडपेवार, अमोल शेंडे, राशिद हुसेन, नकुल वासमवार, जितेश कुळमेथे, करणसिंह बैस, मंगेश अहिरकर आदींची उपस्थिती होती.

    आमदार किशोर जोरगेवार यांनी सर्व विभागांनी समन्वय साधत काम करावे आणि शिबिरात रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळेल याची खात्री करावी, असे निर्देश दिले. शिबिराचे स्थळ, सुविधा, आवश्यक वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि पथकांची रचना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गरजू रुग्णांपर्यंत अधिकाधिक आरोग्य सेवा पोहोचवणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. MLA Kishor Jorgewar health camp 2025

    आरोग्य शिबिराची तारीख निश्चित होणार

    या शिबिरासाठी महापालिका आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, ज्युपिटर हॉस्पिटल, सावंगी मेघे, कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम, श्री सनवरलाल जोधपूर हॉस्पिटल, इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभणार आहे.शिबिराआधी रुग्णांची नोंदणी व प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. गंभीर आजार आढळल्यास शिबिराच्या दिवशी तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला आणि पुढील उपचार दिले जाणार आहेत. याबबत लवकर आरोग्य शिबिराची तारिख निश्चित करण्यात येईल असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.