unidentified attackers killed woman Rajura । महिलेच्या हत्येने राजुरा हादरलं, रमाबाईनगरमध्ये भीतीचं वातावरण!

unidentified attackers killed woman Rajura

unidentified attackers killed woman Rajura : राजुरा – चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी झपाट्याने वाढत असून जिल्ह्यातील राजुरा शहरात ५५ वर्षीय महिलेची अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करीत हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजुरा शहरातील रमाबाईनगर वार्डात राहणाऱ्या ५५ वर्षीय कविता रायपूरे असे मृतकाचे नाव आहे.

मृतक कविता रायपुरे यांचा मुलगा सुरेश रायपुरे हा खाजगी संस्थेत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. तो रात्रौ आठ वाजता आपल्या कामावर गेला होता. कविता रायपूरे ही घरात एकटीच होती. सदर मृतक महिला हि किराणा दुकान चालविते. १४ जून रोजी रात्री मृतक महिला हि घर एकटीच होती, घरा समोरील गेटला कुलूप लावून होते, आज (दिनांक 15 जून ) ला सकाळी बाजूलाच राहणारी मुलगी ममता अलोणे हि दूध नेण्यासाठी घरी आली मात्र आईने प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे गेटचे कुलूप काढून दार ठोठावले तर दार उघडत नव्हते. Kavita Raipure murder Rajura crime news

चंद्रपुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

खिडकीतून ममता ने बघितले तर कविता रायपुरे या बेडवर झोपलेल्या अवस्थेत होत्या. ममता ने आईला हाक मारली मात्र आईने प्रतिसाद दिला नाही. ममता ने आपल्या पतीला याबाबत सांगितले, अथक प्रयत्न करूनही कविता प्रतिसाद देत नसल्याने तुझी आई गेली असे ममताचा पती म्हणाला, याबाबत राजुरा पोलिसांना माहिती देण्यात आली, पोलिसांनी दरवाजा उघडत आत प्रवेश केला असता कविता रायपुरे रक्तबंबाळ अवस्थेत होत्या, मृतकाच्या कपाळाच्या वरच्या बाजूस डोक्याला धारधार वस्तूने मारल्याचे दिसत होते. चेहऱ्यावर, कपाळावर आणि छातीवर मार असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले.

हल्लेखोर ओळखीचा कि अनोळखी?

राजुरा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत तपासाला सुरुवात केली आहे.महिला व तिचा मुलगा दोघेच घरात राहत होते. रात्रौ मुलगा कामावर गेल्याने ती महीला घरात एकटीच होती कुणीतरी अज्ञाताने हल्ला केला किंवा मृतक हल्लेखोराला ओळखत असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कविता रायपूरे यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे एक मुलगी राजुरा येथे रमाबाई नगर येथेच राहत असून दुसरी मुलगी पूजा फुसे ही यवतमाळ येथे राहते, राजुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीवर कलम ३३२ (ब), १०३ (१) हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *