Tag: रमाबाई नगर

  • shopkeeper murder over cigarette debt । उधारीचे पैसे मागितले म्हणून…थेट खून, राजुरा पोलिसांची जबरदस्त कामगिरी

    shopkeeper murder over cigarette debt

    shopkeeper murder over cigarette debt – राजुरा – १५ जून रोजी राजुरा शहरातील रमाबाई नगरात ५३ वर्षीय महिलेच्या हत्येचं प्रकरण उघडकीस आलं होत, रात्री कुणीतरी अज्ञाताने रायपुरे यांच्या घरी प्रवेश करीत धारदार शस्त्राने कविता रायपुरे या महिलेची हत्या करण्यात आली होती. सदर आव्हानात्मक गुन्ह्याचा तपास करीत राजुरा पोलिसांनी या प्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा कबूल केला असून सिगारेट चे पैसे कधी देणार याबाबत त्याला दोनदा हटकले म्हणून हा गुन्हा घडला. असल्याची बाब अल्पवयीन मुलाने कबूल केली.

    चंद्रपूर आम आदमी पार्टीने केला मोठा गौप्य्स्फोट

    १५ जुन रोजी सकाळी कविता रायपुरे यांची मुलगी दुधाचे पॉकेट घेण्याकरिता आई कविता रायपुरे यांच्या घरी गेली होती, आईला आवाज दिल्यावर सुद्धा काही प्रतिसाद न आल्याने आत बघितले असता कविता या मृत अवस्थेत पडल्या होत्या, पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानन्तर त्यांनी घटनास्थळ गाठले. कविता यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या.

    पोलिसांनी अज्ञात आरोपीवर कलम १०३ (१), ३३२ (ब) अन्व्ये गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला, गुन्हा अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचा असल्याने पोलिसांना गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी चांगलीच दमछाक होणार होती, राजुरा पोलिसांनी कसलीही तमा न बाळगता रात्र – दिवस मेहनत घेतली, १५ ते २० ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, संशयाच्या आधारावर एकूण ४० संशयित इसमाची कसून तपासणी केली मात्र आरोपीचा सुगावा लागला नाही. crime due to cigarette addiction among teens

    ४० संशयित हे मृतक महिलेच्या घराजवळील व्यक्ती असल्याची माहिती आहे, गुन्हा घडल्यापासून एक मुलगा गावाबाहेर गेला असल्याची बाब पोलिसांना यावेळी मिळाली, त्याला फोन करीत बोलावले, त्याची चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केला अशी कबुली दिली.

    कारण काय?

    मृतक कविता रायपुरे ह्या घरी किराणा दुकान चालवायच्या, परिसरातील नागरिक किराणा सामान रायपुरे यांच्या दुकानातून खरेदी करीत होते, अश्यावेळी अल्पवयीन मुलाला सिगारेट चा छंद होता, तो नेहमी सिगारेट घेण्यासाठी रायपुरे यांच्या दुकानात जायचा, उधारी जास्त झाल्याने रायपुरे यांनी त्या मुलाला पैश्यासाठी दोनदा हटकले, पैश्यासाठी का हटकले याचा राग त्या मुलाच्या मनात निर्माण झाला. आणि या रंगाचे रूपांतर महिलेच्या हत्येत झाले. कविता रायपुरे यांचा काटा काढायचा असा विचार मनात ठेवत त्या मुलाने त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले, घटनेच्या दिवशी ती महिला एकटी आहे असे त्या मुलाला समजले, मध्यरात्री रायपुरे यांच्या घरी प्रवेश करीत त्याने कोयत्याने रायपुरे यांच्यावर वार केला. shopkeeper murder over cigarette debt

    या हल्ल्यात कविता रायपुरे यांचा जागीच मृत्यू झाला, पोलीस आपल्याला अटक करेल या भीतीने त्या मुलाने घटनास्थळावरुन पळ काढला. त्याला बोलाविले असता त्याने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र राजुरा पोलिसांच्या या आव्हानात्मक तपासाने सदर गुन्ह्याचा उलगडा झाला, अल्पवयीन मुलाला विश्वासात घेत त्याची सखोल चौकशी केली आणि त्याने गुन्हा कबुल केला, गुन्ह्यात वापरलेला कोयता पोलिसांनी त्या मुलाकडून जप्त केला.

    सदर प्रकरणाचा यशस्वी तपास प्रभारी पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात सपोनि निशा भुते, सपोनि हेमंत पवार, पोउपनि पांडुरंग हाके, पोउपनि भीष्मराज सोरते, पोउपनि चाटे, पोलीस कर्मचारी किशोर तुमराम, विक्की निर्वाण, महेश बोलगोडवार, शफिक शेख, शरद राठोड, अविनाश बांबोळे व आनंद मोरे यांनी केला.

  • unidentified attackers killed woman Rajura । महिलेच्या हत्येने राजुरा हादरलं, रमाबाईनगरमध्ये भीतीचं वातावरण!

    unidentified attackers killed woman Rajura

    unidentified attackers killed woman Rajura : राजुरा – चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी झपाट्याने वाढत असून जिल्ह्यातील राजुरा शहरात ५५ वर्षीय महिलेची अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करीत हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजुरा शहरातील रमाबाईनगर वार्डात राहणाऱ्या ५५ वर्षीय कविता रायपूरे असे मृतकाचे नाव आहे.

    मृतक कविता रायपुरे यांचा मुलगा सुरेश रायपुरे हा खाजगी संस्थेत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. तो रात्रौ आठ वाजता आपल्या कामावर गेला होता. कविता रायपूरे ही घरात एकटीच होती. सदर मृतक महिला हि किराणा दुकान चालविते. १४ जून रोजी रात्री मृतक महिला हि घर एकटीच होती, घरा समोरील गेटला कुलूप लावून होते, आज (दिनांक 15 जून ) ला सकाळी बाजूलाच राहणारी मुलगी ममता अलोणे हि दूध नेण्यासाठी घरी आली मात्र आईने प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे गेटचे कुलूप काढून दार ठोठावले तर दार उघडत नव्हते. Kavita Raipure murder Rajura crime news

    चंद्रपुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

    खिडकीतून ममता ने बघितले तर कविता रायपुरे या बेडवर झोपलेल्या अवस्थेत होत्या. ममता ने आईला हाक मारली मात्र आईने प्रतिसाद दिला नाही. ममता ने आपल्या पतीला याबाबत सांगितले, अथक प्रयत्न करूनही कविता प्रतिसाद देत नसल्याने तुझी आई गेली असे ममताचा पती म्हणाला, याबाबत राजुरा पोलिसांना माहिती देण्यात आली, पोलिसांनी दरवाजा उघडत आत प्रवेश केला असता कविता रायपुरे रक्तबंबाळ अवस्थेत होत्या, मृतकाच्या कपाळाच्या वरच्या बाजूस डोक्याला धारधार वस्तूने मारल्याचे दिसत होते. चेहऱ्यावर, कपाळावर आणि छातीवर मार असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले.

    हल्लेखोर ओळखीचा कि अनोळखी?

    राजुरा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत तपासाला सुरुवात केली आहे.महिला व तिचा मुलगा दोघेच घरात राहत होते. रात्रौ मुलगा कामावर गेल्याने ती महीला घरात एकटीच होती कुणीतरी अज्ञाताने हल्ला केला किंवा मृतक हल्लेखोराला ओळखत असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

    कविता रायपूरे यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे एक मुलगी राजुरा येथे रमाबाई नगर येथेच राहत असून दुसरी मुलगी पूजा फुसे ही यवतमाळ येथे राहते, राजुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीवर कलम ३३२ (ब), १०३ (१) हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.