Tragic love story ends
Tragic love story ends : चिमूर – तालुक्यातील नेरी मार्गावर असलेल्या भुमि एम्पायरच्या ले आऊट आहे. येथे असलेल्या कडूनिबांच्या झाडावर २० मे रोजी मंगळवारला सांयकाळी 7.00 च्या दरम्यान उमरेड तालुक्यातील युवकाने पांढऱ्या शेल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतकाचे नाव प्रितम यशवंत वाकडे ,वय 25 वर्ष रा. पिंडकेपार , ता.उमरेड असे आहे. Love dispute leads to suicide
घटनेच्या दिवशी प्रेयसीचा राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात एम.ए. चा पेपर होता. त्याकरीता ती पेपर द्यायला आली होती. याची माहिती प्रितमला झाल्याने तो सुद्धा तिला भेटायला चिमूरला आला. पेपर संपताच दोघेही चिमूर – नेरी मार्गावरील भुमि एम्पायर च्या ले आऊट मध्ये आले. त्यांच्यात लग्नाच्या संबंधात व इतर चर्चा करतांना वाद झाला.
Powered by myUpchar
आता मी गळफास घेतो
आता मि गळफास घेतो असे म्हणून नजीकच असलेल्या कळूनिबांच्या झाडाला पांढरा शेला बांधला. प्रेयसीच्या डोळ्या देखत त्याने गळफास घेतला त्याने घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. कुटुंबाकडून चिमूर पोलिसांना माहिती मिळताच वरीष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बाकल, सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर, सहाय्यक उप पोलिस निरीक्षक विलास निमगडे घटनास्थळी पोहचुन पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. 21 मे बुधवारला उत्तरीय तपासणी झाल्यानंतर प्रेत कुटुंबाच्या स्वाधीन केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी दिली.
Leave a Reply