रस्त्याच्या बाजूने जात असताना अज्ञात वाहनाने उडविले

News34 chandrapur प्रशांत गेडाम

(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही : दोघांना एका भरधाव अज्ञात वाहनाने चिरडले. या भीषण अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना सिंदेवाही- मूल मार्गावर सिंदेवाहीपासून सुमारे १० कि.मी. अंतरावरील नवीन विरव्हा येथे सोमवारी रात्री ७:३० वाजताच्या सुमारास घडली.

 

दादाजी शिवराम सावसाकडे (वय ६५) व उदालक केशव हजारे (५०) दोघेही रा. सरडपार चक (नवीन विरव्हा) ता. सिंदेवाही अशी मृतकांची नावे आहेत.

सरडपार (नवीन विरव्हा) येथील दादाजी आणि उदालक हे दोघेही आपल्या वैयक्तिक कामानिमित्त सिंदेवाही- मूल मार्गावरील विरव्हा गावातील बसथांब्या जवळ आले.

 

रस्त्याच्या बाजूने चालत असताना अचानक भरधाव आलेल्या वाहनाने दोघांनाही जोरदार धडक दिली. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन गंभीर जखमी झाले. दोघेही रस्त्यावर पडून असताना सिंदेवाही पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वाहनातून दोघांनाही सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पोहोचविले. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. पोलिस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहे. सिंदेवाही प्रभारी पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *