Jal Jeevan Mission : या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार – विजय वडेट्टीवार

Jal Jeevan Mission

Jal Jeevan Mission ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात जलजीवन मिशन अंतर्गत नागरिकांना शुद्ध पेयजल पुरवठा करण्यासाठी शासन स्तरावरून आपण कोट्यावधींचा निधी खेचून आणला. सदर विकास कामांचे कंत्राट घेणारे कंत्राटदार यांनी बहुतांश ठिकाणी विहित कालावधीत कामे पुर्ण केली नसल्याने व बऱ्याच ठिकाणच्या कामाच्या तक्रारी प्राप्त झाल्याने यावर अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत या संदर्भात  विशेष समिती मार्फत विकास कामांची चौकशी करून निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार असे ब्रह्मपुरी येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित अधिकारी व कंत्राटदाराना ठणकावले.

Jal Jeevan Mission ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाही, सावली व ब्रह्मपुरी तालुक्यातील ग्राम खेड्यांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नागरिकांना शुद्ध पेयजल उपलब्ध व्हावे याकरिता पाणीपुरवठा योजनेची विकास कामे जोमात सुरू आहे. मात्र सदर कामांचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदारांकडून विहित कालावधीत जलजीवन मिशनची कामे पूर्ण करण्यात आली नाही.

याची माहिती प्राप्त होताच राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज तात्काळ ब्रह्मपुरी येथे तीनही तालुक्यांच्या प्रमुख अधिकारी, नळ योजनेचे अभियंते व संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांचा आढावा घेत निकृष्ट दर्जाचे कामे करणाऱ्या कंत्राटदारांना गुणवत्ता दर्जापूर्ण कामे करा . सोबतच नळ योजनेसाठी खोदण्यात आलेले रस्ते पूर्वरत करा अन्यथा काळ्या यादीत टाकणार असे स्पष्ट ठणकावून सांगितले. (Jal Jeevan Mission)

शेतकऱ्यांना शेतजमिनीचे पट्टे द्या, अन्यथा आंदोलन करणार – संदीप गिर्हे यांचा इशारा

सोबतच या विकास कामांची चाचपणी करण्यासाठी एक विशेष समिती नेमून कामाचा गुणवत्ता दर्जा तपासणार असेही ते यावेळी म्हणाले. यानंतर सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील वन जमिनीवरील अतिक्रमण व नागरिकांना जमिनीचे पट्टे या प्रलंबित प्रकरणावर विस्तृत चर्चा केली.

याप्रसंगी प्रामुख्याने चिमुर उपविभागीय अधिकारी गाडगे, जि‌.प.पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता बोहरे, ब्रम्हपूरी तहसीलदार सतीश मासाळ, सिंदेवाही तहसीलदार संदीप पानमंद, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, कृउबा सभापती प्रभाकर सेलोकर, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, सरपंच संघटनेने अध्यक्ष सोनू नाकतोडे, जिल्हा काॅग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे तसेच संबंधित विभागाचे सर्व अधिकारी शाखा अभियंता ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक उपस्थित होते.

वडेट्टीवार आक्रमक

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *