Tag: जलजीवन मिशन

  • har ghar jal scheme progress । 🚰 “मुनगंटीवारांचा पॉवर पाठपुरावा! चंद्रपूरच्या पाणीटंचाईवर आता कायमचा तोडगा?”

    har ghar jal scheme progress

    har ghar jal scheme progress :  मुंबई : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या भक्कम पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच पाणीपुरवठा मंत्र्यांनी या विषयावर स्वतंत्र बैठक घेण्याची ग्वाही दिली आहे. त्यानिमित्ताने आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या आणखी एका लोककल्याणकारी विषयाला यश प्राप्त होणार आहे.

    मद्य परवाना वाटपात मोठा घोटाळा

    केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत ‘ हर घर पाणी’ या योजनेत निर्धारित वेळेत प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याची योजना आखण्यात आली. या योजनेला वेळ लागत आहे. बल्लारपूर मतदारसंघ तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनांसाठी 47 कोटी रुपयांची तात्काळ तरतूद करावी. कार्यकारी अभियंत्यांचे रिक्त पद त्वरित भरावे, अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. यावर पाणीपुरवठा मंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत चंद्रपूर जिल्ह्यासाठी वेगळी बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. jal jeevan mission updates 2025

    पाणीपुरवठा योजनेची कामे प्राधान्याने व्हायला हवीत

    आमदार श्री. सुधीर मनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनेचे आकडेवारीसह अभ्यासपूर्ण विवेचन केले. ही योजना प्रत्येक नागरिकासाठी किती आवश्यक आहे, त्यात कशा अडचणी येतात, अधिकाऱ्यांच्या पातळीवर कसा विसंवाद होतो यावर विस्तृतपणे भाष्य केले. ते म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने 2026 पर्यंत प्रत्येकाच्या घरी शुद्ध पाणी जावे, हा विचार मांडला. पण प्रलंबित योजनांमुळे या मोहिमेत अडसर निर्माण होत आहे. त्यादृष्टीने पाणीपुरवठा योजनेची कामे प्राधान्याने व्हायला हवीत.’ कार्यकारी अभियंत्याचे पद रिक्त ठेवण्यात आले आहे. ते तात्काळ भरण्यात यावे, अशी मागणी आ. श्री. मुनगंटीवार यांनी केली. ballarpur constituency water issues

    मंत्रालयात बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील गावाच्या पाणीपुरवठा योजने संदर्भात बैठक घेण्यात यावी. तसेच एक बैठक चंद्रपूरला घेतली जावी. रखडलेले काम सुरू होण्यासाठी दोन महिन्यात 43 कोटी रुपये उपलब्ध करावे, या मागण्यांचाही यामध्ये समावेश होता.

    आ. श्री. मुनगंटीवार यांच्या मागणीला यश

    पाणीपुरवठा मंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी आ. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रश्नांवर उत्तर देताना योजनांच्या संदर्भातील प्रगती आणि अडचणी संदर्भात विवेचन केले. तसेच बल्लारपूर मतदारसंघ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेसंदर्भात तात्काळ बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येईल आणि निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन सभागृहात दिले.

  • Jal Jeevan Mission : या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार – विजय वडेट्टीवार

    Jal Jeevan Mission : या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार – विजय वडेट्टीवार

    Jal Jeevan Mission ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात जलजीवन मिशन अंतर्गत नागरिकांना शुद्ध पेयजल पुरवठा करण्यासाठी शासन स्तरावरून आपण कोट्यावधींचा निधी खेचून आणला. सदर विकास कामांचे कंत्राट घेणारे कंत्राटदार यांनी बहुतांश ठिकाणी विहित कालावधीत कामे पुर्ण केली नसल्याने व बऱ्याच ठिकाणच्या कामाच्या तक्रारी प्राप्त झाल्याने यावर अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत या संदर्भात  विशेष समिती मार्फत विकास कामांची चौकशी करून निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार असे ब्रह्मपुरी येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित अधिकारी व कंत्राटदाराना ठणकावले.

    Jal Jeevan Mission ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाही, सावली व ब्रह्मपुरी तालुक्यातील ग्राम खेड्यांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नागरिकांना शुद्ध पेयजल उपलब्ध व्हावे याकरिता पाणीपुरवठा योजनेची विकास कामे जोमात सुरू आहे. मात्र सदर कामांचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदारांकडून विहित कालावधीत जलजीवन मिशनची कामे पूर्ण करण्यात आली नाही.

    याची माहिती प्राप्त होताच राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज तात्काळ ब्रह्मपुरी येथे तीनही तालुक्यांच्या प्रमुख अधिकारी, नळ योजनेचे अभियंते व संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांचा आढावा घेत निकृष्ट दर्जाचे कामे करणाऱ्या कंत्राटदारांना गुणवत्ता दर्जापूर्ण कामे करा . सोबतच नळ योजनेसाठी खोदण्यात आलेले रस्ते पूर्वरत करा अन्यथा काळ्या यादीत टाकणार असे स्पष्ट ठणकावून सांगितले. (Jal Jeevan Mission)

    शेतकऱ्यांना शेतजमिनीचे पट्टे द्या, अन्यथा आंदोलन करणार – संदीप गिर्हे यांचा इशारा

    सोबतच या विकास कामांची चाचपणी करण्यासाठी एक विशेष समिती नेमून कामाचा गुणवत्ता दर्जा तपासणार असेही ते यावेळी म्हणाले. यानंतर सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील वन जमिनीवरील अतिक्रमण व नागरिकांना जमिनीचे पट्टे या प्रलंबित प्रकरणावर विस्तृत चर्चा केली.

    याप्रसंगी प्रामुख्याने चिमुर उपविभागीय अधिकारी गाडगे, जि‌.प.पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता बोहरे, ब्रम्हपूरी तहसीलदार सतीश मासाळ, सिंदेवाही तहसीलदार संदीप पानमंद, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, कृउबा सभापती प्रभाकर सेलोकर, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, सरपंच संघटनेने अध्यक्ष सोनू नाकतोडे, जिल्हा काॅग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे तसेच संबंधित विभागाचे सर्व अधिकारी शाखा अभियंता ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक उपस्थित होते.

    वडेट्टीवार आक्रमक