Breaking News Swift hits Scorpio
Breaking News Swift hits Scorpio : राजुरा (२३ सप्टेंबर २०२५) – गोविंदपूर राष्ट्रीय महामार्गावरील गडचांदूर लागत लालगुडा परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. स्विफ्ट कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ चारचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत ही दुर्घटना घडली. काही दिवसांपूर्वी याच महामार्गावर अपघातात सहा जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असताना हा अपघात झाल्याने वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे महामार्ग सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ट्र्क ची धडक, महिला गंभीर दुचाकी जळून खाक
उभ्या वाहनाला धडक
गडचांदूर-कोरपना राष्ट्रीय महामार्गावरील लालगुडा परिसरात मंगळवारी दुपारी हा अपघात झाला. स्विफ्ट कार कोरपना वरून गडचांदूरच्या दिशेने येत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या स्कॉर्पिओ चारचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर, दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
धडकेचा आवाज प्रचंड असल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
या महामार्गावर याआधीही मोठे अपघात घडले आहेत. नुकतेच झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सतत घडणाऱ्या दुर्घटनांमुळे रस्त्याच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे
Leave a Reply