Police Inspector abusive behavior against staff । दुर्गापूर पोलिस निरीक्षकाचा वादग्रस्त कारभार, पोलिस कर्मचाऱ्यांचा आवाज दाबला जातोय का?

Police Inspector abusive behavior against staff

Police Inspector abusive behavior against staff : चंद्रपूर – १७ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात आजवर अनेक चांगले अधिकारी आले मात्र गेल्या काही वर्षांपासून पोलीस दलात वादग्रस्त अधिकाऱ्यांचा बोलबाला सुरु आहे आणि अजूनही तसाच आहे. मात्र अधिकारी कितीही वादग्रस्त असला तरीही वरिष्ठ कारवाईच्या नावावर त्यांची पाठराखण करताना दिसतात. असाच एक पोलीस अधिकारी कोरपना ते नियंत्रण कक्ष, वेल्फेअर व आता दुर्गापूर पोलीस स्टेशनची कमान सांभाळत आहे. पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांचं नाव आपण ऐकलं असेलंच कारण कोरपना पोलीस स्टेशनमध्ये असताना त्यांनी आपल्या गायन शैलीतून एका युवकाला अमानुषपणे मारहाण केली होती. आज तेच अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांबाबत शिवीगाळ व आक्षेपार्ह वक्तव्य करीत आहे. Chandrapur Police Inspector Controversy

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांची ओली पार्टी, जिल्हा परिषदेचे चौकशीचे आदेश

पोलीस निरीक्षक संदीप एकाडे हे कोरपना पोलीस स्टेशनमध्ये असताना एका प्रकरणी युवकाला त्यांनी बेदम मारहाण केली होती, याबाबत पीडित युवकाने ऑडिओ रेकॉर्डिंग केल्याने एकाडे यांचं बिंग फुटलं, आणि तत्कालीन पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी त्यांना पोलीस कंट्रोल रूम ला स्थलांतर केले. पोलीस अधीक्षक परदेशी यांची बदली झाल्यावर त्यांच्या जागी मुमक्का सुदर्शन चंद्रपुरात दाखल झाले. काही महिने एकाडे यांनी आपला कार्यकाळ जसातसा काढला, दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्यानंतर पोलीस निरीक्षक राऊत यांचा कार्यकाळ शांततेत गेला. मात्र काही दिवसांनी दुर्गापूर पोलीस स्टेशनची शांतता भंग होणार होती हे कर्मचाऱ्यांनाही कधी वाटलं नाही. Police Inspector abusive behavior against staff

वरिष्ठांना तक्रार

दुर्गापूर पोलीस निरीक्षक पदी संदीप एकाडे यांची वर्णी लागली, काही महिने ते शांत राहत कारभार समजून घेत त्यांनी आपला दशावतार दाखविणे सुरु केले, पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ स्वरूपात बोलणे, महिला कर्मचाऱ्यांना हीन पद्धतीने वागणूक देणे असे प्रकार एकाडे यांनी सुरु केले, मात्र कर्मचारी त्यांच्या त्रासाला कंटाळले, आणि थेट याबाबत वरिष्ठांना तक्रार केली.

तक्रार प्राप्त झाल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कान उघाडणी करीत पोलीस कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले, मात्र त्रास इथे संपला नाही, ज्यांनी पोलीस निरीक्षक एकाडे यांच्याविरुद्ध तक्रार करीत बयाण नोंदविले त्यांची ज्याठिकाणी गरज नाही तिथे ड्युटी लावणे सुरु केले. माझ्याविरोधात तक्रार देता काय थांबा तुम्हाला दाखवितो असा मनात निर्धार करीत एकाडे यांचे हेकडे सुरु झाले. पोलीस कर्मचारी यांचे बयान झाल्यावर सुद्धा वरिष्ठ अधिकारी यांनी कसलीही कारवाई न करता एकाडे यांची पाठराखण करणे सुरु केले आहे. दररोज पोलीस स्टेशनमध्ये विविध तक्रारी दाखल होतात, त्या तक्रारीची शहानिशा करीत गुन्हा दाखल करणे अश्या विविध प्रक्रिया पोलीस कर्मचारी पार पाडतात मात्र आपलं कर्तव्य निभावल्यावर त्यांना वरिष्ठांकडून असा त्रास दिला जात आहे. Police misconduct complaints

पोलीस कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या पोलीस निरीक्षकांवर कारवाई करावी अशी चर्चा आता कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच रंगली आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तक्रार झाली, बयाण नोंदविले तरीही वरिष्ठ, पोलीस निरीक्षकांची पाठराखण करतात हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर अन्यायाची मालिका सुरु झाल्याने त्यांना न्याय कोण देणार असा प्रश्न चंद्रपूर पोलीस विभागापुढे उपस्थित झाला आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *