local crime branch successful operation
local crime branch successful operation : चंद्रपूर: दिनांक १७ सप्टेंबर, २०२५ – स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना, एका गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली. चोरीचा माल विकण्यासाठी एक व्यक्ती निमवाटिका, रयतवारी कॉलनी येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
दुर्गापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत
अटकेनंतर, आरोपीच्या अंगझडतीत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल सापडला. अधिक चौकशीत त्याने वरोरा आणि भद्रावती येथे घरफोडी केल्याचे कबूल केले. या प्रकरणात एकूण ८६,२७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Police arrest in Chandrapur theft racket raid
उघडकीस आलेले गुन्हे:
- वरोरा पोलीस स्टेशन: गुन्हे क्र. ५७४/२५ आणि ४१७/२५
- भद्रावती पोलीस स्टेशन: गुन्हा क्र. २२०/२५
या गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेले कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) BNS २०२३ आहेत.
अटक करण्यात आलेले आरोपी:
- रामण्णा दशरथ दांडेकर (वय २९, रा. राजीव गांधी वॉर्ड, वरोरा, जि. चंद्रपूर)
- अरुण लिलाधर साहा (वय ३२, मूळ रा. सीतामढी, बिहार; सध्या रा. अष्टभुजा वॉर्ड, चंद्रपूर)
या प्रकरणात अरविंद सातपुते (रा. वरोरा) आणि अर्जुन दांडेकर (रा. ब्रम्हपुरी) हे दोन आरोपी फरार आहेत.
जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपींना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी वरोरा पोलीस स्टेशनच्या तपास अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि संतोष निंभोरकर आणि सर्वेश बेलसरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोहवा नितीन साळवे, नितिन कुरेकार, प्रमोद कोटनाके, चापोहवा गजानन मडावी, पो. अ. अमोल सावे आणि प्रसाद धुळगंडे यांनी केली.
Leave a Reply