Prabhakar Meshram passes away । सामाजिक व शिक्षण क्षेत्राची हानी, प्रभाकर मेश्राम यांचं निधन

Prabhakar Meshram passes away

Prabhakar Meshram passes away : चंद्रपूर (२ सप्टेंबर २०२५) – चंद्रपूर येथील सिद्धार्थ शिक्षण सहायक संस्थेचे माजी अध्यक्ष आणि मुख्याध्यापक प्रभाकर मेश्राम (९१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. नागपूर येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मेश्राम यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीसह सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

५ व ६ सप्टेंबर रोजी चंद्रपुरातील वाहतूक मार्गात बदल

शिक्षण क्षेत्रात योगदान

चंद्रपूरमधील एक प्रतिष्ठित आणि नावाजलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला आणि आंबेडकरी चळवळीतील त्यांच्या सक्रियतेला समाजात आदराचे स्थान होते.

त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी तारा मेश्राम, मुलगा निखिल मेश्राम (IRS, GST कमिशनर), सून अनिता मेश्राम (IAS), मुलगा मृणाल मेश्राम, सून डॉ. माधुरी मेश्राम आणि नातवंडं असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर आणि समाजावर शोककळा पसरली आहे.

त्यांची अंत्ययात्रा आज, २ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता त्यांच्या राहत्या घरून शांतीधामपर्यंत काढत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *