first salary donation । 💡 “स्वातंत्र्यदिनानिमित्त पहिला पगार शाळेला – हर्षिताचे पाऊल ठरले प्रेरणादायी!”

first salary donation

first salary donation : भद्रावती (चंद्रपूर): भारताचा स्वातंत्र्यदिन केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न ठेवता, समाजाचा एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या स्वातंत्र्याचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्याला मिळावा या उद्देशाने, पुण्यातील एका कंपनीत नुकतीच रुजू झालेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर हर्षिता देवगडे हिने आपला पहिला पगार शाळेला दान करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

वादग्रस्त अम्मा चौक स्मारक हटविले

शिक्षण क्षेत्रातील चुकीच्या धोरणांमुळे अनेक शाळा अडचणीत आल्या आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत. मात्र, हर्षिताला आपल्या वडिलांनी, सुशील देवगडे यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या डॉ. आंबेडकर मेमोरिअल हायस्कूल, भद्रावती ची परिस्थिती सुधारण्याची नेहमीच तळमळ होती. याच प्रेरणेतून तिने आपल्या पहिल्या पगाराची रक्कम स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर शाळेला दान केली. Harshita Devgade

हर्षिताच्या कृतीचे कौतुक

यावेळी हर्षितासोबत तिचे वडील सुशील देवगडे, आई मोनालिसा देवगडे, आणि धाकटी बहीण पारूल यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई आणि अल्पोपहार वाटून स्वातंत्र्यदिन साजरा केला. तिच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे माजी नगरसेवक राहुल चौधरी, माजी नगरसेविका राखीताई रामटेके, माजी नगरसेविका सीमाताई ढेंगळे यांच्यासह शाळेचे प्राचार्य, शिक्षक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. हर्षिताच्या या कृतीने शिक्षण क्षेत्रातील सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *