Rocket country liquor fake smuggling case । चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बनावट देशी दारूचा पुरवठा?

Rocket country liquor fake smuggling case

Rocket country liquor fake smuggling case : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातून बनावट दारूची होणारी वाहतूक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हाणून पाडली, पोलीस पथकाने बनावट दारूसहीत तब्बल २१ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत एका आरोपीला अटक केली. विशेष बाब म्हणजे पुष्पा सिनेमा प्रमाणे बनावट दारू शेपूची भाजी च्या कॅरेटमध्ये लपवून ठेवली होती.

चंद्रपुरात अम्मा वरून नवा वाद

मागील काही महिन्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारू ची तस्करी होत आहे, पोलीस तस्करांचा प्रयत्न हाणून पाडत असली तरी छुप्या मार्गाने हि दारू जिल्ह्यात येतच आहे. health risk from counterfeit alcohol

३१ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेला बनावट दारूची तस्करी होणार आहे अशी माहिती मिळाली सदर दारू हि वरोरा तालुक्यात येणार होती, यवतमाळ जिल्ह्यातून वरोरा मार्गे दारूबंदी जिल्हा वर्धा येथून दारूची वाहतूक सुरु होती. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी केली.

शेपूच्या कॅरेट मध्ये दारू

मौजा वरोरा माढेळी मार्गावरून एक पिकअप वाहन क्रमांक mh२७ x ८२१० येताना दिसले असता पोलिसांनी वाहन थांबवीत वाहनांची झडती घेतली, वाहनात शेपूच्या भाजीचे कॅरेट आढळले, त्या कॅरेट मध्ये रॉकेट देशी दारूचे ९० ml च्या तब्बल १५० पेट्या किंमत ६ लाख रुपये मिळून आले.

पोलिसांनी या प्रकरणी चालक २७ वर्षीय सागर अशोक परदेशी राहणार चाळीसगाव जिल्हा जळगाव याला ताब्यात घेतले, सदर गुन्ह्यात चालकाचा साथीदार यांचेवर वरोरा पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.

सदरची यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, बलराम झाडोकार, पोउपनि विनोद भुरले, संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, सुनील गौरकार, इम्रान खान, किशोर वाकाटे यांनी केली.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *