Deported criminal returns with gun । चंद्रपुरात हद्दपार गुन्हेगार देशी कट्टा घेऊन परतला आणि…

Deported criminal returns with gun

Deported criminal returns with gun : चंद्रपूर – ३० जुलै रोजी चंद्रपूर शहरातील जुनोना मार्गावरील विक्तूबाबा मंदिराजवळ लहान भावाने मोठ्या भावाची गोळ्या झाडून हत्या केली होती. पैश्याच्या वादातून हि हत्या झाल्याची माहिती पुढे आली होती. पोलिसांनी या प्रकरणातील ३ आरोपीना अटक केली.

५ तासाच्या मरण यातना आणि शेवट ओढावला मृत्यू

बुधासिंग टाक यांचेवर त्याच्या लहान भाऊ सोनुसिंग जितसिंग टाक याने आपल्या साथीदारासहित गोळीबार केला होता, या गोळीबारात बुधासिंग चा जागीच मृत्यू झाला, आरोपी सोनुसिग या गोळीबारानंतर पसार झाला होता. घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी अथक परिश्रम घेत ३ आरोपीना अटक केली. ज्यामध्ये मुख्य आरोपी सोनुसिंग, लाला उर्फ नैनेश सहा व आरोपीना पळून जाण्यास मदत करणारा पवन पाटील राहणार फुले चौक बाबुपेठ यांचा समावेश आहे. Deported criminal

सर्वात महत्वाची बाब म्हणजे आरोपी सोनुसिंग याला पोलिसांनी काही दिवसापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार केले होते. सोनुसिंग वर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी त्याला गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर सोडले होते. त्यानंतर सोनुसिंग हा चंद्रपुरात देशी कट्ट्यासह परतला.

काही वर्षांपूर्वी विक्तूबाबा मंदिर जवळ गुन्हगारी वृत्ती अत्यंत फोफावली होती, त्यावेळी रामनगर चे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांनी पोलिसी खाक्या दाखवीत गुंडांची दहशत संपवण्याचा प्रयत्न केला, एकरे यांची बदली झाल्यावर परिस्थिती जैसे थे झाली.

गुप्तचर यंत्रणा गाफील

हद्दपार गुन्हेगार पुन्हा जिल्ह्यात देशी कट्ट्यासह परतला, याबाबत पोलीस यंत्रणा पूर्णतः गाफील राहिली. विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाची गुप्तचर यंत्रणा फेल झाली. आरोपीना पकडण्यासाठी रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आसिफ रजा व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी कौशल्यपूर्ण तपास करून अटक केली. मात्र गुन्हेगार हत्यारांसहित जिल्हात परत आला हे मात्र रामनगर व स्थानिक गुन्हे शाखेला का कळले नाही? हे पोलीस विभागाचे अपयशचं म्हणावे लागेल. कारण चंद्रपुरातील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हाजी ची हत्या झाली त्यावेळी आरोपी हे काही दिवसापासून बंदुकीसह शहरात वावरत होते त्यावेळी सुद्धा पोलीस यंत्रणा अशीच गाफील राहिली होती.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *