Lcb chandrapur
Lcb chandrapur चंद्रपूर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी व व्यापार करणाऱ्या विरोधात धरपकड कारवाई करीत आहे.
27 ते 29 नोव्हेंबर दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने सलग 3 कारवाई करीत अडीच लाखांच्या वर सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त केला.
86 हजारांची कायमस्वरूपी नोकरी करायची? तर आजच अर्ज करा
स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वी रित्या कारवाई केली. Lcb chandrapur
27 नोव्हेंबर रोजी भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची साठवणूक करीत विक्री करण्याकरिता दोन आरोपी विरुद्ध कारवाई केली.

या कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 38,540/_ रु. किंमत असलेला माजा 108 सुगंधित तंबाखू एकूण 164 नग प्रत्येकी 50 ग्रॅम असा एकूण 38 ,540 रु चा मुद्देमाल जप्त केला. Lcb chandrapur
दुसऱ्या कारवाईत चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बाबूपेठ भागातील गनूरवार चौकात राहणारा 29 वर्षीय रोशन कामडी याने आपल्या घरी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा लपवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माहिती मिळताच कामडी यांच्या घरी धाड मारली, या धाडीत 24 हजार 125 रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त केला.
29 नोव्हेंबर रोजी तिसऱ्या कारवाईत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्या 2 आरोपी विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली.
पोलीस स्टेशन भिसी हद्दीत 2 आरोपी प्रतिबंधित सुगंधित तंबाखू ची विक्री करीत होते, यावेळी पथकाने दोन्ही आरोपी विरुद्ध कारवाई करीत अटक केली असता दोघांकडून 1 लाख 93 हजार रुपयांचा सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.
आरोपी विरुद्ध अन्न व सुरक्षा मानके अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, पोहवा नीतीन कुरेकार,अजय बागेसर, पोकॉ प्रशांत नागोसे, शशांक बदामवार, चापोहवा दिनेश अराडे यांनी केली.
Leave a Reply