desi katta : चंद्रपुरात पुन्हा देशी कट्टा जप्त

desi katta विधानसभा निवडणुकीपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात अनेक कारवाया केल्या, त्यामध्ये देशी कट्टा जप्त करण्याची मोहीम त्यांनी राबवली होती. यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात यश आले.

चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात प्रवीण पडवेकर यांनी रचला इतिहास

desi katta जिल्ह्यात अवैध धंदे फोफावू नये यासाठी स्थानिक गुन्हे शाखा प्रयत्नरत आहे, आता निवडणुकीच्या निकालानंतर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एका युवकाला देशी कट्ट्यासहित अटक केली आहे.

25 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना तेलंगणा राज्यातील युवकाकडे देशी कट्टा असल्याची माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 25 वर्षीय नरेश भिक्षेपती तुरपाटी रा.नलगोंडा, तेलंगणा हल्ली मुक्काम जैन ले आऊट, बायपास रोड चंद्रपूर घरी झडती घेण्यात आली. या कारवाईत एक बनावटी देशी कट्टा जप्त करण्यात आला. Desi katta

आरोपीला ताब्यात घेत त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा अंतर्गत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि मधुकर सामलवार , पो.हवा दीपक डोंगरे ,ना.पो.का. संतोष येलपुलवार, पोका. गोपाल आतकुलवार , गोपीनाथ नरोटे, सर्व स्था. गु. शा. चंद्रपूर यांनी केली.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *