A Monkey Bite : चिचपल्ली येथे माकडाचा धुमाकूळ

A Monkey Bite चंद्रपूर-मूल मार्गावरील चिचपल्ली येथे मागील काही दिवसांपासून माकडाने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत त्या माकडाने तब्बल 10 ते 12 नागरिकांना चावा घेतला आहे, वन विभाग त्याला पकडण्याचे प्रयत्न करीत आहे.

A Monkey Bite चिचपल्ली येथील पेट्रोल पंप व बार परिसरात हा माकड काही दिवसांपासून परिसरातील नागरिकांना चावा घेत आहे, विशेष बाब म्हणजे चंद्रपूर-मूल मार्गावरील चालत्या वाहनावर हा माकड सतत हल्ला करीत आहे.

चंद्रपुरातील मायकल भाई जवळ बंदूक, पोलिसांनी केली अटक

चिचपल्ली परिसरातील हॉटेल असो की बार त्याठिकाणी हा माकड नागरिकांना त्रास देत चावा घेत आहे, त्यामुळे परिसरातील नागरिक चांगले दहशती मध्ये आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात 95 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

माकडाच्या हैदोसपासून सुटका मिळावी म्हणून नागरिकांनी वनविभागाला तक्रार केली, वनविभागाची चमू मागील आठवड्याभरापासून त्या माकडाला पकडण्याचे प्रयत्न करीत आहे, माकड वनविभागाच्या चमुला चांगलीच दमछाक आणत आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *