chandrapur live news नरभक्षी वाघांच्या हल्ल्यात जाणारे मानव बळी वाचवण्याकरिता मुख्य वनसंरक्षण कार्यालयाला घेराव, वाघांचे लाड पुरवणाऱ्या वनमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून द्यावा राजीनामा; आंदोलनकर्त्यांची मागणी
chandrapur live news चंद्रपूर :- मुल तालुक्यात दिवसेंदिवस नरभक्षी वाघांच्या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला आहे. वनविभागाची थातुरमातुर भुमीका व वाघांचे लाड पुरवणारे कायदे यामुळे नरभक्षी वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात मुल वनपरिक्षेत्रात वाढत आहे. होणारे वाघाचे हल्ले रोखण्यासाठी व मनुष्य जीवाचे रक्षण करण्यासाठी वनविभागाकडे वेळो-वेळी पाठपुरावा करण्यात येत होते. मात्र लोकांच्या जीवाची पर्वा न कलणाऱ्या वनविभाग कानाडोळा करून गप्प बसले होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील 167 आदिवासी गावाचा कायापालट
यामुळे दिड महिन्यात ५ लोकांचे वाघाच्या हल्ल्यात जीव गेले.त्यांचे परिवार उघड्यावर पडले.वारंवार होणारी घटना रोखण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी दि.२३ सप्टेंबरला चंद्रपूर येथे मुख्य वनसंरक्षण कर्यालयाला घेराव आंदोलन करून वाघांचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा जनतेला घेऊन आम्हीच वाघाचा बंदोबस्त करू असा इशारा देण्यात आला.तसेच वाघाच्या हल्ल्यात ज्या लोकांचे बळी गेले त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजीनामा द्यावा तसेच जनतेच्या भौतिक संरक्षणाची जबाबदारी स्वतः राज्य सरकारने व वनसंरक्षण अधिकाऱ्याने घ्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
मूल तालुक्याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफर झोन, प्रादेशिक, सामाजिक आणि वनविकास महामंडळाचे जंगल लाभले आहे. या चारही भागात वाघांचा मोठा संचार आहे. (chandrapur live news)
जंगलालगत बराचसा शेतशिवार असल्याने तसेच जंगलाशेजारी जनावरांचे चराई क्षेत्र असल्याने दबा धरून बसलेल्या वाघाकडून नियमित हल्ले होत आहे. त्यात निष्पाप शेतकरी, शेतमजूर आणि गुराख्यांचे बळी जात आहे.यावर शासनस्तरावरून आणि वनविभागातर्फे कोणतेही ठोस उपाययोजना केल्या गेले नाही.मूल तालुका वाघाच्या दहशतीत सापडला असल्याने मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
रोज ऐक दुर्दैवी घटना घटना घडत आहे.याकडे वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.यामुळे संतप्त मुल वासियांनी मुख्य वनसंरक्षकाच्याच कार्यालयाला घेराव घालून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
मुल तालुक्यातील वाघाचा तातडीने बंदोबस्त करा,नरभक्षी वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबास विना विलंब तात्काळ आर्थिक मदत करा,जंगली प्राण्यांमुळे पिकांची झालेली नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करा,या सगळ्या प्रकरणात चुप्पी साधलेले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जबाबदारी स्वीकारून वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, मुल येथे वनपरीक्षेत्र कार्यालयात निर्माण करण्यात यावे,मृत झालेल्या व्यक्तीच्या घरी तात्काळ आर्थिक मदत व वनविभागात शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात यावी अश्या विविध मागण्यांच्या संदर्भात मुख्य वनसंरक्षक कार्यालयास घेराव घालण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर संदिप गिऱ्हे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव,विधानसभा प्रमुख प्रमोद पाटील,मुल तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार, राज ठाकरे, विनय धोबे,महिला जिल्हा संघटिका कल्पना गारघाटे,ज्योती गहलोत, मीनाक्षीताई गलगट,प्रशांत मेश्राम युसूफ शेख,सागर राऊत,विनोद बुराडे व आदी उपस्थित होते.

Leave a Reply