चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

News34 chandrapur

चंद्रपूर/सावली – गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील होप फाऊंडेशन तर्फे चंद्रपुरातील सावली तालुक्यात 16 सप्टेंबरला मोफत मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

होप फॉउंडेशन सिरोंचा ही संस्था मानसिक आरोग्य क्षेत्रात गेल्या तीन वर्षापासून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काम करत असून मानसिक आजार असलेल्या रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी या उदात्त हेतूने दिनांक 16/9/2023 ला होप फॉउंडेशन सिरोंचा तर्फे मे धन्वंतरी मेडिकल सावली ता सावली जिल्हा चंद्रपूर येथे मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 

सदर शिबिरात मनोविकार तज्ञ डॉ सचिन हेमके तर धन्वंतरी मेडिकल चे औषध निर्माण अधिकारी तथा संचालक संदीप वसंतराव बेगमवार तर होप फॉउंडेशन सिरोंचा चे अध्यक्ष नागेश मादेशी,होप फॉउंडेशन सिरोंचा स्वयंसेवक सूरज गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर मानसिक आरोग्य तपासणी शिबिरात एकूण 10 रुग्णांना मनोविकार तज डॉ.सचिन हेमके यांनी तपासणी केली आणि त्याना होप फॉउंडेशन तर्फे मोफत औषध पण देण्यात आले.

होप फॉउंडेशन सिरोंचा ता सिरोंचा जिल्हा गडचिरोली या संस्थे तर्फे या पूर्वी चामोर्शी येथे पण मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात एकूण 13 रुग्णांना मोफत औषध देण्यात आले होते.

जसे शरीर आजार होतात तसे मानसिक आजार होतात त्यामुळे मानसिक आजाराबद्दल मनात कसलीही लाज न बाळगता आपण मनोविकार तज्ञ किंवा समुपदेशक कडे जाऊन याबद्दल व्यक्त झाले पाहिजे असे होप फॉउंडेशनचे अध्यक्ष नागेश मादेशी यांच्या वतीने आवाहन करण्यात आले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *