Tag: रस्ते अपघात

  • leopard road accident । 🐆वन्यजीव मरताहेत, प्रशासन झोपलंय! चंद्रपूरमध्ये बिबट्याचा मृत्यू!,

    leopard road accident

    leopard road accident : चंद्रपूर – अहेरी-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर, गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूरजवळ एका बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (२७ जुलै रोजी) सकाळी ८ वाजताच्या सुमारास झरण वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १२१ आणि १२२ च्या मध्ये घडली, ज्यामुळे वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

    असा झाला अपघात

    मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्या रस्ता ओलांडत असताना एका भरधाव अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच झरण वनपरिक्षेत्राचे अधिकारी संदीप मडावी, कर्णेवाड, क्षेत्रसहायक रुपाली आडे, आक्सापूरचे पोलीस पाटील सूरज वैरागडे, उपसरपंच चंद्रजित गव्हारे आणि गावातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. leopard road accident

    चंद्रपुरात मेफेड्रोन ची विक्री, २ आरोपीना अटक १ पसार

    क्षेत्रसहायक रुपाली आडे यांनी पंचनामा केला असता, मृत बिबट्या तीन ते चार वर्षांचा नर असून, त्याने नुकतीच रानडुकराची शिकार केली होती. अपघातामुळे त्याच्या शरीरातून रानडुकराचे मांस बाहेर आलेले दिसत होते. झरण वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप मडावी यांनी सांगितले की, मृत बिबट्याला चंद्रपूर येथे नेण्यात येणार असून, शवविच्छेदनानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

    वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

    या घटनेमुळे परिसरातील वन्यजीव सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच आक्सापूर गावाजवळ आणि शेतात वाघाचे दर्शन झाल्याने तसेच वाघाचे पाऊलखुणा (पगमार्क) आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग, चंद्रपूर यांना १४ जुलै रोजी निवेदनही देण्यात आले होते. शेतकरी आपला जीव धोक्यात घालून शेतीची कामे करत आहेत, तर वानरांमुळे वेलवर्गीय आणि फळबागा वाचवणेही कठीण झाले आहे, अशी कैफियत गावकऱ्यांनी मांडली आहे. highway animal crossing danger zones

    Somayya institute of technology

    कान्हाळगाव अभयारण्य आणि वन्यप्राण्यांचा भ्रमणमार्ग

    नुकतेच कान्हाळगावला अभयारण्य घोषित करण्यात आले असल्याने, हा परिसर वन्यप्राण्यांचा महत्त्वाचा भ्रमणमार्ग बनला आहे. यामुळे रस्त्यावर वन्यप्राण्यांना वारंवार अपघातांना सामोरे जावे लागत आहे. या घटनेला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. वनविभाग, महामंडळ आणि शासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालून वन्यजीवांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

    या घटनेमुळे वन्यजीव आणि मानवी वस्ती यांच्यातील संघर्ष आणि वन्यजीव संरक्षणाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने त्वरित पाऊले उचलणे आवश्यक आहे.

  • fatal pickup truck accident near Ganpur । चंद्रपूर जिल्हा हादरला – गणपूरजवळील अपघातात मृत्यूचा थरार!

    fatal pickup truck accident near Ganpur

    fatal pickup truck accident near Ganpur : चंद्रपूर- अहेरी मार्गावरील गणपूरजवळ पिकअप-ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (दि. १३) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

    चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्याला बेदम मारहाण

    किराणा सामान घेऊन निघाले मात्र

    संदीप कुळमेथे, रमेश वाढई रा. कोठारी अशी मृतकांची नावे आहेत. गणेश मडावी हा जखमी आहे.
    किराणा सामान घेऊन पिकअप एमएच ३४ बीजी ८८९९ गोंडपिपरीकडे निघाले होते. कोठारी येथील संदीप कुळमेथे,रमेश वाढई, कवडजई येथील गणेश मडावी हे तिघे होते.

    गोंडपिपरी येथून बल्लारपूरकडे जाणाऱ्या ट्रकला पिकअपने धडक दिली. समोरासमोर झालेली हि धडक इतकी भीषण होती कि यामध्ये पिकअपमधील संदीप कुळमेथे, रमेश वाढई यांचा मृत्यू झाला. गणेश मडावी हा जखमी झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

  • काका पुतण्याच्या दुचाकीला अपघात, काका जागेवरच ठार तर पुतण्या जखमी

    काका पुतण्याच्या दुचाकीला अपघात, काका जागेवरच ठार तर पुतण्या जखमी

    News34 chandrapur

    चिमूर : – गुणवंत चटपकार

    चिमूर सिंदेवाही रस्त्यावरील मासळ ते पिपर्डा रोडवर असलेल्या कोलारा गावांनाजिक फाट्यावर दुचाकी व डुकराच्या धडकेने झालेल्या भीषण अपघातात पिपर्डा येथील ईसमाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या सोबत असलेला पुतण्या जखमी झाला. १९ जानेवारी रोजी रात्रौला ८.३० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.

     

    माणिक साधू चुनारकर (५५) असे मयत इसमाचे नाव आहे, तर मोरेश्वर कुसन चुनारकर (३८) जखमी वेक्तीचे नाव आहे . पिपर्डा येथील हे दोन्ही काका पुतण्या चिमूर येथे प्लांट खरेदी साठी गेले होते.रात्रौला परत स्व गावी पिपर्डा येथे येत असताना हा अपघात घडला आहे.

     

    घडलेल्या अपघाता बद्दल गावात डुकराची धडक कि अज्ञात वाहनाची धडक तर नसेल ना असा तर्क वितर्क लावल्या जातं आहे,जबर धडक दिली. या धडकेत माणिक चुनारकर यास जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मोरेश्वर हा जखमी झाल्याने त्याला चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.जखम गंभीर असल्याने पुढील उपाचारासाठी खाजगी दवाखान्यात चंद्रपूर ला नेण्यात आले आहे.

     

    अपघाताची माहिती मिळताच पोलिस हवालदार विलास निमगडे, प्रविण तिरनकर , पोलिस झिलपे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचणामा केला .प्रेत उत्तरीय तपासनी साठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मृत इसमावर पोस्टमार्टम करून प्रेत कुटुंबातील सदस्य कडे देण्यात आले आहे.त्यांच्यावर पिपर्डा येथील स्म्शानभूमीवर अंतिम संस्कार करण्यात आले आहे. पिपर्डा येथे दिनांक १८ जानेवारीला राहुल मेश्राम या युवकांने आत्महत्या केली. तर आणि १९ जाणे ला दुर्दैवी अपघात घडला त्यात माणिक चुनारकर मयत झाल्याने पिपर्डा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • खड्डे चुकविताना बस शिरली शेतात आणि

    खड्डे चुकविताना बस शिरली शेतात आणि

    News34 chandrapur

    चिमूर – चिमूर तालुक्यातील शंकरपुर जवळील कवडसी देश रस्त्यावरील खड्डे चुकवीताना बस शेतात उतरल्याने विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे परिसरातील सर्व नागरिक एकत्र येऊन चिमूर – काम्पा मार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू केले.

     

    चिमूर वरून कामपा जाणार हा रस्ता मागील एक वर्षापासून खराब झालेला असून जागोजागी खडे पडलेले आहेत. या रस्त्याचे खड्डे बुजवीन्यासाठी सामाजिक संघटनेसोबत राजकीय पक्ष्यांनी सुद्धा निवेदन देऊन आंदोलन केले आहे. परंतु त्या निवेदनाची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली नाही.

     

    या अपघातामुळे कितीतरी अपघात झाले आहेत. आज दिनांक १९ डिसेंबरला सकाळी ८ वाजता चिमूर वरून भंडारा करिता जाणारी बस खड्डे चुकवत जात असताना अचानक कवडसी फाट्यावर शेतात घुसली. या बस मध्ये ७० प्रवासी होते. शालेय विद्यार्थी व प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र शंक्ररपुर येथे उपचार सुरू आहे.

     

    या रोड संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने निवेदन देऊन दखल न घेतल्याने आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ सतीश वारजूकर यांचे नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तीन तास रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर बांधकाम विभाग अभियंता समीर उपगणलावार आंदोलन स्थळी पोहचले. यावेळी डॉ सतीश वारजूकर यांनी २३ डिसेंबर पर्यंत रस्ता दुरुस्ती करण्याचा अल्टिमेट दिला. बांधकाम विभागाने आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले

  • चंद्रपूर जिल्ह्यात विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या 129 नागरिकांचा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर : जानेवारी ते ऑगस्ट 2023 या कालावधीत जिल्ह्यात एकूण 534 अपघातांची नोंद झाली असून 233 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यात झालेल्या एकूण अपघातांपैकी फक्त दुचाकीच्या अपघातांची संख्या 275 आहे. यात 129 जण मृत्युमुखी पडले आहे. दुचाकीवर हेल्मेट घातले असते तर कदाचित मृत्युचा आकडा कमी होऊ शकला असता. त्यामुळे दुचाकीस्वारांनो, स्वत:च्या व कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कृपाकरून हेल्मेट घाला, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.

     

    जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा समितीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरूगानंथम एम., अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, सा.बा. विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, मुकेश टांगले, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक श्री. जिचकार, वाहतूक निरीक्षक प्रवणीकुमार पाटील, राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक स्मिता सुतावणे, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण आदी उपस्थित होते.

     

    दुचाकीने वाहतूक करतेवेळी हेल्मेट घालणे अतिशय महत्वाचे आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, त्यामुळे आपण स्वत: तर सुरक्षित राहतोच, मात्र आपले कुटुंबसुध्दा सुरक्षित राहू शकते. अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस विभाग आणि उप-प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्त पाहणी करावी. तसेच त्रृटी किंवा उणिवा असल्यास तत्परतेने त्या पूर्ण कराव्यात. जेणेकरून वाहतूक करतांना नागरिकांना त्रास होणार नाही. रस्त्यावर वारंवार खड्डे पडणार नाही, याबाबत कामाचे योग्य नियोजन करावे. खड्डे पडत असलेल्या रस्त्यांची दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरूस्ती करणे आवश्यक आहे.

     

    जिल्ह्यातील टोल नाक्यावर तिनही विभागांनी संयुक्त पाहणी करून वाहतुकीचे नियम, रस्त्याची वेगमर्यादाबाबतचे फलक, सुरक्षित वाहतुकीबाबत दृकश्राव्य माध्यमातील ऐकू येणा-या सुचना आदींची तपासणी करावी. जिल्ह्यात किंवा शहरात ज्या ठिकाणी सिग्नल व्यवस्था आहे, त्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग अतिशय सुस्पष्ट दिसली पाहिजे. जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेले ब्लॅकस्पॉट व संभाव्य ब्लॅकस्पॉट ठिकाणांना पोलिस, सार्वजनिक बांधकाम आणि उप-प्रादेशिक परिवहन विभागाने भेट द्यावी. अपघात टाळण्यासाठी ब्लॅकस्पॉटवर काय उपाययोजना करण्यात येत आहे, त्याचा अहवाल पुढील बैठकीत सादर करावा, अशा सुचनाही जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

     

    सादरीकरण करतांना उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी सांगितले की, सन 2021 मध्ये जिल्ह्यात एकूण 718 अपघात झाले होते. त्या तुलनेत सन 2022 मध्ये अपघातांची संख्या 474 होती. चालू वर्षी 2023 मध्ये मात्र पहिल्या 8 महिन्यात अपघातांची संख्या 534 पर्यंत पोहचली आहे.

     

    यावेळी जिल्ह्यातील नवीन ब्लॅकस्पॉट, पोलिस आणि परिवहन विभागाने केलेली कार्यवाही, आवश्यकता असलेल्या रस्त्यावर गतिरोधक लावणे, रस्ता सुरक्षा अभियान व त्यावरील उपाययोजनेसाठी लागणा-या खर्चास मान्यता देणे, रस्त्यावरील जड वाहने हटवून नो-पार्किंग झोन घोषित करणे आदींबाबत चर्चा करण्यात आली.

  • सिंदेवाही पोलिसांनी चंद्रपुरातील वाहनचालकाला केली अटक

    News34 chandrapur

    (प्रशांत गेडाम)
    सिंदेवाही : सिंदेवाही शहरापासून जवळच असलेल्या नवीन विरव्हा येथील अपघातात राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

     

    सिंदेवाही पोलिसांनी अखेर 12 तासात अज्ञात वाहनाचा शोध लावून त्या दोघांचा जीव घेणारे चंद्रपूर येथील अज्ञात वाहन सेंट्रो कार सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे जमा केली आहे.

     

    सिंदेवाही तालुक्यातील अपघातात नवीन विरव्हा येथील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दादाजी शिवराम सावसाकडे वय 65 वर्ष, उदालक केशव हजारे वय 50 वर्ष रा.सरडपार चक यांचा अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तात्काळ मदतीस वाहनाने ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल केले.

     

    अपघातातील धडक दिलेल्या अज्ञात वाहनाचा शोध पोलिसांनी तात्काळ घेणे सुरू केले. अखेर 12 तासात पोलिसांनी त्या अपघातातील वाहनाचा कसून शोध घेतला असता MH 34 AA 7437 या क्रमांकाची हुंडाई सेंट्रो कंपनीची कार चंद्रपूर येथे मिळाली आहे. हुंडाई सेंट्रो कंपनीची कार सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आली आहे. वाहनाचे चालक आरोपी गजेंद्र गोमकर वय 35 रा. चंद्रपूर यांना ताब्यात घेतले आहे.

     

    अपघातानंतर पोलिसांनी तपास करीत असताना विविध ठिकाणी लावून असलेले कॅमेरे व नियोजन करून कार चा शोध लावण्यात यशस्वी कामगिरी केली असून सिंदेवाही पोलीस स्टेशन चे चव्हाण पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात, सागर महल्ले उप निरीक्षक, पोलीस देवानंद सोनुले, अरविंद मेश्राम, दादाजी रामटेके, मातेरे, जांभुळे, होमगार्ड कोकुलवार पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहे.