Tag: बल्लारपूर पोलीस

  • Ballarpur police seize sword from house । दहशतीचा कट उधळला! बल्लारपूरमध्ये घरातून तलवार जप्त, आरोपी अटकेत

    Ballarpur police seize sword from house

    Ballarpur police seize sword from house : बल्लारपूर – चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी आता अनियंत्रित होत असून पोलीस प्रशासनाचा यावर वचक कमी होत आहे असे चित्र दिसत आहे, खून, दरोडे, जबरी चोरीने नागरिक अक्षरक्षा त्रासले आहेत.

    पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने केली पतीची हत्या

    या गुन्हेगारीच्या दहशतीला हातभार लावत बल्लारपूर शहरात नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने एकाने धारदार तलवार घरी आणली, मात्र काही घडण्याच्या आत बल्लारपूर पोलिसांनी आधीच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. sword seizure police raid

    दहशत निर्माण करण्याकरिता आणली तलवार

    १६ जून रोजी बल्लारपूर पोलीस पथक गस्तीवर असताना त्यांना धारदार शस्त्र एकाने घरी आणले आहे अशी गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी संतोषी माता वॉर्ड मध्ये पोहचत त्याठिकाणी राहत असलेला ३५ वर्षीय नीरज उर्फ लालू धनराज शेंडे यांच्या घरी धाड मारत झडती घेतली असता त्याठिकाणी लोखंडी धारदार तलवार आढळली.

    बल्लारपूर पोलिसांनी सदर तलवार जप्त करीत नीरज वर भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल करीत अटक केली. सदर तलवार नागरिकांमध्ये दहशत निर्माण व्हावी यासाठी आणली असल्याची माहिती आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र गायकवाड, सपोनि मदन दिवटे, पोलीस कर्मचारी आनंद परचाके, संतोष दंडेवार, संतोष पंडित, सुनील कामतकर, पुरुषोत्तम चिकाटे, सत्यवान कोटनाके, शरदचंद्र कारुष, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, खंडेराव माने, मिलिंद आत्राम, भास्कर चिंचवलकर, शेखर माथनकर, अनिता नायडू यांनी केली.

  • बल्लारपुर पोलिसांचा रूट मार्च

    News34 chandrapur रमेश निषाद

    बल्लारपुर रमेश निषाद

    दिनांक 23 सितंबर रोजी पोलीस स्टेशन बल्लारपूर येथील गणेश विसर्जन ईद-ए-मिलाद सन उत्सव दरम्यान सार्वजनिक शांतता राहावी कसलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सकाळी 11:35 वाजता पासून पोलीस स्टेशन बल्लारपूर येथील अधिकारी कर्मचारी होमगार्ड एसआरपीएफ प्लाटून यांचे सह पोलीस स्टेशन बल्लारपूर ते आंबेडकर पुतळा, जुना बस स्टॉप, गोर्शिया मझिद .डॉ रजनी हजारे हॉस्पिटल, नवीन बस स्टॉप, गणपती वार्ड ,गोल पुलिया, विसर्जन घाट व विसर्जन रोड नी जामा मस्जिद ,मदिना मझीद, सात नल पोलीस चौकी पर्यंत रोड मार्च करण्यात आला.

     

    रोड मार्चमध्ये पोलीस स्टेशन बल्लारशा येथील पो नी पाटिल, सपोणी रासकर पोउपनी शाह, सलीम शेख, नैताम मॅडम, ४४ कर्मचारी 4 महिला तसेच होमगार्ड 29, 6महिला होमगार्ड एस आर पी एफ प्लाटून चे ए1 अधिकारी psi दाबेराव 22 कर्मचारी असे रोड मार्च मध्ये हजर होते.

     

    सदरचा रोड मार्ग हा एक वाजता पोलीस चौकी वस्ती विभाग येथे विसर्जन करण्यात आला सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना पाण्याची व्यवस्था करण्यात आली यावेळी सर्वत्र शांतता राहिली.