Tag: देवभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह

  • amruta fadnavis chandrapur visit । 💥 ५५ नद्यांचं जल, १.५५ लाख बेलपत्र! अमृता फडणवीस यांनी केला चंद्रपूरच्या शिवलिंगाचा रुद्राभिषेक!

    amruta fadnavis chandrapur visit

    amruta fadnavis chandrapur visit : चंद्रपूर – देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाच्या निमित्ताने आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून पहिल्या श्रावण सोमवारी आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यातील सर्वात मोठ्या प्राचीन शिवलिंगाचा जलाभिषेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ५५ नद्यांचे पवित्र जल आणि १ लाख ५५ हजार बेलपत्र अर्पण करण्यात आले. या भव्य धार्मिक कार्यक्रमाला हजारो भाविकांची उपस्थिती लाभली. आमदार किशोर जोरगेवार आणि त्यांच्या पत्नी तथा माजी मंत्री शोभा फडणवीस यांची यावेळी उपस्थिती होती. ही एक जागृत देवस्थान असल्याची अनुभूती झाल्याचे अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

    आधारकार्ड मध्ये अनेक चुका, खासदार धानोरकर यांचा अधिवेशनात प्रश्न

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह साजरा करण्यात येत असून, त्याअंतर्गत ३५५ हून अधिक विविध सेवाभावी उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून भिवापूर वॉर्डातील प्राचीन आणि राज्यातील सर्वात मोठ्या शिवलिंगाच्या रुद्राभिषेकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी राज्यातील तसेच राज्याबाहेरील नामवंत पंडितांना आमंत्रित करण्यात आले होते. 55 rivers water abhishek ritual

    amruta fadnavis chandrapur visit 2025

    दरम्यान, या कार्यक्रमासाठी अमृता फडणवीस आज चंद्रपुरात दाखल झाल्या. सायंकाळी चार वाजता त्या कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. कावड घेऊन त्या शिवलिंगाजवळ आल्या आणि राज्यभरातून आणलेल्या ५५ नद्यांच्या पवित्र जलाने व १ लाख ५५ हजार बेलपत्रांनी शिवलिंगाचे जलाभिषेक केले. त्यानंतर त्यांनी शिवलिंगाची आरती केली.

    यावेळी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, “चंद्रपूर ही विविध रूपातील सौंदर्याने नटलेली नगरी आहे. हे सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे. त्याचा विकास व्हायला हवा. मी वर्षातून किमान दोनदा तरी चंद्रपूरला भेट देईन, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांनी महामृत्युंजय मंत्राचे पठण केले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचे कौतुक केले.

    अमृता फडणवीस यांच्या हस्ते सायकल वाटप व चित्रप्रदर्शनाचे निरीक्षण

    देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहानिमित्त २०५५ विद्यार्थिनींना सायकली वाटप करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ आज अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या ‘राजमाता निवासस्थान’ येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी ५५ विद्यार्थिनींना सायकली वाटप करून या उपक्रमाचा प्रारंभ केला.

    Somayya institute of technology

    तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचीही त्यांनी पाहणी केली.

  • devendra fadnavis birthday special events । 355 कार्यक्रम, जनकल्याणाचा ध्यास – फडणवीसांच्या वाढदिवसावर ऐतिहासिक सेवा सप्ताह

    devendra fadnavis birthday special events

    devendra fadnavis birthday special events : चंद्रपूर २६ जुलै – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी सुरू केलेली जनसेवेची ही ३५५ कार्यक्रमाची मालिका कौतुकास्पद आहे. या उपक्रमांचा थेट लाभ जनतेपर्यंत पोहोचत आहे. मि आमदार असता पासून किशोर जोरगेवार हे आमचे मित्र असून ही मैत्री आज अधिक दृढ झाली आहे. कामाचा सातत्याने पाठपुरावा करून त्यांना मार्गी लावणारा आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. आज त्यांचे सामाजिक भान आणि नियोजनही पाहता आले असून सेवाभावी कार्यक्रमांनी चंद्रपूरचा सेवा सप्ताह सजला असल्याचे प्रतिपादन राज्याचे बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले (PWD Minister Chhatrapati Shivendrasingh Raje Bhosale) यांनी केले.

    चंद्रपूर शहरात चोरांची दादागिरी

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहानिमित्त बालाजी सभागृहात कार्यकर्ता मेळावा, रक्तदान शिबिर, मंडळ अध्यक्षांना संगणक वाटप. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नवनियुक्त पदाधिकारी आणि संचालकांचा सत्कार, आणि पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंत्री भोसले बोलत होते.

    या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार, भाजप नेते अशोक जिवतोडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, उपाध्यक्ष संजय डोंगरे, प्रकाश देवतळे, रघुवीर आहिर, दशरथसिंह ठाकूर, नामदेव डाहुले, संजय कंचर्लावार, संदीप आवारी, अजय जयस्वाल, बलराम डोडाणी, तुषार सोम, छबू वैरागडे, मनोज पाल, राहुल घोटेकर, मंडळ अध्यक्ष रवी गुरुन्नूले, प्रदीप किरमे, स्वप्नील डुकरे, सुभाष अदमाने, ॲड. सारिका सिंदुरकर, विनोद खेवले, रवींद्र गुरुनुरे, आशिष मासिरकर, संजय तिवारी, वंदना हातगावकर, सविता दंढारे आदींची उपस्थिती होती. devendra fadnavis birthday special events

    पक्षाचे काम अधिक गतिशील करण्याच्या हेतूने आमदार किशोर जोरगेवार यांच्या वातीने नवनियुक्त पाच मंडळ अध्यक्षांना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संगणक व प्रिंटरचे वाटप करण्यात आले. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नवनियुक्त पदाधिकारी आणि संचालकांचा सत्कारही मंत्री भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

    राज्यातील प्रत्येक घटकांचे प्रश्न समजून घेणारे मुख्यमंत्री

    यावेळी पुढे बोलताना मंत्री भोसले म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देशातील सर्वमान्य नेतृत्व आहे. पक्ष संकटात असतानाही राज्यासह इतर राज्यातील निवडणुकांमध्ये त्यांनी नियोजनबद्ध काम करत सत्ता मिळवून दिली आहे. राज्यातील प्रत्येक घटकांचे प्रश्न समजून घेणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगतीपथावर आहे. chandrapur bjp seva saptah 2025 highlights

    आज आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले असून त्याद्वारे त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास दर्शविण्यात आला. पक्षनिष्ठा, सातत्य, प्रामाणिकपणा हे गुण फडणवीस यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेच्या अपेक्षेप्रमाणे काम करत स्वराज्याची स्थापना केली. राज्य सरकारही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आहे. आमदार किशोर जोरगेवार यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी स्नेहसंबंध असल्यामुळे चंद्रपूरच्या विकासासाठी त्यांनी मांडलेल्या मागण्या पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाकाली मंदिर यंत्रा परिसर, दीक्षाभूमी विकास, धानोरा बॅरेज, टायगर सफारी यांसारखे अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. आमच्या विभागामार्फत या व भविष्यातील सर्व विकासकामांना प्राधान्याने मंजुरी दिली जाईल, असेही मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले. devendra fadnavis birthday special events

    शिवेंद्रसिंहराजे भोसले जनसेवेचे भान असणारे राजे – आ. किशोर जोरगेवार

    देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहानिमित्त (seva saptah) आपण ४०० हून अधिक विविध सामाजिक, धार्मिक, आरोग्यवर्धक व शैक्षणिक कार्यक्रम राबवित आहोत. आज मंत्री भोसले यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे. मंत्री म्हणून जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात ते नेहमी तत्पर राहतात. त्यामुळे ते जनसेवेचे भान असणारे राजे आहेत, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, आज पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जनसेवेचा संकल्प केला आहे. रक्तदानाच्या माध्यमातून मागील सहा दिवसांत २ हजारहून अधिक रक्त युनिट्स संकलित करण्यात आले आहे. ही कार्यकर्त्यांची समर्पणशील भावना दर्शवते. या सप्ताहाच्या माध्यमातून शेवटच्या गरजूंपर्यंत पोहोचण्याचा आमचा संकल्प आहे. devendra fadnavis birthday special events

    Somayya institute of technology

    विद्यार्थिनींना सायकल वाटप असो वा भव्य आरोग्य शिबिर – हे सर्व आयोजन थेट नागरिकांच्या हिताचे आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येथील  विकासकामांना प्राधान्य द्यावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

    मंत्री भोसले यांचे चंद्रपूर आगमन झाल्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी माता महाकाली मंदिरात दर्शन घेतले. भिवापूर वार्डातील राज्यातील सर्वात मोठ्या शिवलिंगाचेही त्यांनी दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी चौकात मुख्यमंत्री फडणवीस (devendra fadnavis) यांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आणि बालाजी सभागृहातील रक्तदान शिबिराचे उद्घाटनही त्यांनी केले. या शिबिरात २०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. या मेळाव्याला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्याम हेडाऊ यांनी केले. 

  • Devabhau Jankalyan Seva Saptah । “देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे अनोखे सेलिब्रेशन – ९ दिवसांचा समाजहिताचा महाउत्सव!”

    Devabhau Jankalyan Seva Saptah

    Devabhau Jankalyan Seva Saptah : चंद्रपूर – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (cm devendra fadnavis) यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाला ९ रक्तदान शिबिरे, योग प्रात्यक्षिके, महाआरती आणि वृक्षारोपण कार्यक्रमाने उत्साहात सुरुवात झाली आहे. पुढील नऊ दिवस हा सेवा सप्ताह चालणार असून, यामध्ये विविध धार्मिक, आरोग्यवर्धक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी म्हटले आहे.

    चंद्रपुरात मोरांची शिकार?

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २० जुलै ते २९ जुलै पर्यंत सदर सेवा सप्ताह चालणार आहे. दरम्यान, आज पंजाबी सेवा समिती, कृष्ण नगर समाज मंदिर, बंगाली कॅम्प, पंचशील चौक, घुग्घूस येथील माता मंदिर, श्यामनगर, नूतन व्यायामशाळा, महिला पतंजली योग समिती, भवानजीबाई हायस्कूल येथे रक्तदान शिबिरे पार पडली. यामध्ये जवळपास ३०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

    तर तुकूम येथील लॉ कॉलेज येथे योग-नृत्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मोरवा येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर बायपास मार्गावरील अष्टभुजा मंदिर आणि महाकाली वॉर्डातील सुपर मार्केट येथील दुर्गा मंदिर येथे महाआरती करण्यात आली.

    विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा

    यातील अनेक कार्यक्रमांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्या प्रसंगी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आज या पवित्र कार्याची, देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाची (Devabhau Jankalyan Seva Saptah) सुरुवात करताना आनंद होत आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हा सप्ताह त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजासाठी समर्पित भावनेतून आयोजित करण्यात आला आहे. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी फक्त योजना पुरेशा नसतात, तर त्या योजनांना समर्पित मन, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव लागतो. आपल्या चंद्रपूर मतदारसंघात हा सेवा सप्ताह सुरू करत आहोत, जिथे रक्तदान शिबिरे, योग प्रात्यक्षिके, महाआरती, वृक्षारोपण आणि शैक्षणिक-सामाजिक उपक्रम अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा सुरू झाला आहे.

    chandrapur blood donation

    रक्ताच्या एका थेंबातून कोणाचे तरी जीवन वाचवण्याचे भाग्य आपल्याला मिळत आहे. तसेच, आजच्या योग शिबिरातून आपण आरोग्यविषयी सजगता वाढवत आहोत. वृक्षारोपणाने पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आहोत आणि महाआरतीद्वारे आपल्या परंपरांचा गौरव करत असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.

    या सर्व कार्यक्रमांना भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.