Tag: चंद्रपूर शहर पोलीस

  • burglary and bike theft solved । घरफोडी व मोटारसायकल चोरीचे २ गुन्हे उघडकीस

    burglary and bike theft solved

    burglary and bike theft solved : चंद्रपूर, [17 ऑगस्ट ] – चंद्रपूर शहरातील प्रांतिक कॉलनी, भिवापूर वॉर्ड येथे घडलेली घरफोडी आणि मोटारसायकल चोरीची दोन प्रकरणे चंद्रपूर शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत उघडकीस आणली आहेत. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेला ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

    चंद्रपुरात गांजाची वाहतूक करणाऱ्या २ आरोपीना अटक

    घटनेचा तपशील:

    प्रांतिक कॉलनी, भिवापूर वॉर्ड येथील एका महिलेने १५ ऑगस्ट रोजी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की, ती ११ ऑगस्ट रोजी बाहेरगावी गेली होती. १४ ऑगस्ट रोजी घरी परतल्यानंतर तिला घराचे कुलूप तुटलेले दिसले आणि घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. तात्काळ तक्रार दिल्यानंतर, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (B.N.S.) कलम ३३१(३), ३३१(४), आणि ३०५ नुसार घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

    पोलिसांची कारवाई:

    गुन्हा दाखल होताच, चंद्रपूर शहर पोलिसांनी तत्परतेने तपासचक्रे फिरवली. गोपनीय माहिती आणि तपास कौशल्याचा वापर करून त्यांनी काही वेळातच आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी सुमित शांताराम अम्राजवार (वय २८) आणि तनवीर कदीर बेग (वय २३), दोघेही रा. भंगाराम वॉर्ड, चंद्रपूर, यांना अटक केली.

    न्यायालयातून पोलीस कोठडी रिमांड मिळाल्यानंतर, पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान, आरोपींनी घरफोडीची कबुली दिली आणि त्यांच्याकडून चोरीला गेलेला एकूण रु. २,६१,७६/- किमतीचा ३२.७३० मिलीग्रॅम वजनाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. Chandrapur rapid police action

    दुसरा गुन्हा उघडकीस:

    याच वेळी, १६ ऑगस्ट रोजी भिवापूर वॉर्ड येथील नारायण चिल्लकेवार यांनी त्यांची मोटारसायकल (क्र. एम.एच. ३४ ए दोड. २०५३) चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी मोटारसायकल चोरी प्रकरणीही अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली. त्यांनी रु. २०,०००/- किमतीची मोटारसायकल चोरल्याची कबुली दिल्याने, या गुन्ह्यातही त्यांना अटक करण्यात आली. burglary and bike theft solved

    पोलीस पथकाचे यश:

    ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे आणि प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वाखालील पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे, पोलीस हवालदार सचिन बोरकर, लक्ष्मण रामटेके, महिला पोलीस हवालदार भावना रामटेके, निकेश ढेंगे, नापोशि. कपूरचंद खरवार, पोअं. जावेद सिद्दिकी, योगेश पिदुरकर, रुपेश पराते, विक्रम मेश्राम, सारिका गौरकार, आणि दीपिका झिंगरे यांचा सहभाग होता.

  • Mephedrone trafficking case in Chandrapur । १८ वर्षीय मुलगा करतोय मेफेड्रोन ची वाहतूक, चंद्रपूर पोलिसांची कारवाई

    Mephedrone trafficking case in Chandrapur

    Mephedrone trafficking case in Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपुरात अंमली पदार्थ विक्रीचे जाळे सर्वत्र पसरले आहे, आधी गांजा तर आता मेफेड्रोन म्हणजेच एमडी पॉवडर ची विक्री जोमात सुरु आहे, विशेष म्हणजे या विक्री गॅंग मध्ये अनेक महिला, मुली व अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. शहरातील बाबुपेठ मध्ये नुकतेच शहर पोलिसांनी अवैध दारू विक्री प्रकरणी धाडसत्र मोहीम राबवली आता लगेच एमडी पावडर ची वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

    चंद्रपुरात मतांची चोरी

    एमडी पावडर ची वाहतूक बाबुपेठ भागातून होणार असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होतो माहितीच्या आधारे १० ऑगस्ट रोजी शहर पोलिसांनी नेताजी चौक मध्ये नाकाबंदी केली. यावेळी एम एच ३४ बीडब्लू ८६८९ हि दुचाकी येताना दिसली असता पोलिसांनी वाहन थांबवित झडती घेतली असता चालकांकडून तब्बल ०६.८५ ग्राम एमडी पावडर आढळून आले.

    १८ वर्षीय मुलाने केली वाहतूक

    पोलिसांनी दुचाकी चालक १८ वर्षीय अविनाश अनुप कुंडू अटक करीत एकूण ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी कुंडू विरुद्ध एनडीपीएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहे. Chandrapur MD powder drug bust

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे, पोलीस कर्मचारी भावना रामटेके, सचिन बोरकर, लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, कपूरचंद खरवार, योगेश पिदूरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, रुपेश पराते, सारिका गौरकर व दीपिका झिंगरे यांनी केली.

  • Chandrapur Babupeth illegal liquor raid । बाबुपेठमध्ये चंद्रपूर शहर पोलिसांचे धाडसत्र

    Chandrapur Babupeth illegal liquor raid

    Chandrapur Babupeth illegal liquor raid : चंद्रपूर – शहरातील बाबुपेठ भागात मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू विकल्या जाते याबाबत आम आदमी पक्षाने प्रकरण उचलत संबंधित विभागाला कारवाईचे करण्यासंबंधीचे पत्र दिले होते. याबाबत चंद्रपूर पोलिसांनी बाबुपेठ भागात अवैध दारू व्यवसायिकांविरुद्ध कारवाई सत्र राबविले, या कारवाईत देशी दारू सहित ४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी ६ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

    मनोरंजनाच्या नावाखाली जुगार

    ६ आरोपींवर गुन्हा दाखल

    घरी देशी दारू साठवीत बेकायदेशीरपणे विक्री चा व्यवसाय करणारे बाबुपेठ मधील ३५ वर्षीय युवराज कैलास झाडे यांच्या घरी धाड मारली असता देशी दारूच्या २४ बॉटल, ५५ वर्षीय रजनी राजेंद्र साटोणे यांच्याजवळून १६ देशी दारूच्या बॉटल, ८९ वर्षीय सईबाई गोपाळ मैथि १६ बॉटल, ५५ वर्षीय संगीता देविदास गेडाम १२ बॉटल, ५५ वर्षीय भीमराव प्रभाकर माऊलीकर जवळून २० बॉटल व ४० वर्षीय राहुल अशोक देवगडे जवळून १४ बॉटल असा एकूण ४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल चंद्रपूर शहर पोलिसांनी जप्त केला.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, सपोनि सहारे, पोउपनि दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे, कपिल घुगे, वैभव चव्हाण, पोलीस कर्मचारी भावना रामटेके, तनुजा गजभे, सचिन बोरकर, लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, इम्रान शेख, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, राकेश फुकट, कपूरचंदं खरवार, योगेश पिदूरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, रुपेश पराते, मोरेश्वर शिंदे, सारिका गौरकार व दीपिका झिंगरे यांनी केली.

  • ndps act chandrapur arrest । चंद्रपुरात ओसाड कॉलेजचं मैदान की ड्रग्सचा अड्डा? शहर पोलिसांची कारवाई!

    ndps act chandrapur arrest

    ndps act chandrapur arrest : चंद्रपूर शहरातील बाबुपेठ प्रभागामध्ये ओसाड पडलेले डीएड कॉलेजच्या मैदानात अंमली पदार्थाची विक्री काळोखात सुरु आहे, यावर चंद्रपूर शहर पोलिसांनी कारवाई सत्र राबवित २४ वर्षीय युवकाला एमडी ड्रग्स पावडर सहित अटक करीत तब्बल १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 24 year old arrested with md drugs

    वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही

    चंद्रपूर जिल्हा दारूबंदी व दारूबंदी उठल्यानंतर च्या काळात जिल्ह्यात अंमली पदार्थाची तस्करी व सेवन करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले होते मात्र आजही अंमली पदार्थाची तस्करी पोलीस प्रशासन थांबवू शकलेले नाही.

    तत्कालीन पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी शहर व जिल्ह्यातील ओसाड पडलेल्या ठिकाणावर सर्च मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होती, त्यावेळी पोलिसांनी अनेक अवैध धंदे उघडकीस आणले. मात्र पोलीस अधीक्षकांची बदली झाल्यावर हि कारवाई थंडबस्त्यात गेली, त्यामुळे ओसाड पडलेल्या ठिकाणी पुन्हा अवैध धंद्याची वर्णी लागली.

    गुन्हेगारीचा अड्डा

    चंद्रपूर शहरातील सर्वात मोठा प्रभाग म्हणून बाबुपेठ च नाव आहे, या प्रभागात शासकीय अध्यापक विद्यालयाचे मैदान आहे, कालांतराने शिक्षण क्षेत्रात झालेल्या बदलणे शासकीय अध्यापक विद्यालयात विद्यार्थी संख्या कमी झाल्याने प्राध्यापक आपली वसाहत सोडून गेले, आणि हीच वसाहत पुढे चालून गुन्हेगारीचा अड्डा बनली.

    १५ मे रोजी चंद्रपूर शहर पोलिसांना या एमडी ड्रग्स विक्री बाबत गोपनीय माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली असता त्याठिकाणी संशयास्पद तरुणाला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्याजवळ एमडी पावडर आढळले.

    २४ वर्षीय तरुणाला झटपट पैसे कमविण्याचा चस्का

    आरोपी २४ वर्षीय महेश सुबोध बाला राहणार जुनोना चौक, बाबुपेठ याच्याजवळून ९.०४० ग्राम एमडी पावडर किंमत ४५ हजार व दुचाकी क्रमांक एमएच ३४ सीई ७१९५ असा एकूण १ लक्ष १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी आरोपी बाला वर NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली. md drugs in chandrapur

    Powered by myUpchar

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छीरे, पोलीस कर्मचारी भावना रामटेके, सचिन बोरकर, संतोष कणकम, संजय धोटे, कापूरचंद खरवार, इम्रान खान, इर्शाद खान, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम, रुपेश पराते, सारिका गौरकार, दीपिका झिंगरे यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे करीत आहे.

  • चंद्रपुरातील घरफोडीच्या आरोपीने केला महत्वाचा खुलासा आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त

    चंद्रपुरातील घरफोडीच्या आरोपीने केला महत्वाचा खुलासा आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त

    Marathi News

    चंद्रपूर –  9 जानेवारीला चंद्रपूर शहरातील श्रीनगर लालपेठ भागात जयश्री गादम यांच्या घरी अज्ञाताने प्रवेश करीत घरफोडी ची घटना घडली, 8 तारखेला रात्री गादम यांनी आपल्या घराला कुलूप लावत आईच्या घरी गेल्या होत्या, मात्र सकाळी घरी गेल्यावर बघितले असता घरातील दार उघड्या अवस्थेत होते. कपाटातील रोख रक्कम व दागिने असा एकूण 53 हजार रुपयांचा माल चोरी झाला.

     

    याबाबत पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाली त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत पंचनामा करीत परिसरात पाहणी केली, गुन्हा दाखल करीत पोलिसांनी तपास सुरू केला.

     

    13 जानेवारीला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने रेकॉर्डवरील आरोपी आशिष रेड्डीमल्ला याला ताब्यात घेतले, सदर आरोपीवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते, शहर पोलीस ठाण्यात सुद्धा आरोपीवर गुन्हा दाखल असल्याने आरोपीला चंद्रपूर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

     

    लालपेठ भागातील घरफोडी प्रकरणात आशिष चा सहभाग होता, आरोपीने विविध गुन्ह्यात चोरी केलेले दागिने नागपुरातील सराफा दुकानदाराला विकले असल्याची कबुली दिली असता पोलिसांनी तात्काळ नागपूर गाठत 1 लाख 47 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

     

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी , अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु , उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंनदनवार यांचा मार्गदर्षनाखाली पोलीस निरीक्षक सतिशसिह राजपुत यांचे नेतृत्वात गुन्हेशोध पथकातील सहाय्य पुलिस निरीक्षक मंगेश भोंगाडे , पुलिस उपनिरीक्षक शरीफ शेख सहाय्यक फौजदार विलास निकोडे , महेंद्र बेसरकर , जयंता चुनारकर , सचिन बोरकर , संतोष पंडीत , निलेश मुळे , चेतन गज्जलवार , इमरान शेख रूपेश रणदिवे , दिलीप कुसराम , संतोष कावडे , भावना यांनी केली आहे.

  • चंद्रपुरात युवकाचा मृतदेह आढळला, हत्या की आत्महत्या?

    चंद्रपुरात युवकाचा मृतदेह आढळला, हत्या की आत्महत्या?

    News34 chandrapur

    चंद्रपूर- शहरात सकाळी 8 वाजता 29 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली, पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असता त्यांनी तात्काळ जमनजट्टी परिसरात जात पंचनामा केला.

     

    शहरातील पठाणपुरा गेटबाहेरील जमनजट्टी परिसरात महाकाली मंदिर जवळ राहणारा 29 वर्षीय दानिश इंतेजार लवंगर याचा मृतदेह असल्याची पोलिसांना ओळख पटली.

     

    सुनसान ठिकाणी मृतदेह आढळल्याने त्याची कुणी हत्या तर केली नाही याबाबत अनेक तर्कवितर्क पुढे आले, दानिश च्या कुटुंबानी आमच्या मुलाची हत्या करण्यात आली असा आरोप लावला अशी माहिती पुढे येत आहे.

     

    पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन साठी पाठविला आहे, त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण पुढे येणार.

     

    याबाबत शहर पोलिसांनी अधिक माहिती दिली की सदर युवकाचा मृत्यू हा अति दारू सेवनाने झाला असावा असा अंदाज आहे, त्याच्या शरीरावर कसल्याही खुणा आढळून आल्या नाही, शवविच्छेदन अहवाल आल्यावर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

  • चंद्रपुरात ब्राऊन शुगर ची विक्री, पोलिसांनी केली 2 आरोपीना अटक

    चंद्रपुरात ब्राऊन शुगर ची विक्री, पोलिसांनी केली 2 आरोपीना अटक

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपुरात छुप्या पध्दतीने ब्राऊन शुगर या अंमली पदार्थाची विक्री सुरू आहे, अश्यातच शहर पोलिसांनी दोघांना अटक करीत ब्राऊन शुगर जप्त केले.

     

    9 जानेवारीला शहर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की सोहेल शेख नामक युवक हा लपून ब्राऊन शुगर ची विक्री करतो, माहितीच्या आधारे पोलीस स्टाफ ने रेड करीत 23 वर्षीय सोहेल शेख सलीम शेख ला अटक केली.

     

    सोहेल ची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळून 7.12 ग्राम वजनाचे ब्राऊन शुगर सहित एकूण 57 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, सोहेल ची अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की सदर ब्राऊन शुगर हे भंगाराम वार्ड येथे राहणारा 38 वर्षीय आवेश शब्बीर कुरेशी याचे असून मी फक्त विक्री करतो.

     

    शहर पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक करून ताब्यात घेतले असू दोघांवर NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत, सपोनि मंगेश भोंगाळे, रमिझ मुलानी, पोउपनी शरीफ शेख, विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, इम्रान खान, भावना रामटेके व संतोष पंडित, जयंता चुनारकर, सचिन बोरकर, निलेश मुडे, चेतन गजलवार, संतोष कावळे, दिलीप कुसराम, रुपेश रणदिवे, इर्शाद शेख, रुपेश पराते यांनी केली.

  • चंद्रपूर शहर पोलिसांनी पकडला जेष्ठ चोर

    चंद्रपूर शहर पोलिसांनी पकडला जेष्ठ चोर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरात 63 वर्षीय वृद्ध हा 2 चोरी प्रकरनात दोषी आढळल्याने शहर पोलिसही चक्रावून गेले.

    चोरीच्या पहिल्या प्रकरणात 26 डिसेंम्बरला शहरातील जटपूरा गेट परिसरातील डॉ.आलूरवार हॉस्पिटलमध्ये ड्युटी करीत रेस्ट रूम मध्ये रेडिओलॉजिस्ट सागर दामिया हे आराम करत होते, मात्र त्यावेळी डॉक्टर आलूरवार यांच्या चेंबर मधून कुणीतरी स्टॅण्ड घड्याळ चोरून नेली, त्यावेळी सीसीटीव्ही तपासली असता एक इसम ती घडी चोरून नेताना आढळून आला, याबाबत दामिया यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली.

     

    दुसऱ्या घटनेत सुरेश लष्कर हे 24 डिसेंम्बरला राजकला टॉकीज येथे चित्रपट बघण्यासाठी गेले होते, त्यावेळी लष्कर यांनी आपले दुचाकी वाहन पार्क केले होते, चित्रपट बघून झाल्यावर लष्कर हे बाहेर आले असता त्यांची दुचाकी पार्किंग च्या ठिकाणी आढळून आली नाही आपले वाहन चोरी झाले हे समजताच त्यांनी याबाबत शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

     

    तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी आपला तपास सुरू केलं, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने आरोपी 63 वर्षीय इकबाल पंढरपूरवाला याला अटक केली, त्याची चौकशी केली असता डॉ.आलूरवार हॉस्पिटलमधून घड्याळ व राजकला टॉकीज येथून चोरी गेलेले दुचाकी वाहनाची चोरी इकबाल ने चोरी केल्याची कबुली दिली.

     

    पोलिसांनी आरोपिकडून चोरी केलेला माल असा एकूण 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहे.

  • गुन्हेगारीचा पहिला प्रयत्न चंद्रपूर शहर पोलिसांनी हाणून पाडला

    गुन्हेगारीचा पहिला प्रयत्न चंद्रपूर शहर पोलिसांनी हाणून पाडला

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरात तीन अल्पवयीन मुलांचा पहिल्या गुन्हा करण्याचा प्रयत्न शहर पोलिसांनी हाणून पाडला, या घटनेत तीन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे.

     

    शहरातील संताजी भवन मार्गे बगड खिडकी कडे सायकल ने जाणारे प्रत्युष मुन यांचा मोबाईल दुचाकी वाहनांवर आलेल्या तिघांनी हिसकावून नेल्याची घटना 6 डिसेंबर ला घडली, फिर्यादी मुन यांनी याबाबत शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असता गुन्हे शोध पथकाचे कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला.

     

    संताजी भवन व पुढील मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज ची पोलिसांनी तपासणी करीत दुचाकी व अल्पवयीन मुलांची ओळख पटताच त्यांना ताब्यात घेण्यात आले, या घटनेत तिघांना ताब्यात घेतले असता त्यांची चौकशी करण्यात आली, त्यांनी सांगितले की हा आमचा पहिलाच गुन्हा आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी क्रमांक MH34CC1447 व हिसकावून नेलेला मोबाईल असा एकूण 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

     

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोंगाळे, पोलीस उपनिरीक्षक शरीफ शेख, पोलीस कर्मचारी विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, संतोष पंडित, इम्रान खान, भावना रामटेके, सचिन बोरकर, चेतन गज्जलवार, रुपेश रणदिवे यांनी केली.