Tag: कोंबडा बाजार जुगार

  • illegal cockfighting gambling Chandrapur । 🔥 कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार! खेळाडूंचा भंडाफोड

    illegal cockfighting gambling Chandrapur

    illegal cockfighting gambling Chandrapur : चंद्रपूर – १७ ऑगस्ट रोजी रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने अवैधपणे कोंबड्याच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्या जुगार बहाद्दर विरोधात कारवाई केली, या कारवाई ३ आरोपी सह ५ लाख ८८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    चंद्रपुरात २४ वर्षीय युवकाला मेफेड्रोन पावडर विक्री प्रकरणी अटक

    मौजा जांभरला गावाच्या तलावाजवळ काही इसम कोंबड्याच्या झुंजीवर जुगार खेळत आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने जांभरला या गावातील तलावाजवळ धाड मारली. यावेळी एकूण १५ कोंबडे, त्यापैकी ३ मृत कोंबडे, ६ दुचाकीवाहन सह रोख १५ हजार ५०० रुपये असा एकूण ५ लाख ८८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर जुगार हा अजयपूर मधील विशाल गावंडे चालवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

    हे आहेत जुगार बहाद्दर

    यावेळी जुगार खेळणारे आरोपी ३८ वर्षीय फारुख बहादूर शेख चंद्रपूर, ४६ वर्षीय मुकेश नामदेव दशमवार राहणार जुनोना चौक, बाबुपेठ व ३५ वर्षीय राजसिंग बहादूरसिंग पटवा राहणार शिवाजी चौक मूल यांना अटक झाली. आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. cockfight gambling crime in Chandrapur

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, चेतन गज्जलवार, इम्रान खान, सतीश अवथरे, किशोर वाकाटे, सुमित बरडे, हिरालाल गुप्ता, प्रफुल्ल गारघाटे व शशांक बदामवार यांनी केली.

  • Illegal Cockfighting Gambling Raid । तिरवंजा जंगलात कोंबड्यांची झुंज आणि जुगार, पोलिसांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त

    Illegal Cockfighting Gambling Raid

    Illegal Cockfighting Gambling Raid : भद्रावती – चंद्रपूर जिल्हा हा वाघाच्या सतत होणाऱ्या हल्ल्यामुळे हादरून गेला आहे, असं असले तरी गुन्हेगार वृत्ती आजही झुडपी जंगलात अवैध काम करीत आहे, विशेष म्हणजे वाघाच्या दहशतीला झुगारून अवैध धंदे सरार्सपणे होत आहे.

    दारू दुकानाविरोधात जनता रस्त्यावर

    २८ मे रोजी पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीत मौजा तिरवंजा येथे गावातील शेतालगत असलेल्या झुडपी जंगलात काही इसम कोंबड्याची झुंज लावीत जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

    माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या झुडपी जंगलात धाड मारली असता त्याठिकाणी ७ आरोपी सहित १ मृत व २ जखमी कोंबडे, दोन कात्या, ७ मोटारसायकल असा एकूण ४ लक्ष ५९ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. police raid on illegal gambling

    सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी महेंद्र बेसरकर, अशोक मंजुळकर, अनुप आष्टुनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुधरी, गजानन नागरे, खुशाल कावळे, शैलेश दुर्गेमवार व रोहित चिटगिरे यांनी केली.

    कोण आहे आरोपी?

    • ६३ वर्षीय महादेव गोपाळा गौरकार, खैरगाव, चंद्रपूर
    • ६६ वर्षीय विजय बाबुराव काटकर, तुकूम एसटी वर्कशॉप जवळ चंद्रपूर
    • ३८ वर्षीय विनोद मारोती मुनघाटे, सिनाळा, चंद्रपूर
    • ४० वर्षीय अनिल किसन सोनटक्के, घुटकाला तलाव, चंद्रपूर
    • ३४ वर्षीय हर्षल सुधाकर बैरम, जगन्नाथ बाबा नगर, चंद्रपूर
    • ४३ वर्षीय सुरेंद्र पांडुरंग निनावे, भानापेठ, चंद्रपूर
    • ३५ वर्षीय शेख राजू शेख मुमताज, घुटकाला वार्ड, चंद्रपूर
    • २९ वर्षीय सौरभ मनोज वानखेडे, गोकुळ गल्ली, बाजार वॉर्ड, चंद्रपूर
    • पाहिजे आरोपी प्रशांत ढवस, तिरवंजा, भद्रावती