Tag: अतिक्रमण

  • Illegal construction action in Chandrapur city । 🏛️ अवैध बांधकामांवर ‘ऑनलाइन तक्रार’ करा, चंद्रपूर मनपाची थेट कारवाई सुरू!

    Illegal construction action in Chandrapur city

    Illegal construction action in Chandrapur city : चंद्रपूर 22 जुलै (News३४) – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे अवैध बांधकामांना आळा घालण्यासाठी झोन निहाय टीम नियुक्त करण्यात आली असुन प्रत्येक वॉर्डमध्ये सुरु असलेल्या अथवा सुरु होणाऱ्या सर्व अवैध बांधकाम तपासणी सदर टीमद्वारे केली जाणार आहे.

    मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवशी अनोखे आंदोलन

      चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात परवानगीविना वाढणाऱ्या अवैध बांधकामांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने झोन निहाय स्वतंत्र तपासणी पथकांची स्थापना केली आहे. ही पथके त्यांच्या झोनमधील प्रत्येक वॉर्डामध्ये नियमितपणे दौरे करत असून सुरु असलेल्या किंवा नव्याने सुरु होणाऱ्या बांधकामांची तपासणी करीत आहेत. Flood zone construction regulations

    अतिक्रमण धारकांनी अडथळा आणल्यास गुन्हा दाखल होणार

       अवैध बांधकाम हटविण्यासाठी कारवाई दरम्यान अवैध बांधकाम करणाऱ्यांना प्रथम नोटीस बजावण्यात येऊन अतिक्रमण काढण्यास ठराविक कालावधी दिला जातो. यानंतरही अतिक्रमण वा अवैध बांधकाम स्वतः हुन न हटविल्यास मनपातर्फे कारवाई केली जाते.कारवाई दरम्यान दबाव आणण्याचा प्रकार अतिक्रमण धारकांकडुन झाल्यास शासकीय सेवकाला कर्तव्यात अडथळा निर्माण करण्याप्रकरणी कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे तसेच कारवाईचा प्रत्यक्ष खर्च, दंड व प्रशासकीय शुल्क संबंधितांकडून वसूल करण्यात येईल.

    अतिक्रमण काढा, न्यायालयाचे निर्देश

       पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पूररेषेच्या आत कोणतेही बांधकाम व्हायला नको, नदी किनारी असलेली बांधकामे, अतिक्रमणे, नदीपात्रातील काँक्रीटीकरण यामुळेे पुराची पातळी वाढत जाण्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. मा.हायकोर्टात दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने पूररेषेतील अतिक्रमणे काढण्यात यावी असे निर्देश मा.न्यायालयाने दिलेले आहेत. Action against unauthorized buildings near rivers


       शहरातील एखादे अतिक्रमण काढण्यासाठी संबंधित अधिकारी सरसावले की, विविध मार्गातुन त्याला विरोध केला जातो यामुळे शहरातील अवैध बांधकाम व अतिक्रमणात मोठय़ा प्रमाणात वाढ होते. अतिक्रमण तसेच अवैध बांधकामाविरुद्ध आलेल्या तक्रारी मग त्या ऑनलाईन आलेल्या व प्रत्यक्ष कार्यालयात प्राप्त झालेल्या असो त्याच शहनिशा करून त्या तात्काळ मार्गी लावण्याचे तसेच कुठल्याही स्वरूपाच्या दबावाला झुगारून कार्य करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.    


         कुठलेही बांधकाम हे परवानगी घेऊनच करावे,बांधकाम परवानगी घेतली नसल्यास त्वरीत ऑनलाईन mahavastu.maharashtra.gov.in” या संकेत स्थळावर सादर करावी. तसेच किल्यालगत 100 मीटर परिसरात, नझूल परिसर,ब्लू लाईन परिसरात कुठलेही बांधकाम न करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. 

  • Encroachment : जिल्हाधिकारी यांना खासदार धानोरकरांनी दिला आंदोलनाचा इशारा

    Encroachment : जिल्हाधिकारी यांना खासदार धानोरकरांनी दिला आंदोलनाचा इशारा

    Encroachment घुग्गुस येथे राजकीय पक्षाने अतिक्रमण केलेल्या जागेवरून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना समान न्याय द्या अशी विनंती केली, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा सुद्धा धानोरकर यांनी दिला आहे.

    Encroachment चंद्रपूर जिल्हîात सर्वत्र अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरु असून काही राजकीय पक्षांना जाणिवपुर्वक सुट दिली जाते का? असा प्रश्न खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून घुग्घुस येथील सर्व्हे क्र. 17 मधील राजकीय पक्षाद्वारे अतिक्रमीत केलेल्या जमिनीवरुन केला आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील ओयो हॉटेल का आले चर्चेत

    चंद्रपूर शहर (chandrapur) तसेच घुग्घुस शहरात देखील प्रशासनाद्वारे न्यायालयाचा दाखला देत अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरु आहे. यामध्ये सामान्य नागरीकांचे अतिक्रमण सरसकट काढत आहेत. परंतु, घुग्घुस येथील सर्व्हे क्र. 17 मधे एका राजकीय पक्षाचे सेवा केंद्र सुरु असून त्याला शासनाचे अभय का? खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केला आहे. सदर जागेची मागणी एका राजकीय पक्षाशी संबंध असलेल्या व शिक्षकी पेशा असून शाळेत न जाणाऱ्या   पदाधिकाऱ्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या संस्थेने सदर जागेची मागणी केली. या जागेचा नोटीस 08 ऑगस्ट रोजी प्रसिध्द झाला असतांना तो जाणीवपुर्वक नोटीस बोर्डाच्या दर्शनीय भागात लावण्यात आला नाही. दि. 02 सप्टेंबर रोजी आक्षेप नोंदविण्याची अंतिम तारीख असतांना 31 ऑगस्ट व 01 सप्टेंबर रोजी सुट्टीचे औचित्य साधून कोणीही आक्षेप घेऊ नये यासाठी 30 ऑगस्ट रोजी लावण्यात आला. सदर बाब जाणीपूर्वक केली का? असा प्रश्न खासदार धानोरकर यांनी उपस्थित केला आहे.

    चंद्रपूर शहरात आला बिबट्या

    एकीकडे सामान्य नागरिकांना जागा मिळत नसत नसुन दुसरीकडे एखाद्या संस्थेला 0.43 हे.आर. जागा भाडेपट्ट्याने देणे हा कुठला न्याय? असा प्रश्न देखील खासदार धानोरकर यांनी उपस्थित केला आहे. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी महोदयांनी तात्काळ अतिक्रमण काढून वरील प्रकरणात दोषींवर कार्यवाही करावी अन्यथा आंदोलनाचा मार्ग हाती घ्यावा लागेल असा ईशारा देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे.

  • चंद्रपूर शहरातील अपघाताला कारणीभूत अतिक्रमण हटणार

    चंद्रपूर शहरातील अपघाताला कारणीभूत अतिक्रमण हटणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील बेलगाम वाहतूक व वाढत असलेल्या अतिक्रमनावर चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेने आता कंबर कसली आहे, शहरातील ट्रायस्टार हॉटेल चौक ते वरोरा नाका चौकातील अतिक्रमण धारकांना नोटीस दिल्या असून येत्या काही दिवसात अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

     

    मागील काही महिन्यांपासून चंद्रपूर शहरात अपघातांची संख्या वाढत असून आतापर्यंत अनेकांनी अपघातात जीव गमावला आहे, सतत वाढणारे अपघाताबाबत News34 ने बातमी प्रकाशित केली होती, त्या बातमीची दखल घेत वाहतूक नियंत्रण विभागाने अतिक्रमण हटविण्यासाठी पाऊल उचलले आहे.

     

    वाहतूक नियंत्रण शाखा, चंद्रपूर महानगरपालिका व उप प्रादेशिक परिवहन विभाग आता या वाढत असलेल्या अतिक्रमनावर संयुक्त रित्या कारवाई करणार आहे.

     

     

    चंद्रपूर वरोरा नाका चौक ते ट्रायस्टार हॉटेल मार्गावर शोरूम धारकांचे दुचाकी वाहन, फास्टफूड सेंटर, पार्किंग नसलेले जिम अश्या अनेक प्रतिष्ठान मुळे शहरात अपघात घडत आहे, त्यामुळे वाहतूक विभागाने अतिक्रमण करीत असलेल्या प्रतिष्ठानाला नोटीस बजावले आहे, अतिक्रमण काढा अन्यथा कारवाईला तयार रहा अश्या सूचना वाहतूक विभागाने दिल्या आहे.

  • चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात भीषण अपघात

    चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात भीषण अपघात

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील अति वर्दळीचा भाग व अपघात प्रवण स्थळ वरोरा नाका चौकात आज मोठी दुर्घटना घडली, या घटनेत ट्रक ने तब्बल 4 वाहनांना चक्काचुर केल्याची माहिती आहे.

    ट्रायस्टार हॉटेल ते वरोरा नाका चौकात अतिक्रमण झपाट्याने वाढत आहे, या मार्गावर होणाऱ्या अपघाताला हे अतिक्रमण सुद्धा कारणीभूत ठरले आहे.

     

    25 नोव्हेम्बरला शहरातील वरोरा नाका चौकातून ट्रक क्रमांक Mh04 DK 6344 हा मूल रोडच्या दिशेने निघाला मात्र बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलावरून जाताना अचानक ट्रक चा रिव्हर्स गियर लागल्याने ट्रक अतिवेगात मागच्या बाजूने यायला लागला, मागे असलेल्या चारचाकी वाहन व दुचाकीला धडक देत तब्बल 100 मीटर अंतर ट्रक मागच्या दिशेने गेला, यामध्ये 3 चारचाकी वाहन व 1 दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. वाहनात कुणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

     

    ट्रक चालकाने समयसूचकता दाखवीत ट्रक मागच्या बाजूने सरळ नेला अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

    मागील अनेक दिवसांपासून चंद्रपूर शहरात अपघातांची संख्या वाढत आहे, याला जबाबदार काही वाहतुकीचे नियम मोडणारे बेजबाबदार नागरिक तर मोठ्या प्रमाणात वाढत असलेले अतिक्रमण आहे.

  • चंद्रपूर नागपूर मार्गावर वाढतंय अतिक्रमनाचे जाळं

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दिवसेंदिवस चंद्रपूर शहराचा विस्तार वाढत असून नागरिकांच्या मूलभूत सोयी काही प्रमाणात अपुऱ्या पडत आहे. सोबतच शहरात अतिक्रमण सुद्धा झपाट्याने वाढत आहे.

     

    चंद्रपूर शहरातील गोल बाजार ते जटपुरा गेट परिसर असो की वरोरा नाका चौक ते बापट नगर याठिकाणी आज मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे.

     

    काही दिवसांपूर्वी चंद्रपूर ते नागपूर महामार्गावर शिक्षिकेचा रस्ते अपघातात बळी गेला होता, कारण रस्त्यावर चारचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ व काही दुकान चालकांनी रस्त्यावर केलेलं अतिक्रमण त्या अपघाताला कारणीभूत होते.

     

    त्या अपघातानंतर सुद्धा चंद्रपूर मनपा प्रशासनाने रस्त्यावर असलेल्या अतिक्रमनावर काही ठोस कारवाई केली नाही, विशेषतः चंद्रपूर नागपूर मार्ग हा अनेक दुकान चालकांनी आपल्या दुकानाच्या हद्दीत घेतला आहे.

    या मार्गावरील अतिक्रमण मनपा प्रशासनाने तात्काळ हटवून चंद्रपूर नागपूर महामार्ग मोकळा करून भविष्यात होणाऱ्या अपघाताला टाळण्याचे काम करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.