Mephedrone trafficking case in Chandrapur
Mephedrone trafficking case in Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपुरात अंमली पदार्थ विक्रीचे जाळे सर्वत्र पसरले आहे, आधी गांजा तर आता मेफेड्रोन म्हणजेच एमडी पॉवडर ची विक्री जोमात सुरु आहे, विशेष म्हणजे या विक्री गॅंग मध्ये अनेक महिला, मुली व अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. शहरातील बाबुपेठ मध्ये नुकतेच शहर पोलिसांनी अवैध दारू विक्री प्रकरणी धाडसत्र मोहीम राबवली आता लगेच एमडी पावडर ची वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
एमडी पावडर ची वाहतूक बाबुपेठ भागातून होणार असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होतो माहितीच्या आधारे १० ऑगस्ट रोजी शहर पोलिसांनी नेताजी चौक मध्ये नाकाबंदी केली. यावेळी एम एच ३४ बीडब्लू ८६८९ हि दुचाकी येताना दिसली असता पोलिसांनी वाहन थांबवित झडती घेतली असता चालकांकडून तब्बल ०६.८५ ग्राम एमडी पावडर आढळून आले.
१८ वर्षीय मुलाने केली वाहतूक
पोलिसांनी दुचाकी चालक १८ वर्षीय अविनाश अनुप कुंडू अटक करीत एकूण ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी कुंडू विरुद्ध एनडीपीएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहे. Chandrapur MD powder drug bust

सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे, पोलीस कर्मचारी भावना रामटेके, सचिन बोरकर, लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, कपूरचंद खरवार, योगेश पिदूरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, रुपेश पराते, सारिका गौरकर व दीपिका झिंगरे यांनी केली.
