Tag: News34 chandrapur

  • monsoon safety rules for old buildings । 🏚️ पावसाळ्यात चंद्रपुरातील जुन्या इमारतींचा धोका वाढतोय!

    monsoon safety rules for old buildings

    monsoon safety rules for old buildings : चंद्रपूर ४ जुलै – महापालिका क्षेत्रातील शिकस्त इमारतींपासून परिसरातील रहिवाशांच्या जीविताला निर्माण होऊ शकणारा संभाव्य धोका पाहता चंद्रपूर महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरवात केली असुन मागील काही दिवसात 62 जीर्ण इमारतींना नोटीस देण्यात आली आहे.  

    शहरात आली हायटेक नालेसफाई यंत्र

        पावसाळ्यात दरवर्षी महापालिका क्षेत्रातील जीर्ण व शिकस्त इमारतींचा सर्व्हे करण्यात येतो. यात आढळलेल्या धोकादायक इमारतीतील रहिवाश्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 चे कलम 264 अन्वये नोटीस जाहीर करण्यात येते. चंद्रपूर मनपातर्फे झोन 1 अंतर्गत 30, झोन 2 अंतर्गत 20 तर झोन 3 अंतर्गत 12 अश्या एकुण 62 धोकादायक इमारतींना नोटीस देण्यात आली आहे. notice to vacate unsafe buildings by municipality 

    अभियंता कडून सर्व्हेक्षण करा

       नोटीसनुसार धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्यास असलेल्या सर्व व्यक्तींना व महत्वाचे साहित्य अन्यत्र सुरक्षित ठिकाणी तात्काळ स्थलांतरीत होण्यास सांगण्यात आले असुन त्वरित आपल्या इमारतीची दुरुस्ती करुन घेण्याचे तसेच त्यांनतर आपल्या इमारतीचे नोंदणीकृत स्ट्रक्चरल अभियंता यांचेकडून सर्वेक्षण करुन त्याबाबतचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट मनपा कार्यालयास सादर करण्यास कळविण्यात आले आहे.

     
      अश्या 6 इमारती यापुर्वी मनपाने निर्लेखित केल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी सदर कारवाई दरवर्षी मनपातर्फे करण्यात येते मात्र काही मालमत्ताधारक जिवाची पर्वा न करता त्याच इमारतीत तळ ठोकून राहतात. यामुळे परिसरातील रहिवाशांच्या जिवालासुद्धा धोका निर्माण होतो. मग अश्या प्रसंगी निष्कासीत करण्याची अथवा नियमानुसार कारवाई मनपातर्फे करण्यात येते.

  • sewage suction machine for city drainage system । 🛠️ स्मार्ट सिटीची वाटचाल! चंद्रपूर शहरात आली हायटेक नालेसफाई यंत्रणा!

    sewage suction machine for city drainage system

    sewage suction machine for city drainage system : चंद्रपूर 4 जुलै – चंद्रपूर शहरात नाली सफाईचा कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात आजपासून ‘ट्रक माउंटेड – हाय सिवेज सक्शन मशीन’ (Truck Mounted – High Sewage Suction Machine) कार्यान्वित करण्यात आली आहे.

    बोगस शिक्षक व शालार्थ आयडी घोटाळ्याची होणार एसआयटी चौकशी

       सदर मशीनद्वारे आता शहरातील विविध भागांतील भूमिगत नाले,गटार, मेनहोल्स, व नाल्यांची सफाई अधिक जलद, कार्यक्षम आणि यांत्रिक पद्धतीने होणार आहे. पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या स्वच्छता कार्यात लागणारा वेळ आणि श्रम यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार असून, विशेषतः पावसाळ्यातील नालेसफाई अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व स्वच्छता विभागाच्या देखरेखीखाली मशीनचे ट्रायल रन करण्यात आले. modern technology in urban sewage cleaning


      यावेळी मशीनची शोषण क्षमता, दाब नियंत्रण, आणि जलप्रवाह व्यवस्थापन याची तपासणी करण्यात आली.सदर मशीनची क्षमता ही 4000 लिटरची असुन बंद गटारांमधून त्वरित सांडपाणी काढण्यासाठी, पावसाळ्यात नाले तुंबल्यास तत्काळ सफाईसाठी, गंध व दुर्गंधीमुक्त परिसर राखण्यासाठी विशेषतः उपयुक्त ठरणार आहे. सीवेज लाइन्स, ड्रेनेज सिस्टीम आणि इतर भागातील मलबा, गाळ आणि द्रव काढण्यासाठी हे मशीन शक्तिशाली सक्शन वापरते. मनपाच्या वतीने ही आधुनिक मशीन सार्वजनिक सेवेसाठी समर्पित करण्यात येत आहे. यामुळे शहर स्वच्छतेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे.

    हे कसे कार्य करते:

    मशीनमध्ये एक शक्तिशाली सक्शन पंप आहे जो नोजल किंवा ट्यूबद्वारे सीवेज लाइनमध्ये सक्शन तयार करतो. हे सक्शन मशीनच्या टाकीमध्ये चिखल आणि द्रव खेचते. नंतर टाकी रिकामी करून ती कचरा विल्हेवाटीसाठी नेली जाऊ शकते.

    फायदे:

    कार्यक्षमता: ही मशीन कमी वेळेत सांडपाणी साफ करू शकते.
    परिणामकारकता: ही मशीन मोठ्या प्रमाणातील नालीचा गाळ व चिखल देखील काढू शकते.
    सुरक्षा: ही मशीन सफाई कामगारांना धोकादायक परिस्थितीत काम करण्यापासून वाचवते.
    पर्यावरण संरक्षण: हे यंत्र सांडपाणी स्वच्छ करून पर्यावरणाचे प्रदूषणापासून संरक्षण करते.
    खर्च प्रभावी: या यंत्रामुळे सांडपाणी साफ करण्याचा खर्च कमी होऊ शकतो.

  • Bogus teacher recruitment and shalarth ID scam । 🛑 १००० कोटींचा घोटाळा? शिक्षक भरती व शालार्थ आयडी प्रकरणाची होणार SIT चौकशी

    Bogus teacher recruitment and shalarth ID scam

    Bogus teacher recruitment and shalarth ID scam : चंद्रपूर : नागपूर विभागातील शिक्षक पदभरती घोटाळा, शालार्थ आयडी घोटाळ्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती नागपूर विभागासह संपूर्ण राज्यात आहे. त्यामुळे राज्यातील बोगस शिक्षक पदभरती / शालार्थ आयडी प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करावा. यात गृह, शिक्षण विभागातील निवृत्त अधिकारी व उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करण्याची मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी शुक्रवार (ता. ४) विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे केली. या प्रकरणाची प्रशासकीय, पोलिस विभागामार्फत चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची व्याप्ती बघता राज्यस्तरीय एसआयटी नियुक्त करून यात आयएएस, आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांसह न्यायालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी उत्तर देतांना सांगितले. special investigation team for teacher scam

    नझूल धारकांना मिळणार कायमस्वरूपी पट्टे – आमदार किशोर जोरगेवार यांची लक्षवेधी

    महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात अराजकता माजली आहे. शिक्षक पदभरती घोटाळा, शालार्थ आयडी ( shalarth ID) घोटाळा नागपूर या उपराजधानीत उघडकीस आला आहे. या घोटाळ्याची पाळेमुळे राज्यभर पसरली आहेत. २ मे २०१२ पासून शिक्षक पदभरती बंद करण्यात आली. फेब्रुवारी २०१३ ला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात आली. त्यानंतर शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी २०१३ पूर्वी उत्तीर्ण झालेल्या डीएड धारकांच्या नियुक्तीस मृत शिक्षणाधिकारीच्या स्वाक्षरीने मान्यता देण्यात आली.

    २०१९ नंतर या पदभरतीस बोगस शालार्थ आयडी मिळविण्यात आला. यातून शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीची लूट करण्यात आली. या घोटाळ्यात शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, संचालक, आयुक्त कार्यालय तसेच मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा देखील समावेश असून जवळपास १००० कोटींच्या वर भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे. what is shalarth ID and how it’s misused

    घोटाळ्याची व्याप्ती मोठी

    नागपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये बोगस भरती, शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या नियुक्तीस मान्यता व शालार्थ आयडी देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे राज्यस्तरावर तात्काळ एसआयटी (SIT) नियुक्त करावी. एसआयटीमध्ये गृह, शिक्षण विभागातील निवृत्त अधिकारी व उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करावा. नागपूर विभागातील बोगस भरती, शालार्थ आयडी घोटाळ्यातील निलंबित सूत्रधार गेल्या तीन महिन्यांपासून फरार आहे. त्याला अटक कधी करणार? या घोटाळ्यात १८ च्यावर अधिकारी, कर्मचाऱ्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यांना बडतर्फ करावे तसेच त्यांच्या संपत्तीची ईडीमार्फत चौकशी करावी, आदी प्रश्न आमदार सुधाकर अडबाले यांनी विधानपरिषदेत उपस्थित केले. fake shalarth ID case Nagpur

    यावर शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर (pankaj bhoyar) यांनी उत्तरात नागपूर, भंडारा, नाशिक व जळगाव या जिल्ह्यांमध्ये बोगस भरती, शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला आहे. त्यानंतर या प्रकरणाचा तपास विशेष चौकशी पथकामार्फत करण्याची मागणी पोलिस विभागाकडे करण्यात आली आहे. तसेच संचालक, सहसंचालक दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या प्रकरणाची व्याप्ती बघता राज्यस्तरीय एसआयटी नियुक्त करून चौकशी करण्यात येणार असून, यात गृह, शिक्षण विभागातील निवृत्त अधिकारी व उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. भोयर सांगितले.

  • permanent patta for nazul land holders । 🔥 ५० वर्षांचा संघर्ष संपणार? नझुलधारकांना मिळणार कायमस्वरूपी पट्टा!, आमदार जोरगेवार यांची लक्षवेधी

    permanent patta for nazul land holders

    permanent patta for nazul land holders : चंद्रपूर – चंद्रपूर आणि  घुघ्घुस  येथील नागरिक मागील ५०–६० वर्षांपासून नझुल जागेवर वास्तव्यास असूनही, त्यांना अतिक्रमणधारक म्हणून नोटिसा पाठवून बेघर करण्याचे काम सुरू आहे. हा अन्याय आहे. अशा नझुलधारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावेत, अशी मागणी पावसाळी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. या बाबत येत्या बुधवारी बैठक घेण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे.

    दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचा आज वाढदिवस, बाळूभाऊंच्या आठवणीत एक भावनिक पत्र


                    मुंबई येथे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात काल गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगारांचा प्रश्न उपस्थित केला होता. तर आज लक्षवेधी सूचनेवर बोलताना आमदार किशोर जोरगेवार (kishor jorgewar) यांनी चंद्रपूर आणि घुग्घूस येथील नझुलधारकांच्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधत त्यांच्या मागण्या सभागृहापुढे मांडल्या. nazul land patta issue latest news


                चंद्रपूर महानगरपालिका आणि घुघ्घुस नगरपरिषद हद्दीतील हजारो नागरिक गेल्या अनेक दशकांपासून शासनाच्या जमिनीवर घरे बांधून वास्तव्यास आहेत. तरीही त्यांना अद्याप शासकीय नोंदीत मालकी हक्क मिळालेला नाही. या संदर्भात सभागृहात बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूर शहरातील ३९ झोपडपट्टीमध्ये एकूण ११,८८१ घरांचा प्रश्न आहे. यापैकी २५ झोपडपट्टी इम्प्रुव्हमेंट स्कीमच्या नकाशांना मंजुरी मिळाली आहे, तर उर्वरित १४ नकाशे अद्याप मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत.

    नगर परिषद घुघ्घुसमध्ये अनेक कुटुंबे शासकीय जमिनीवर राहत असून सुमारे १३०० कुटुंबियांना अतिक्रमण (encroachment) नोटीसा बजावण्यात आलेल्या असून घरे खाली करण्याच्या सूचना केल्या आहे. त्यामुळे जवळपास ४ ते ५  हजार रहिवासी विस्थापित होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे येत आहेत.

    बुधवारी महत्वाची बैठक

    त्यामुळे आता नझूल धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या विषयावर जिल्हाधिकारी, घुग्घूस नगरपरिषद, तहसीलदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह तातडीने बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी सूचना देखील आमदार जोरगेवार यांनी अधिवेशनात केली. त्यांच्या या मागणीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येत्या बुधवारी बैठक घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पट्ट्यांचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

  • inspirational political journey | प्रिय बाळूभाऊ, बाळूभाऊंच्या आठवणीत एक भावनिक पत्र

    inspirational political journey

    inspirational political journey : प्रिय बाळूभाऊ,

    दिनांक: ४ जुलै, २०२५

    आज तुमचा जन्मदिवस. आजच्या दिवशी तुम्हाला आठवताना मन भरून येतंय आणि डोळे पाणावतात. तुम्ही आमच्यातून निघून गेला असलात तरी, तुमची आठवण, तुमचं कार्य, आणि तुमचा कणखर स्वभाव आजही आमच्या मनात तेवढाच जिवंत आहे. आज तुमच्या जयंतीदिनी तुम्हाला आठवताना जाणवतंय की, तुमच्यासारखा लोकनेता पुन्हा होणे नाही – न भूतो न भविष्यति! (Balubhau dhanorkar birthday)

    बाळूभाऊ, तुम्ही चंद्रपूरच्या भूमीत जन्माला आलात आणि याच मातीची सेवा करण्यात तुम्ही आपलं आयुष्य वेचलं. तुम्ही फक्त एक खासदार नव्हता, तर आमच्यासाठी एक कार्य, एक प्रेरणा, आणि एक आधारस्तंभ होता. तुम्ही तर बुडणाऱ्या नौकेला योग्य मार्ग दाखवून किनाऱ्यावर आणू शकणारा खंबीर नावाडी होते. एक कार्यक्षम नेतृत्व, एक दूरदृष्टी असलेला नेता, आणि विजयश्री खेचून आणणारा एक उत्कृष्ट आक्रमक योद्धा म्हणूनच आम्ही तुम्हाला ओळखत होतो. तुमच्या प्रत्येक कृतीतून, प्रत्येक निर्णयांतून हेच सिद्ध झाले. Tribute

    सुधीर मुनगंटीवार यांचा 15 वर्षाच्या पाठपुराव्याला अखेर यश

    २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशात पंतप्रधान मोदींची दुसरी लाट असतानाही, तुम्ही चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा क्षेत्रात अपवादात्मक कामगिरी केली. तुम्ही तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर (hansraj ahir) यांचा पराभव करून विजय मिळवला, आणि विशेष म्हणजे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून निवडून आलात. हा विजय केवळ तुमचा नव्हता, तर तो चंद्रपूरच्या सामान्य जनतेचा विजय होता. तुमच्या या विजयाने, तुमची जनतेवरील पकड किती मजबूत होती, हे स्पष्ट झाले.

    राजकीय वारसा नसतानाही शिखरापर्यंतचा संघर्षमय प्रवास


    राजकारणात यशस्वी होण्यासाठी राजकीय वारसा लागतो, हे एक अलिखित सूत्र आहे. पण बाळूभाऊ, तुम्ही हे सूत्र पूर्णपणे खोटे ठरवले. कोणताही राजकीय वारसा नसताना, तुम्ही केवळ आपल्या स्वकर्तृत्वाने राजकारणात एक अढळ स्थान निर्माण केले. एका सामान्य जिल्हा परिषद शिक्षकाचा मुलगा, औषधनिर्माणशास्त्र पदविका घेऊनही नोकरीच्या मागे न लागता, कपड्याचे दुकान सुरू करून तुम्ही व्यवसायात पदार्पण केले. पण तुमच्या अवतीभवती असलेला अन्याय, गरिबांवर होणारे अत्याचार तुम्हाला स्वस्थ बसू देईना. inspirational political journey

    कोणत्याही पदावर नसतानाही, तुम्ही प्रशासनाला धारेवर धरून लोकांच्या समस्या मार्गी लावण्याची तुमची हातोटी सर्वांनी पाहिली. त्यामुळेच तुम्ही स्थानिक लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि पुढे लोकांच्या आग्रहाखातर तुम्ही राजकारणात प्रवेश केला. भद्रावतीसारख्या तालुक्याच्या गावातून सुरू झालेला तुमचा प्रवास, आमदार ते खासदार पदापर्यंतचा हा थक्क करणारा पल्ला खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे.

    गेली दोन दशके भारतीय जनता पक्षाची चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात मजबूत पकड होती. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणे आणि प्रस्थापित नेतृत्वांसमोर आव्हान उभे करणे सोपे नव्हते. पण तुम्ही व्यवस्थेतील अन्यायाविरोधात बंड पुकारताना कधीही अन्याय करणाऱ्यांची तमा बाळगली नाही. लोकहितासाठी केलेल्या अनेक आंदोलने आणि मोर्चांमुळे तुमच्याविरोधात अनेक न्यायालयीन केसेस दाखल झाल्या. सामान्य जनतेच्या हितासाठी तुम्ही तुरुंगवासही भोगलात. राजकीय प्रस्थापित कुटुंबांना शह देत, एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा ते खासदार पदापर्यंतचा हा संघर्षमय प्रवास युवकांसाठी एक आदर्श आहे. inspirational political journey

    लोकहितासाठी सदैव तत्पर आणि संकटातील आधार
    बाळूभाऊ, तुम्ही कायम लोकहितासाठी तत्पर राहिलात. लोकसभेत चंद्रपूर विभागासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मूर्ती विमानतळाच्या कामासाठी तुम्ही आवाज उचलला. त्याचे काम अद्याप सुरू का झाले नाही, असा प्रश्न तुम्ही सरकारला विचारला होता. उड्डाण मंत्री सिंधिया यांनी भूसंपादनाचे काम बाकी असल्याचे सांगितले असता, तुम्ही धावपट्टीची लांबी वाढवल्यास अनेक समस्या सुटतील असे दूरदृष्टीचे उपायही सुचवले होते. Chandrapur airport

    कोरोना महामारीच्या काळात तुमच्यातील लोकसेवकाचे रूप अधिक स्पष्ट झाले. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता, ही भयावह परिस्थिती भविष्यात उद्भवू नये म्हणून तुम्ही ऑक्सिजन प्लांट उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तुमच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागात एकाच वेळी ८० बेडवर ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकणारा प्लांट लवकरच पूर्ण झाला आणि त्याचे उद्घाटनही तुमच्या हस्ते झाले होते.

    कोरोनाच्या पहिल्या लाटेतही तुम्ही सामान्य जनतेची जेवणासाठी होणारी भटकंती पाहून धान्य किट वाटप केले होते. प्रत्येक तालुक्यात मोठ्या गावांमध्ये शिवभोजन केंद्रे आणि जेवणाचे डब्बे उपलब्ध करून दिले होते. तुमच्या या कार्याची जनसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशंसा झाली होती. तुमच्या मनात सर्वांसाठीच किती आपुलकी होती, हे यातून दिसून येते.

    मृत्यूच्या भीतीमुळे मोठे मोठे समाजसेवक आणि राजकारणी मंडळी घरात असताना, दुसऱ्या लाटेतही तुम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, पीपीई किट घालून कोरोना रुग्णांची आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आपुलकीने विचारपूस केली होती. पीपीई किट परिधान करून, तुम्ही कोरोना रुग्णांशी संवाद साधला होता, त्यांच्या गरजा समजून घेतल्या आणि ही लढाई सर्वांनी मिळून लढायची आहे, असे सांगून जनतेचे धैर्य वाढवले होते. तुमचा तो चेहरा, ते बोल आजही आमच्या स्मरणात आहेत.

    एक आक्रमक आणि समर्पित नेतृत्व


    तुमची कार्यक्षमता पाहून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही तुम्हाला काँग्रेस कार्यकारिणीत स्थान दिले. केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्यांवर तुम्ही जोरदार टीका करत, हे अन्यायकारक कायदे मागे घेण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या हिताचा असो, की कोरोनाविरुद्धचा लढा, तुम्ही जनतेच्या आणि तुमच्या संसदीय क्षेत्राच्या विकासासाठी सदैव तत्पर होता. खासदार धानोरकर हे खूप आक्रमक मानले जात, पण त्यांच्या आक्रमकतेमागे जनतेच्या हिताची तळमळ होती. सदैव आपल्या परिसराचा विकास, जनतेचे हित हे ध्येय बाळगणाऱ्या खासदार बाळू धानोरकर यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. inspirational political journey

    तुमचा विजयी रथ इथेच थांबला नाही. तुमच्या विजयानंतर तुमच्या पत्नी प्रतिभा धानोरकरही भरघोस मताधिक्याने आमदार झाल्या, ही तुमच्याच कार्याची आणि जनमानसातील तुमच्या आदराची पावती होती. आमदार असताना तुम्ही वरोरा रुग्णालयात रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवणाची उत्तम सोय होण्याकरिता तुमच्या पुढाकारातून भोजन व्यवस्था सुरू केली होती, जी आजही अव्याहतपणे सुरू आहे. लोकांमध्ये मिसळण्याची तुमची वृत्ती आणि प्रेमळ स्वभाव यामुळे राजकीय विरोधकही आपलेसे होत होते. तुम्ही पक्षीय भेदाभेद न करता, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. inspirational political journey

    बाळूभाऊ, तुम्ही आमच्यातून निघून गेलात, पण तुमच्या कार्याची आणि संघर्षाची गाथा आमच्या मनात कायम राहील. तुम्ही घालून दिलेले आदर्श आणि तुमचा कामाचा झपाटा आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील. तुमच्या अचानक जाण्याने चंद्रपूर जिल्ह्याने एक सच्चा लोकसेवक गमावला आहे. तुमची पोकळी भरून काढणे अशक्य आहे.

    तुमच्या जन्मदिनी, तुमच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन ! तुमचा आदर्श घेऊन आम्ही नेहमीच वाटचाल करत राहू.

    आपला

    गोविल मेहरकुरे, चंद्रपूर

  • Chandrapur peace committee meeting decisions । 🛑 चंद्रपूर जिल्ह्यातील आगामी सण ‘निर्विघ्न’ होणार! शांतता समितीच्या बैठकीत महत्वाचे निर्णय

    Chandrapur peace committee meeting decisions

    Chandrapur peace committee meeting decisions : चंद्रपूर : आगामी दोन – तीन दिवसांत जिल्ह्यात आषाढी एकादशी आणि मोहर्रम तसेच पुढील महिन्यांपासून गणेशोत्सव व इतर सणांना सुरवात होणार आहे. या दरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सर्वधर्मीय सण शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी केले.

    चंद्रपुरात मोठा आर्थिक घोटाळा


    नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे, सहायक पोलिस अधिक्षक नियोमी साटम, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपमुख्‍ कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे उपस्थित होते.

    प्रत्येकच नागरिक हा विना वर्दीतील पोलिस आहे, असे सांगून अपर जिल्हाधिकारी श्री. व्यवहारे म्हणाले, सर्वांनी आपापल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी. सोशल मिडीयावर येणा-या अफवांवर विश्वास ठेवू नये. मोहर्रम आणि एकादशी एकत्रित येत असून ग्रामीण स्तरावर जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधितांना योग्य निर्देश द्यावेत. मोकाट जनावरे, रस्त्यावरील खड्डे याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था, सा. बा. विभागाने विशेष देणे गरजेचे आहे. peace committee meeting updates

    सण उत्सवाच्या कालावधीत वीज पुरवठा अखंडीत सुरू राहील, याची महाविरतण कंपनीने काळजी घ्यावी. या कालावधीत मद्यविक्रीचा साठा अचानक वाढणार नाही, यासाठी उत्पादन शुल्क विभागाने तपासणी करावी. प्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलिस विभागाने वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियेाजन करावे. तसेच आरोग्य विभागाने फिरते वैद्यकीय पथक, पुरेसा औषधीसाठी ठेवावा, अशा सुचना त्यांनी दिल्या.

    अफवांबाबत सर्वांनी अलर्ट राहावे : अतिरिक्त पोलिस अधिक्षक कातकाडे

    सोशल मिडीयाबाबत सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कृत्रिम बुध्दिमत्तेच्या माध्यमातून आजकाल बनावट पोस्ट करणे शक्य असून, असे आढळल्यास त्वरीत सायबर पोलिस स्टेशनसोबत संपर्क करावा. शांतता राखणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. सण आणि उत्सवादरम्यान पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येईल. ध्वनी प्रदुषणाबाबत डीजे ऑपरेटर्सची बैठक घेऊन मर्यादेचे पालन करण्याचे त्यांना सांगितले जाईल. उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. चंद्रपूर जिल्ह्यातील आगामी सण उत्सव शांततेत पार पडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. how local administration handles festival season security

    यावेळी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले. तसेच शांतता समितीच्या उपस्थित सदस्यांनी सुचना केल्या. कार्यक्रमाचे संचालन मंगला घागी यांनी केले. बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, मुख्याधिकारी, पोलिस पाटील आदी उपस्थित होते.

  • Pombhurna MIDC project latest status । 💬 मुनगंटीवारांचा 15 वर्षांचा पाठपुरावा अखेर यशस्वी! पोंभूर्णा MIDC ची सुरुवात लवकरच

    Pombhurna MIDC project latest status

    Pombhurna MIDC project latest status : मुंबई, ३ जुलै : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा येथे एमआयडीसी होण्यासाठी २००९ पासून सातत्याने पाठपुरावा केला. पंधरा वर्षांच्या या संघर्षाला अखेर यश आले आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उद्योग राज्यमंत्री इंद्रनीलजी नाईक यांनी पोंभूर्णा एमआयडीसी (pombhurna midc) वर्षभरात सुरू करण्याचे स्पष्ट आश्वासन आ. मुनगंटीवार यांना दिले.

    चंद्रपुरात निघाला भव्य निषेध मोर्चा

    या मुद्द्यावर अर्धा तास झालेल्या चर्चेत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी  आतापर्यंतच्या पाठपुराव्याची आठवण करून दिली. एनओसी, नकाशा, नाहरकत प्रमाणपत्र, बैठकांचे इतिवृत्त आणि कालबाह्य प्रक्रियांमुळे हा प्रकल्प कसा लांबणीवर पडला, हे त्यांनी तपशीलवार मांडले. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री महोदयांकडे चार ठोस मागण्या करत लक्ष वेधले. संबंधित अधिकाऱ्यांची एक बैठक तत्काळ घेणे, चंद्रपूर जिल्ह्यातच राज्य उद्योग मित्र नेमावा, मंत्री महोदयांनी चंद्रपूर दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करावी, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यात वाढ करावी, या मागण्यांचा यामध्ये समावेश होता. Sudhir Mungantiwar efforts for MIDC project

    २ कोटी ३५ लाखांचा मोबदला

    उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी यावेळी सकारात्मक भूमिका घेत पोंभूर्णा एमआयडीसीसाठी १०२.५० हेक्टर भूसंपादन प्रस्तावाला मान्यता मिळाल्याची माहिती दिली. या अंतर्गत ४२.५९ हेक्टर शेतकऱ्यांशी थेट खरेदी करून २ कोटी ३५ लाखांचा मोबदला दिला गेला आहे. उर्वरित जमिनींसाठी ३३/३ ची नोटीस जारी करण्यात आली आहे.  

    आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या मागण्याबाबत मंत्री नाईक म्हणाले, ‘यासंदर्भात अधिवेशन कालावधीतच बैठक आयोजित केली जाईल. चंद्रपूर येथे राज्य उद्योग मित्र नेमण्यात येईल. उर्वरित भूसंपादन प्रक्रिया ६० दिवसांत पूर्ण केली जाईल आणि अधिकाऱ्यांकडून दर आठवड्याला प्रगती अहवाल आमदार श्री. मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांना सादर केला जाईल. जमिनीच्या दरांसंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल.’ यासोबतच पुढील महीन्यात मी स्वतः चंद्रपुरात  येतो, असे आश्वासनही राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी यावेळी दिले.

  • safety of Christian priests and pastors । ख्रिश्चन समाजाचा चंद्रपुरात भाजप आमदारविरुद्ध निषेध मोर्चा

    safety of Christian priests and pastors

    safety of Christian priests and pastors : चंद्रपूर ३ जुलै – राज्याच्या राजकारणात सत्ताधारी मंत्री असो कि आमदार सध्या ते विविध जातीधर्माबाबत बेताल वक्तव्य करत सुटले आहे, याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे भाजपचे जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर, यांच्यावर कठोर कारवाई करीत आमदारकी रद्द करण्याची मागणी चंद्रपूर ख्रिश्चन समाजाच्या वतीने करण्यात आली.

    चंद्रपुरात डास नियंत्रण मोहिमेला सुरुवात

    ३ जुलै रोजी चंद्रपुरात संत अँड्रयूज चर्च ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ख्रिश्चन समुदायाने आमदार पडळकर विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. सदर निषेध मोर्च्याचे आयोजन चंद्रपूर जिल्हा पास्टर्स असोसिएशन तर्फे करण्यात आले होतेे. protests against politicians for hate speech

    ११ लाखांची सुपारी

    सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कुपवाड येथे ऋतुजा राजगे नावाच्या गर्भवती तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणात धर्मांतरासाठी सासरच्या लोकांनी छळ केल्याचा आरोप आहे. या घटनेच्या निषेधार्थ आयोजित मशाल मोर्चादरम्यान गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांनी “धर्मांतरासाठी गावात येणाऱ्या ख्रिश्चन पाद्रींना सैराट करा, आणि जो हे करेल त्याला मी स्वतः ११ लाखांचे बक्षीस देईन” असे विधान केले. या वक्तव्याने ख्रिश्चन समाजात संताप आणि भय निर्माण झाले असून, त्यांनी याला हिंसाचाराला चिथावणी देणारे वक्तव्य ठरवले आहे. धर्मगुरूंना ठार मारणाऱ्याला पडळकर यांनी 11 लाखांची सुपारी देण्याचं काम केले.

    चंद्रपुरात आयोजित निषेध मोर्च्यात आमदार पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, त्यांना आमदार पदावरून पदमुक्त करीत कारवाई करा अशी मागणी ख्रिश्चन समाजाने मोर्च्यात केली.

    जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निषेध मोर्चा पोहचल्यावर जिल्हाधिकारी गौडा यांना निवेदन देण्यात आले.

    यावेळी पास्टर निर्मल यांनी सांगितले की जनतेतून निवडून आलेल्या प्रतिनिधीने एखाद्या समाजाविरुद्ध असे बेताल वक्तव्य करणे म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम होय. church protest march against political statements

    आमच्या धर्मात येणारे नागरिकांना आमच्या धर्मात येण्यासाठी आम्ही जबरदस्ती करीत नाही, ज्यांना आमच्या धर्मात यायचे आहे ते स्वखुशीने येतात. पडळकर यांच्या या आक्षेपार्ह विधानाने ख्रिश्चन समाजात दहशत निर्माण झाली असून शासनाने आमच्या समाजाच्या रक्षणासाठी महत्वाचे पाऊले उचलत आम्हाला सुरक्षा प्रदान करावी व पडळकर यांच्यावर कठोर कारवाई शासनाने करावी अशी मागणी पास्टर्स यांनी केली. आयोजित निषेध मोर्चात हजारो ख्रिश्चन समाजातील नागरिकांची उपस्थिती होती.

  • industrial security guard registration process । 🕵️‍♂️ काम आहे पण नोंद नाही? आमदार जोरगेवार यांनी वेधले सरकारचे लक्ष

    industrial security guard registration process

    industrial security guard registration process : मुंबई पावसाळी अधिवेशन ३ जुलै (News३४) – अनेक औद्यागीक संस्थांनी सुरक्षारक्षकांची मागणी केली आहे. ते नौकरी देण्यास तयार आहे. मात्र सुरक्षा रक्षक मंडळ कामगारांची नोंदणी करुन घेत नसल्याने नोंदणीकृत कामगारांची संख्या कमी आहे. परिणामी मागणी असूनही कामगार पूरवता येत नसल्याचा आरोप करत सूरक्षारक्षक मंडळाने तात्काळ सुरक्षा रक्षकांची नोंदणी करावी याबाबत कामगार मंत्री यांनी चंद्रपूरसाठी बैठक लाववी अशी मागणी पावसाळी अधिवेशनात (Monsoon session) बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. आहे. यावर अधिवेशन संपताच विशेष बैठक घेण्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी मान्य केले आहे. special meeting to resolve contract labor problems

    मूल पोलिसांचं कौतुकास्पद कार्य

          पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या सत्रात बोलताना आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी कामगारांचा प्रश्न उपस्थित करून येथील सुरक्षारक्षकांच्या समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावर उत्तर देताना कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी अधिवेशन संपल्यानंतर या संदर्भात विशेष बैठक घेण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे औद्योगिक जिल्हा असलेल्या चंद्रपूरमधील कामगारांचे प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात ५० हजार कंत्राटी कामगार


    चंद्रपूर जिल्ह्यात सध्या ५० हजारांहून अधिक कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. मात्र त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करणारी सक्षम यंत्रणा अद्याप अस्तित्वात नाही. अनेक आस्थापनांनी आपल्या सुरक्षारक्षकांची नोंद केली असली, तरी प्रशासनाकडून त्यांच्या नोंदणीबाबत उदासीनता आहे. परिणामी, या कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे चंद्रपूर येथे विशेष बैठक घेऊन कामगारांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी पावसाळी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.


    आज विधीमंडळात या मुद्द्याकडे लक्ष वेधताना आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे विशेष मागणी करत सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यातील कंत्राटी कामगार, विशेषतः सुरक्षारक्षक यांच्या नोंदणी प्रक्रियेत अपुऱ्या यंत्रणेचा फटका कामगारांना बसतो. त्यामुळे या कामगारांचे हक्क आणि कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. कामगार मंत्री यांनी स्वतः चंद्रपूर जिल्ह्याला भेट द्यावी, स्थानिक अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी आणि या कामगारांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. contract labor registration issues


    या मागणीला उत्तर देताना कामगार मंत्री आकाश फुंडकर (Labor Minister Akash Fundkar) यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, लवकरच चंद्रपूर जिल्ह्यातील कामगार समस्यांवर विशेष बैठक घेण्यात येईल. तसेच सुरक्षारक्षक कामगारांची नोंदणी करण्याचे आदेश दिले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो कंत्राटी कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले जाणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • district council rural development updates । 🏡 गावात रोजचा कचरा उचलला जाणार! घनकचरा व्यवस्थापनात जिल्हा परिषदेची नवी क्रांती!

    district council rural development updates

    district council rural development updates : चंद्रपूर दिनांक 3 जुलै 2025 – चंद्रपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी नुकताच सिदेंवाही तालुक्याचा दौरा केला असून, सिदेंवाही तालुक्यातील विविध विकास कामांना भेटी देऊन, पाहणी केली आहे. या भेटी दरम्यान गावातील विकास कामे गतीने निर्माण करा. कामात गती आणा असे सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंह (Pulkit Singh) यांनी केल्या.

    चंद्रपुरात डास नियंत्रण मोहिमेला सुरुवात

    सर्वप्रथम सिंदेंवाही पंचायत समितीमध्ये सर्व विभागाचा आढावा घेण्यात आला यामध्ये कामात पारदर्शकता ठेवून कामे करा. सर्व विकासकामे वेळेत पूर्ण करा .अशा सूचनाही पुलकित सिंह यांनी दिली आहे. यावेळी पुलकीत सिंह यांनी सिंदेंवाही तालुक्यातील काही गावातील विकास कामांची पाहणी केली.

    यावेळी पेडगाव या गावात व्हिजिट देऊन, गावातील शाळा व अंगणवाडी , मोहाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, जामसाळा ग्रामपंचायत ला भेट देऊन ग्रामपंचायतच्या कामकाजाची विचारणा केली.

    घनकचरा व्यवस्थापनाची पाहणी

    नवरगाव येथील नव्याने तयार झालेले घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पची (Solid Waste Management Project) पाहणी करून, गावातील कचऱ्याचे  वर्गीकरण करून, सर्व प्रकारचा कचरा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात रोज आणावा .गावातील कचरा रोज गोळा करावा .अशा सूचना केल्या. यासोबतच मामा तलाव दुरुस्तीच्या कामाची पाहणी करून यंत्रणेला योग्य ते निर्देश दिले . यावेळी पंचायत समिती सिंदेंवाहीचे गटविकास अधिकारी आत्मज मोरे तथा विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.