Zilla Parishad Social Welfare Scheme : चंद्रपूर, दि. ०८ जुलै : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता दिव्यांग व मागासवर्गीय नागरिकांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येणार आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी १५ जुलै २०२५ पर्यंत संबंधित ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी अंतर्गत तीन चाकी सायकल, पांढरी काठी, श्रवणयंत्र, स्वयंचलित सायकल, कमोड चेअर, ई-रिक्शा व विवाहित जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान या योजनांचा समावेश आहे. तर मागासवर्गीयांसाठी २० टक्के निधी अंतर्गत ९० टक्के अनुदानावर सबमर्सिबल पंप व ऑईल इंजिन, महिलांसाठी सोलर दिवे आणि लघुउद्योगासाठी ७५ टक्के अनुदानावर ई-रिक्शा, झेरॉक्स मशिन इत्यादींचा लाभ देता येणार आहे.
डीबीटी प्रणाली राबवली जाणार
या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. तसेच सर्व प्रकल्प डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे राबविले जाणार असल्याने लाभार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालय किंवा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
SHE Box portal for women harassment complaints : चंद्रपूर, दि. ८ जुलै : कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत ‘कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३’ लागू करण्यात आलेला आहे. या अधिनियमाच्या अंमलबजावणी साठी पीडित महिलेस ऑनलाईन स्वरूपात तक्रार नोंदवता यावी याकरिता मंत्रालयाने ‘शी बॉक्स’ नावाचे संकेतस्थळ सुरू केले असून https://shebox.wcd.gov.in या पत्त्यावरून तक्रार सादर करता येते.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांनी ही वेब लिंक त्यांच्या कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, तसेच सदर दाव्याबाबत अधिकृत माध्यमांतून जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने दिल्या आहेत. how to file sexual harassment complaint online
कामाच्या ठिकाणी १० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असतील, तर अशा आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे कायद्याने बंधनकारक आहे. संबंधित महिलांनी अशा ठिकाणी झालेल्या लैंगिक छळाची तक्रार ही समितीकडे करावी. मात्र, जर आस्थापनात १० पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत असतील किंवा तक्रार थेट नियोक्त्याविरुद्ध असेल, तर ती जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समितीकडे दाखल करावी लागते.
तर ५० हजार रुपये दंड
या अधिनियमामध्ये नमूद केलेल्या कलम २६ नुसार जर कोणत्याही आस्थापनाने अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही, तसेच कलम १३, १४ आणि २२ नुसार आवश्यक कार्यवाही न केली, अथवा अधिनियमातील व नियमांतील तरतुदी व जबाबदाऱ्या पाळल्या नाहीत, तर संबंधित मालकास पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. याच प्रकाराची पुनरावृत्ती झाल्यास त्या आस्थापनाचा परवाना रद्द होणे किंवा दुप्पट दंड आकारला जाणे, अशी तरतूदही आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘शी बॉक्स’ हे पोर्टल अत्यंत उपयुक्त असून पीडित महिलांनी या पोर्टलचा लाभ घेऊन स्वतःच्या हक्कांचे रक्षण करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर यांनी केले आहे.
Reconstruction of Chandrapur roads : चंद्रपूर 8 जुलै – शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 (Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation) योजनेअंतर्गत महत्त्वाचे प्रकल्प मनपातर्फे हाती घेण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत वाढीव पाणीपुरवठा यंत्रणा तसेच मलनिःस्सारण योजनेच्या कामासाठी शहरातील विविध भागांमध्ये अनेक रस्त्यांवर खोदकाम करावे लागले होते. या रस्त्यांचे पुनर्बांधकाम, मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे.
पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात आजपावेतो 47 किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली असुन विठ्ठल मंदिर,ठक्कर कॉलोनी,पठाणपुरा,एकोरी वॉर्ड येथील रस्त्यांचे काम पुर्ण करण्यात येत आहे.इरई धरणावर नवीन इंटेक वेल व जॅकवेलचे काम प्रस्तावित असुन येथुन अतिरिक्त पाणी उचल करण्यात येणार आहे. तसेच तुकूम येथे 53 दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत असुन 6 नवीन जलकुंभ सुद्धा उभारण्यात येणार आहे. तर 38 हजार नवीन नळ जोडणी करण्यात येणार आहे. AMRUT 2.0 योजना
या भागातील रस्त्याचे पुनर्बांधकाम
मलनिःस्सारण योजनेअंतर्गत 32 किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली असुन पागल बाबा नगर,विठ्ठल मंदिर,ठक्कर कॉलोनी,बाबुपेठ, गोपाळपुरी,नरेंद्रनगर इंडस्ट्रिअल येथील रस्ता पुनर्बांधणीचे काम सुरु आहे.शहराची वाढती लोकसंख्या बघता मलनिःस्सारणाची योग्य व्यवस्था हे दीर्घकालीन नियोजनाचे पाऊल आहे. sewerage projects
यामुळे मोकळ्या नाल्यांमध्ये सांडपाणी जाण्याऐवजी ते प्रक्रिया केंद्रात गेल्याने शहरात दुर्गंधी आणि घाणीचे प्रमाण कमी होणार आहे. पुनर्वापर केलेले सांडपाणी बागायती,सिमेंट उद्योग,औद्योगिक वापर,वाटर स्प्रे बांधकामासाठी वापरता येईल. खुल्या नाल्यांमुळे रोगकारक जंतु व जी दुर्गंधी पसरते त्यावर मलनिःस्सारण प्रकल्पामुळे आळा घालता येऊ शकतो. तसेच यामुळे सुदृढ आरोग्य पातळीत वाढ होऊन मच्छरांचा त्रासही कमी होतो.
सदर कामांमुळे काही भागांतील नागरिकांना तात्पुरती गैरसोय झाली असली, तरी या दीर्घकालीन प्रकल्पांमुळे शहराला भक्कम व टिकाऊ पायाभूत सुविधा प्राप्त होणार आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात ऑनलाइन बेटिंगवर लवकरच बॅन? कठोर कायदे करा,आमदार जोरगेवार यांचा अधिवेशनात प्रश्न
laws against online betting in Maharashtra : मुंबई – संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात ऑनलाइन गेमिंग ॲपमुळे आत्महत्यांचे अनेक प्रकार समोर आले असून, अनेक गुन्हे देखील नोंदवले गेले आहेत. मात्र राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार केवळ 97 गुन्हे दाखल झाल्याचे उघड झाले आहे. ही संख्या प्रत्यक्षात अत्यंत कमी असल्याचे सांगत युवा पिढीला जुगाराची सवय लावणाऱ्या (online gamin apps)ऑनलाइन गेमिंग ॲप्सविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी अधिवेशनात बोलताना (mla kishor jorgewar)आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. online gaming apps causing suicides
सभागृहात या विषयावर प्रश्न उपस्थित करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, ‘जंगली रमी’,(junglee rummy) ‘ड्रीम इलेव्हन’ (dream 11), ‘एमपीएल’, ‘माय इलेव्हन सर्कल’(my 11 circle), ‘वन एसबीटी’ या कंपन्या टीव्हीवर जाहिराती देत असून युवकांना जुगाराच्या सवयी लावून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. नामवंत सेलिब्रिटी अशा कंपन्यांच्या जाहिराती करतात, हे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी सांगितले.
या संदर्भात राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी उत्तर देताना स्पष्ट केले की, सध्या या प्रकारासाठी कोणताही विशिष्ट कायदा अस्तित्वात नाही. यावर आमदार जोरगेवार यांनी राज्य सरकारने स्वतंत्र कायदा तयार करावा, अशी मागणी केली.
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी उत्तर देताना सांगितले की, सध्या या विषयावर ठोस कायदा नसला तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार या विषयावर नियमावली तयार करण्याची विनंती केली आहे. तसेच राज्य सरकारदेखील आपल्या सूचना केंद्राला देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी अशा कायद्यात ‘धनशोधन निवारण अट’ समाविष्ट करावी आणि अशा ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर कठोर कारवाई करण्यासाठी स्पष्ट नियम तयार करण्यात यावेत, अशी सरकारकडे मागणी केली आहे.
pmfby notification for Chandrapur district : चंद्रपूर, दि. 0८ जुलै : खरीप हंगाम 2025 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2025 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. सदर योजना शेतकऱ्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, कीड प्रादुर्भाव, वाऱ्यामुळे नुकसान इत्यादींपासून आर्थिक संरक्षण प्रदान करते.
या योजनेत भात, कापूस, सोयाबीन, तुर, ज्वारी इ. पिकांसाठी विमा संरक्षण दिले जाणार आहे. भात (तांदुळ) करीता विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 61,000 रुपये असून शेतकऱ्यांनी भरायचा हप्ता प्रती हेक्टर 1220 रुपये आहे. तसेच खरीप ज्वारी करीता विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 33,000 रुपये असून विमा हप्ता 82 रुपये 50 पैसे व सोयाबीन करीता विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 58,000 रुपये व विमा हप्ता 580 रुपये. तुर करीता 47,000 रुपये विमा हप्ता 117 रुपये 50 पैसे तसेच कापूस करीता विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 60,000 रुपये व शेतकऱ्यांनी भरायचा विमा हप्ता 1200 रुपये प्रती हेक्टर.
योजनेत सहभागी होण्यासाठी महत्वाचे निकष व अटी:
योजना अंतरभूत (Notified) पिके आणि क्षेत्रांवरच लागू असेल, कृषीदार व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी दोघेही पात्र, मात्र भाडेपट्टीचे नोंदणीकृत करार अपलोड करणे बंधनकारक, ई-पीक पाहणी प्रणालीवर पिकांची नोंदणी करणे आवश्यक, शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) असणे बंधनकारक (भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई) (ईमेल: pikvima@aicofindia.com). how to apply for pmfby scheme online 2025
योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखा किंवा ‘आपले सरकार सेवा केंद्रा’ मार्फत आवश्यक कागदपत्रांसह हप्ता भरावा. सहभागी होण्याची इच्छा नसलेल्या शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी किमान 7 दिवस आधी नकारपत्र संबंधित कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. pmfby registration last date 2025
शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन पीक संरक्षणासाठी आर्थिक सुरक्षेची हमी घ्यावी तसेच अधिक माहितीसाठी सहाय्यक कृषी अधिकारी / मंडळ कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी / उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर कार्यालय या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
district level narcotics coordination meeting : चंद्रपूर, दि. 7 जुलै : जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वापर, साठवणूक, वाहतूक व विक्रीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे कठोर आणि योजनाबद्ध उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नार्को-कोऑर्डिनेशन समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत श्री गौडा बोलत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे तसेच रेल्वे पोलिस व इतर विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गौडा यांनी युवा पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये, यासाठी समाजात व्यापक जनजागृती करणे गरजेचे असल्याचे सांगितले. (anti drug awareness programs in schools) शाळा, महाविद्यालये व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांपासून दूर राहण्यासाठी जनजागृती करावी, तसेच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी शिक्षण विभागाने विविध उपक्रम राबविण्याचे सांगितले.
प्रतिबंधक औषधांची विक्री
अन्न व औषध प्रशासन विभागाने पोलिसांच्या सहकार्याने जिल्ह्यातील विविध मेडीकल स्टोअर्सवर अचानक भेटी देऊन प्रतिबंधित औषधांची (how to check banned drugs in pharmacies) विक्री होत आहे की नाही याची तपासणी करणे, सीसीटीव्ही कार्यरत आहेत की नाही याचीही खातरजमा करणे, रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ तयार होणार नाहीत याची खबरदारी घेणे, एमआयडीसीमधील चालू व बंद कारखान्यांची तपासणी करणे.
तसेच आंतरराज्य सीमेवरील शेती क्षेत्रांमध्ये खसखस किंवा गांजाची लागवड होणार नाही यासाठी कृषी अधिकाऱ्यांकडून नियमित पाहणी करून शेतकऱ्यांना जागरूक करणे, खाजगी वाहनाद्वारे येणाऱ्या टपाल, पार्सल, कुरीअर यांची आकस्मिक तपासणी करणे अशा विविध सूचना देत जिल्हाधिकारी यांनी दिल्या. यासोबतच व्यसनमुक्ती संदर्भात महिलांसाठी स्वतंत्र व्यसनमुक्ती केंद्र उभारण्याचे निर्देश देत, यासाठीही जनजागृतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीचे सादरीकरण पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी केले. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयावर नियमित पाठपुरावा करण्याचेही सूचित केले.
cattle trafficking Maharashtra Telangana border : चंद्रपूर – चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने गो तस्करांविरुद्ध मोठी कारवाई करीत तब्बल ५३ गोवंशीय जनावरांसहित १७ पीकअप वाहने, २४ आरोपी सहित एकूण १ कोटी ५२ लक्ष ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई महाराष्ट्र-तेलंगाणा सीमेवरील चिखली खुर्द तपासणी नाक्यावर करण्यात आली.
मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यात गो तस्कर सक्रिय आहे, चंद्रपूरातून विविध मार्गाचा उपयोग करीत गोवंश जनावरे कत्तलीसाठी तेलंगाणा राज्यात नेण्यात येतात, मात्र यंदा स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे गो सत्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. Chandrapur cow smuggling news update
७ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने चिखली खुर्द नाक्यावर सापळा रचत नाकेबंदी केली, यावेळी अनेक वाहने संशयास्पद वाटली असता पोलिसांनी प्रत्येक वाहनांची झडती घेतली असता पोलिसांना एकूण १७ पीकअप वाहनात ५३ गोवंशीय जनावरे आढळून आली, सदर सर्व जनावरे हे कत्तलीसाठी तेलंगाणा राज्यात नेण्यात येत होती अशी माहिती पुढे आली.
५३ गोवंशाना अत्यन्त क्रूरपणे हात पाय व तोंड बांधून क्षमतेपेक्षा जास्त संख्येत वाहनात कोंबण्यात आले होते.
पोलिसांनी यावेळी २४ आरोपीना अटक केली असून पुढील तपास टेकमांडवा पोलीस करीत आहे. अटकेतील आरोपीमध्ये १ आरोपी तेलंगणा राज्यातील असून उर्वरित २३ आरोपी हे चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील आहे. Major Police Action Against Cow Smugglers
हे आहेत आरोपी
२५ वर्षीय सचिन देवानंद नरोटे राहणार धानोरा, जिल्हा आदिलाबाद, तेलंगाणा, कृष्णा राम सुरवर, अलीम लतीफ सैय्यद, नितीन राजेंद्र नरोटे, माधव बजरंग पेंदीलवार, दिगंबर मारोती रुंजे, नंदकिशोर रावसाहेब ऐतवाड, देवराव उत्तम ताम्बरे, गोवर्धन किसन चव्हाण, विनोद किसन राठोड, दीपक रामनाथ नरोटे, अभिषेक प्रेमदास पवार, माधव गोबिंद पवार, उत्तम किसन राठोड, गोविंद प्रकाश पोले, अशोक अंकुश धुळगुंडे, विठ्ठल गोविंद मामीडवाड, विनायक रावसाहेब ऐतवाड, दानिश रसूल शेख, संतोष रामा थोरात, अजहर शाबीर शेख, प्रवीण किसन जाधव, अंकुश मारोती नरोटे, संतोष गुणाजी नरोटे, इंदल गणेश पवार.
सदरची यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल कचोरी यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि जगन्नाथ मडावी, स्वामीदास चालेकर, किशोर वैरागडे, गणेश भोयर, अजय बागेसार, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, चेतन गज्जलवार, जयसिंग, सुरेंद्र महतो, गणेश मोहुर्ले, प्रमोद कोटनाके, नितेश महात्मे, मिलिंद जांभुळे, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, प्रफुल्ल गारघाटे, प्रदीप मडावी, रवींद्र पंधरे, राहुल बनकर, सूरज अवथरे व मिलिंद टेकाम यांनी केली.
Maharashtra Navnirman Kamgar Sena : चंद्रपूर :-जिल्ह्याच्या उद्योगात स्थानिक मराठी कामगारांना मोठया प्रमाणात कंपनी व्यवस्थापनाकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असून जर कुणी मराठी कामगार आपल्या हक्कासाठी लढायला पुढे आला की त्याला कुठलीही नोटीस किंव्हा सूचना न देता कंपनी गेटच्या आत येण्यास मनाई केली जाते असाच प्रकार डालमिया कंपनीत घडला.
सुरुवातीला कंपनीने तीन कामगारांना कामावरून कमी केले कारण त्या तीन कामगारांना यासाठी कामावरून कमी केले की तें महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात मनसेच्या यूनियन मध्ये दाखल झाले, या दरम्यान तब्बल 30 कामगारांना कामावरून कमी केल्याने मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी केंद्रीय जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे तक्रार केली मात्र कंपनी व्यवस्थापन मानायला तयार नव्हते.
कामगारांनी मानले मनसेचे आभार
शेवटी दिनांक 7 जुलै ला कंपनी चे अधिकारी आणि मनसे पदाधिकारी यांची कामगारांसह आयुक्ताकडे बैठक झाल्यानंतर कंपनी मधून काढून टाकलेले 30 कामगार उद्यापासून कामावर घेण्याचा निर्णय झाल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला. workers reinstated after legal battle
या वेळी मनसे कामगार सेनेकडून अँड कल्याण कुमार यांनी बाजू मांडली तर त्यांचे सोबत मनसे विधी विभाग जिल्हाध्यक्ष अँड अजित पांडे यांनी कामगारांच्या मुळ मागण्या संदर्भात पक्षाची भूमिका मांडली, यावेळी मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांचे सह मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष सुनील गुढे व डालमिया कंपनीच्या चिअर इंडिया या कंत्राटी कंपनीचे कामगार मोठ्या संख्येने उपास्थित होते, दरम्यान कामगारांच्या प्रमुख मागण्या संदर्भात लवकरच केंद्रीय सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात निर्णय लागेल असे सांगण्यात आले आहें.
medical college drug supply issue : चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील औषधांच्या तुटवड्याचा गंभीर मुद्दा आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात ठामपणे उपस्थित केला. रुग्णालय प्रशासनाकडून औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगितले जाते, मात्र डॉक्टर रुग्णांना बाहेरून औषध आणायला लावत असल्याचा आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी केला असून, (why do doctors ask to buy medicine outside)औषधांचा लाभ रुग्णांपर्यंत पोहोचत नसेल, तर खरेदीचा उपयोग काय, असा प्रश्न त्यांनी अधिवेशनात बोलताना उपस्थित केला आहे.
मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार सातत्याने चंद्रपूर मतदारसंघातील विविध विषयांकडे मंत्री यांचे लक्ष वेधत आहेत. परिणामी नझूल धारकांना कायमस्वरूपी पट्टे वाटप करण्याचा निर्णय आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी लवकरच बैठक लावण्याचा शब्द संबंधित मंत्री यांनी दिला आहे. तर आज अधिवेशनात बोलताना त्यांनी शासकीय रुग्णालयातील प्रकाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना औषध खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात रुग्णांना आवश्यक असलेली औषधे मिळत नसल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींना सातत्याने प्राप्त होत आहेत. हॉस्पिटलमध्ये औषधांचा साठा असूनही रुग्णांना बाहेरून औषध घेण्यास सांगितले जाते. परिणामी, गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी अधिवेशनात बोलताना विचारले की, शासनाच्या खर्चाने खरेदी केलेली औषधे जर रुग्णांपर्यंत पोहोचत नसतील, तर त्या औषध खरेदी यंत्रणेचा उपयोग तरी काय ? (problems in government hospital medicine supply) केवळ कागदोपत्री उपलब्धता दाखवून चालणार नाही. रुग्णांच्या हाती औषध पोहोचणं गरजेचं आहे. त्यांनी या संपूर्ण व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रुग्णांच्या हितासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली.
तसेच राज्यभरातील औषध व फर्निचर खरेदी प्रक्रियेबाबतही आमदार जोरगेवार यांनी गंभीर आरोप केले आहे. ज्याने निधी आणला त्याच्या मर्जीतल्या कंत्राटदारालाच काम देण्याचा काहींचा आग्रह असतो परिणामी काही ठराविक पुरवठादारच सातत्याने टेंडर प्रक्रियेत सहभागी होतात आणि सगळी खरेदी त्यांच्याकडेच जाते. या प्रक्रियेत पारदर्शकता नाही, स्पर्धकांना संधी नाही, असा आरोप करत त्यांनी औषध खरेदीसाठी स्वतंत्र आणि पारदर्शक नियमावली तयार करून कोणत्याही ‘रॅकेट’ला प्रोत्साहन न मिळता योग्य स्पर्धा आणि दर्जेदार पुरवठा सुनिश्चित होईल, असे नियोजन करण्याची मागणी आरोग्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर वारीसाठी पायी निघणाऱ्या लाखो वारकर्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आज आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी सरकारचे लक्ष या समस्येकडे वेधले. pandharpur wari route safety issues
दरवर्षी मोठ्या श्रद्धेने लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी प्रवास करतात. मात्र रस्त्यांवरील अपुर्या सुरक्षाव्यवस्थेमुळे दरवर्षी अनेक अपघात घडतात आणि त्यातून दुर्दैवी जीवितहानी होते. अशाच एका दुःखद घटनेत चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी स्व. आकाश कोंडलकर यांचा अपघाती मृत्यू झाला होता. अशा घटना केवळ एका व्यक्तीचा जीव जातो म्हणून मर्यादित राहत नाहीत, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. how to prevent accidents during wari
वारकर्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची सरकारकडे जोरदार मागणी करताना ते म्हणाले कि,, वारकर्यांची ही पवित्र परंपरा अखंड राहावी, त्यांची सेवा हे आपले कर्तव्य आहे. म्हणून अपघात टाळण्यासाठी प्रभावी व्यवस्था उभी करण्याची जबाबदारी शासनाने गांभीर्याने स्वीकारावी. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस आणि परिणामकारक उपाययोजना करावी, अशी ठाम मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सभागृहात केली.
chandrapur orange alert heavy rain warning : चंद्रपूर – नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 6 जुलै ते 8 जुलै , 2025 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी.
• संरक्षणात्मक कपडे घाला आणि घरात आश्रय घ्या. • मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्या आणि दरवाज्यापासून दुर रहा. • रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते अशा भागातुन जाणे टाळा . • खराब दृश्यमानतेमुळे मुसळधार पाऊसात वाहने चालवणे टाळा. • पॉवर लाईन्स किंवा विजेच्या तारांपासून दुर रहा. • फ्लॅश पुर चेतावणी किंवा विजेच्या तारोपासून दुर रहा. heavy rain alert chandrapur
वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना : काय करावे आणि काय करु नये • विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. • जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. • आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. • तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. what to do during lightning and thunderstorms
• आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. • शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. • विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.
• उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. • धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. • जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क आणि सुरक्षित राहण्याचे व मुसळधार पावसामुळे नदी नाले किंवा पुलावरून पाणी ओसंडून वाहत असेल तर ते ओलांडू नये उचित काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी श्री विनय गौडा जी सी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत करण्यात आलेला आहे.