Tag: News34 chandrapur

  • compensation increase for coal mine farmers । ✅ “OBC आयोग पुढे सरसावलं! शेतकऱ्यांना न्याय मिळणार?”

    compensation increase for coal mine farmers

    compensation increase for coal mine farmers : चंद्रपूर : वेकोलि बल्लारपूर क्षेत्र अंतर्गत, बल्लारपूर नॉर्थ वेस्ट खुली खदान प्रकल्पातील मागास व अन्य प्रवर्गातील शेतकऱ्यांनी दि. 27 जुलै रोजी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांची प्रत्यक्ष भेट घेवून या प्रकल्पासाठी मिळणारा प्रति एकर आर्थिक मोबदल्यामध्ये दरवाढ मिळवून देण्याविषयी चर्चा केली यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

    जिल्हा भाजपा सचिव मधुकर नरड, पूर्व जिल्हाध्यक्ष किसान आघाडी राजु घरोटे, कोलगाव उपसरपंच पुरूषोत्तम लांडे यांचे नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी हंसराज अहीर यांना या आशयाचे निवेदन सादर केले. आर/आर पॉलिसी नुसार मिळणाऱ्या नोकरी सोबतच प्रति एकरी दरवाढ देण्याविषयी कोल इंडियाने तत्वतः मान्य केले असल्याने ही दरवाढ लवकरात लवकर मिळवून देवू असा निर्धार हंसराज अहीर यांनी उपस्थित शेतकऱ्यांसमोर व्यक्त केला.

    युवकाला अमानुष मारहाण, चंद्रपूर पोलिसांवर गंभीर आरोप

    अहीर यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासित केले की, नोकरी व शेतीला दरवृध्दी प्राप्त करून घेणे हा आपला न्याय अधिकार आहे. सन 2012 मध्ये कोल इंडिया व राज्य शासनाच्या धोरणानुसार कोरडवाहू प्रति एकर जमिनीस रू. 8 लाख व सिंचीत प्रति एकर जमिनीकरिता रू. 10 लाख दरवाढ लागु करण्यात आली होती. farmer land compensation policy Maharashtra

    दरवाढ होणार

    परंतु, जमिनीचे विद्यमान बाजारमुल्य आणि आजचे सरकारी दराच्या तुलनेत वेकोलिद्वारा आजघडीला मिळणारे हे दर अत्यल्प असल्याची भुमिका कोल इंडियाचे अध्यक्ष श्री. पी. मल्लिकार्जूना प्रसाद यांच्या तसेच वेकोलि मुख्यालय, नागपुर यांचे वरिष्ठा प्रबंधनाच्या उपस्थितीत दि. 10 जुलै 2025 रोजी कोलकाता येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाद्वारे दरवाढीचा हा मुद्दा आग्रही स्वरूपात मांडण्यात आला असल्याचे हंसराज अहीर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले. सदर दरवृध्दीबाबत कोल इंडिया प्रबंधनाने सकारात्मक भुमिका स्विकारत ओबीसी आयोगाद्वारे मांडण्यात आलेली भुमिका व्यावहारीक असल्याने ही मागणी तत्वतः मान्य केली असल्याचेही अहीर यांनी यावेळी सांगितले. farm land rate revision coal India project

    Somayya institute of technology

    हा निर्णय कोल इंडियाद्वारे लवकरात लवकर जाहीर व्हावा यासाठी आपण वारंवार पाठपुरावा करीत असल्याचे तसेच ज्या प्रकल्पांचे दर निश्चितीचे करारनामे झालेले नाही त्या प्रकल्पांना ही होणारी दरवाढ लागू राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अहीर यांनी सांगितले. दर निश्चितीच्या करारनाम्यापुर्वी प्रकल्प धारकांनी द्यावयाच्या कौटूंबिक शपथपत्रात असलेला वर्ष 2012 च्या शासन धोरणानुसार, दर मान्य असल्याचा अनावश्यक उल्लेख वगळण्यासाठी वेकोलि प्रबंधनास सुचना व पाठपुरावा करणार असल्याचे सुध्दा अहीर यांनी सांगितले.

    शेकडो शेतकऱ्यांच्या जिवीताला निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेता, कोलगाव येथील उर्वरित 337 हेक्टर जमीन अधिग्रहण व गावाचे पुनर्वसन याविषयासाठी आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीलात तसेच या दरवृध्दीसाठी आमच्या पाठीशी उभे राहावे असा आशावाद उपस्थित शेतकऱ्यांनी अहीर यांचेशी संवाद साधतांना व्यक्त केला.

  • maha arogya shibir Chandrapur । महाआरोग्य शिबिरात ५ हजार रुग्णांची तपासणी, देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह

    maha arogya shibir Chandrapur

    maha arogya shibir Chandrapur : चंद्रपूर – आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाच्या निमित्ताने शंकुतला लॉन येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा ५ हजार २६ नागरिकांनी लाभ घेतला. विविध तपासण्यांमध्ये काही रुग्णांमध्ये गंभीर आजारांचे निदान झाले असून त्यांच्यावर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या तपासणीत बालकांचाही समावेश आहे.

    अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

    या कार्यक्रमाला राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजप प्रवक्त्या व चिखलीच्या आमदार श्वेता महाले, भाजप महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, कल्याणी किशोर जोरगेवार, अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंह, माजी उपमहापौर अनिल फुलझले, प्रकाश देवतळे, तुषार सोम, नामदेव डाहुले, संजय कंचर्लावार, दशरथसिंह ठाकूर, भारती दुधाणी, मंडळ अध्यक्ष रवि जागी, प्रदीप किरमे, स्वप्नील डुकरे, 

    अ‍ॅड. सारिका संदुरकर, सुभाष आदमाने, विनोद खेवले, माजी नगरसेविका छबू वैरागडे, घुग्घुस शहर अध्यक्ष संजय तिवारी, मनोज पाल, माजी नगरसेवक देवानंद वाढई, प्रशांत चौधरी, वंदना तिखे, पुष्पा उराडे, वनिता डुकरे, शीतल आत्राम, वंदना हातगावकर, सविता दंढारे तसेच ज्युपिटर हॉस्पिटल मुंबईचे डॉ. रचना केशवानी, डॉ. सुषांत श्रीवास्तव, एनसीआय हॉस्पिटल कामटीचे डॉ. पवन अरगडे, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. वसंत वाघ, कस्तुरबा गांधी हॉस्पिटलचे डॉ. अजहर शेख, आयएमएचे अध्यक्ष डॉ. दिक्षीत आदी मान्यवर उपस्थित होते.

    चंद्रपूरात सुरू असलेल्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह अंतर्गत विविध सामाजिक, धार्मिक व आरोग्यवर्धक उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आयोजित महाआरोग्य शिबिरात मुंबईच्या ज्युपिटर हॉस्पिटल, नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.

    Somayya institute of technology

    या शिबिरात कर्करोग, बालरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, हृदयविकार, सामान्य आरोग्य, कान-नाक-घसा, श्वसन रोग, न्यूरोलॉजी, स्त्रीरोग, त्वचारोग आणि दंतरोग अशा विविध तपासण्या करण्यात आल्या. तपासणीदरम्यान गंभीर आजाराचे निदान झालेल्या रुग्णांवर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. free health camp

    आरोग्य शिबिरे गरजेची – हंसराज अहिर

    वाढते आजार पाहता त्यांचे वेळीच निदान होणे अत्यंत आवश्यक आहे. अशा शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या शरीरातील आजारांची माहिती मिळते. त्यामुळे अशा आरोग्य शिबिरांची आवश्यकता आहे, असे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी सांगितले. त्यांनी देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहातील विविध सेवाभावी उपक्रमांचेही कौतुक केले.

    मुख्यमंत्री यांचा संकल्प आमदार जोरगेवार यांनी साकारला – आ. श्वेता महाले

    वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनहिताचे उपक्रम राबवण्याचे आवाहन केले होते. अनेक आमदारांनी एक दिवसाचे उपक्रम राबवले, पण आमदार किशोर जोरगेवार यांनी १० दिवसांचा साप्ताह राबवीत तब्बल ३५५ हून अधिक उपक्रम राबवून हा संकल्प खऱ्या अर्थाने साकारला आहे, असे आमदार श्रेता महाले म्हणाल्या. त्यांनी आमदार जोरगेवार यांच्या कार्याची प्रशंसा करताना त्यांचे अपक्ष असताना केलेले काम आणि आज भाजपचे आमदार असतानाही मतदारसंघासाठीची तळमळ अधिवेशनात पाहायला मिळते, असे नमूद केले.

    पर्यटन, आरोग्य आणि शिक्षण केंद्रस्थानी – आ. किशोर जोरगेवार

    मतदारसंघात काम करताना पर्यटन, आरोग्य आणि शिक्षण या तीनही क्षेत्रांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करत आहोत. यापूर्वीही आम्ही आरोग्य शिबिरांद्वारे ४७ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. आता या महाआरोग्य शिबिरातही गंभीर रुग्णांवर उपचाराचा सर्व खर्च आम्ही उचलणार आहोत, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.

    या शिबिरात डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या मदतीमुळेच हे शिबिर यशस्वी झाले आहे. अनेक रुग्णांमध्ये गंभीर आजारांचे निदान झाले असून त्यांच्या उपचाराचा खर्च मोठा आहे. मात्र, रुग्णांनी चिंता करू नये. या सर्व शस्त्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य करण्यात येणार असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.

  • leopard road accident । 🐆वन्यजीव मरताहेत, प्रशासन झोपलंय! चंद्रपूरमध्ये बिबट्याचा मृत्यू!,

    leopard road accident

    leopard road accident : चंद्रपूर – अहेरी-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर, गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूरजवळ एका बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (२७ जुलै रोजी) सकाळी ८ वाजताच्या सुमारास झरण वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १२१ आणि १२२ च्या मध्ये घडली, ज्यामुळे वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

    असा झाला अपघात

    मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्या रस्ता ओलांडत असताना एका भरधाव अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच झरण वनपरिक्षेत्राचे अधिकारी संदीप मडावी, कर्णेवाड, क्षेत्रसहायक रुपाली आडे, आक्सापूरचे पोलीस पाटील सूरज वैरागडे, उपसरपंच चंद्रजित गव्हारे आणि गावातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. leopard road accident

    चंद्रपुरात मेफेड्रोन ची विक्री, २ आरोपीना अटक १ पसार

    क्षेत्रसहायक रुपाली आडे यांनी पंचनामा केला असता, मृत बिबट्या तीन ते चार वर्षांचा नर असून, त्याने नुकतीच रानडुकराची शिकार केली होती. अपघातामुळे त्याच्या शरीरातून रानडुकराचे मांस बाहेर आलेले दिसत होते. झरण वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप मडावी यांनी सांगितले की, मृत बिबट्याला चंद्रपूर येथे नेण्यात येणार असून, शवविच्छेदनानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

    वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

    या घटनेमुळे परिसरातील वन्यजीव सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच आक्सापूर गावाजवळ आणि शेतात वाघाचे दर्शन झाल्याने तसेच वाघाचे पाऊलखुणा (पगमार्क) आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग, चंद्रपूर यांना १४ जुलै रोजी निवेदनही देण्यात आले होते. शेतकरी आपला जीव धोक्यात घालून शेतीची कामे करत आहेत, तर वानरांमुळे वेलवर्गीय आणि फळबागा वाचवणेही कठीण झाले आहे, अशी कैफियत गावकऱ्यांनी मांडली आहे. highway animal crossing danger zones

    Somayya institute of technology

    कान्हाळगाव अभयारण्य आणि वन्यप्राण्यांचा भ्रमणमार्ग

    नुकतेच कान्हाळगावला अभयारण्य घोषित करण्यात आले असल्याने, हा परिसर वन्यप्राण्यांचा महत्त्वाचा भ्रमणमार्ग बनला आहे. यामुळे रस्त्यावर वन्यप्राण्यांना वारंवार अपघातांना सामोरे जावे लागत आहे. या घटनेला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. वनविभाग, महामंडळ आणि शासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालून वन्यजीवांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

    या घटनेमुळे वन्यजीव आणि मानवी वस्ती यांच्यातील संघर्ष आणि वन्यजीव संरक्षणाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने त्वरित पाऊले उचलणे आवश्यक आहे.

  • Maha Smiles । 🎉 मोफत शस्त्रक्रियांचा ऐतिहासिक निर्णय! विदर्भातील 1000+ बालकांना नवजीवन देणारी Maha Smiles मोहीम!

    Maha Smiles

    Maha Smiles : मुंबई, दि. 27 :  बालकांच्या चेहऱ्यावरील दुभंगलेले ओठ (क्लेफ्ट) व फाटलेले टाळू (पॅलेट) या जन्मजात विकारावर उपचार आणि जनजागृती करून या बालकांच्या निरागस चेहऱ्यावर हसू फुलविणे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ध्येय आहे. यासाठी त्यांनी  विदर्भातील अशा बालकांवर उपचार आणि जनजागृतीची गरज ओळखत त्यांनी स्वयंसेवी संस्थांना आवाहन केले. cleft awareness and treatment campaign

    चंद्रपुर शहरातील मुख्य मार्गावर खड्डेच खड्डे

    मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या आवाहनाला  ‘स्माईल ट्रेन इंडिया’ ही स्वयंसेवी संस्था आणि बजाज फिनसर्वच्या शेफाली बजाज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हे स्वप्न आता मिशनमोडवर साकार होतांना दिसत आहे.

    ‘स्माईल ट्रेन इंडिया’ ही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आणि बजाज फिनसर्व यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून आता ही मोहीम पूर्णपणे मोफत राबविली जाणार आहे. ‘महा स्माईल्स क्लेफ्ट जनजागृती आणि उपचार मोहीम’ ही केवळ वैद्यकीय मोहीम नसून, हजारो बालकांना नवजीवन देणारी एक आशावादी चळवळ ठरणार आहे.

    या आगळ्यावेगळ्या मोहिमेचा नागपूर येथे 31 जुलै 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत स्वामी विवेकांनद मेडिकल मिशन हॉस्पिटल, खापरी, येथून शुभारंभ होणार आहे.

    तीन विशेष मोबाईल व्हॅन विदर्भात

    या पहिल्यावहिल्या उपक्रमाअंतर्गत पुढील 90 दिवसांत तीन विशेष मोबाईल व्हॅन विदर्भातील संपूर्ण 11 जिल्ह्यात फिरून लोकांमध्ये क्लेफ्ट विकाराविषयी माहिती देणार आहेत. यामध्ये लवकर निदान, उपचाराची शिफारस आणि गरजू बालकांसाठी मोफत शस्त्रक्रियांची नोंदणी असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या बालकांवर नागपूर, गोंदिया, अकोला, वर्धा येथील रूग्णालयात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. free cleft palate surgery for children

    क्लेफ्ट विकार हा जन्मजात असून यात ओठ आणि टाळू हे दुभंगलेले असतात. जवळपास 700 मुलांपैकी एका मुलांमध्ये हा विकार दिसून येतो. यावर शस्त्रक्रिया करूनच हा विकास दूर करता येते. वेळीच उपचार केले नाहीत तर कान बधिर होणे, बोलण्यात अडथळा येणे अशा वेगवेगळ्या व्यंगासोबत सामाजिक एकटेपणा  येऊ शकतो. तथापि या विकारावर उपचार असून 6-7 शस्त्रक्रियेनंतर यावर पूर्णपणे मात करता येते. या सर्व शस्त्रक्रिया खर्चिक असल्याने आर्थिक दुर्बल कुटुंबातील व्यक्तींना ते परवडणारे नाही. म्हणूनच संवेदशील नेतृत्व असलेल्या मुख्यमंत्र्यांनी क्लेफ्ट वरील उपचार संपूर्ण मोफत व्हावे, यासाठी या विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. free plastic surgery for cleft kids in Vidarbha

    Somayya institute of technology

    महा स्माईल्स’ मोहीम

    क्लेफ्ट विकार असलेल्या बालकांना वेळेवर उपचार मिळाल्यास त्यांचे जीवन पूर्णतः सामान्य होऊ शकते. यासाठी केवळ उपचारच नव्हे, तर जागरूकता ही देखील तितकीच गरजेची आहे. त्यामुळे ‘महा स्माईल्स’ ही मोहीम विदर्भातील बालकांसाठी आरोग्यदूत ठरणारी आहे. या मोहिमेमुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील हजारो कुटुंबांना एक नवीन आशेचा किरण दिसणार आहे. अपूर्ण माहितीमुळे दुर्लक्षित राहिलेल्या समस्येवर आता तज्ज्ञांच्या मदतीने प्रभावी उपचार मिळणार आहे.

    स्माईल ट्रेन आणि बजाज फिनसर्व यांच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या 11 जिल्ह्यातील  मुलांमध्ये जन्मजात आलेले दुभंगलेले होठ आणि टाळू विकार दूर होऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण नक्कीच जागणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

  • sudhir mungantiwar latest news chandrapur । सुधीरभाऊ आले तर आम्ही सगळे अलर्ट मोडमध्ये – शिवेंद्रसिंहराजे भोसले

    sudhir mungantiwar latest news chandrapur

    sudhir mungantiwar latest news chandrapur : चंद्रपूर- छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आधी आपण लंडनला जाऊन बघायचे अन् परत यायचो. ते भारतात आणण्याचे काम आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ही वाघनखं त्यांनी पहिल्यांदा सातारा येथे आणली. सातारा ही मराठ्याची राजधानी होती. भाऊंनी सातारकरांचा मानसन्मान ठेवला. नाहीतर ही वाघनख ते पहिले नागपूरलाही घेऊन जाऊ शकले असते, तो त्यांचा अधिकारही होता. पण त्यांनी आधी साताऱ्याची ओळख ठेवली. मग वाघनखांचा पुढचा प्रवास सुरू झाला. सातारकर म्हणून आम्हाला सुधीरभाऊंबद्दल प्रचंड आदर आहे, असे गोरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूरचे पालकमंत्री मा.ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी काढले.

    मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चंद्रपुरात ३५५ कार्यक्रम

    राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे शनिवारी (२६ जुलै) चंद्रपूर येथे आगमन झाले. यावेळी त्यांनी राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. आ.मुनगंटीवार यांनी आपल्या परिवाराच्यावतीने आणि चंद्रपूरकरांच्यावतीने त्यांचे जोरदार स्वागत केले. या प्रसंगी आ.मुनगंटीवार परिवाराकडून बांबूपासून साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती आणि लाकडापासून तयार केलेली तलवार देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी ते बोलत होते. sudhir mungantiwar contribution to chandrapur development

    याप्रसंगी आमदार श्री सुधीर मुनगंटीवार, सौ.सपनाताई मुनगंटीवार, आमदार देवराव भोंगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार अतुल देशकर, जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल,राहूल पावडे, प्रमोद कडू, राजेंद्र गांधी, विजय राऊत,  सुरज पेदूलवार, प्रज्वलंत कडू, डॉ. मंगेश गुलवाडे, अल्काताई आत्राम, किरण बुटले, सविता कांबळे, मीनाताई देशकर, नम्रता ठेमसकर, सर्व तालुका अध्यक्ष, भाजपा शहर व ग्रामीणचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    ना.शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, सुधीरभाऊ फक्त आमदार किंवा माजी मंत्री नाहीत, तर ते आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात आम्ही सर्व जण राज्यात काम करतोय. त्यांचे स्थान आमच्या सर्वाच्या दृष्टीने फार वरचे आणि महत्वाचे आहे. मी सुधीरभाऊंएवढा दांडगा अभ्यास आणि वक्तृत्व शैली आजवर बघितली नाही. इतिहास आणि वर्तमान स्थितीचा अभ्यास, प्रत्येक विषयाची आकडेवारीनिशी अचूक माहिती, हे भाऊंकडे बघूनही शिकणे शक्य नाही. आपण फक्त प्रयत्न करू शकतो. सुधीरभाऊंकडे बघून जेवढे शिकता येईल, तेवढे शिकण्याचा माझा प्रयत्न असतो. सुधीरभाऊ कुठल्या मंत्र्यांकडे, अधिकाऱ्याकडे किंवा एखाद्या विभागातही गेले. तरी सगळे अलर्ट मोडमध्ये येतात. भाऊंना काहीही उत्तर देऊन चालत नाही. जे कायद्यात असेल तेच त्यांना पाहिजे. विधानसभेतही आम्ही बघितलं की सरकारची, मंत्र्यांची चुकही ते दाखवतात, असे ना.शिवेंद्रराजे यांनी सांगितले. sudhir mungantiwar

    लोकांसाठी आपल्याला काम करायचं आहे. भाजप आणि इतर पक्षांमध्ये हाच फरक आहे, आपल्यासाठी नाही तर ज्यांनी आपल्याला निवडून दिले, त्यांच्यासाठी काम करायचे आहे. त्याप्रमाणे काम झाले पाहिजे. अधिकाऱ्यांसाठी चंद्रपूर आणि गडचिरोली पहिले शिक्षा समजले जायचे. पण आता उलटं झालं आहे. भाऊंचे नेतृत्व असल्यामुळे विकास वेगाने झाला आहे. हा परिसर आता दुर्लक्षित राहिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, केंद्री मंत्री नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार या नेत्यांनी या परिसराला नवी ओळख दिली. मंत्री झाल्यापासून असं स्वागत अद्याप कुणीही केलं नाही, हे त्यांनी आवर्जून नमूद केलं. sudhir mungantiwar latest news chandrapur

    मा.सुधीरभाऊंच्या सुचनेप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील रस्ते, पूल सर्व कामे मार्गी लाऊ, असे आश्वासन देत त्यांनी आ.मुनगंटीवार यांना सातारा येथे प्रतापगड आणि सज्जनगडला येण्याचे निमंत्रण दिले.

    Somayya institute of technology

    यावेळी आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवेंद्रराजे यांनी त्यांच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्यात पहिली भेट सुधीर मुनगंटीवार यांची घेतल्याबद्दल त्यांच्या नम्रतेचे कौतुक करीत आभार मानले. आपल्या सहकारी आमदाराच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त करणं, हे खरं तर नम्रतेचं आणि मोठेपणाचं लक्षण आहे, असं ते म्हणाले. sudhir mungantiwar

    एकच राजा

    श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले छत्रपती शिवरायांचे वारसदार आहेत. महाराजांच्या १३व्या पिढीचा वारसा चालवणारे आहेत. आपण मावळे म्हणून १३व्या पिढीतील शिवभक्त आहोत. ते घरी आल्यामुळे आज अत्यानंद झाला. आपसूक ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष निघत होता. या शब्दांमध्ये इतकी शक्ती आहे की, एक बेशुद्ध व्यक्तीसुद्धा शुद्धीवर येईल. १२ गडकिल्ले युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी इतर देशातील लोक बैठकीत बसले होते. तेव्हा आम्ही छत्रपतींचे वैशिष्ट्य सांगितले. आजवर झालेल्या सर्व राजा महाराजांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज सर्वार्थाने वेगळे राजे होऊन गेले. कारण सर्व राजे ‘हे माझे राज्य आहे..’, असे म्हणायचे. पण छत्रपती शिवराय म्हणायचे की ‘हे रयतेचे राज्य आहे..’, असे सांगणारा आणि माननारा हा एकच राजा होऊन गेला, असे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले. sudhir mungantiwar latest news chandrapur

    छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर

    आ.मुनगंटीवार पुढे म्हणाले,छत्रपतींच्या १२ गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांत समावेश करण्यात आला आहे. यासाठी आम्ही आपले सर्वस्व पणाला लावले होते. छत्रपतींच्या सर्व किल्ल्यांवरील मातीचा कण अन् कण जगातल्या कुठल्याही धातुपेक्षा महागडा आहे. कारण धातुपासून महागड्या वस्तू बनवता येतील. पण या मातीच्या कणाकणांतून माणूस घडवता येतो. या मातीची किंमत केवळ भारत देशच नाही, तर जगातील सर्वच देश मानतात. आता तर दरवर्षी छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर सरकारच्यावतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराजांनी ज्या वाघनखाने अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, ते वाघनख व्हिक्टोरीया अल्बर्ट म्युझीअमने आपल्याला तीन वर्षांसाठी दिले आहेत. वाघनख येथेच कायम रहावे, हा आपला पुढचा प्रयत्न असणार आहे.  sudhir mungantiwar latest news chandrapur

    शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे महत्वाचे खाते आहे. शिवेंद्रराजे यांना चांद्यापासून ते बांद्यापर्यंत रस्ते आणि टनेल बांधायचे आहेत. छत्रपतींच्या मातोश्री आपल्या विदर्भाच्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे जिजाऊंचे माहेर आहे. आजही तेथे त्यांचा वाडा दिमाखात उभा आहे. तेथे भव्य शिवसृष्टी उभारली जाते आहे, असे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

  • why roads are so bad in Chandrapur । चंद्रपुरातील रस्त्यात ‘विकास” खड्ड्यास्वरूपात डोकावतोयं

    why roads are so bad in Chandrapur

    why roads are so bad in Chandrapur : चंद्रपूर – खनिज संपत्ती ने नटलेला चंद्रपूर, राज्यात औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे, विशेष बाब म्हणजे या जिल्ह्याने राज्याला मुख्यमंत्री, सह अनेक मंत्री दिले मात्र आजही हा जिल्हा उपेक्षित आहे. विकासाच्या नावावर नुसत्या बोंबा जिल्ह्यात कालांतरापासून सुरु आहे. शहर व ग्रामीण भागात अनेक अभियांत्रिकी कॉलेज आहे, मात्र त्या कॉलेजकडे जाणारा रस्ता हा पांदण रस्त्यापेक्षा हि खराब आहे.

    मुलींनी मंगळसूत्र विकलं, मात्र तरी झाली फसवणूक, चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

    शेतात जाण्यासाठी बनलेला पांदण रस्ता तरी चांगला असतो मात्र शहरात पायदळ किंवा वाहनाने आपल्याला जायचे असल्यास रस्त्याच्या मधोमध असलेले खड्डे आपल्याला चुकवीत जावे लागते. हि आपल्यासाठी व आपण निवडून दिलेले जनप्रतिनिधी साठी एक लाजिरवाणी बाब आहे. pothole problems in Chandrapur city

    हे मार्ग पांदण रस्त्यापेक्षाही खराब….

    बागला चौक आताचा शहीद हेमंत करकरे चौक ते लालपेठ कडे जाणारा मार्ग, बंगाली कॅम्प ते बस स्थानक, बंगाली कॅम्प ते जुनोना चौक, जटपुरा गेट ते गिरनार चौक या मार्गावरील काही ठिकाणी रस्ता खोल गेला आहे, ज्यावरून वाहन चालविताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागते. शहराकडे येणारे मार्ग अत्यंत बिकट परिस्थितीचे आहे.

    शहरात अमृत योजनेच्या कामामुळे अनेक मार्ग बेजार झाले, अनेक मार्गावर मोठे खड्डे पडले, काही सामाजिक संघटनांनी यावर आंदोलन केले, त्यांनतर प्रशासनाने अखेर रस्ते बनवायला सुरुवात केली, रस्ते बनवून महिना उलटल्यावर पाऊस पडला आणि नवनिर्मित रस्त्यावरील विकास हा खड्ड्याच्या स्वरूपात बाहेर पडला. why newly constructed roads break in rain

    यावर विशेष बाब म्हणजे इंजिनिअर यांना काम वाटपात दुजाभाव केल्या जातो यावरून सार्वजनिक बांधकाम विभागात हाणामारी चा प्रकार सुद्धा घडला होता, याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीही देण्यात आल्या होत्या. म्हणजे इंजिनिअर हे कामासाठी भांडतात, त्यांना काम मिळण्यात दुजाभाव होतो, आणि काम मिळाल्यावर निकृष्ट दर्जाचे काम पूर्ण करीत ते बाजूला होतात.

    जनतेमध्ये हिंमत कधी येणार?

    चंद्रपुरातील जनता रस्त्यावरील खड्ड्यापायी वैतागून गेली आहे, मात्र आवाज उचलण्याची त्यांच्यात हिंमत नाही, अशी अवस्था जर इतर जिल्ह्यात जसे पश्चिम महाराष्ट्र भागात झाली असती तर सामान्य नागरिक जनप्रतिनिधी यांना जाब विचारून कामे पूर्णत्वास आणतो, मात्र चंद्रपुरातील सुजाण नागरिकांमध्ये अशी हिंमत कधी येणार देव जाणे. कारण जनता हि राजकीय पक्षासोबत जुडलेली असतात, कुणाला काय म्हणावं काय करावं हे कळत नसेल कदाचित.

    Somayya institute of technology

    म्हणून म्हणतात ना ५०० में बिक जाओगे तो ऐसी सडक पाओगे…अशी अवस्था आपली झालेली आहे. दरवर्षी या खड्ड्यामुळे अनेक नागरिक अपघाताला बळी पडते, मात्र गेंड्याची कातडी असलेले जनप्रतिनिधी यांना याचा काही एक फरक पडत नाही.

  • Chandrapur schools closed due to red alert rain । “चंद्रपूर रेड अलर्ट ब्रेकिंग: शाळा, कॉलेजेस, क्लासेस पूर्णपणे बंद!”

    Chandrapur schools closed due to red alert rain

    Chandrapur schools closed due to red alert rain : चंद्रपूर, दि. 24 : भारतीय हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार 25 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात “रेड अलर्ट” दिला असून काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविलेली आहे.

    पुरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी काढले बाहेर

    त्यामुळे चंद्रपूर जिल्हयात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यावर होऊ नये, याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस यांना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 30 (2) (5) व (18) नुसार 25 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

    Somayya institute of technology

    उक्त आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करावी.

    तसेच नागरीकांनी भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी व आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर संपर्क क्र. 07172 – 250077 येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले आहे.

  • samuhik vivah sohala anudan । 👰 सामूहिक विवाह करा आणि मिळवा ₹25,000 अनुदान

    samuhik vivah sohala anudan

    samuhik vivah sohala anudan : चंद्रपूर, दि.24 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती (नवबौद्धांसह) व आर्थिक दृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय कुटुंबांमधील तरुण-तरुणींना अनाठायी खर्च व कर्जबाजारीपणामुळे येणाऱ्या आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे.

    मोरवा विमानतळास स्वाती पांडे यांची भेट

    या योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या प्रत्येक जोडप्यास  25 हजार रुपये इतके कन्यादान अनुदान देण्यात येणार असून, विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला प्रत्येक जोडप्यामागे  4 हजार इतके अनुदान देण्यात येणार आहे. mass marriage grant scheme

    स्वयंसेवी संस्थांनी करा अर्ज

    उपरोक्त योजनेचा लाभ घेण्यासाठी दाम्पत्यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच हुंडा प्रतिबंधक कायदा यातील कोणत्याही कलमाचे उल्लंघन केलेले नसावे, ही अट बंधनकारक आहे. सदर योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी ऑगस्ट अखेरपर्यंत विवाह सोहळ्यासाठी प्रस्ताव सहायक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांचे कार्यालयात सादर करावेत.

    Somayya institute of technology

    या अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक संस्थांनी समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

  • Central government misleads railway passengers । 🚨 रेल्वे प्रवाशांची फसवणूक? केंद्र सरकारच्या घोषणा आणि वास्तवात फरक!

    Central government misleads railway passengers

    Central government misleads railway passengers : चंद्रपूर – रेल्वे मंत्रालयाने 1 जुलै 2025 पासून रेल्वे भाड्यांमध्ये केलेल्या बदलांबाबत आणि प्रवासी सेवा सुधारण्यासाठी उचललेल्या पावलांबाबत दिलेल्या स्पष्टीकरणामुळे सामान्य जनतेमध्ये निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची केवळ असमाधानकारक उत्तरे देऊन केंद्र सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या अतारांकित प्रश्न क्रमांक 656 च्या उत्तरात रेल्वे मंत्रालयाने सविस्तर माहिती दिली असली तरी, ही माहिती जनतेच्या मूळ मुद्द्यांना दूर करण्यात कमी पडली आहे. रेल्वे मंत्रालय प्रवाशांना परवडणारी आणि दर्जेदार वाहतूक सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षातील परिस्थिती वेगळीच आहे.

    महावितरणचा नवा नियम, अशी होणार वीज बिल वसुली

    भारतीय रेल्वेचे भाडे जगातील सर्वात कमी भाड्यांपैकी एक असल्याचा आणि शेजारील देशांच्या तुलनेतही कमी असल्याचा मंत्र्यांचा दावा केवळ आकडेवारीचा खेळ वाटतो. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये प्रवाशांना ₹60,466 कोटींची अंदाजित सबसिडी देण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी, वाढत्या भाड्यांचा सामान्य प्रवाशांवर होणारा आर्थिक भार दुर्लक्षित केला जात आहे. 1 जुलै 2025 पासून भाड्यांचे तर्कसंगतीकरण करण्यात आले असून, यात प्रति किलोमीटर अर्धा पैसा ते दोन पैसे प्रति किलोमीटर अशी किरकोळ वाढ करण्यात आल्याचे म्हटले असले तरी, या वाढीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर येणारा ताण मोठा आहे.

    वाढीव दरांचा फटका

    द्वितीय श्रेणी सामान्य, शयनयान श्रेणी सामान्य, प्रथम श्रेणी सामान्य, मेल एक्सप्रेसमधील गैर-वातानुकूलित श्रेणी आणि आरक्षित वातानुकूलित श्रेणींमध्ये ही वाढ लागू होईल. मासिक पास (MST) आणि उपनगरीय प्रवासाच्या भाड्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे सांगून कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रयत्न असला तरी, लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मात्र वाढीव दरांचा फटका बसणार आहे.

    अधिकृत एजंटना तिकिटे बुक करण्याची परवानगी नाही

    तत्काळ तिकीट बुकिंग प्रणालीमध्येही काही बदल करण्यात आले आहेत; 1 जुलै 2025 पासून, आधार-प्रमाणित वापरकर्त्यांनाच IRCTC वेबसाइट/ॲपद्वारे तत्काळ तिकिटे बुक करता येतील. अधिकृत एजंटना बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिले तीस मिनिटे तत्काळ तिकिटे बुक करण्याची परवानगी नसेल. (IRCTC agent restrictions tatkal booking) हे बदल प्रवाशांच्या सोयीसाठी नसून, अधिक कडक निर्बंध लादणारे आहेत, ज्यामुळे सामान्य प्रवाशांना तत्काळ तिकिटे मिळवणे अधिक कठीण होणार आहे. IRCTC tatkal booking Aadhaar rules

    प्रवाशांना सुरक्षित, आरामदायक आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी अमृत भारत स्टेशन योजना, वंदे भारत आणि अमृत भारत रेल्वेगाड्यांची सुरुवात, रेल मदतद्वारे उत्तम देखरेख, आणि डिजिटल उपक्रम जसे की रेल वन ॲप आणि यूटीएस ऑन मोबाईल ॲप यांसारख्या विविध उपाययोजना रेल्वे मंत्रालयाने केल्या असल्याचा दावा आहे. मात्र, या उपायांमुळे प्रवाशांच्या समाधानात वाढ झाली असल्याचे रेल्वे मंत्रालयाने नमूद केले असले तरी, अनेक मूलभूत समस्या आजही कायम आहेत. Central government misleads railway passengers

    भारतीय रेल्वेचे उद्दिष्ट सेवांची गुणवत्ता सुधारणे आणि आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासोबतच प्रवासी भाडे परवडणारे ठेवणे असल्याचे सांगितले जात असले तरी, सध्याची भाडेवाढ आणि सेवेतील कमतरता या दाव्यांशी विसंगत आहेत. केंद्र सरकार खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विचारलेल्या सामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर निरुत्तर राहिले आहे.

  • Nomadic Pardhi tribal children vaccination । लसीकरणाच्या विरोधात उभा समाज… पण आरोग्य यंत्रणेनं जिंकला विश्वास!

    Nomadic Pardhi tribal children vaccination

    Nomadic Pardhi tribal children vaccination : चंद्रपूर 22 जुलै – शिवमंदिर परिसर, अष्टभुजा वार्ड येथे झोपडी उभारून अगदी काही काळ वास्तव्यास असणाऱ्या, भटकी पारधी जमातीतील लसीकरणापासुन वंचित असलेल्या बालकांचे चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत लसीकरण करण्यात आले. लसीकरणाबाबत असलेला त्यांचा विरोध व गैरसमज दूर करतांना आलेल्या अडचणींचा सामना करून लसीकरण मोहीम यशस्वी करण्यात आली.

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाजपची सत्ता, शिंदेने कांग्रेसला केले गारद

      या समाजामध्ये लसीकरणाबाबत भीती होती की, “बाळ लसीकरण केल्यावर आजारी पडते,” म्हणून अनेक कुटुंबे लसीकरण टाळत होती. आरोग्य विभागामार्फत याआधी दोनदा प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या, मात्र संबंधित कुटुंबे घरी न सापडल्यामुळे प्रयत्न अपूर्ण राहिले. Chandrapur temporary shelter vaccination

      त्यामुळे मंगळवार 22 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजता, आरोग्य विभागाच्या टीमने तात्काळ भेट देत, त्या ठिकाणी वसलेल्या 40-42 तात्पुरत्या झोपड्यांमध्ये जाऊन जनजागृती केली. प्रत्येक कुटुंबाशी संवाद साधून, लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्यांच्या भीतीचे निरसन करण्यात आले. त्यानंतर लगेचच सुटलेली बालके ओळखून त्यांचे लसीकरण करण्यात आले.


       प्रतिकूल परिस्थितीत, समज-गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर योग्य समुपदेशनाद्वारे सकारात्मक बदल घडविणे हे आरोग्य यंत्रणेच्या तातडीच्या, सहानुभूतीपूर्ण आणि चिकाटीच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले.आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, लसीकरण क्षेत्र निरीक्षक सारिका गेडाम व बगडखिडकी येथील शहरी प्राथमीक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांद्वारे सदर मोहीम राबविण्यात आली.  

    आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी अभिनंदनास पात्र

    “हे काम म्हणजे आरोग्य यंत्रणेसाठी तारेवरच्या कसरतीसारखे होते. समाजाच्या विश्वासास पात्र ठरत, योग्य समुपदेशनाने लसीकरणासारखा संवेदनशील मुद्दा  सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्येही स्वीकारला गेला त्याबद्दल आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत ” – आयुक्त विपीन पालीवाल