Tag: News34 chandrapur

  • mla kishor jorgewar study room initiative । 📚 २० अभ्यासिका! समाजासाठी क्रांतिकारी उपक्रम! किशोर जोरगेवारांचा पुढाकार

    mla kishor jorgewar study room initiative

    mla kishor jorgewar study room initiative : चंद्रपूर – श्री श्री रामकृष्ण सेवा समितीने हाती घेतलेले हे स्वप्नवत कार्य आज पहिल्या टप्प्यात प्रवेश करत आहे. आपल्या परिसरात अभ्यासिका उभारण्याचा शुभारंभ होत आहे. ही केवळ चार भिंतींची इमारत नसून, आपल्या मुलांच्या आणि समाजाच्या भविष्यास आकार देणारे ज्ञानमंदिर ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. modern digital study center

    फार्मर आयडी शिवाय मिळणार पीक विम्याचा लाभ

    आमदार किशोर जोरगेवार यांनी कृष्णा नगर येथील श्री श्री रामकृष्ण सेवा समिती येथे अभ्यासिकेच्या बांधकामासाठी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर कामाचे भुमिपूजन आज त्यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री मनोज पॉल, सविता दंढारे, राष्ट्रीय परिषद सदस्य तुषार सोम, बलराम डोडाणी, मंडळ अध्यक्ष अॅड. सारिका संदुरकर, सचिव विश्वजीत शाहा, रॉबिन बिश्वास, तपोष डे, प्रलय सरकार, आनंद रणशूर, सुधाकर राखडे, जितेश कूळमेथे, कृष्णा मंडळ, बलाई चक्रवर्ती, मदन शहा, संतोष चक्रवर्ती, सुशांत भद्रा, सुनील रॉय आदी मान्यवर उपस्थित होते.

    चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात तब्बल २० अभ्यासिका

    पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याचा संकल्प आपण केला आहे. ११ अभ्यासिकांचा आपला संकल्प होता; मात्र आता जवळपास २० अभ्यासिका आपण मतदारसंघात तयार करत आहोत. यातील काही अभ्यासिकांचे काम पूर्ण झाले असून, विद्यार्थी येथे अभ्यास करून स्वप्नांना पंख देत आहेत, असे ते म्हणाले. bjp mla kishor jorgewar development works

    ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी केवळ पुस्तक वाचण्याची किंवा अभ्यास करण्याची जागा नसेल, तर त्यांच्या विचारशक्तीचा, सर्जनशीलतेचा आणि स्वप्नांचा विस्तार करणारे केंद्र ठरेल. येथे होणाऱ्या वाचन-संवादातून, मार्गदर्शन सत्रांतून आणि विविध शैक्षणिक उपक्रमांतून अनेक तरुणाई आपले उद्दिष्ट पूर्ण करतील. केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे, तर आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची जपणूक हेही या अभ्यासिकेचे ध्येय असेल. आजच्या डिजिटल युगात वाचनाची आणि प्रत्यक्ष संवादाची गरज अधिक वाढली आहे. अशा वेळी, अशी सुविधा निर्माण होणे म्हणजे पुढच्या पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Bhadravati APMC chairman no confidence motion । 15 संचालकांची एकजूट – भद्रावती बाजार समितीतून ताजने हटले!

    Bhadravati APMC chairman no confidence motion

    Bhadravati APMC chairman no confidence motion : भद्रावती : स्थानीक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून अविश्वास प्रस्तावाच्या हालचाली सुरु असताना अखेर आज (दि.७ ऑगस्ट) ला पंधरा संचालकांनी एकमताने सभापती भास्कर ताजने यांच्यावर अविश्वास प्रस्ताव पारित केला व ताजने यांना सभापती पदावरून पायउतार केले. आज दिनांक ७ ऑगस्ट ला स्थानिक बाजार समितीच्या सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेत सदर प्रक्रिया पार पडली.

    शिक्षणाच्या उजेडावर राजकारणाचा अंधार, अम्मा कि पढाई उपक्रम स्थगित

    १५ मतांनी प्रस्ताव पारित

    कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध गटांचे मिळून एकूण अठरा संचालक आहेत. भास्कर ताजने हे सभापती होते. मात्र संचालकांना विश्वासात न घेणे, नियमबाह्य कामकाज करणे व कारभारात पारदर्शकता नसल्याचे कारण पुढे करीत सर्व संचालकांनी मिळून एकमताने ताजने यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याचे प्रयत्न चालविले होते. व पंधरा मतांनी सदर प्रस्ताव पारित झाला तर दोन सभासद अनुपस्थित होते.

    अविश्वास प्रस्ताव यशस्वी होईल या भीतीने ताजने यांनी आधीच राजीनामा दिला होता, हे विशेष.

    कोणत्याही पक्षात प्रवेश घेण्यासंदर्भात कोणत्याही संचालकांवर अथवा सभापतीवर दबाव नव्हता. किंबहुना हा विषयच कधी कुणामार्फत बोलल्या गेला नाही. भास्कर ताजने यांनी सदर विषयाला घेऊन भाजपात प्रवेश घेण्यास नकार दिल्याने अविश्वास ठराव आणला असल्याचे बोलून स्वतःवरील दोषावर पांघरून घालण्यासाठी बनाव केला आहे. सदर अविश्वास कुणाच्या सांगण्यावरून झाला नसुन सर्व संचालकांच्या एकमताने पारित झाला आहे. यावेळी राजकीय पक्ष, गट आदी न बघता केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उन्नतीकरिता हा निर्णय घेण्यात आला. ताजने यांच्या बाजूने एकही संचालक नाही, यातूनच त्यांच्या विषयीची नाराजी उघड होते.
    -गजानन उताणे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती]

    मी बांधकाम सभापती असुन सुद्धा या अविश्वास प्रस्तावात सहभागी आहो, यात कोणताही पक्षपात नाही. ताजने यांच्या कारभारावरील नाराजीमुळेच सदर अविश्वास प्रस्ताव आणला. पुढील सभापतीची निवड रीतसर सर्व संचालक एकत्र बसून निर्णय घेऊ.

    • राजु डोंगे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती]
  • dnyanjyoti savitribai phule aadhaar yojana । 🏠 मोफत वसतीगृहाची संधी! ‘सावित्रीबाई फुले आधार योजना’ मध्ये अर्ज सुरू

    dnyanjyoti savitribai phule aadhaar yojana

    dnyanjyoti savitribai phule aadhaar yojana : चंद्रपूर, दि. 7 :  इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मुले / मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, तसेच वाढत्या स्पर्धेत टिकुन राहता यावे, यासाठी वसतीगृह सुरू करण्या्त आले आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी पदवी प्रथम वर्षात व पदवी नंतरचे पदव्यूत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून वसतीगृहासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. Pandit Dindayal Swayam Yojana

    महिलांच्या नावे मिळणार घर, आजच करा अर्ज

    विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज सादर करावा. सदर विद्यार्थी 12 वी किमान 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण असावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2025 आहे. वसतीगृहामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना आधार व स्वयंम योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने अर्ज गृहपाल आम्रपाली टेंभुर्णे व मुलांचे गृहपाल धीरज डोंगरे यांच्याकडे वसतिगृहात सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडे यांनी केले आहे.

    प्रवेशाचे निकष व नियमावली खालीलप्रमाणे : 

    विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विद्यार्थी हा चंद्रपूर येथील स्थानिक रहिवासी नसावा.  फक्त पदवी प्रथम वर्षातच (Bacherlor Degree) शिक्षण घेणारा असावा. पदवी नंतरचे पदव्यूत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) यांना प्रवेश देण्यात येणार आहे. वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांच्या आत असावे. विद्यार्थ्याचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त  नसावे. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नॉन – क्रिमीलेअर तसेच कास्ट व्हॅलिडीटी जोडणे बंधनकारक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी उत्पान्ना्चा दाखला, बोनाफाईड व वैद्यकिय तपासणी प्रमाणपत्र ओरीजनल जोडावे. अर्ज भरल्यानंतर संपूर्ण कागदपत्रे जोडून सदर अर्ज इतर मागासवर्गीय मुलां / मुलींचे शासकीय वसतीगृहात जमा करावा.

  • Ramchandra Hindi primary school । चंद्रपुरातील रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा होणार स्मार्ट व डिजिटल

    Ramchandra Hindi primary school

    Ramchandra Hindi primary school : चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील जटपूरा गेट परिसरात स्थित रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळेला मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यासाठी  ५ कोटींच्या निधीची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे. ना. दादाजी भुसे चंद्रपूर दौऱ्यावर असताना, विश्रामगृह येथे आमदार जोरगेवार यांनी त्यांची भेट घेऊन या संदर्भातील निवेदन सादर केले. Model school funding 5 crore

    चंद्रपूर हादरलं, वनरक्षकाने वनात केला अत्याचार

    यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्षा छबू वैरागडे, भाजप नेते अशोक जिवतोडे, विधानसभा महिला प्रमुख वंदना हातगावकर, प्रकाश देवतळे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, नामदेव डाहुले, महामंत्री मनोज पाल, रवि गुरुनुरे, सविता दंढारे, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, स्वप्नील डुकरे, सुभाष अदमाने, रवि जोगी, ॲड. सारिका संदुरकर, देवनंद वाढई, वंदना तिखे, सायली येरणे, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा बोरगमवार यांची उपस्थिती होती.

    शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत

    रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा प्रभाग क्र. ७ मध्ये असून, ही शाळा गेल्या अनेक वर्षांपासून अल्पसाधनांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. शाळेतील बहुतांश विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. सध्या शाळेची इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असून पायाभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. वर्गखोल्या अपुऱ्या आहेत, शौचालयांची संख्या कमी आहे, तसेच डिजिटल शिक्षणासाठी कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. Chandrapur Jatpura Gate model school funding

    या पार्श्वभूमीवर, सदर शाळेला मॉडेल स्कूलचा दर्जा देत नव्याने सुसज्ज इमारत, स्मार्ट क्लासरूम, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, वाचनालय, शौचालय, शुद्ध पिण्याचे पाणी आणि खेळाचे मैदान उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यासाठी अंदाजे  ५ कोटी निधीची आवश्यकता असुन हा निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना केली आहे.

  • Ballarpur Forest Guard Assault Case । चंद्रपूर जिल्हा हादरला, वनरक्षकाने वनात केला अत्याचार

    Ballarpur Forest Guard Assault Case

    Ballarpur Forest Guard Assault Case : बल्लारपूर : बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर ३० वर्षीय वनरक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना ५ ऑगस्ट रोजी घडली असून, आरोपी वनरक्षक सध्या फरार आहे.

    अम्मा चौक वादावर आमदार जोरगेवार यांचं उत्तर

    पीडित मुलगी कॉलेज सुटल्यानंतर आपल्या मित्रासोबत चंद्रपूरहून गावाकडे दुचाकीने परत येत होती. रस्त्यात त्यांची दुचाकी बंद पडल्याने ते थांबले. याचवेळी चंद्रपूरहून कारवाकडे जाणारा वनरक्षक दुर्योधन तिथे थांबला. त्याने मुलीच्या मित्राला खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत पैसे मागितले. त्यानंतर, ‘तुला पुढच्या गावापर्यंत सोडतो’ असे सांगून त्याने त्या अल्पवयीन मुलीला आपल्या गाडीत बसवले. forest guard assault case

    गुन्हे दाखल, आरोपी पसार

    आरोपीने तिला चंद्रपूर-जुनोना मार्गावरील जंगलात नेऊन तिच्यावर जबरदस्ती केली. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पीडितेने आपल्या मित्राला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर तो तिला घरी घेऊन गेला. पीडितेने आपल्या पालकांसह बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. Forest guard rape case Maharashtra

    पोलिसांनी आरोपी वनरक्षकाविरुद्ध अप.क्र. ५९२/२५ नुसार भादंवि कलम ३०८(२), १३७(२), ६४(१), ६५(१) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची ओळख पटली असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

    पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे, पोहवा यशवंत कुमरे आणि मपोअं खडसे या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

  • NAKSHA project Ghugus Chandrapur district । 📍 मालकीचे वाद मिटणार? ‘घुग्घुस’मध्ये ऐतिहासिक डिजिटल भूमापन सुरू!

    NAKSHA project Ghugus Chandrapur district

    NAKSHA project Ghugus Chandrapur district : चंद्रपूर, दि. 6 : केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागाच्या मार्गदर्शनाखाली देशातील 150 शहरी भागात “National Geospatial Knowledge Based Land Survey of Urban Habitations (नक्षा)” हा कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील 10 स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस नगर परिषदेचा समावेश असून याठिकाणी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

    वृक्ष लावा आणि जिंका २१ हजार रुपये

    सदर प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक वीस कलमी सभागृहात पार पडली. या बैठकीस जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख भुषण मोहिते, नगर रचना अधिकारी गणेश चिल्लाळ, घुग्घुस न.प. चे मुख्याधिकारी निलेश रांजणकर मनपाचे उपायुक्त संदीप चिदंबर पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, उपअधिक्षक भुमी अभिलेख भूमरेड्डी गिज्जेवार आदी उपस्थित होते.

    घुग्घुस नगर परिषदेचा भूमापन प्रकल्प यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सर्वे ऑफ इंडिया व त्यांचे खाजगी भागीदार आर. व्ही. असोसिएट्स यांच्या माध्यमातून हेलिकॉप्टर आणि ड्रोनद्वारे मोजणी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच नगर परिषदेमार्फत कर आकारणी नमुना 8 अ (पीटीआर डेटा) भूमि अभिलेख विभागास सादर करण्यात आला आहे. या अंतर्गत ग्राऊंड कंट्रोल पॉईंट्स, बेंचमार्क स्थापन करणे आणि सीमांकनासह ड्रोन इमेजवर आधारित प्रारूप नकाशे व जिओ टीआयएफएफ फायली प्राप्त होण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यानंतर स्थानिक चौकशी केली जाईल. नागरीकांना यासंदर्भात पूर्वसूचना दिली जाणार असून चौकशीदरम्यान संबंधितांनी मालकी हक्काचे कागदपत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. NAKSHA pilot project

    प्रकल्पाचे फायदे काय?

    प्रत्येक मालमत्तेचे जीआयएस प्रणालीवर आधारित रेखांकन आणि मूल्यांकन, शहरी नियोजनासाठी आवश्यक बेस मॅप उपलब्धता, प्रत्येक मिळकतीचा स्वतंत्र नकाशा आणि मालकी सनद, बहुमजली इमारतींतील प्रत्येक युनिटसाठी अधिकार अभिलेख, रस्ते, गल्ल्या, जलस्त्रोत, सरकारी मिळकतीचे जीआयएस आधारित नकाशे, मालमत्ता कर नोंदवही (PTR) अद्ययावत करणे,  शासन व स्थानिक संस्थांच्या मिळकतींचे रजिस्टर अद्ययावत करणे, नागरिकांना धारक हक्काचा अधिकृत अभिलेख देऊन आर्थिक सक्षमीकरण.

    प्रकल्पामुळे मालकीचे वाद कमी होणार असून नियोजनबद्ध शहरी विकासासाठी आधारभूत माहिती मिळणार आहे. प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी केले आहे.

  • Vrikshmitra competition Chandrapur । 🌳”वृक्ष लावा, ₹21,000 जिंका! चंद्रपूर मनपाची धमाकेदार स्पर्धा!”

    Vrikshmitra competition Chandrapur

    Vrikshmitra competition Chandrapur : चंद्रपूर 6 ऑगस्ट – वाढत्या उष्णतेचे संकट, हवामानातील असमतोल, वायुप्रदूषण आणि हिरवळीचे घटते प्रमाण या गंभीर समस्यांचा सामना करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत 10 ऑगस्ट 2025 ते 30 ऑगस्ट 2025 या कालावधीत “वृक्षमित्र स्पर्धा 2025” आयोजित करत असल्याची माहिती सहायक आयुक्त शुभांगी सुर्यवंशी यांनी दिली. Chandrapur tree plantation competition

    अम्मा चौक वादावर आमदार जोरगेवार यांचं उत्तर

      5 ऑगस्ट रोजी मनपा सभागृहात आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत सहभागी सामाजिक संस्थांना स्पर्धेचे निकष व इतर माहिती देण्यात आली. स्पर्धेत आतापर्यंत 25 संघांनी सहभाग दर्शविला आहे. यंदाच्या स्पर्धेचा उद्देश “हरित चंद्रपूर” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे, तसेच नागरिक व सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग घेऊन शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व संगोपन करणे हा आहे.स्पर्धेत शहरातील सर्व स्थानिक अशासकीय सामाजिक संस्था,एनजीओ,ओपन स्पेस विकास समिती,क्लब्स,जेष्ठ नागरिक मंडळे,युवक युवती मंडळे तसेच महिला मंडळे सहभागी होऊ शकतात.  
      या प्रसंगी सहायक आयुक्त शुभांगी सुर्यवंशी,उपअभियंता रवींद्र कळंबे,गोपाल मुंदडा,साक्षी कार्लेकर तसेच इतर सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थीत होते. Vrikshmitra green city initiative Chandrapur

    स्पर्धेचा उद्देश –  

    वाढते तापमान आणि हवामानातील बदल यांना तोंड देण्यासाठी हिरवळ वाढवणे.
    प्रत्येक नागरिक व सामाजिक संस्थेमध्ये पर्यावरण संवर्धनाची भावना रुजवणे.
    सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांच्या कडेला, मोकळ्या जागेत व सरकारी जमिनीवर वृक्षारोपण करून सौंदर्यवृद्धी व प्रदूषण नियंत्रण साध्य करणे.

    सहभागी कोण होऊ शकतात?

    नोंदणीकृत व अनोंदणीकृत सामाजिक संस्था (NGO)
    विविध क्लब, महिला मंडळे, गणेश मंडळे, क्रीडा संघटना, ज्येष्ठ नागरिक मंडळे
    योग व नृत्य गट, सायकल क्लब, बचत गट इ.
    (स्पर्धा फक्त गटांसाठी असून वैयक्तिक सहभाग मान्य नाही)


    स्थळ निवड अटी –
    शासकीय जागा, सार्वजनिक मोकळी जागा, रस्त्यालगतची मोकळी पट्टी.
    किमान क्षेत्रफळ – 1000 चौ. फूट किंवा रस्त्यालगत 500 मीटर अंतर.
    स्थळाची पूर्वतपासणी महानगरपालिकेमार्फत होईल.


    मनपाकडून मिळणारी मदत –
    वृक्षांची मोफत उपलब्धता.
    तांत्रिक मार्गदर्शन व देखभाल पद्धतीबाबत सल्ला.
    गटाची जबाबदारी –
    वृक्ष लावणे व त्यांचे संगोपन किमान एक वर्ष करणे.
    वृक्षांना ट्री गार्ड (टाकाऊ साहित्यापासून तयार केल्यास अधिक गुण).
    वृक्ष संगोपनासोबतच पर्यावरण जनजागृतीसाठी उपक्रम, रॅली, कार्यशाळा आयोजित करणे.


    पारितोषिके –
    NGO/क्लब श्रेणी:
    प्रथम – ₹21,000/-
    द्वितीय – ₹15,000/-
    तृतीय – ₹11,000/-
    प्रोत्साहनपर (3 गट) – प्रत्येकी ₹5,000/-
    नागरिक गट श्रेणी –
    प्रथम – ₹21,000/-
    द्वितीय – ₹15,000/-
    तृतीय – ₹11,000/-
    प्रोत्साहनपर (3 गट) – प्रत्येकी ₹5,000/-


    नोंदणी प्रक्रिया –
    इच्छुक गटांनी मनपाने उपलब्ध करून दिलेल्या Google Form द्वारे अथवा उद्यान विभाग, चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये प्रत्यक्ष नोंदणी करावी.
    नोंदणीवेळी गटाचे नाव, सदस्यांची यादी, निवडलेले स्थळ व उपक्रमाची संक्षिप्त योजना सादर करावी.
    संपर्क –
    उद्यान विभाग, चंद्रपूर महानगरपालिका
    मो.: 74989 54976, 83291 69743

  • Chimur Chandrapur bus accident । एक क्षण… आणि बस रस्त्याखाली! स्टेअरिंग लॉक आणि…चिमूर-चंद्रपूर बसचा भीषण अपघात

    Chimur Chandrapur bus accident

    Chimur Chandrapur bus accident : वरोडा – चिमूरहून चंद्रपूरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसला आज दुपारी भीषण अपघात झाला. चारगाव खुर्द जवळील एका वळणावर ही बस रस्त्याच्या खाली घसरली. या अपघातात बसचा वाहक सुरेश भटारकर (रा. राजुरा) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, बसमधील चालक आणि इतर 19 प्रवासी जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    वरोरा नाका चौकाचे होणार नामांतर

    अपघाताचे कारण काय?

    आज, मंगळवार (5 ऑगस्ट) रोजी दुपारी दोन वाजता चिमूर आगाराची बस क्र. एम एच ४० ए क्यू ६१८१ चिमूरवरून चंद्रपूरच्या दिशेने जात होती. चंद्रपूर-वरोडा राष्ट्रीय महामार्गावर चारगाव खुर्द गावाजवळ एका वळणावर समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रॅव्हल्समुळे बसचालक सुनील सुधाकर कुसनाके (वय ३७, रा. वरोडा) यांचे बसवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने बसचे स्टेरिंग लॉक झाले आणि बस रस्त्याच्या खाली घसरली. Maharashtra state transport bus accident

    जखमी प्रवाशांवर उपचार सुरू

    अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे 25 प्रवासी होते. यापैकी सहा प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींमध्ये शकील शेख (आडेगाव), शाहीन शेख (गडचांदूर), वासुदेव शेडमाके (वायगाव भोयर), वसंता देठे (बल्लारशा), ईश्वर चिंचोळकर (धामणी) आणि संजय कोवे (घुग्गुस) यांचा समावेश आहे.

    इतर जखमी प्रवाशांवर वरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमींमध्ये रेखा श्रीरामे (चंद्रपूर), सुमन बालूदे (लोधीखेडा), कांताबाई नवले (भिसी), शामकला दडमल (सुमठाणा), भरत चिंचोळकर (चिमूर), वनिता दडमल (चिमूर), मधुकर चिंचोलकर (चिमूर), मालती कापसे (चिमूर), सोमाबाई चिंचोलकर (धामणी), स्नेहा वाजुरकर (इंदिरानगर चंद्रपूर) आणि सदाशिव मून (बल्लारशा) यांचा समावेश आहे.

    अपघाताची माहिती मिळताच राज्य परिवहन मंडळाचे वरोडा आगार प्रमुख वर्धेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला. बसचालकाने स्वतः शेगाव पोलीस ठाण्यात जाऊन अपघाताची माहिती दिली. शेगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

  • angdaan jeevan sanjeevani abhiyan । शहरातील नागरीकांनी अवयवदानासाठी पुढाकार घ्यावा – चंद्रपूर मनपा

    angdaan jeevan sanjeevani abhiyan

    angdaan jeevan sanjeevani abhiyan : चंद्रपुर 5 ऑगस्ट – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे “अंगदान – जीवन संजीवनी अभियान पंधरवडा” दिनांक 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान राबविला जात आहे.. या अभियानाचा उद्देश नागरिकांमध्ये अंगदानाविषयी जागृती निर्माण करणे, गैरसमज दूर करणे आणि अधिकाधिक लोकांना अंगदानासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. organ donation awareness campaign Chandrapur

    वरोरा नाका चौकाचे होणार नामांतर

      समाजाभिमुख उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने मनपा आरोग्य विभागामार्फत अवयवदानबाबत मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येत आहे 5 ऑगस्ट रोजी मनपा सभागृहात यासंबंधी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. नयना उत्तरवार यांनी या संदर्भात सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. याप्रसंगी सर्व उपस्थितांनी अवयवदानाची शपथ घेतली.अवयवदान हे “मरणोत्तर दान” म्हणून याला सर्वोच्च मानले जाते. एका व्यक्तीच्या अंगदानामुळे 8 लोकांचे प्राण वाचू शकतात,अंगदान सुरक्षित, वैद्यकीय दृष्ट्या नियंत्रित आणि कायदेशीर प्रक्रिया आहे.अंगदानामुळे दात्याच्या शरीराचा अपमान होत नाही; सन्मानपूर्वक सर्व प्रक्रिया पार पाडली जाते. अंगदानाच्या  एका निर्णयामुळे अनेक कुटुंबांना आशा, आनंद आणि नवे भविष्य मिळू शकते. organ donation drive Chandrapur municipal corporation  


       डोळे, हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे, स्वादुपिंड इ. अवयवांचे प्रत्यारोपण करून रुग्णांना नवे जीवन मिळते. काही अवयव (जसे की किडनी) प्रत्यारोपणामुळे रुग्णाला वर्षानुवर्षे चालणाऱ्या डायलिसिसपासून मुक्ती मिळते. कॉर्निया प्रत्यारोपणामुळे अंध व्यक्तीला पुन्हा दृष्टी मिळू शकते. एका अर्थाने मृत्यूनंतरही आपण समाजासाठी कार्य करू शकतो.


        सदर कार्यक्रमाच्या मार्गदर्शन व जनजागृती प्रसंगी उपायुक्त मंगेश खवले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार,नगरसचिव नरेंद्र बोबाटे,सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,डॉ. अमोल शेळके,उपअभियंता रवींद्र कळंबे,उपअभियंता प्रगती भुरे,सोनू थुल,अमित फुलझेले,सागर सिडाम,डॉ. नरेंद्र जनबंधू तसेच अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    अवयवदानासाठी कुठे संपर्क साधावा –

     अवयवदान संकल्प अणि ऑनलाईन प्रतिज्ञा संदर्भात अधिक माहीतीसाठी नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (NOTTO) च्या www.notto.abdm.gov.in या संकेतस्थळावरील वेब पोर्टलच्या माध्यमातुन ऑनलाईन प्रतिज्ञेद्वारे नोंदणी करावी. अधिक माहीतीसाठी NOTTO च्या कॉल सेंटरशी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1800-11-4770 यावर किंवा चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभाग येथे संपर्क साधावा.

  • Dr Babasaheb Ambedkar Deekshabhoomi Chowk । वरोरा नाका चौकाचे नाव बदलणार, आता हे नाव…

    Dr Babasaheb Ambedkar Deekshabhoomi Chowk

    Dr Babasaheb Ambedkar Deekshabhoomi Chowk : शहरातील महत्त्वाच्या दळणवळण केंद्रांपैकी एक असलेल्या वरोरा नाका चौकाचे नामकरण ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी चौक’ असे करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली असून, याबाबतचे निवेदन मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांना देण्यात आले आहे.

    बेकायदेशीर दारू विक्री, आपचे निवेदन

    यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला मोर्चा अध्यक्षा छबू वैरागडे, विधानसभा प्रमुख वंदना हातगावकर, महामंत्री सविता दंढारे, तेजा सिंग, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा बोरगमवार, विमल कातकर, भाग्यश्री हांडे, आशु फुलझेले, राकेश बोमनवार, अक्षय धोटे, करणसिंह बैस, कार्तिक बोरेवार आदींची उपस्थिती होती.
    चंद्रपूर येथील दीक्षाभूमी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीतील एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. Historical significance of Ambedkar’s religious revolution

    तर सन्मान प्राप्त होणार

    नागपूरनंतर बाबासाहेबांनी चंद्रपूरमध्ये दुसऱ्यांदा धम्मदीक्षा दिली होती. त्यामुळे ही भूमी बौद्ध अनुयायांसाठी श्रद्धास्थान मानली जाते. या दीक्षाभूमीपासून हाकेच्या अंतरावर असलेला वरोरा नाका चौक शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याचे नामकरण ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी चौक असे केल्यास त्याला अधिक योग्य आणि सन्मानास्पद स्वरूप प्राप्त होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


    या नामकरणामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव होईल. तसेच, त्यांच्या विचारांतून सामाजिक समरसता, बंधुता आणि ज्ञानाचा संदेश जनमानसात पोहोचेल. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या चंद्रपूर शहराला हे नामकरण ऐतिहासिक ओळखही प्राप्त करून देईल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.


    तसेच संबंधित ठिकाणी आकर्षक फलक, स्मृतिचिन्हे व माहिती फलक बसवून हे स्थान पर्यटकांसाठी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी बनवता येईल, असेही भारतीय जनता पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.