Tag: News34 chandrapur

  • Chandrapur police action on animal trafficking । चंद्रपूरमध्ये प्राण्यांची निर्दयी वाहतूक; १६ जनावरांची सुटका, ४ आरोपी अटकेत

    Chandrapur police action on animal trafficking

    Chandrapur police action on animal trafficking : चंद्रपूर १५ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा): स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोलीकडून नागपूरकडे क्रूरपणे वाहतूक केल्या जाणाऱ्या जनावरांनी भरलेल्या एका ट्रकला ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १६ जनावरांची सुटका केली असून ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Also Read : चंद्रपुरात बचत गटातील महिलांचे दिवाळी फराळ महोत्सव

    कारवाईचे स्वरूप:

    दिनांक १५/१०/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागभीड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा कोठेगाव येथे ही कारवाई केली. पोलिसांनी जनावरांना अत्यंत क्रूरपणे वागणूक देऊन वाहतूक करत असलेला ट्रक (क्र. MH40CT2954) पकडला. ट्रकमध्ये २ नग म्हशी आणि १४ नग रेड्यांसह एकूण १६ जनावरे होती, ज्यांची किंमत अंदाजे ६,४०,०००/- रुपये आहे.

    गुन्हा दाखल:

    या प्रकरणी नागभीड पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. १६५/२०२५ नुसार ‘प्राण्यांना क्रूरपणे वागणुकीचा प्रतिबंध अधिनियम, १९६०’ च्या कलम ११ (१) (घ), (ड), (च), (ज) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    आरोपी आणि जप्त माल:

    पोलिसांनी या प्रकरणी खालील तीन आरोपींना ताब्यात घेतले असून एका आरोपीचा शोध सुरू आहे: १. फिरोज समीर खान (वय २६), रा. भीम गड कॉलनी, तालुका छपरा, जिल्हा शिवनी (म. प्र.) २. आझाद रविदाद खान (वय १९), रा. भीम गड कॉलनी, तालुका छपरा, जिल्हा शिवनी (म. प्र.) ३. सुनील चंद्रकुमार जेलेशिया (वय २१), रा. बोटाटोला, तालुका धुलिया, जिल्हा राजनांदगाव ४. पाहिजे आरोपी: जमीर कुरेशी, राहणार नागपूर

    जनावरांच्या वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक (किंमत २०,००,०००/- रुपये) आणि १६ जनावरे (किंमत ६,४०,०००/- रुपये) असा एकूण २६,४०,०००/- (सत्तावीस लाख चाळीस हजार) रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

    जनावरे ‘प्यार फाउंडेशन’च्या हवाली:

    जप्त करण्यात आलेल्या सर्व १६ जनावरांना पुढील काळजी आणि संरक्षणासाठी चंद्रपूर येथील ‘प्यार फाउंडेशन’ येथे सुरक्षितपणे जमा करण्यात आले आहे.

  • Unclaimed bank deposits Chandrapur । चंद्रपूरमध्ये 88 कोटींच्या दावा न केलेल्या ठेवी; दावा न केलेल्या ठेवी परत मिळवण्याची प्रक्रिया

    Unclaimed bank deposits Chandrapur

    Unclaimed bank deposits Chandrapur : चंद्रपूर, दि. 15 (News३४ वृत्तसेवा) : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध बँकांमधील वैयक्तिक, संस्थात्मक आणि सरकारी योजनांच्या खात्यांमध्ये सुमारे 88 कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी शिल्लक आहेत. या ठेवींचा जिल्ह्यातील 3 लक्ष 76 हजार 242  खातेदारांना परतावा मिळवून देण्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेकडून विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. Chandrapur bank deposit claim process

    Also Read : नशामुक्त चंद्रपूर मोहिमेची सुरुवात

    ही मोहीम 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने आणि सर्व सदस्य बँकांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आशीष पोरकुटे यांनी दिली. देशभरात सुमारे 1 लाख 35 हजार कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी विविध बँकांमध्ये शिल्लक आहेत. त्यापैकी महाराष्ट्र राज्यात 5866 कोटी रुपये, ज्यात वैयक्तिक खात्यांच्या 4612 कोटी, संस्थांच्या 1082 कोटी आणि सरकारी योजनांतील 172  कोटी रुपयांच्या ठेवी समाविष्ट आहेत.

    जिल्हाधिका-यांचे आवाहन 

    जिल्हा अग्रणी बँकेकडून प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील विविध बँकांमधील सुमारे 88 कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी, ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी खात्यात वर्ग करण्यात आल्या आहेत. ठेवींचा परतावा मिळविण्यासाठी आणि निष्क्रिय खाती पुन्हा सक्रिय करण्यासाठी ठेवीदारांनी आपल्या संबंधित बँकांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह अद्ययावत केवायसी सादर करावे. बँकांमार्फत या विशेष मोहिमेअंतर्गत जनजागृती शिबिरे आणि संपर्क अभियान राबविण्यात येणार असून, ज्या खातेदारांचे पैसे वर्ग झाले आहेत, त्यांनी आपल्या ठेवी परत मिळविण्यासाठी पुढाकार घ्यावा. सर्व खातेदारांनी आपल्या रकमेचा परतावा मिळवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे. Bank of India unclaimed deposit recovery

    संबंधित खातेदारांनी बँकेत संपर्क करावा 

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, 10 वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या खात्यांतील ठेवी, ठेवीदार शिक्षण आणि जागरुकता निधी मध्ये हस्तांतरित केल्या जातात. तथापि, खातेदारांना आपले पैसे परत मिळवण्याचा पूर्ण हक्क आहे. ठेवी परत मिळविण्यासाठी संबंधित खातेदारांनी आपल्या बँकेत संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे व अद्ययावत केवायसी सादर करणे आवश्यक आहे. या मोहिमेद्वारे सर्व बँकांकडून जनजागृती शिबिरे व ग्राहक भेटी आयोजित करण्यात येणार आहे. खातेदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक आशिष पोरकुटे यांनी केले आहे.

  • Chandrapur Diwali Faral Mahotsav 2025 । चंद्रपुरात बचत गटातील महिलांचा दिवाळी फराळ महोत्सव

    Chandrapur Diwali Faral Mahotsav 2025

    Chandrapur Diwali Faral Mahotsav 2025 : चंद्रपूर,दि. 14 (News३४ वृत्तसेवा) :   दिवाळीनिमित्त विविध वस्तूंची खरेदी करताना ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेले खाद्यपदार्थ तसेच आकाशदिवे, उटणे यांची खरेदी करावी. तसेच या महिला गटांचा उत्साह वाढवून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर घालून ही दिवाळी अनोख्या पध्दतीने साजरी करावी, असे आवाहन उमेद अभियानाचे जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी केले आहे. यावर्षी सर्व पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद परिसरात दिवाळी फराळ महोत्सव 15 ते 19 आक्टोबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

    ४ दिवसीय फराळ महोत्सव

    उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हयात मोठ्या प्रमाणात स्वयंसहायता समूह कार्यरत असून, यातील अनेक महिला नाविण्यपुर्ण वस्तूंची निर्मिती करीत असतात. येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमिवर या महिलांकडून विविध स्वरुपाची खाद्दपदार्थ तयार केले जात आहेत. दिवाळीनिमित्त खाद्यपदार्थ व अनुषंगीक सजावटीच्या वस्तू नागरिकांनी खरेदी केल्यास त्याचा ग्रामीण भागातील महिलांना खूप फायदा होणार आहे. नुकेतच जिल्हा परिषद परिसरात झालेल्या गणपती महोत्सव प्रदर्शनाला चंद्रपूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला होता. Buy homemade Diwali faral

    Also Read : चंद्रपुरात १६ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी घोषित

                  सर्व तालुकास्तरावर तसेच जिल्हा मुख्यालयात जिल्हा परिषद परिसरात तथा मौलांना अब्दुल कलाम आझाद गार्डन चंद्रपूर येथे दिवाळी फराळ महोत्सव साजरा केला जाणार आहे. यात विविध साहित्य विक्रीस असणार आहे. एकमेकांना भेट देताना स्थानिक व ग्रामीण वस्तूचा वापर करावा, जेणेकरुन ग्रामीण भागातील महिलांच्या घरातही आनंद पोहोचेल, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग तसेच जिल्हा अभियान सहसंचालक मंजिरी टकले यांनी केले आहे.

  • Chandrapur Police Latest News । चंद्रपूर पोलिसांची यशस्वी कारवाई: चोरीच्या दोन मोटारसायकल जप्त

    Chandrapur Police Latest News

    Chandrapur Police Latest News : चंद्रपूर/दुर्गापूर १४ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा): चंद्रपूर पोलिसांनी (Chandrapur Police) एक महत्त्वपूर्ण कारवाई करत ऊर्जानगर हद्दीतून दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांतील चोरीच्या मोटारसायकलसह एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी संदीप रामभाऊ पाटील (वय ४०, रा. कोंढी वार्ड क्रमांक ०५, ऊर्जानगर) याच्याकडून एकूण ५०,०००/- रुपये किंमतीच्या २ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

    Also Read : पत्रकाराने महिलांना लावला चुना, नोकरीच्या नावाने फसवणूक

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या (Durgapur Police Station) हद्दीत चोरीच्या दोन घटना घडल्या होत्या.

    1. पहिली घटना: CSTPS मेजर गेट ऊर्जानगर (Urjanagar) येथून दि. २०/०९/२०२५ चे २२:०० ते दिनांक २३/०९/२०२५ चे ०२:३० वा. दरम्यान मोटारसायकल चोरी झाली होती. याप्रकरणी अपराध क्रमांक २३६/२०२५ कलम ३०३ (२), भा. न्या. सं. (भारतीय न्याय संहिता) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
    2. दुसरी घटना: WCL कॉलनी शक्तिनगर, मेजर गेट ऊर्जानगर येथून दि. १७/०६/२०२४ चे १५:०० ते दिनांक १८/०६/२०२४ चे १२:०० वा. दरम्यान मोटारसायकल चोरी झाली होती. याप्रकरणी अप. क्रं. १८१/२०२४ कलम ३७९, भा.द.वि. (भारतीय दंड विधान) अंतर्गत गुन्हा दाखल होता. Chandrapur Police arrest motorcycle thief

    या दोन्ही गुन्ह्यांतील चोरी केलेल्या २ मोटारसायकलसह आरोपी संदीप रामभाऊ पाटील याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    यशस्वी कारवाई करणारे पथक

    सदरची उल्लेखनीय कार्यवाही श्री मुम्मका सुदर्शन (पोलीस अधीक्षक, चंद्रपूर), श्री ईश्वर कातकडे (अपर पोलिस अधीक्षक, चंद्रपूर) आणि श्री प्रमोद चौगुले (उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

    पोलीस निरीक्षक श्री संदीप एकाडे यांच्या नेतृत्वात पो. उपनि. प्रवीण बिनकलवार, पो. हवा. योगेश शार्दूल, ना. पो. अं. मोरेश्वर गोरे, पो. अं. मंगेश शेंडे, किशोर वलके, सोनाल खोब्रागडे आणि रुपेश सावे यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.

  • Chandrapur Dhamma Chakra Pravartan traffic । धम्मचक्र प्रवर्तन दिन: चंद्रपूर शहरातील वाहन चालकांसाठी महत्त्वाची वाहतूक सूचना

    Chandrapur Dhamma Chakra Pravartan traffic

    Chandrapur Dhamma Chakra Pravartan traffic : चंद्रपूर १४ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) – शहरामधील दीक्षाभूमी मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथे 15 आणि 16 ऑक्टो रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून  सदर सोहळयात जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. या दरम्यान वाहतुक व रहदारीचा  प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, म्हणून दीक्षाभुमी मैदानकडे जाणाऱ्या रहदारीच्या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक बंद ठेवणे आवश्यक आहे.

    Also Read : १६ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

                त्या अनुषंगाने 15 ऑक्टो. च्या  सकाळी 8 वाजतापासून 17 ऑक्टो. च्या 8 वाजेपर्यंत शहरातील वाहतुक व्यवस्थेत पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहे.

    सर्व प्रकारच्या वाहनाकरीता खालील मार्ग बंद : 

               दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या बौध्द बांधवाची गर्दी पाहता पाण्याची टाकी चौक – जुना वरोरा नाका ते कलेक्टर बंगला रोड/हुतात्मा स्मारक जवळील रोड, तसेच वरोरा नाका चौक -मित्रनगर चौक ते सिंधी पंचायत भवन व मित्रनगर चौक ते जिल्हा स्टेडीयमपर्यंत या सर्व परीसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी  राहील. तसेच सदरचा सर्व परीसर नो पार्कीग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. Chandrapur Dhammachakra Pravartan parking    

    अवजड वाहनाकरीता पर्यायी रहदारीचा मार्ग

              1) सदर कालावधी दरम्यान गरजेनुसार नागपूरकडून चंद्रपुरकडे येणारी सर्व प्रकारची जड़ वाहने ही  हॉटेल कुंदन प्लाझा येथून सीटीपीएस मार्गे नेहरू नगरवरून मुल रोडला जातील. 2) मुलकडून नागपुरकडे जाणारी जड वाहने ही बंगाली कॅम्प, सावरकर चौक, वरोरा नाका उडाणपुल या  मार्गाने जातील. किंवा नेहरू नगर वरून सिटीपीएस मार्गे नागपुर कड़े जातील. तसेच गरजेनुसार एम.ई. एल.नाका चौक येथे सदर वाहने थांबवण्यात येतील. 3) बल्लारशा कडून नागपूरकडे जाणारी जड वाहने बंगाली कॅम्प, नेहरू नगर वरून सिटीपीएस मार्गे नागपूरकडे जातील किंवा पलीकडे बंगाली कॅम्प  डि.आर.सी. बंकर, बायपास रोड येथे दीक्षाभूमी मार्गावरील अनुयायांची गर्दी पाहुन थांबवण्यात येईल.

    शहरातील दुचाकी व चारचाकी हलकी वाहनाकरिता रहदारी व्यवस्था

     : जुना वरोरा नाका चौक ते आंबेडकर महाविद्यालय-मित्र नगर चौक-टि. बी . हॉस्पीटल पर्यंतचा मार्ग सर्व प्रकारचे वाहनाकरिता (सायकल सहीत) बंद करण्यात येत आहे. पाण्याची टाकी, विश्रामगृह, जुना वरोरा नाका हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहना करिता (सायकल सहीत) दोन्ही बाजुने बंद करण्यात येत आहे. करिता नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने (जड वाहने वगळून) वरोरा नाका उड्डाण पुल  सिध्दार्थ हॉटेल, बस स्टैंड, प्रियदर्शनी चौक मार्गे शहराकडे जातील. Chandrapur city traffic management Dhammachakra

    रामनगर, मित्र नगर, आकाशवाणी, स्नेहनगर, वडगाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी  पाण्याची टाकी –दवा बाजार – संत केवलराम चौक- दाताळा रोड मार्गे पर्यायी रस्त्याने आपली वाहने, जड वाहने वगळून  घेवून जातील. त्याचप्रमाणे जटपुरा गेट कडून रामनगर मार्गे जुना वरोरा नाकाकडे  जाणाऱ्या वाहन चालकांनी  आपली वाहने पाण्याची  टाकी, प्रियदर्शनी चौक, बस स्टैंड, सिध्दार्थ हॉटेल, उड्डान पुल मार्गं नागपूरकडे जातील. Chandrapur Dhamma Chakra Pravartan traffic

    दीक्षाभूमी सोहळयास येणाऱ्या नागरिकांकरिता वाहन पार्कींग स्थळ

                1) नागपूर रोडने दीक्षाभूमीकडे येणाऱ्या वाहनाकरीता  शकुंतला लॉन, जनता कॉलेज समोरील पटांगण (ईदगाह मैदान) 2) शहरातून दीक्षाभूमी कडे येणारे वाहनाकरीता सेंट मायकल स्कुल मैदान, सिंधी पंचायत भवन जवळील मैदान. 3) वडगांव, आकाशवाणी व लगतच्या परिसरातुन दीक्षाभूमीकडे येणारी  वाहनाकरिता लोकमान्य टिळक हायस्कुल (जिल्हा स्टेडीयम जवळ),  जीवन साफल्य गृह निर्माण सहकारी संस्था (मनोमय हॉस्पीटलच्या मागे), 4) मुल रोड, बंगाली कॅम्प, तुकुम या परिसरातुन येणाऱ्या अनुयायांनी आपली वाहने कृषी भवन जवळील ट्रॅव्हल्स  स्टँड या ठिकाणी (मोटार सायकल) पार्क करावी व चारचाकी वाहने वरील दिलेल्या इतर पार्किंग स्थळी पार्क करावी. Diksha Bhumi road closures Chandrapur

                  सदर अधिसूचना 15 ऑक्टो च्या सकाळी 8 वा पासून 17 ऑक्टो च्या सकाळी 8 वाजतापर्यंत अंमलात राहील. तसेच सदर अधिसूचनेच्या अमंलबजावणीमध्ये आवश्यकतेनुसार  बदल करण्यात येईल. तरी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळ्यामध्ये सहभागी सर्व बौध्द बांधव / अनुयायी व जनतेने वरील वाहतुक व्यवस्थेचा वापर करून घोषित पार्कींग व्यवस्थेमध्येच आपली वाहने ठेवावी तसेच वाहतुक व्यवस्थेचे (नियमाचे) पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.

  • Vijay Wadettiwar Farmers Relief । अतिवृष्टीग्रस्त तालुके नुकसान भरपाई यादीत समाविष्ट; वडेट्टीवार पुन्हा ठरले शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक

    Vijay Wadettiwar Farmers Relief

    Vijay Wadettiwar Farmers Relief : ब्रह्मपुरी १४ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) – यंदाचे वर्षी खरीप हंगामात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे शेतातील उभे पीक पूर्णतः उध्वस्त झाले. अशा आसमानी संकट काळात हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार कडे संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांना भरीव आर्थिक मदत देऊन, सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली. तसेच ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी केलेल्या आग्रही मागणीच्या पाठपुराव्याला यश आले असून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मदत मिळणार आहे. Kharif Crop Damage Maharashtra

    Also Read : चंद्रपुरात महाविकास आघाडीची महत्वाची बैठक

    राजकारणा सह सामाजिक बांधिलकी जोपासणारा सहृदयी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार विजय वडेट्टीवार यांची सर्वदूर ओळख आहे. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी, कामगार, मजूर यांच्या समस्यांचे निराकरणासाठी सदैव पाठीशी खंबीर उभे राहणारे विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात यंदाचे वर्षी झालेल्या अतिवृष्टीची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. व लगेच कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करण्याचे निर्देश दिले.

    सततच्या पाठपुराव्याला यश

    शेतकऱ्यांची दैन्यावस्था बघून सदर मागणी त्यांनी शासन दरबारी रेटून धरल्याने अखेर आ. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश आले असून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही या तीनही तालुक्यांचा अतिवृष्टी व नुकसानग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. विधिमंडळ पक्षनेते,आ विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नामुळे सदर तीनही तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मदत मिळणार असून एक कर्तव्यदक्ष,शेतकऱ्यांप्रती सहृदयी लोकप्रतिनिधी म्हणून पुन्हा एकदा याचा प्रत्यय ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला आला आहे.

  • Mahavikas Aghadi prominent leaders meeting । 💪 चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी सुरू — प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात महत्त्वाची बैठक

    Mahavikas Aghadi prominent leaders meeting

    Mahavikas Aghadi prominent leaders meeting : चंद्रपूर १४ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा): चंद्रपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने तयारीला गती दिली आहे. याच अनुषंगाने आज चंद्रपूर येथील विश्रामगृह येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची प्राथमिक बैठक पार पडली. ही बैठक खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आली.

    Also Read : रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू

    मनपा निवडणुकीत विजय मिळविण्याचा निर्धार

    या बैठकीत आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक स्थानिक पातळीवर मित्र पक्षांना सोबत घेऊन पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, महानगरपालिकेवर विजय मिळवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित सर्व नेत्यांनी केला. या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

     यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या महानगर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दिलीप चौधरी, काँग्रेसचे विधानसभा उमेदवार प्रवीण पडवेकर, उबाठा शहर अध्यक्ष सुरेश पचारे, उबाठा गटाचे नेते सतीश भिवगडे, उबाठा उपाध्यक्ष शालिक फाले, अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख, मनपा माजी स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, मनपा माजी स्थायी समिती सभापती नंदू नगरकर, माजी नगरसेवक राजेश अडूर, काँग्रेस नेते शिव राव, उबाठा नेते अजय वैरागडे, माजी शहर प्रमुख उबाठा प्रमोद पाटील, संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य, संभाजी ब्रिगेड मार्गदर्शक दीपक जेऊरकर, नवशाद शेख, पप्पू सिद्धीकी आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

  • skill training short term courses । PM मोदी यांच्या हस्ते कौशल्य रोजगार कोर्सेसचा शुभारंभ — चंद्रपूरमध्ये संधीचा नवा सूर!

    skill training short term courses

    skill training short term courses : चंद्रपूर, दि. 13 : कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागामार्फत अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रम (शॉर्ट टर्म कोर्सेस) या उद्योगस्नेही व नवयुगीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने राज्यात नुकतेच या अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कौशल्य, विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून स्थानिक पातळीवर या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

    Also Read : १६ ऑक्टोबर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाची सुट्टी द्या

    चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 18 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून 6 शासकीय तंत्र माध्यमिक शाळा आहेत. सन 2025-26 या शैक्षणिक सत्रात संपूर्ण जिल्ह्यात  1145 विद्यार्थ्यांनी शॉर्ट टर्म करीता प्रवेश घेतला असून यात 138 जणांनी न्यू ऐज कोर्स, 141 मुलींच्या संबंधित कोर्सेस, 157 जण संगणकाशी संबंधित तर 709 विद्यार्थ्यांनी व्होकेशनल संबंधित अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. Chandrapur Short Term Skill Courses

    असे आहेत नवीन शॉर्ट टर्म अभ्यासक्रम : 

    चंद्रपूर जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण आणि रोजगारक्षम अभ्यासक्रमांना सुरुवात झाली आहे. यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, ॲडेक्टिव्ह मॅन्युफॅक्चरींग, इलेक्ट्रिकल व्हेईकल टेक्नॉलॉजी, सोलर एनर्जी, सर्व्हिस टेक्निशिअन (होम अल्पायंन्सेस), ड्रोन टेक्नॉलॉजी, सायबर सिक्युरीटी तसेच महिलांसाठी विशेष अभ्यासक्रम, डीजीटल मित्र, सोशल मिडीय इन्फ्ल्युएंसन, सेल्फ ऐप्लॉईड टेलर, कॉसमेटॉलॉजी, ब्युटी पार्लर असे आधुनिक व्यवसाय अभ्यासक्रम समाविष्ट आहेत.

    प्रवेश घेण्यासाठी पात्रता

     : या अभ्यासक्रमांसाठी पात्रता म्हणून आयटीआय प्रशिक्षण घेत असलेले किंवा उत्तीर्ण विद्यार्थी, उच्च व तंत्रशिक्षणातील पदवीधर किंवा पदविकाधारक तसेच दहावी/बारावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.

    येथे करा नोंदणी : नोंदणी खालील संकेतस्थळांवर करता येईल. 1. https://admission.dvet.gov.in

    2. https://msbsvet.edu.in

    अधिक माहितीसाठी व प्रवेश नोंदणीसाठी जिल्ह्यातील जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा शासकीय तांत्रिक विद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोनगीरवार यांनी केले आहे.

  • Public Holiday October 16 । चंद्रपूर दीक्षाभूमी येथील १६ ऑक्टोबरच्या ऐतिहासिक धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनासाठी सार्वजनिक सुट्टी?

    Public Holiday October 16

    खासदार प्रतिभा धानोरकर यांची आक्रमक मागणी

    Public Holiday October 16 : चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरनंतर १६ ऑक्टोबर १९५६ रोजी ज्या चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन एक ऐतिहासिक क्रांती घडवली, त्याच दिवशी सार्वजनिक सुट्टी नसल्याने लाखो लोकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचा थेट मुद्दा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी विभागीय आयुक्त, नागपूर विभाग यांच्याकडे १६ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी तातडीने जाहीर करण्याची लोकहितकारी मागणी केली आहे.

    Also Read : रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू

    या मागणीचे गांभीर्य स्पष्ट करताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नमूद केले की, १६ ऑक्टोबर रोजी देशभरातून लाखो आंबेडकर अनुयायी आणि बौद्ध धर्मीय बांधव चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर अखंड श्रद्धेने अभिवादन करण्यासाठी येतात. हा दिवस सामाजिक समता आणि क्रांतीचे प्रेरणास्रोत आहे. Deekshabhoomi Day Public Holiday

    सुट्टी जाहीर करा

    “सध्या १६ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी नसल्यामुळे शासकीय, निमशासकीय कर्मचारी, तसेच विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कामावरून रजा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. परिणामी, त्यांना त्यांच्या श्रद्धेचा मान राखणे आणि या पवित्र सोहळ्यात सहभागी होणे शक्य होत नाही. हा विषय लाखो लोकांच्या धार्मिक व सामाजिक श्रद्धेशी जोडलेला आहे,” असे थेट मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात मांडले आहे.

    लाखो अनुयायांच्या धार्मिक आणि सामाजिक भावनांचा आदर करण्यासाठी आणि त्यांच्या सोयीसाठी १६ ऑक्टोबर या पवित्र दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यासाठी सार्वजनिक सुट्टी तातडीने जाहीर करणे काळाची गरज आहे. प्रशासनाने या महत्त्वपूर्ण लोकहितकारी मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रहपूर्ण विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विभागीय आयुक्तांना केली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो अनुयायांना शांतता आणि उत्साहाने या ऐतिहासिक स्थळी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

  • tiger death railway crossing । सिंदेवाहीतील दुर्दैवी घटना: रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू

    tiger death railway crossing

    tiger death railway crossing : सिंदेवाही, ऑक्टोबर १३: गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्गावरील सिंदेवाही-आलेवाही रेल्वे क्रॉसिंगजवळ रविवारी (आज) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या रेल्वेच्या धडकेत एका वाघाचा (Tiger Death) मृत्यू झाला आहे. ‘टी-४०’ (T-40) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वाघाचा जागीच मृत्यू झाल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

    Also Read : चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ५६ जागांवरील सोडत

    नेमके काय घडले?

    मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया–बल्लारशाह पॅसेंजर ट्रेन या परिसरातून जात असताना हा अपघात झाला. वाघ रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना त्याला वेगात आलेल्या रेल्वेची जोरदार धडक बसली. सिंदेवाही रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर सोनू कुमार यांनी तत्काळ सिंदेवाहीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) अंजली सायंकार यांना घटनेची माहिती दिली.

    वनविभाग अधिकाऱ्यांनी माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

    वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल

    या दुर्घटनेनंतर वन विभागाने घटनास्थळी पंचनामा सुरू केला आहे. वाघाच्या मृत्यूची नेमकी कारणे आणि अपघात कोणत्या परिस्थितीत घडला, याची सखोल चौकशी (Detailed Investigation) वन विभागाकडून केली जात आहे.

    यावेळी सहायक वनसंरक्षक (ACF) गायकवाड, उपवनसंरक्षक (DCF) कुमारस्वामी, वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) अंजली सायंकार, नितीन गडपायले आणि वनविभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.Gondia Ballarpur tiger railway accident

    सिंदेवाही-आलेवाही पट्ट्यात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या मार्गावर रेल्वे प्रशासनाने गाड्यांचा वेग (Train Speed) कमी ठेवण्याबाबत वारंवार सूचना देऊनही अशा घटना घडत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या अपघातामुळे चंद्रपूर वन विभागात वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.