Tag: MH34

  • criminal with sharp weapon arrested । 🛑 चंद्रपूरच्या रस्त्यांवर दहशत माजवणारा गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात!

    criminal with sharp weapon arrested

    criminal with sharp weapon arrested : चंद्रपूर – गुन्हेगारांची दहशत हि चंद्रपूर शहरातून हद्दपार होताना सध्यातरी दिसत नाही आहे, हातात शस्त्र मिळाले कि परिसरातील नागरिकांना घाबरविण्याचे काम काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक करीत आहे, अशीच दहशत माजविणाऱ्या गुन्हेगाराला शहर पोलिसाने १ जुलै रोजी बेड्या ठोकल्या.

    चंद्रपुरात ३ जुलै रोजी भाजप आमदार विरोधात निषेध मोर्चा

    रेकॉर्डवरील गुन्हेगाराची दहशत

    चंद्रपूर शहरातील बाबुपेठ ओव्हर ब्रिज च्या खाली महात्मा फुले चौकात रेकॉर्डवरील गुन्हेगार ४१ वर्षीय गणपत शंकर भुजोने हा हातात धारदार कोयता घेत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धमकवीत दहशत माजवीत असल्याची माहिती चंद्रपूर शहर पोलिसांना मिळाली.

    माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ बाबुपेठ येथे पोहचत गणपत भुजोने ला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता एक धारदार लोखंडी कोयता जप्त केला.

    आरोपी गणपत शंकर भुजोने वर भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली. सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलते, पोउपनि विलास निकोडे व गुन्हे शोध पथकाने केली.

  • civic issues in chandrapur city । 📢 चंद्रपूरच्या रस्त्यांपासून ड्रेनेजपर्यंत, आप ने वाचला समस्यांचा पाढा

    civic issues in chandrapur city

    civic issues in chandrapur city : चंद्रपूर – आम आदमी पार्टी (आप), चंद्रपूर ने जल नगर वॉर्डातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत महानगरपालिकेला निवेदन दिले. जल नगर वॉर्डातील नाले आणि रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, यामुळे नागरिक डास, दुर्गंधी आणि दूषित पाण्यामुळे त्रस्त आहेत. यामुळे सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

    शेतकऱ्यावर अस्वलीने केला हल्ला

    नागरिकांच्या समस्या आणि महानगरपालिकेची उदासीनता

    जल नगर वॉर्डातील नागरिकांनी अनेकदा महानगरपालिकेकडे या समस्यांबाबत तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

    आपची मागणी आणि आंदोलनाचा इशारा

    या पार्श्वभूमीवर, आम आदमी पार्टीने जल नगर वॉर्डातील नागरिकांसह महानगरपालिकेला निवेदन देत तातडीने नाल्यांची सफाई आणि रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली. जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आपने दिला आहे.

    यावेळी आम आदमी पक्षाच्या तबस्सुम शेख, मयूर राईकवार, सुनील मुसळे आणि राजू कुडे यांच्यासह जल नगर प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • WCL area bear attack incident । 🐾 WCL परिसरात थरार! अस्वलाच्या हल्ल्याने शेतकरी गंभीर

    WCL area bear attack incident

    WCL area bear attack incident : भद्रावती: चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur District) भद्रावतीजवळ काल, २९ जून रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास एका शेतकऱ्यावर अस्वलाने (Bear Attack) हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने (Forest Department) तात्काळ या अस्वलाला पकडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

    महावितरण देणार २४ तास वीज पुरवठा, रणनीती ठरली

    नेमकी काय घडली घटना?

    आनंदराव मारोती ढवस (वय ६७, रा. तिरवंजा) असे गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आनंदराव ढवस हे काल सायंकाळी आपल्या शेतातील कामे आटोपून घराकडे परतत होते. भटाळी वेकोली (WCL) परिसरातील डम्पिंगजवळ दबा धरून बसलेल्या एका अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात आनंदराव यांच्या चेहऱ्यावर आणि दोन्ही डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. bear attack on farmer


    नागपूरला उपचारासाठी हलवले

    हल्ला झाल्यानंतर त्यांना तातडीने चंद्रपूर सामान्य रुग्णालयात (Chandrapur General Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात (Nagpur Private Hospital) रेफर करण्यात आले आहे.

    या घटनेमुळे भद्रावती आणि वेकोली परिसरातील शेतकऱ्यांमध्ये अस्वलाच्या हल्ल्याची भीती वाढली आहे. शेतात काम करण्यासाठी जाणेही आता धोक्याचे झाले असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. वनविभागाने या अस्वलाला लवकरात लवकर जेरबंद करून शेतकऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

  • Bhadravati Nagar Parishad । भद्रावती नगर परिषदेची ऐतिहासिक फजिती, थेट फर्निचर जप्त!

    Bhadravati Nagar Parishad

    Bhadravati Nagar Parishad : भद्रावती: भद्रावती नगर परिषदेला (Bhadravati Nagar Parishad) मोठा धक्का बसला आहे. आठवडी बाजारासाठी भाड्याने घेतलेल्या खासगी जमिनीचे तब्बल ६६ लाख रुपये भाडे (Rent Arrears) थकल्याने जमीनमालकांनी नगर परिषदेच्या कार्यालयातील साहित्य जप्त करण्याची कारवाई केली आहे. वरोरा न्यायालयाने (Warora Court) जमीनमालकांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ही जप्तीची कारवाई करण्यात आली. यामुळे भद्रावती नगर परिषदेची आर्थिक स्थिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

    काय आहे नेमके प्रकरण?

    २०१८ मध्ये भद्रावती नगर परिषदेने शहरातील राजू गुंडावार, संजय गुंडावार आणि किशोर गुंडावार यांच्या मालकीची ३०,०३३ चौरस फूट जमीन आठवडी बाजारासाठी भाडेतत्त्वावर घेतली होती. त्यावेळी ६६ हजार रुपये प्रतिमहिना असे भाडे निश्चित करण्यात आले होते. सुरुवातीचे काही महिने भाडे नियमितपणे भरण्यात आले, परंतु त्यानंतर नगर परिषदेने भाडे भरणे बंद केले. यामुळे थकीत भाड्याची रक्कम वाढत जाऊन ती सुमारे ६६ लाख रुपयांवर पोहोचली.

    चंद्रपुरात भाजप आमदार विरोधात भव्य निषेध मोर्चा

    गुंडावार कुटुंबीयांनी नगर परिषदेशी अनेकदा संपर्क साधून थकीत भाड्याची मागणी केली, तसेच त्यांना पुरेसा वेळही दिला. मात्र, नगर परिषदेने ही रक्कम चुकती केली नाही. अखेर, गुंडावार कुटुंबीयांनी वरोरा दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला. न्यायालयाने गुंडावार यांच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांना रक्कम वसुलीसाठी जप्तीचे अधिकार दिले.


    कार्यालयातील साहित्याची जप्ती

    न्यायालयाच्या आदेशानुसार, ३० जून रोजी (सद्यस्थितीनुसार) गुंडावार यांनी भद्रावती नगर परिषद कार्यालयात जाऊन जप्तीची कारवाई सुरू केली. या कारवाईत कार्यालयातील सोफा, खुर्च्या आणि इतर अनेक साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या या साहित्याचा लिलाव करून थकलेले भाडे वसूल केले जाईल, असे जमीनमालकांनी सांगितले आहे. municipal property seizure


    नगर परिषदेची आर्थिक अडचण

    या कारवाईमुळे भद्रावती नगर परिषदेची आर्थिक स्थिती उघड झाली आहे. मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांनी सांगितले की, नगर परिषदेकडे सध्या एकाच वेळी एवढी मोठी रक्कम देण्यास पुरेसा निधी नाही. त्यांनी जमीनमालकांना ही रक्कम पाच टप्प्यांत देण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु जमीनमालकांनी तो प्रस्ताव मान्य न करता जप्तीची कारवाई केली.

    जमीनमालक संजय गुंडावार यांनी स्पष्ट केले की, जप्त केलेल्या साहित्याचा लिलाव करून भाड्याची रक्कम वसूल केली जाईल. जर यातून पूर्ण वसुली झाली नाही, तर आणखी साहित्य जप्त करण्यात येईल. या घटनेमुळे भद्रावती शहरात नगर परिषदेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • Maharashtra discom power supply strategy । ⚡ “२४ तास वीज पुरवठा!” – महावितरणची नवी रणनीती जाणून घ्या!

    Maharashtra discom power supply strategy

    Maharashtra discom power supply strategy :चंद्रपूर:- दिनांक 30 जून – वीज सेवा अखंडित देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याची कारणे शोधा, फिडरची लांबी जास्त असेल तर त्याची विभागणी करा, नविन डिटीसी लावा, नविन एबी स्विच लावा, तसेच वीज पुरवठा अखंडित रहावा यासाठी पर्यायी व्यवस्थेतून वीज पुरवठा करता येईल त्यादृष्टिने कायमस्वरूपी नियोजन करा. तसेच आरडीएसएस योजनेअंतर्गत सुरू असलेल्या वीज यंत्रणा सुधारणा आणि मजबूतीकरणाच्या कामांना गती द्या असे निर्देश संचालक (प्रकल्प/संचालन) सचिन तालेवार यांनी दिले. feeder level power outage analysis

    चंद्रपूर जिल्हा ग्रामीण भाजपचे नवे मंडळ अध्यक्ष जाहीर

    चंद्रपूर परिमंडळ येथे दि. 29/06/2025 ला झालेल्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता हरीश गजबे ,अधीक्षक अभियंता चंद्रपूर मंडळ संध्या चिवंडे, अधीक्षक अभियंता गडचिरोली मंडळ प्रकाश खांडेकर, कार्यकारी अभियंता विकास शहाडे, विलास नवघरे, चंद्रशेखर दारवेकर, सत्यदेव पेगलपट्टी,वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) राकेश बोरीवर, कार्यकारी अभियंता बल्लारशा रागीट, कार्यकारी अभियंता ब्रह्मपुरी भारतभूषण औगड, कार्यकारी अभियंता गडचिरोली पारेख, कार्यकारी अभियंता आलापल्ली वाघमारे तसेच महावितरणच्या परिमंडळातील सर्व विभागीय कार्यकारी अभियंते आणि जिल्ह्यातील उपविभागीय अभियंते उपस्थित होते.

    वीज पुरवठा बंद करण्यापूर्वी ग्राहकाला सूचना द्या

    यावेळी संचालक (प्रकल्प/संचालन) यांनी फिडर निहाय झालेला वीज पुरवठा खंडिताचा आढावा घेतला. कार्यकारी अभियंता यांनी देखभाल दुरूस्तीच्या कामावर नियंत्रण ठेवावे तसेच ग्राहकांची तक्रार होणार नाही यासाठी सक्षम अधिकारी यांच्या परवानगीने आणि वीज ग्राहकाला पुर्व सुचना देवूनच देखभाल दुरूस्तीसाठी वीज पुरवठा बंद करण्यात यावा, औद्योगिक ग्राहकाची भूमिका जिल्ह्याच्या विकासात महत्वाची आहे.

    औद्योगिक ग्राहकांसाठी विजेच्या महत्व लक्षात घेऊन त्यांना सुरळीत वीज सेवा देण्यासोबत त्यांच्या वीज सेवे विषयक अडचणी जाणून घ्या आणि त्यांच्या तक्रारी तत्परतेने सोडवा. तसेच अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी प्रत्येक महिन्यातून एकदा जिल्ह्यातील उद्योजकांसोबत बैठक घेत पुढाकार घेऊन वीज पुरवठ्याशी संबंधित प्रश्न सोडविण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. तक्रार घेऊन येणाऱ्या ग्राहकांना सौजन्याची वागणूक द्या, ग्राहकांच्या नावात बदल करण्याची आणि नविन वीज जोडणीसाठी महावितरणने ग्राहकांसाठी ऑनलाईन व्यवस्थेची सोय केली आहे, त्यामुळे वीज जोडणीचे अर्ज प्रलंबित राहणार नाही.


    यावेळी सचिन तालेवार संचालक (प्रकल्प/संचालन) बोलतांना म्हणाले की, वीज ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून महावितरणमध्ये अनेक धोरणात्मक बदल करण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रपूर परिमंडळातील शेवटच्या कर्मचाऱ्यांना महावितरणची ध्येय धोरणे, तसेच मुख्य कार्यालयातील बैठकितील निर्देश, सुचना यांची माहिती देण्यासाठी, नियमित लाईनस्टाफ पर्यंत संवाद साधा असेही निर्देश त्यांनी दिले.

  • BJP Chandrapur district new mandal presidents । 🚨 भाजपच्या चंद्रपूर जिल्ह्यात नवे २७ मंडळ अध्यक्ष – बघा नावांची यादी

    BJP Chandrapur district new mandal presidents

    BJP Chandrapur district new mandal presidents : चंद्रपूर, दि. ३० : मुंबई येथे झालेल्या विशेष बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अंतर्गत कार्यरत २७ मंडळांसाठी नवीन मंडळ अध्यक्षांची यादी निश्चित करण्यात आली. ही बैठक भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला प्रदेश महामंत्री श्री. विक्रांतजी पाटील, श्री. रविंद्रजी अनासपुरे, श्री. रणधीरजी सावरकर, श्री. राजेश पांडे, श्री. विजयराव चौधरी, माधवीताई नाईक तसेच विदर्भ संगठन मंत्री श्री. उपेंद्रजी कोठेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. या नव्या यादीची अधिकृत घोषणा भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री. हरीश शर्मा यांनी आज केली आहे. BJP rural leadership appointments

    भाजप आमदार विरोधात चंद्रपुरात भव्य निषेध मोर्चा

    नवीन नियुक्त मंडळ अध्यक्षांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

    • 1)बल्लारपुर शहर- ॲड रणन्जय सिंह
      2)बल्लारपुर ग्रामिण- श्री.चंद्रकांत(पिंटु)देऊळकर
      3)मुल शहर- श्री.प्रविण मोहुर्ले
      4)मुल ग्रामिण- श्री.चंदु मारगोनवार
      5)दुर्गापुर/उर्जानगर- श्री.श्रीनिवास जनगमवार
      6)पोंभुर्णा-श्री.हरी पाटील ढवस
       7)गोंडपीपरी – श्री दीपक सातपुते
      8)गडचांदूर शहर – श्री अरुण तुकाराम डोहे,
      9)राजुरा शहर – श्री सुरेश हरी रागीट,


    10)राजुरा ग्रामीण – श्री वामन मारोती तुराणकर,
    11) जिवती – श्री दत्ता हरी राठोड,
    12)कोरपना – श्री संजय रामचंद्र मुसळे,
    13)नंदोरी – मुधोली– श्री दयानंद जांभुळे,
    14)वरोरा शहर –श्री संतोष पवार,
    15)नागरी – सालोरी– श्री राजेंद्र सवई,
    16)भद्रावती शहर – श्री सुनील नामोजवार,
    17)बोर्डा- आबामक्ता – श्रीमती वंदनाताई राजू दाते,
    18)घोडपेठ- पाटाळा – श्री श्यामसुंदर उरकुडे, 19)अर्‍हेरनवरगाव– श्री सुधीर दोनाडकर,
    20)तळोधी– श्री हेमराज शांताराम लांजेवार,
    21)नागभीड –श्री संतोष विठ्ठल रडके,


    22)चिमूर – श्री गजानन गुडधे,
    23) भिसी – नेरी – श्री मनीष दत्तात्रय तूम्पलीवार,
    24) सावली – श्री किशोर भाऊराव वाकुडकर
    25)ब्रह्मपुरी शहर – श्री सुयोग वामनराव बाळबुधे
    26)ब्रह्मपुरी ग्रामीण – श्री ज्ञानेश्वर राजाराम दिवटे
    27)सिंदेवाही –श्री नागराज मुकुटराव गेडाम
     यांची नियुक्ती झाली आहे.

    जिल्हाध्यक्ष श्री हरीश शर्मा यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की,“पक्षाची विचारधारा आणि धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही नवीन टीम प्रभावी कार्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

    नवनियुक्‍त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे माजी वने व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार  सुधीरभाऊ मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराजभैय्या अहीर,चंद्रपूर जिल्‍हा ग्रामीण अध्‍यक्ष हरिश शर्मा,वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष श्री.चंदनसिंह चंदेल,आमदार किर्तीकुमार भांगडीया,आमदार देवराव भोंगळे,आमदार करण देवतळे, माजी आ.प्रा. अतुल देशकर, माजी आ. अॅड. संजय धोटे, माजी आ. सुदर्शन निमकर,श्री.विजय राऊत,श्री.राजेंद्र गांधी,श्री.प्रमोद कडु,श्री.रमेश राजुरकर,सौ.विद्याताई देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस , प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम,भाजपा जिल्हा महामंत्री श्रीमती संध्याताई गूरनुले,डाॅ.मंगेश गुलवाडे, श्री.विवेक बोढे आदींनी अभिनंदन केले आहे.

  • Chandrapur protest July 3 । 💥 धर्मगुरूंविरोधात बोलणाऱ्या आमदाराविरुद्ध चंद्रपूर ख्रिश्चन समाज आक्रमक!

    Chandrapur protest July 3

    Chandrapur protest July 3 चंद्रपूर – राज्याच्या राजकारणात सत्ताधारी मंत्री असो कि आमदार सध्या ते विविध जातीधर्माबाबत बेताल वक्तव्य करत सुटले आहे, याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे भाजपचे जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर, यांच्यावर कठोर कारवाई करीत आमदारकी रद्द करण्याची मागणी चंद्रपूर ख्रिश्चन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याकरिता ३ जुलै रोजी चंद्रपुरात संत अँड्रयूज चर्च ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. सदर निषेध मोर्च्याचे आयोजन चंद्रपूर जिल्हा पास्टर्स असोसिएशन तर्फे करण्यात येत आहे. Gopichand Padalkar controversial speech

    आयटीआय नंतर थेट नोकरी, ७० जणांना मिळाला रोजगार

    प्रकरण काय?

    सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कुपवाड येथे ऋतुजा राजगे नावाच्या गर्भवती तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणात धर्मांतरासाठी सासरच्या लोकांनी छळ केल्याचा आरोप आहे. या घटनेच्या निषेधार्थ आयोजित मशाल मोर्चादरम्यान गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांनी “धर्मांतरासाठी गावात येणाऱ्या ख्रिश्चन पाद्रींना सैराट करा, आणि जो हे करेल त्याला मी स्वतः ११ लाखांचे बक्षीस देईन” असे विधान केले. या वक्तव्याने ख्रिश्चन समाजात संताप आणि भय निर्माण झाले असून, त्यांनी याला हिंसाचाराला चिथावणी देणारे वक्तव्य ठरवले आहे.

    सैराट गेम करा

    धर्मगुरूंना ठार मारणाऱ्याला, त्याचा सैराट गेम करणाऱ्यास अकरा लाख रुपयांचे बक्षीस त्यांनी सभेत जाहीर केले आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळे धर्मगुरूंची समाजविघातक व्यक्तीकडून हत्या होऊ शकते. त्यामुळे धर्मगुरूंच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्यास गोपीचंद पडळकर जबाबदार असतील. जनतेतून निवडून आलेला आमदारच अशी बेताल भाषणे करून ख्रिश्चन समाजाबद्दल गरळ ओकत असेल तर त्याला आमदारपदी राहण्याचा अजिबात अधिकार नाही. Christian protest Chandrapur 2025

    राज्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी विविध समाजात तेढ निर्माण करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, काही वाद झाला तर एका समाजाला टार्गेट करण्याचे काम या सत्ताधारी पक्षांकडून केल्या जात आहे, समाजाने विरोध दर्शविला तर माफी मागून प्रकरण शांत केल्या जाते मात्र सरकारतर्फे अश्या बेताल वक्तव्य करणाऱ्या लोक प्रतिनिधींवर कारवाई केल्या जात नाही. सध्या राज्यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ख्रिश्चन समाज एकजुटीला उभा झाला असून राज्यात आंदोलनाची शृंखला सुरु करण्यात आली असून या श्रुंखलेत चंद्रपुरातील ख्रिश्चन बांधवांतर्फे निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे, या मोर्च्यात समाजातील बांधवानी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

  • How to apply for Divyangjan national award | 🏆 “दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय ओळख देणारी सुवर्णसंधी – अर्ज करण्यासाठी उशीर नको!”

    How to apply for Divyangjan national award

    How to apply for Divyangjan national award online : चंद्रपूर : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींकरिता राष्ट्रीय पुरस्कार सन 2025 साठी अर्ज व नामांकन ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहेत. हे अर्ज www.awards.gov.in या केंद्रीकृत पोर्टलवर 15 मे पासून 15 जुलै 2025 पर्यंत सादर करता येणार आहेत.

    सुधीर मुनगंटीवार यांचं प्रेरणादायी मार्गदर्शन, गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

    ऑनलाईन करा अर्ज

    राष्ट्रीय पुरस्कारांसाठी अर्ज सादर करताना फक्त ऑनलाइन प्रणालीच स्वीकारण्यात येणार असून, प्रत्यक्ष किंवा पोस्टाद्वारे आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्ज हे पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विशिष्ट नमुन्यात सविस्तर व प्रेरणादायी कार्याची माहिती देऊन भरायचे आहेत.

    या पुरस्कारांसाठी पात्रता निकष, अर्जाची माहिती व मार्गदर्शक सूचनांचे सविस्तर विवरण दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.depwd.gov.in वर उपलब्ध आहे.

    याबाबत अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी सदर प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.

  • murder case in Rajura । 📢 घरगुती वाद, भीषण शेवट – राजूरा खून प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई!

    murder case in Rajura

    murder case in Rajura : चंद्रपूर: राजुरा तालुक्यातील हरदोना (बुज) गावात एका धक्कादायक घटनेत, एका भावाने आपल्याच सख्ख्या भावाचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना २८ जून रोजी रात्री ९ वाजता घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी वडील आणि मुलाला अटक केली आहे.

    चंद्रपूर मनसेत विविध राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

    प्रदीप मनोहर चिलमुले (२४) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर राजुरा पोलिसांनी वडील मनोहर बक्का चिलमुले (५०) आणि मोठा भाऊ प्रफुल्ल मनोहर चिलमुले (२८) यांना अटक केली आहे.

    पत्नीसोबत भांडण आणि खुनी संघर्ष

    मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री प्रदीप त्याचे पत्नीसोबत भांडण करत होता आणि तिला मारहाण करत होता. हे पाहून मोठा भाऊ प्रफुल्ल भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थीला गेला. मात्र, प्रदीपने त्याला काठीने मारले. त्यानंतर त्यांचे वडील मनोहर चिलमुले यांनीही मध्यस्थी केली, पण प्रदीप कुणाचेच ऐकत नव्हता. chandrapur crime

    या रागातून प्रफुल्लने प्रदीपला खाली पाडले आणि त्याचा गळा दाबला. त्याच वेळी वडील मनोहर यांनी घरातून दोरी आणून त्याचे हात बांधण्याचा प्रयत्न केला. प्रफुल्लने गळा दाबल्यामुळे प्रदीप अचानक बेशुद्ध पडला. त्याला तातडीने गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

    या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात वडील आणि भावाविरुद्ध कट रचून खुन केल्याप्रकरणी अप. क्र. ३०५/२०२५, कलम १०३(१), ३(५) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते हे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

  • MNS party joining event in Chandrapur । 🔥 मनसेचा विसापूरमध्ये झंझावाती प्रवेश – भाजपा व काँग्रेसला मोठा झटका?

    MNS party joining event in Chandrapur

    MNS party joining event in Chandrapur : चंद्रपूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचे जिल्हा संपर्क अभियान सुरु असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीकरिता गावाखेड्यावर मनसेचे कार्यक्रम सुरु आहेत.

    अमन अंधेवार यांच्या मार्गदर्शनात पक्षप्रवेश

    दरम्यान बल्लारापूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या विसापूर या गावात मनसेच्या शाखा उदघाटनाच्या कार्यक्रमासह इतर राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेशाचा कार्यक्रम मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विसापूर येथील मनसेचे जुने पदाधिकारी व आता मनसे जनहीत कक्ष बल्लारापूर तालुका सचिव राजू लांडगे यांच्या नेतृत्वात दिनांक 28 जून ला आयोजित करण्यात आला होता. MNS Visapur branch inauguration

    वन्यप्राण्यांचा कर्दनकाळ, रेल्वेच्या धडकेत सांबराचा मृत्यू

    विसापूर गावात शाखा फलकाचे उदघाटन करण्यात आले तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी मंच्यावर मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे, रोजगार स्वयंरोजगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, जनहीत कक्षाचे चंद्रपूर शहर अध्यक्ष पियुष धुपे, मनसे महिला सेनेच्या चंद्रपूर शहर अध्यक्षा वर्षा भोंबले, अनुप यादव इत्यादीची उपास्थिती होती.

    कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपास्थित होते, या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पक्ष प्रवेश विसापूर राजू भाऊ लांडगे, बळी भाऊ नरूले शाखा अध्यक्ष, किशोर नागापुरे, नारायण शिकारदार, दिलीप नान्ने, राकेश जवादे. रमेश शिवरकर, निलेश राऊत, नानाजी शिकारदार, जीवन मेश्राम, ग॔गाधर नान्ने, शिवा वाडिले, फरजना शेख, संगिता लांडगे, अमन थूल, प्रतीक चिकाटे, शरद गणवीर, राज आत्राम, परितोष मंडळ, कैलाश पाटील, आसिफ शेख इत्यादी मानसैनिकांनी प्रयत्न केले.