Tag: MH34

  • pmfby notification for Chandrapur district । चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी संधी, विमा भरून मिळवा 60,000 रुपयांपर्यंतचे संरक्षण

    pmfby notification for Chandrapur district

    pmfby notification for Chandrapur district : चंद्रपूर, दि. 0८ जुलै : खरीप हंगाम 2025 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2025 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. सदर योजना शेतकऱ्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, कीड प्रादुर्भाव, वाऱ्यामुळे नुकसान इत्यादींपासून आर्थिक संरक्षण प्रदान करते.

    चंद्रपुरात महिलांसाठी स्वतंत्र व्यसनमुक्ती केंद्र

    या योजनेत भात, कापूस, सोयाबीन, तुर, ज्वारी इ. पिकांसाठी विमा संरक्षण दिले जाणार आहे. भात (तांदुळ) करीता विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 61,000 रुपये असून शेतकऱ्यांनी भरायचा हप्ता प्रती हेक्टर 1220 रुपये आहे. तसेच खरीप ज्वारी करीता विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 33,000 रुपये असून विमा हप्ता 82 रुपये 50 पैसे व सोयाबीन करीता विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 58,000 रुपये व विमा हप्ता 580 रुपये. तुर करीता 47,000 रुपये विमा हप्ता  117 रुपये 50 पैसे तसेच कापूस करीता विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 60,000 रुपये व शेतकऱ्यांनी भरायचा विमा हप्ता 1200 रुपये प्रती हेक्टर.

    योजनेत सहभागी होण्यासाठी महत्वाचे निकष व अटी:

    योजना अंतरभूत (Notified) पिके आणि क्षेत्रांवरच लागू असेल, कृषीदार व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी दोघेही पात्र, मात्र भाडेपट्टीचे नोंदणीकृत करार अपलोड करणे बंधनकारक, ई-पीक पाहणी प्रणालीवर पिकांची नोंदणी करणे आवश्यक, शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) असणे बंधनकारक (भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई) (ईमेल: pikvima@aicofindia.com). how to apply for pmfby scheme online 2025

    योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखा किंवा ‘आपले सरकार सेवा केंद्रा’ मार्फत आवश्यक कागदपत्रांसह हप्ता भरावा. सहभागी होण्याची इच्छा नसलेल्या शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी किमान 7 दिवस आधी नकारपत्र संबंधित कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. pmfby registration last date 2025

    शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन पीक संरक्षणासाठी आर्थिक सुरक्षेची हमी घ्यावी तसेच अधिक माहितीसाठी सहाय्यक कृषी अधिकारी / मंडळ कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी / उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर कार्यालय या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

  • district level narcotics coordination meeting । चंद्रपुरात महिलांसाठी स्वतंत्र व्यसनमुक्ती केंद्र!, व्यसनमुक्तीचा नवा आराखडा

    district level narcotics coordination meeting

    district level narcotics coordination meeting : चंद्रपूर, दि. 7 जुलै :  जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वापर, साठवणूक, वाहतूक व विक्रीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे कठोर आणि योजनाबद्ध उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहेत.

    जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नार्को-कोऑर्डिनेशन समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत श्री गौडा बोलत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे तसेच रेल्वे पोलिस व इतर विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    सीमावर्ती भागात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    जिल्हाधिकारी गौडा यांनी युवा पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये, यासाठी समाजात व्यापक जनजागृती करणे गरजेचे असल्याचे सांगितले. (anti drug awareness programs in schools) शाळा, महाविद्यालये व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांपासून दूर राहण्यासाठी जनजागृती करावी, तसेच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी शिक्षण विभागाने विविध उपक्रम राबविण्याचे सांगितले.

    प्रतिबंधक औषधांची विक्री

    अन्न व औषध प्रशासन विभागाने पोलिसांच्या सहकार्याने जिल्ह्यातील विविध मेडीकल स्टोअर्सवर अचानक भेटी देऊन प्रतिबंधित औषधांची (how to check banned drugs in pharmacies) विक्री होत आहे की नाही याची तपासणी करणे, सीसीटीव्ही कार्यरत आहेत की नाही याचीही खातरजमा करणे, रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ तयार होणार नाहीत याची खबरदारी घेणे, एमआयडीसीमधील चालू व बंद कारखान्यांची तपासणी करणे.

     तसेच आंतरराज्य सीमेवरील शेती क्षेत्रांमध्ये खसखस किंवा गांजाची लागवड होणार नाही यासाठी कृषी अधिकाऱ्यांकडून नियमित पाहणी करून शेतकऱ्यांना जागरूक करणे, खाजगी वाहनाद्वारे येणाऱ्या टपाल, पार्सल, कुरीअर यांची आकस्मिक तपासणी करणे अशा विविध सूचना देत जिल्हाधिकारी यांनी दिल्या. यासोबतच व्यसनमुक्ती संदर्भात महिलांसाठी स्वतंत्र व्यसनमुक्ती केंद्र उभारण्याचे निर्देश देत, यासाठीही जनजागृतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

    बैठकीचे सादरीकरण पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी केले. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयावर नियमित पाठपुरावा करण्याचेही सूचित केले.

  • cattle trafficking Maharashtra Telangana border । मोठी तस्करी उधळली! सीमावर्ती भागात चंद्रपूर गुन्हे शाखेचा सर्जिकल स्ट्राइक

    cattle trafficking Maharashtra Telangana border

    cattle trafficking Maharashtra Telangana border : चंद्रपूर – चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने गो तस्करांविरुद्ध मोठी कारवाई करीत तब्बल ५३ गोवंशीय जनावरांसहित १७ पीकअप वाहने, २४ आरोपी सहित एकूण १ कोटी ५२ लक्ष ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई महाराष्ट्र-तेलंगाणा सीमेवरील चिखली खुर्द तपासणी नाक्यावर करण्यात आली.

    महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेमुळे ३० कामगारांना मिळाला न्याय

    मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यात गो तस्कर सक्रिय आहे, चंद्रपूरातून विविध मार्गाचा उपयोग करीत गोवंश जनावरे कत्तलीसाठी तेलंगाणा राज्यात नेण्यात येतात, मात्र यंदा स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे गो सत्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. Chandrapur cow smuggling news update

    ७ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने चिखली खुर्द नाक्यावर सापळा रचत नाकेबंदी केली, यावेळी अनेक वाहने संशयास्पद वाटली असता पोलिसांनी प्रत्येक वाहनांची झडती घेतली असता पोलिसांना एकूण १७ पीकअप वाहनात ५३ गोवंशीय जनावरे आढळून आली, सदर सर्व जनावरे हे कत्तलीसाठी तेलंगाणा राज्यात नेण्यात येत होती अशी माहिती पुढे आली.

    ५३ गोवंशाना अत्यन्त क्रूरपणे हात पाय व तोंड बांधून क्षमतेपेक्षा जास्त संख्येत वाहनात कोंबण्यात आले होते.

    पोलिसांनी यावेळी २४ आरोपीना अटक केली असून पुढील तपास टेकमांडवा पोलीस करीत आहे. अटकेतील आरोपीमध्ये १ आरोपी तेलंगणा राज्यातील असून उर्वरित २३ आरोपी हे चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील आहे. Major Police Action Against Cow Smugglers

    हे आहेत आरोपी

    २५ वर्षीय सचिन देवानंद नरोटे राहणार धानोरा, जिल्हा आदिलाबाद, तेलंगाणा, कृष्णा राम सुरवर, अलीम लतीफ सैय्यद, नितीन राजेंद्र नरोटे, माधव बजरंग पेंदीलवार, दिगंबर मारोती रुंजे, नंदकिशोर रावसाहेब ऐतवाड, देवराव उत्तम ताम्बरे, गोवर्धन किसन चव्हाण, विनोद किसन राठोड, दीपक रामनाथ नरोटे, अभिषेक प्रेमदास पवार, माधव गोबिंद पवार, उत्तम किसन राठोड, गोविंद प्रकाश पोले, अशोक अंकुश धुळगुंडे, विठ्ठल गोविंद मामीडवाड, विनायक रावसाहेब ऐतवाड, दानिश रसूल शेख, संतोष रामा थोरात, अजहर शाबीर शेख, प्रवीण किसन जाधव, अंकुश मारोती नरोटे, संतोष गुणाजी नरोटे, इंदल गणेश पवार.

    सदरची यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल कचोरी यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि जगन्नाथ मडावी, स्वामीदास चालेकर, किशोर वैरागडे, गणेश भोयर, अजय बागेसार, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, चेतन गज्जलवार, जयसिंग, सुरेंद्र महतो, गणेश मोहुर्ले, प्रमोद कोटनाके, नितेश महात्मे, मिलिंद जांभुळे, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, प्रफुल्ल गारघाटे, प्रदीप मडावी, रवींद्र पंधरे, राहुल बनकर, सूरज अवथरे व मिलिंद टेकाम यांनी केली.

  • Maharashtra Navnirman Kamgar Sena । “30 कामगार पुन्हा कामावर! मनसे कामगार सेनेचा मोठा विजय”

    Maharashtra Navnirman Kamgar Sena

    Maharashtra Navnirman Kamgar Sena : चंद्रपूर :-जिल्ह्याच्या उद्योगात स्थानिक मराठी कामगारांना मोठया प्रमाणात कंपनी व्यवस्थापनाकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असून जर कुणी मराठी कामगार आपल्या हक्कासाठी लढायला पुढे आला की त्याला कुठलीही नोटीस किंव्हा सूचना न देता कंपनी गेटच्या आत येण्यास मनाई केली जाते असाच प्रकार डालमिया कंपनीत घडला.

    ग्रामीण भागातील विविध प्रकल्पाना जिल्हाधिकारी गौडा यांची भेट

    सुरुवातीला कंपनीने तीन कामगारांना कामावरून कमी केले कारण त्या तीन कामगारांना यासाठी कामावरून कमी केले की तें महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात मनसेच्या यूनियन मध्ये दाखल झाले, या दरम्यान तब्बल 30 कामगारांना कामावरून कमी केल्याने मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी केंद्रीय जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे तक्रार केली मात्र कंपनी व्यवस्थापन मानायला तयार नव्हते.

    कामगारांनी मानले मनसेचे आभार

    शेवटी दिनांक 7 जुलै ला कंपनी चे अधिकारी आणि मनसे पदाधिकारी यांची कामगारांसह आयुक्ताकडे बैठक झाल्यानंतर कंपनी मधून काढून टाकलेले 30 कामगार उद्यापासून कामावर घेण्याचा निर्णय झाल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला. workers reinstated after legal battle

    या वेळी मनसे कामगार सेनेकडून अँड कल्याण कुमार यांनी बाजू मांडली तर त्यांचे सोबत मनसे विधी विभाग जिल्हाध्यक्ष अँड अजित पांडे यांनी कामगारांच्या मुळ मागण्या संदर्भात पक्षाची भूमिका मांडली, यावेळी मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांचे सह मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष सुनील गुढे व डालमिया कंपनीच्या चिअर इंडिया या कंत्राटी कंपनीचे कामगार मोठ्या संख्येने उपास्थित होते, दरम्यान कामगारांच्या प्रमुख मागण्या संदर्भात लवकरच केंद्रीय सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात निर्णय लागेल असे सांगण्यात आले आहें.

  • medical college drug supply issue । “शासकीय हॉस्पिटलमधील औषध खरेदीचा काळा खेळ – जोरगेवारांचा सभागृहात स्फोटक सवाल!”

    medical college drug supply issue

    medical college drug supply issue : चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील औषधांच्या तुटवड्याचा गंभीर मुद्दा आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात ठामपणे उपस्थित केला. रुग्णालय प्रशासनाकडून औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगितले जाते, मात्र डॉक्टर रुग्णांना बाहेरून औषध आणायला लावत असल्याचा आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी केला असून, (why do doctors ask to buy medicine outside)औषधांचा लाभ रुग्णांपर्यंत पोहोचत नसेल, तर खरेदीचा उपयोग काय, असा प्रश्न त्यांनी अधिवेशनात बोलताना उपस्थित केला आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट, अति मुसळधार पावसाची शक्यता

    मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार सातत्याने चंद्रपूर मतदारसंघातील विविध विषयांकडे मंत्री यांचे लक्ष वेधत आहेत. परिणामी नझूल धारकांना कायमस्वरूपी पट्टे वाटप करण्याचा निर्णय आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी लवकरच बैठक लावण्याचा शब्द संबंधित मंत्री यांनी दिला आहे. तर आज अधिवेशनात बोलताना त्यांनी शासकीय रुग्णालयातील प्रकाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे.

    यावेळी बोलताना ते म्हणाले की, सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना औषध खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात रुग्णांना आवश्यक असलेली औषधे मिळत नसल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींना सातत्याने प्राप्त होत आहेत. हॉस्पिटलमध्ये औषधांचा साठा असूनही रुग्णांना बाहेरून औषध घेण्यास सांगितले जाते. परिणामी, गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी अधिवेशनात बोलताना विचारले की, शासनाच्या खर्चाने खरेदी केलेली औषधे जर रुग्णांपर्यंत पोहोचत नसतील, तर त्या औषध खरेदी यंत्रणेचा उपयोग तरी काय ? (problems in government hospital medicine supply) केवळ कागदोपत्री उपलब्धता दाखवून चालणार नाही. रुग्णांच्या हाती औषध पोहोचणं गरजेचं आहे. त्यांनी या संपूर्ण व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रुग्णांच्या हितासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली.

    तसेच राज्यभरातील औषध व फर्निचर खरेदी प्रक्रियेबाबतही आमदार जोरगेवार यांनी गंभीर आरोप केले आहे. ज्याने निधी आणला त्याच्या मर्जीतल्या कंत्राटदारालाच काम देण्याचा काहींचा आग्रह असतो परिणामी काही ठराविक पुरवठादारच सातत्याने टेंडर प्रक्रियेत सहभागी होतात आणि सगळी खरेदी त्यांच्याकडेच जाते. या प्रक्रियेत पारदर्शकता नाही, स्पर्धकांना संधी नाही, असा आरोप करत त्यांनी औषध खरेदीसाठी स्वतंत्र आणि पारदर्शक नियमावली तयार करून कोणत्याही ‘रॅकेट’ला प्रोत्साहन न मिळता योग्य स्पर्धा आणि दर्जेदार पुरवठा सुनिश्चित होईल, असे नियोजन करण्याची मागणी आरोग्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

    वारकऱ्यांच्या सेवेत दुर्लक्ष नको, अपघात रोखण्यासाठी उपाय योजना करा – आ. किशोर जोरगेवार

    आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर वारीसाठी पायी निघणाऱ्या लाखो वारकर्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आज आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी सरकारचे लक्ष या समस्येकडे वेधले. pandharpur wari route safety issues

      दरवर्षी मोठ्या श्रद्धेने लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी प्रवास करतात. मात्र रस्त्यांवरील अपुर्या सुरक्षाव्यवस्थेमुळे दरवर्षी अनेक अपघात घडतात आणि त्यातून दुर्दैवी जीवितहानी होते. अशाच एका दुःखद घटनेत चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी स्व. आकाश कोंडलकर यांचा अपघाती मृत्यू झाला होता. अशा घटना केवळ एका व्यक्तीचा जीव जातो म्हणून मर्यादित राहत नाहीत, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. how to prevent accidents during wari

      वारकर्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची सरकारकडे जोरदार मागणी करताना ते म्हणाले कि,, वारकर्यांची ही पवित्र परंपरा अखंड राहावी, त्यांची सेवा हे आपले कर्तव्य आहे. म्हणून अपघात टाळण्यासाठी प्रभावी व्यवस्था उभी करण्याची जबाबदारी शासनाने गांभीर्याने स्वीकारावी. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस आणि परिणामकारक उपाययोजना करावी, अशी ठाम मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सभागृहात केली.

  • chandrapur orange alert heavy rain warning । चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची तुफान शक्यता! प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना!

    chandrapur orange alert heavy rain warning

    chandrapur orange alert heavy rain warning : चंद्रपूर – नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 6 जुलै ते 8 जुलै , 2025 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्‍या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविली आहे.

    खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी.

    • संरक्षणात्‍मक कपडे घाला आणि घरात आश्रय घ्‍या.
    • मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्‍या आणि दरवाज्‍यापासून दुर रहा.
    • रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते अशा भागातुन जाणे टाळा .
    • खराब दृश्‍यमानतेमुळे मुसळधार पाऊसात वाहने चालवणे टाळा.
    • पॉवर लाईन्‍स किंवा विजेच्‍या तारांपासून दुर रहा.
    • फ्लॅश पुर चेतावणी किंवा विजेच्‍या तारोपासून दुर रहा. heavy rain alert chandrapur

    ७ ऑगस्टला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे १० वे राष्ट्रीय अधिवेशन गोव्यात


    वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना : काय करावे आणि काय करु नये
    • विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा.
    • जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
    • आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.
    • तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. what to do during lightning and thunderstorms


    • आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका.
    • शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.
    • विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.


    • उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.
    • धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.
    • जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

    जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क आणि सुरक्षित राहण्याचे व मुसळधार पावसामुळे नदी नाले किंवा पुलावरून पाणी ओसंडून वाहत असेल तर ते ओलांडू नये उचित काळजी घ्‍यावी असे आवाहन जिल्हाधिकारी श्री विनय गौडा जी सी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत करण्‍यात आलेला आहे.

  • national obc federation 10th convention 2025 । राजकीय आरक्षण, जातनिहाय जनगणना आणि OBC मंत्रालय, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे १० वे अधिवेशन

    national obc federation 10th convention 2025

    national obc federation 10th convention 2025 in goa : (गोवा) राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दहावे महाअधिवेशन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इन्डोअर स्टेडीयम, गोवा युनिव्हर्सिटी जवळ, सांताक्रुज, गोवा. येथे ७ ऑगस्ट २०२५ रोजी होत आहे. गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांना अधिवेशनाचे निमंत्रण दिले आहे , बाकीच्या केंद्र व राज्याच्या प्रमुख पाहुण्यांना अधिवेशनास निमंत्रित करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध मागण्या मंजूर करुन घेण्या साठी ७ ऑगस्ट ला राष्ट्रीय ओबीसी महासंघ अधिवेशन घेत असते.

    १०० विद्यार्थ्यांना मिळणार मोफत जेईई चे प्रशिक्षण

    केंद्र सरकारने तात्काळ जात निहाय जनगणना करावी.आरक्षणाची मर्यादा ५० टक्के वरून हटविण्यात यावी व लोकसंखेच्या प्रमाणात आरक्षण देण्यांत यावे.ओबीसींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात बजेटचे वाटप करून स्वतंत्र केंद्रीय ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी. स्वातंत्र्य, समता, बंधुता, आदर आणि प्रतिष्ठेसह सामाजिक आर्थिक राजकीय न्याय मिळवण्यासाठी भारतीय राज्यघटनेचे रक्षण, जतन आणि खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्यात यावी.

    दिनांक ४ मार्च २०२१ च्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आलेले ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थामधील राजकीय आरक्षण पूर्ववत सुरु करण्याकरिता संविधानाच्या (obc political reservation under 243 d and 243 t amendment) कलम २४३ D (६) व कलम २४३ T (६) मध्ये सुधारणा करून देशातील ओबीसीना लोकसंखेच्या प्रमाणात २७ % राजकीय आरक्षण लागू करण्यात यावे.१३ सप्टेंबर २०१७ पासून क्रिमी लेयरची मर्यादा वाढलेली नाही. ओबीसी समाजाला लावण्यात आलेली क्रीमिलीयरची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी व ती रद्द होईपर्यंत क्रीमिलीयरची मर्यादा २० लाख करण्यात यावी. प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर ओबीसी मुली आणि मुलांसाठी आवश्यकतेप्रमाणे स्वतंत्र वसतिगृहे स्थापन करण्यात यावी.

    ओबीसी समाजाला लोकसभा व विधानसभेत राजकीय आरक्षण लागू करण्यात यावे व लोकसभा आणि विधानसभेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघ स्थापन करण्यात यावे. (bharat ratna for phule couple obc federation appeal) महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्कार बहाल करण्यात यावा.ओबीसी प्रवर्गातील शेतकरी आणि शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन योजना लागू करण्यात याव्यात. केंद्र व राज्य सरकारी कार्यालयातील ओबीसी संवर्गातील रिक्त पदांचा अनुशेष भरण्यासाठी स्वतंत्ररीत्या मोहीम राबवून त्वरित रिक्त पदे भरण्यात यावी व त्यासाठी सक्तीचा कायदा करण्यात यावा. ओबीसी प्रवर्गाचा अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामध्ये समावेष करण्यात यावा ओबीसी समाजातील शेतकऱ्यांना वनहक्क पट्ट्यासाठी तीन पिढ्यांची अट रद्द करण्यात यावी.

    कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र बजेट आणि स्मार्टगाव योजना


    कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र बजेट आणि स्मार्टगाव योजना लागू करण्यात यावी.केंद्र सरकारने वार्षिक अंदाजपत्र तयार करतांना एस.सी., एस.टी. प्रमाणे ओबीसी प्रवर्गाकरिता लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात यावी.
    ओबीसी, एस सी, एस टी साठी आरक्षण विधेयक पारित करून घटनेच्या ९ व्या अनुसूची मध्ये समाविष्ट करण्यात यावे.

    गोवा राज्यातील सबंधित ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या

    ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे. (obc independent ministry demand central government) शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाची कडक अंमलबजावणी करावी.सरकारी नोकरभरतीत ओबीसी आरक्षणाचे योग्य प्रमाण राखावे.राजकीय आरक्षणाला घटनादुरुस्ती करून स्थैर्य द्यावे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहांची उभारणी करावी. ओबीसींसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना लागू करावी. व्यावसायिक शिक्षणासाठी ओबीसींना आर्थिक साहाय्य योजना सुरू करावी. goa obc convention agenda and guest list 2025


    ओबीसींच्या आर्थिक सर्वेक्षणासाठी आयोग नेमावा. ओबीसी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी मोफत सुविधा. शेती व्यवसायात ओबीसी शेतकऱ्यांसाठी विशेष योजना लागू करावी.ओबीसी समाजासाठी सामूहिक सभागृहाची उभारणी करावी ओबीसींसाठी वैद्यकीय व आरोग्य योजना.मागासवर्गीय मुला-मुलींसाठी विवाह प्रोत्साहन योजना लागू करावी.


    वरील सर्व मागण्याकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दहावे महाअधिवेशन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इन्डोअर स्टेडीयम, गोवा युनिव्हर्सिटी जवळ, सांताक्रुज, गोवा. येथे ७ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न होणार आहे.
    या महाअधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेस द्वारे डॉ बबनराव तायवाडे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ राष्ट्रीय , महासचिव सचिन राजुरकर गोवा राज्याचे अध्यक्ष मधु नाईक महासचिव सर्वेश बंदोडकर, उपाध्यक्ष नोनू नाईक,गुरुदास सवाल ,प्रसाद नागवेकर,बेनी झेवियर ,नौभत वैद्य यांनी केले आहे.

  • ashok uike tribal welfare strategy review । धरती आबा ते पीएम जनमन – पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांची धोरणं आदिवासी समाजाला देणार नवा उजाळा!

    ashok uike tribal welfare strategy review

    ashok uike tribal welfare strategy review : चंद्रपूर, दि. 6 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय सुधारणा मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिका-यांचासुध्दा सन्मान केला. tribal welfare schemes review by guardian minister

    जिल्हाधिकारी गौडा यांची विविध प्रकल्पाना भेट

    नियोजन भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त विपीन पालिवाल, अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे, उपसंचालक आनंद रेड्डी, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, श्री. लाटकर आदी उपस्थित होते.


    यावेळी पालकमंत्री डॉ. श्री. उईके म्हणाले, आदिम जमातीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी.एम. जनमन आणि धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत विविध शासकीय विभागामार्फत आदिवासींना एकत्रितपणे योजनांचा लाभ देण्यात येत आहे. यात घरकुल, वनपट्टे, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, आयुष्मान कार्ड, रेशन कार्ड, विद्युत जोडणी, जात प्रमाणपत्र, जॉब कार्ड, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, सातबारा, पीएम किसान, उत्पन्न दाखला, जनधन खाते आदींचा समावेश आहे.

    धरती आबा अभियान प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा

    चंद्रपूर जिल्ह्यात 18 टक्के लोकसंख्या आदिवासींची असून दोन प्रकल्प कार्यालय आहेत. जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूरची टीम मन लावून काम करीत आहे. धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून 17 विभागाच्या 25 सेवा देण्यात येत आहे. धरती आबा अभियान प्रत्येक घरापर्यंत पोहचले पाहिजे. (dharti aba gram utkarsh abhiyan scheme details) यापुढेही आदिवासी समाजाला काय अपेक्षित आहे, त्यानुसारच योजना राबविली जाईल. आदिवासींना लाभ खरच मिळाला की नाही, याची प्रकल्प अधिका-यांनी शहानिशा करावी. योजनेमध्ये गैरप्रकार होऊ देऊ नका, गरजवंतांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुक्ष्म नियेाजन करावे.


    प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत 12360 लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात आला आहे. या अभियानात जिल्ह्यातील 167 गावांचा समावेश असून चंद्रपूर प्रकल्प कार्यालय अंतर्गत 115 गावे तर चिमूर प्रकल्प कार्यालयअंतर्गत 52 गावांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 87 गावांमध्ये धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाचे शिबीर घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

    उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिका-यांचा सन्मान

    : राज्य शासनाच्या 100 दिवस प्रशासकीय सुधारणा मोहिमेत उत्कृष्ट कार्य करून राज्यात अव्वल स्थान प्राप्त करणारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचा पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबतच नागपूर विभागात जिल्ह्यातील 19 शासकीय कार्यालयांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संबंधित अधिका-यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यात प्रथम क्रमांक प्राप्त करणारे जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नाकर नलावडे, सा.बां. उपअभियंता (मूल) राजेश चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी (नागभीड) प्रफुल गव्हारे, तहसीलदार (नागभीड) प्रताप वाघमारे, तालुका वैद्यकीय अधिकारी (नागभीड) डॉ. विनोद मडावी, पशुधन विकास अधिकारी (वरोरा) डॉ. सतिश अघडते. (awards to best performing officers in 100 day reform drive)


    द्वितीय क्रमांक प्राप्त करणारे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडे, जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख भुषण मोहिते, उपविभागीय अधिकारी (ब्रम्हपूरी) पर्वणी पाटील, महावितरण उपअभियंता (मुल) चंदन चौरसिया, उपजिल्हा रुग्णालय (ब्रम्हपूरी) डॉ. प्रितम खंडाळे, तालुका कृषी अधिकारी (कोरपना) गोविंद ठाकूर, बालसंरक्षण अधिकारी (मूल) आर्यन लोणारे, नगर परिषद मुख्याधिकारी (नागभीड) राहुल कंकाळ यांचा समावेश होता.

  • district collector field visit various projects । अंगणवाडीतील दर्जा, आश्रमशाळेतील भोजन, आणि सांडपाण्याच्या योजनांवर जिल्हाधिकाऱ्यांचा पॉवरफुल फोकस!

    district collector field visit various projects

    district collector field visit various projects : चंद्रपूर – क्षेत्रीय भेटीअंतर्गत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी नागभीड तालुक्यातील विविध प्रकल्पांना भेट देऊन पाहणी केली व संबंधितांना सुचनाही केल्या. यावेळी ब्रम्हपुरीच्या उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तहसीलदार प्रताप वाघमारे, गटविकास अधिकारी स्नेहल लाड, बालविकास प्रकल्प़ अधिकारी शिला गेडाम, मुख्याधिकारी सोनम देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी विनोद मडावी, डॉ. आखाडे आदी उपस्थित होते.

    चंद्रपुरात सुरु झाला चांदा ज्योती सुपर १०० कार्यक्रम


    यावेळी जिल्हाधिका-यांनी तळोधी येथील अंगणवाडी, कचरा विलगीकरण केंद्र, पळसगाव खुर्द येथील तलाठी कार्यालय बांधकाम, चिंधीचक येथील मुलींची शासकीय आश्रमशाळा (निवासी), नवेगाव पांडव येथील स्मार्ट पीएचसी बांधकामास भेट, मानव विकास अंतर्गत प्राप्त निधीतून गांडुळ खत प्रकल्प, नवखळा पाणी पुरवठा योजना सोलर प्रकल्प आदी प्रकल्पांना भेट दिली.


    तळोधी येथील अंगणवाडीला भेट दिल्यावर जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, वेळेवर लसीकरण पूर्ण करावे तसेच आहाराचा दर्जा व परिमाण राखावे. दोन अंगणवाडी एकत्र भरत असल्यामुळे एक अंगणवाडी त्वरीत नवीन इमारतीत स्थलांतरित करा. येथील घनकचरा व्यस्थापन प्रकल्प़ लवकरात लवकर कार्यान्वीत करावा. या प्रकल्पाबाबत त्यांनी महिलांशी संवाद साधला. पळसगाव येथील तलाठी कार्यालय बांधकाम वेळेत व दर्जेदार स्वरुपात करावे व बांधकामास तारेचे कुंपन करून घ्यावे. (anganwadi building construction status nagbhid)

    distric collector gowda visit

    भोजनाचा दर्जा उत्तम ठेवा

    जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी चिंधीचक येथील मुलींच्या शासकीय आश्रमशाळा नविन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. सदर बांधकाम जवळपास पूर्णत्वास असून ते त्वरीत हस्तांतरीत करून घ्यावे. यावेळी त्यांनी शाळेतील मुलांशी वर्गात संवाद साधून शिक्षणाचा दर्जा तपासला. तसेच भोजनाचा दर्जा उत्तम ठेवण्याच्या सुचना दिल्या. नवेगाव पांडव येथील स्मार्ट पीएचसी मध्ये पाण्याची गळती होणार नाही, याची दक्षता घ्यावी. (tribal girls government hostel school visit)


    नविन बांधकामामुळे खोल्यांची अंतर्गत उंची कमी होणार नाही याबाबत दक्षता बाळगावी. नागभीड नवखळा पाणी पुरवठा सोलर प्रकल्पाला जिल्हाधिका-यांनी भेट देऊन पाहणी केली. सदर प्रकल्प लवकर सुरळीत संचलित होईल, याबाबत सर्व यंत्रणानी समन्वय साधावा, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
    या भेटीदरम्यान सरपंच, उपसरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी,पोलीस पाटील आदी उपस्थित होते.

  • chanda jyoti super 100 free coaching program | चंद्रपूरमध्ये सुरु झाला Super 100 कोचिंग प्रोग्राम – IIT/JEE ची तयारी आता मोफत!

    chanda jyoti super 100 free coaching program

    chanda jyoti super 100 free coaching program : चंद्रपूर, दि. 6 जुलै (News३४) : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे राहून जातात. यावर तोडगा काढण्यासाठी तसेच हुशार विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ‘चांदा – ज्योती सुपर 100’ अभ्यासिकेचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अभ्यासिकेच्या माध्यमातून आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग मिळणार आहे. free residential coaching for competitive exams

    चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत एकहाती सत्ता स्थापन करणार

    राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते या अभ्यासिकेचे उद्घाटन शनिवारी (दि.5) करण्यात आले. शहरातील ज्युबली हायस्कुलच्या परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. मनपा आयुक्त विपीन पालीवाल, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, शिक्षणाधिकारी राजेश पाताळे, अश्विनी सोनवणे, उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख आदी उपस्थित होते.


    ग्रामीण विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी जिल्हा परिषदेने अतिशय चांगला आणि नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, इयत्ता 11 वीचे 50 आणि इयत्ता 12 वीचे 50 असे एकूण 100 विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीचे मार्गदर्शन मिळणार आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवण्याची सोयसुध्दा जिल्हा परिषदेमार्फत मोफत आहे. या उपक्रमाचा फायदा नक्कीच जिल्ह्यातील होतकरू आणि मेहनती विद्यार्थ्यांना होईल.

    शिफारसीने विद्यार्थ्यांना अजिबात प्रवेश देऊ नका


    आज या अभ्यासिकेचे उद्घाटन झाले असले तरी, येथील विद्यार्थी पुढील वर्षीच्या जेईई – सीईटी परिक्षेत उल्लेखनीय कामगिरी करतील तेव्हा खरे सार्थक होईल. 100 विद्यार्थ्यांची निवड करताना अतिशय काटेकोरपणे करा. चाचणी परिक्षेद्वारेच निवड व्हावी, कोणाच्याही शिफारसीने विद्यार्थ्यांना अजिबात प्रवेश देऊ नका. या अभ्यासिकेसाठी ग्रामाीण भागातील हुशार आणि चांगले विद्यार्थी निवडले गेले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत केवळ एकच उद्दिष्ट न ठेवता जेईई – सीईटी प्रमाणेच इतरही स्पर्धा परिक्षेचे मोफत मार्गदर्शनसुध्दा या अभ्यासिकेतून मिळण्यासाठी नियोजन करावे, अशा सुचनाही पालकमंत्री डॉ. उईके यांनी दिल्या. district council free jee cet classes for village students

    free residential coaching for competitive exams


    तत्पुर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते अभ्यासिकेच्या परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी फित कापून अभ्यासिकेचे उद्घाटन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी केले. यावेळी विद्यार्थी व इतर पालक उपस्थित होते.

    या मिळणार सुविधा :

    ग्रामीण विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची दिशा ठरविण्यासाठी ‘चांदा – ज्योती सुपर 100’ या अभ्यासिकेमध्ये दर्जेदार कोचिंग व मार्गदर्शन, निवासी व जेवणाची मोफत सोय, अभ्यास साहित्य, समुपदेशन व टेस्ट सिरीज, क्षेत्रभेटी व प्रेरणादायी संवाद