Tag: MH34

  • student dies in river while swimming । 🛑 “१५ वर्षीय विद्यार्थ्याचा चिमढा नदीत बुडून मृत्यू – पावसाळ्यातील आनंद ठरला जीवघेणा!”

    student dies in river while swimming

    student dies in river while swimming : सावली – २८ जुलै २०२५]: सावली तालुक्यातील चिमढा नदीत बुडून सोहम प्रमोद मोहूर्ले (वय १५) या शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी सुट्टी असल्याने मित्रांसोबत फिरायला गेलेल्या सोहमचा नदीत आंघोळीसाठी उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. ही घटना सावलीतील प्रभाग क्रमांक ९ मध्ये घडली असून, सोमवारी सायंकाळी त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    राजुरा शहरात पुन्हा तलवार जप्त, दोन दिवसात दोन कारवाई

    मिळालेल्या माहितीनुसार, सोहम मोहूर्ले, जो इयत्ता दहावीत शिकत होता, रविवारी कुटुंबीय घरी नसताना आपल्या मित्रांसोगट फिरायला गेला होता. फिरत असताना वाटेत चिमढा नदीवरील बंधारा पाहण्याची त्याला इच्छा झाली. बंधाऱ्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू असताना सोहमला पोहण्याचा मोह आवरता आला नाही. सोबत असलेले मित्र लहान असल्याने त्याला रोखू शकले नाहीत. पोहण्याच्या इच्छेने त्याने पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो प्रवाहात वाहून गेला.

    ही घटना सोहमच्या मित्रांच्या डोळ्यासमोरच घडली, परंतु भीतीपोटी त्यांनी तातडीने घरच्यांना किंवा पोलिसांना माहिती दिली नाही. रात्री उशीरपर्यंत सोहम घरी परत न आल्याने घरच्या मंडळींची चिंता वाढली. त्यांनी शोधाशोध सुरू केली असता, मित्रांकडून सत्य परिस्थिती समोर आली. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

    माहिती मिळताच पोलीस विभाग आणि आपत्कालीन मदत विभागाने तातडीने शोधमोहीम राबवली. अखेर, दुसऱ्या दिवशी, म्हणजेच सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास, घटनास्थळापासून काही अंतरावर सोहमचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण सावली तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

    Somayya institute of technology

    पोलिसांचे आवाहन

    सावली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर सावली पोलिसांनी नागरिकांना वाहत्या पाण्यापासून सावध राहण्याचे आणि विशेषतः पावसाळ्यात नद्यांमध्ये न उतरण्याचे आवाहन केले आहे. पालकांनी आपल्या मुलांना अशा धोक्याच्या ठिकाणी जाण्यापासून रोखावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. police advisory for monsoon water safety

  • Gondwana University carry on policy update । 📢 “गोंडवाना विद्यापीठात ‘कॅरी ऑन’ धोरणावर चर्चा, सिनेट सदस्यांचा आग्रह

    Gondwana University carry on policy update

    Gondwana University carry on policy update : चंद्रपूर – गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत सलग्नित महाविद्यालयात शिकणाऱ्या बी. ए. ,बी एस सी, बी कॉम इत्यादी अभ्यासक्रमातील अनेक विद्यार्थी मागील सत्रामध्ये काही विषयात नापास झालेत. नवीन शैक्षणिक धोरण मागील सत्रापासून लागू केले आहे. त्यामुळे सुरुवातीला अनेक दिवस त्याचा अभ्यासक्रमांचा सिलॅबस व अभ्यास साहित्य उपलब्ध होऊ न शकल्यामुळे निकालामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. academic year loss due to new education policy

    चंद्रपुरात अमृता फडणवीस यांच्या हस्ते भव्य रुद्राभिषेक

    मात्र याचा फटका विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश घेताना बसत आहे. अनेक विद्यार्थी अंतिम वर्षाच्या प्रवेशापासून वंचित राहणार आहे. काही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे व प्रा. डॉ. दिलीप चौधरी यांच्याशी संपर्क साधून सदर बाब लक्षात आणून दिली.

    विद्यार्थ्यांचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन दोन्ही सिनेट सदस्यांनी तत्काळ गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याशी संपर्क साधला व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विशेष बाब म्हणून यावर्षी सगळ्या विद्यार्थ्यांना सरसकट कॅरी ऑन लागू करावे अशा पद्धतीची विनंती केली.

    तोडगा निघणार

    कुलगुरूंनी सकारात्मक निर्णय घेऊ, सदरचा निर्णय हा अकॅडमिक कौन्सिलच्या अंतर्गत येत असल्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या अकॅडमी कौन्सिलच्या बैठकीमध्ये सदर विषय ठेवून त्यावर निश्चितपणे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने काहीतरी तोडगा काढू असे आश्वासित केलेले आहे.

    Somayya institute of technology

    त्यामुळे येणाऱ्या अकॅडमी कौन्सिलच्या बैठकीत विद्यार्थ्यांना कॅरी ऑन लागू करून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची विद्यापीठाने काळजी घ्यावी. अशा स्वरूपाची मागणी दोन्ही सिनेट सदस्यांकडून विद्यापीठाकडे करण्यात आली आहे.

  • amruta fadnavis chandrapur visit । 💥 ५५ नद्यांचं जल, १.५५ लाख बेलपत्र! अमृता फडणवीस यांनी केला चंद्रपूरच्या शिवलिंगाचा रुद्राभिषेक!

    amruta fadnavis chandrapur visit

    amruta fadnavis chandrapur visit : चंद्रपूर – देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाच्या निमित्ताने आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून पहिल्या श्रावण सोमवारी आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यातील सर्वात मोठ्या प्राचीन शिवलिंगाचा जलाभिषेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ५५ नद्यांचे पवित्र जल आणि १ लाख ५५ हजार बेलपत्र अर्पण करण्यात आले. या भव्य धार्मिक कार्यक्रमाला हजारो भाविकांची उपस्थिती लाभली. आमदार किशोर जोरगेवार आणि त्यांच्या पत्नी तथा माजी मंत्री शोभा फडणवीस यांची यावेळी उपस्थिती होती. ही एक जागृत देवस्थान असल्याची अनुभूती झाल्याचे अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

    आधारकार्ड मध्ये अनेक चुका, खासदार धानोरकर यांचा अधिवेशनात प्रश्न

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह साजरा करण्यात येत असून, त्याअंतर्गत ३५५ हून अधिक विविध सेवाभावी उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून भिवापूर वॉर्डातील प्राचीन आणि राज्यातील सर्वात मोठ्या शिवलिंगाच्या रुद्राभिषेकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी राज्यातील तसेच राज्याबाहेरील नामवंत पंडितांना आमंत्रित करण्यात आले होते. 55 rivers water abhishek ritual

    amruta fadnavis chandrapur visit 2025

    दरम्यान, या कार्यक्रमासाठी अमृता फडणवीस आज चंद्रपुरात दाखल झाल्या. सायंकाळी चार वाजता त्या कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. कावड घेऊन त्या शिवलिंगाजवळ आल्या आणि राज्यभरातून आणलेल्या ५५ नद्यांच्या पवित्र जलाने व १ लाख ५५ हजार बेलपत्रांनी शिवलिंगाचे जलाभिषेक केले. त्यानंतर त्यांनी शिवलिंगाची आरती केली.

    यावेळी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, “चंद्रपूर ही विविध रूपातील सौंदर्याने नटलेली नगरी आहे. हे सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे. त्याचा विकास व्हायला हवा. मी वर्षातून किमान दोनदा तरी चंद्रपूरला भेट देईन, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांनी महामृत्युंजय मंत्राचे पठण केले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचे कौतुक केले.

    अमृता फडणवीस यांच्या हस्ते सायकल वाटप व चित्रप्रदर्शनाचे निरीक्षण

    देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहानिमित्त २०५५ विद्यार्थिनींना सायकली वाटप करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ आज अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या ‘राजमाता निवासस्थान’ येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी ५५ विद्यार्थिनींना सायकली वाटप करून या उपक्रमाचा प्रारंभ केला.

    Somayya institute of technology

    तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचीही त्यांनी पाहणी केली.

  • illegal weapon seizure by Rajura police । 📢 शहरात दहशतीच्या उद्देशाने बाळगली तलवार! राजुरा पोलिसांकडून कारवाई

    illegal weapon seizure by Rajura police

    illegal weapon seizure by Rajura police :चंद्रपूर / राजुरा – जिल्ह्यातील राजुरा शहरात तलवार बाळगणाऱ्यावर पोलीस कारवाई सत्र राबवित असून २७ जुलै रोजी गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रेल्वे वसाहत समोरील परिसर, सोनिया नगर मध्ये तलवार सहित एकाला अटक करण्यात आली.

    दुचाकी वाहनांचा लिलाव

    २ दिवसात राजुरा पोलिसांनी दोन जणांवर अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्यावर कारवाई केली आहे, ४२ वर्षीय पवन किरण वनकर राहणार आंबेडकर वॉर्ड याला ताब्यात घेत त्याचे जवळून ८६ सेंटीमीटर लांबीची धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. आरोपीवर भारतीय हत्यार कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

    दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

    जिल्ह्यात गुन्हेगारी वृत्ती मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, गुन्हे करण्याच्या उद्देशाने आधीच अवैध शस्त्र स्वतःजवळ बाळगून गुन्हेगार दहशत निर्माणक करण्याचे काम करीत आहे, मात्र पोलिसांच्या सतर्कतेने गुन्हा घडण्यापूर्वी आरोपी व शस्त्र जप्त करण्याचे कसोशीने प्रयत्न केले जात आहे.

    Somayya institute of technology

    सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात पोउपनि भीष्मराज सोरते, पोलीस कर्मचारी किशोर तुमराम, विक्की निर्वाण, रामेश्वर चहार, शफिक शेख, महेश बांबोळे व राजीव दुबे यांनी केली.

  • how to buy scrap vehicles from police । १ लाख ८८ हजारात ३७ दुचाकी वाहने खरेदी करण्याची संधी, त्वरा करा

    how to buy scrap vehicles from police

    how to buy scrap vehicles from police : चंद्रपूर, दि. 28 : पोलिस स्टेशन माजरी, येथे बरेच कालावधीपासुन जमा असलेली जंगम मालमत्तेबाबत कोणताही व्यक्ती त्याचा हक्क सांगण्याकरीता किंवा प्रस्थापित करण्यासाठी हजर न झाल्याने एकूण 37 मोटार सायकल, (शासकीय किंमत 1 लक्ष 88 हजार 210 रुपये) यांचा लिलाव होणार आहे. नमुद वाहने टेंडरद्वारे जिथे आहे तिथे वाहनाचे इंजिन व चेचिस नंबर मिटवून व वाहनाची विल्हेवाट लावून भंगारमध्ये विक्री करण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छुक खरेदीदार यांच्याकडून सिलबंद टेंडर मागविण्यात आले आहे. police confiscated bike auction process

    चंद्रपुरात पुन्हा मेफेड्रोन पावडरची विक्री, दोघांना अटक

    वाहने परिक्षणाची तसेच अनामत रक्कम व नोंदणी तारीख 11 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी वाजेपर्यंत अनामत रक्कम भरावी लागेल. लिलाव 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत होईल.

    लिलावाच्या अटी व शर्ती 

    वरीलप्रमाणे नमुद केलेल्या जंगम मालमत्तेची जशी आहे तशी जिथे आहे तिथे व ज्या स्थितीत आहे, तशी विक्री केली जाईल. लिलावाच्या वेळी व ठिकाणी लिलावाबाबत तपशिलवार अटी व शर्ती वाचुन  दाखविण्यात येतील. विक्री रकमेच्या 10 टक्के रक्कमेचा (अनामत) भरणा केल्यावर लिलाव बोली बोलुन झाल्यानंतर ज्यांचे नावाने सदर वाहनाचा लिलाव मंजुर होईल, त्या खरेदीदारास उर्वरित रक्कमचा भरणा त्वरीत लिलावाच्या ठिकाणीच भरणे बंधनकारक राहील. 


    जर सदरचा भरणा त्वरीत मुदतीत केला नाही तर भरलेली 10 टक्के रक्कम कोणत्याही प्रकारची नोटीस न देता जप्त करण्यात येईल. जे खरेदीदार भंगार व्यावसायिक आहे (ज्याचे नावे भंगार व्यवसायाचे प्रमाणपत्र आहे.) तेथ विक्री रक्कमेच्या 10 टक्के रकमेचा (अनामत) भरणा करतील व फक्त त्याच खरेदीदारास विक्री बोली लिलावामध्ये प्रवेश मिळणार, त्याचप्रमाणे अनामत रक्कमेचा भरणा करतांना त्याचे प्रमाणपत्र ची आधारकार्डची झेरॉक्स प्रत्त सादर करावी लागेल.

    Somayya institute of technology

    सदर लिलावाच्या बोली/ऑफर स्विकारणे न स्विकारणे लिलाव कायम करणे, पुढे ढकलणे किंवा रद्द करणे व इतर कोणतेही कारण न देता निर्णय घेणे, हे सर्व अधिकार ठाणेदार, पोलीस स्टेशन माजरी यांचे राहतील याची नोंद घ्यावी, असे ठाणेदार अमितकुमार पांडेय यांनी कळविले आहे.

  • Aadhar card mismatch issues in schools । आधार कार्ड मध्ये अनेक चुका, खासदार धानोरकरांनी संसदेत उपस्थित केला प्रश्न

    Aadhar card mismatch issues in schools

    Aadhar card mismatch issues in schools : चंद्रपूर : खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महाराष्ट्र तसेच देशभरातील सरकारी आणि खासगी शाळांमधील नामांकित विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये आढळलेल्या विसंगती आणि अवैध आधार कार्डच्या संदर्भात शिक्षण मंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. लोकसभा सचिवालयाला सादर करण्यात आलेल्या अतारांकित प्रश्न क्रमांक-1333 च्या लेखी उत्तरात, शिक्षण मंत्रालयातील राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीची स्थिती आणि आधार तपशिलांच्या पडताळणी प्रगतीची सविस्तर माहिती दिली.  aadhaar correction process for students

    चंद्रपुरात दोघांना मेफेड्रोन पावडर सह अटक

    सरकारने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एकूण 1,84,89,092 विद्यार्थी नामांकित आहेत.  यापैकी 4,55,263 विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड उपलब्ध नाहीत , 6,80,686 विद्यार्थ्यांची आधार पडताळणी प्रलंबित आहे , आणि 2,08,903 विद्यार्थ्यांची आधार पडताळणी अयशस्वी झाली आहे, यशस्वी आधार पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1,71,44,240 असून, त्यापैकी 1,70,36,596 आधार पूर्णपणे सत्यापित आहेत.  

    सरल पोर्टलवर नोंदणी करताना झालेल्या चुका

    सरकारने नमूद केले की, पडताळणी अयशस्वी होण्याची सामान्य कारणे म्हणजे नाव, स्पेलिंग, जन्मतारीख मधील विसंगती, आधार कार्ड अद्ययावत नसणे, आधार कार्डवर जन्मतारीख नसणे, राज्याच्या सरल पोर्टलवर नोंदणी करताना झालेल्या चुका आणि लिंग विसंगती इत्यादी चुकीच्या नोंदी दिसून येत आहे.   

    शिक्षण मंत्रालयाने हे देखील स्पष्ट केले की, आधार अवैध असल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला योजना आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यापासून वंचित ठेवण्यात येणार नाही. केंद्र सरकार समग्र शिक्षा आणि पीएम-पोषण यांसारख्या केंद्र पुरस्कृत योजनांसह, प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी कटिबद्ध आहे. Ministry of Education  

    या विसंगती दूर करण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांचीही माहिती दिली. आधार कार्डमधील नवीन नोंदणी आणि दुरुस्तीचे काम ब्लॉक आणि क्लस्टर स्तरावर एक सतत प्रक्रिया आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक ब्लॉकमध्ये आधार संबंधित कामे करण्यासाठी दोन आधार किट विकसित करण्यात आले आहेत. विभाग सतत आढावा घेतो आणि राज्ये तसेच प्रकल्प मूल्यमापन मंडळ (PAB) आणि राज्यांसोबतच्या त्रैमासिक बैठकांमधून जमिनीवर येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी राज्यांना मार्गदर्शन करतो.  

    Somayya institute of technology

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सरकारच्या उत्तरावर समाधान व्यक्त केले आणि आधार संबंधित विसंगतींमुळे कोणताही विद्यार्थी शैक्षणिक किंवा आर्थिक लाभापासून वंचित राहणार नाही याची खात्री करण्याचे आवाहन केले.

  • Chandrapur drug trafficking case । चंद्रपुरात MD पावडरसह दोघांना अटक

    Chandrapur drug trafficking case

    Chandrapur drug trafficking case : चंद्रपूर – राज्य ड्रग्ज मुक्त व्हावे यासाठी पोलीस यंत्रणा सध्या विविध मोहिमा राबवित आहे, विशेषकरून चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा जिल्ह्यात होणाऱ्या अंमली पदार्थाच्या तस्करी व विक्रीवर आळा घालण्याचे प्रयत्न करीत आहे यामध्ये २७ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० ग्राम मेफेड्रोन पावडर सहित दोघांना अटक केली आहे. आरोपीजवळून तब्बल १ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    चंद्रपुरात गुन्हेगारीचा उद्रेक

    झटपट पैसे कमविण्याच्या नादात तरुणाईच्या उंबरठ्यावर असणारी मुले अंमली पदार्थाच्या तस्करीत रमून गेली आहे, या गुन्ह्यात अडकल्यावर पुढे काय यावर विचार न करणारी मुले आपलं भविष्य उध्वस्त करीत आहे. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर नियंत्रण आणण्याकरिता विविध मोहिमा राबवित आहे. या अनुषंगाने २७ जुलै रोजी गोपनीय माहितीच्या आधारे शहरात मेफेड्रोन पावडरची विक्री करणाऱ्या २ युवकांना रयतवारी कॉलोरी येथील निमवाटिका येथे सापळा रचून ताब्यात घेतले. MD powder drug case in Chandrapur

    झटपट पैसे कमविण्याच्या नादातील गुन्हेगारी

    २१ वर्षीय विशाल रत्नाकर भोयर राहणार बगड खिडकी, चंद्रपूर व २२ वर्षीय मोहम्मद फैज अब्दुल राशिद कुरेशी राहणार नुरी चौक बगड खिडकी यांच्याजवळून पोलिसांना २० ग्राम एमडी मेफेड्रोन पावडर आढळून आले. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सहित १ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी यावेळी जप्त केला.

    Somayya institute of technology

    सदरची यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, अजित शेंडे, रिषभ बारसिंगे व मिलिंद टेकाम यांनी केली.

  • Amruta Fadnavis in chandrapur । देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह, मिसेस मुख्यमंत्री चंद्रपुरात

    Amruta Fadnavis in chandrapur

    Amruta Fadnavis in chandrapur : चंद्रपूर – आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह अंतर्गत आयोजित विविध सामाजिक उपक्रमांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस उद्या (सोमवार) चंद्रपूर दौर्‍यावर येत असून, त्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

    गुन्हेगारीचा हॉटस्पॉट चंद्रपूर जिल्हा

    सायकल वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ

    दुपारी ३ वाजता सौ. फडणवीस यांचे चंद्रपूर येथे आगमन होईल. त्यानंतर त्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या कोतवाली वार्ड येथील ‘राजमाता निवास’ या निवासस्थानी भेट देतील. दुपारी ३.३० वाजता २०५५ विद्यार्थ्यांपैकी ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करून सायकल वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ‘राजमाता निवास’ येथेच होणार आहे.

    Somayya institute of technology

    दुपारी ४ वाजता सौ. फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनपटावर आधारित चित्रप्रदर्शनीची पाहणी करतील. यानंतर ४.२५ वाजता भिवापूर येथील शिवलिंग परिसरात आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिवलिंगाचे त्यांच्या हस्ते पूजन करण्यात येणार आहे. येथे एक लाख ५५ बेलपत्रे आणि ५५ नद्यांच्या पवित्र जलाने शिवलिंगाचा जलाभिषेक करण्यात येणार आहे.

  • police operations in chandrapur district । देशी कट्टा, तलवार सहित अवैध धारदार शस्त्रे जप्त, चंद्रपूर गुन्हेगारीचा नवा हॉटस्पॉट?

    police operations in chandrapur district

    police operations in chandrapur district : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा हा गुन्हेगारीचा हब बनू पाहत आहे, सध्या नवे भाई म्हणून अल्पवयीन मुले पुढे येत आहे, जिल्ह्यात घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा समावेश वाढत असून हि पोलीस विभागासाठी भविष्यात मोठी डोकेदुखी निर्माण होणार अशी शक्यता आहे. चंद्रपूर पोलीस विभागाने जिल्ह्यात देशी कट्टा, तलवार व धारदार शस्त्रे जप्त केले असून सदरची कारवाई घुग्गुस, मूल व राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली आहे.

    मूल पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेमकं काय घडलं?

    २६ जुलै रोजी रात्री ८.३० च्या सुमारास गुन्हे शोध पथकाला चंद्रपूर – मुल रोडवर, VP बियर शॉपी समोर नामे शोहेब पठाण, वय – २३ वर्षे, व एक १७ वर्षीय विधी संघर्ष बालक हे त्यांचे ताब्यातील TVS jupiter मॉपेड वाहन डिक्की मध्ये धारधार शस्त्र ठेवून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने व गंभीर दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या मिळून आले. त्यांचे विरुद्ध कलम ४,२५ Arms act, ३(५) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शोहेब पठाण यास अटक करण्यात आली आहे. youth gang violence trends

    घुग्गुस पोलीस स्टेशनच्या हद्दीत देशी कट्टा

    २६ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शास्त्रीनगर परिसरात गावठी बनावटीचा कट्टा सह एक जिवंत काडतूस जप्त केले. या धाडीत २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. घुग्गुस मधील वार्ड क्रमांक ५ शास्त्रीनगर मध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माहितीच्या आधारे कारवाई केली. या कारवाईत २८ वर्षीय सोनूलाल उर्फ नन्नू कैथल या युवकांकडून देशी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. Chandrapur Police Are Seizing Illegal Arms

    चंद्रपूर पोलिसांनी युवकाला केली अमानुष मारहाण, गंभीर आरोप

    सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, रजनीकांत पुठ्ठावार, सतीश अवथरे, दीपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे व हिरालाल गुप्ता यांनी केली.

    राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रेल्वे वसाहत समोरील परिसरात सोनिया नगर मध्ये १९ वर्षीय युवकांकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. आरोपीवर राजुरा पोलिसांनी भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    Somayya institute of technology

    चुनाभट्टी वॉर्ड राजुरा मध्ये राहणारा १९ वर्षीय अकिब नासिर खान या युवकाने स्वतःजवळ ८१ सेंटीमीटर लांबी ची लोखंडी तळावर ठेवली होती, मात्र काही गुन्हा घडण्यापूर्वी राजुरा पोलिसांनी छापामार कारवाई करीत तलवार जप्त केली. illegal weapons seizure

    सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात पोउपनि भीष्मराज सोरते, पोलीस कर्मचारी किशोर तुमराम, विक्की निर्वाण, रामेश्वर चहारे, शफिक शेख, महेश बोलगोडवार, शरद राठोड, आनंद मोरे, बालाजी यामलवार, अविनाश बांबोळे व राजीव दुबे यांनी केली.

  • compensation increase for coal mine farmers । ✅ “OBC आयोग पुढे सरसावलं! शेतकऱ्यांना न्याय मिळणार?”

    compensation increase for coal mine farmers

    compensation increase for coal mine farmers : चंद्रपूर : वेकोलि बल्लारपूर क्षेत्र अंतर्गत, बल्लारपूर नॉर्थ वेस्ट खुली खदान प्रकल्पातील मागास व अन्य प्रवर्गातील शेतकऱ्यांनी दि. 27 जुलै रोजी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांची प्रत्यक्ष भेट घेवून या प्रकल्पासाठी मिळणारा प्रति एकर आर्थिक मोबदल्यामध्ये दरवाढ मिळवून देण्याविषयी चर्चा केली यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

    जिल्हा भाजपा सचिव मधुकर नरड, पूर्व जिल्हाध्यक्ष किसान आघाडी राजु घरोटे, कोलगाव उपसरपंच पुरूषोत्तम लांडे यांचे नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी हंसराज अहीर यांना या आशयाचे निवेदन सादर केले. आर/आर पॉलिसी नुसार मिळणाऱ्या नोकरी सोबतच प्रति एकरी दरवाढ देण्याविषयी कोल इंडियाने तत्वतः मान्य केले असल्याने ही दरवाढ लवकरात लवकर मिळवून देवू असा निर्धार हंसराज अहीर यांनी उपस्थित शेतकऱ्यांसमोर व्यक्त केला.

    युवकाला अमानुष मारहाण, चंद्रपूर पोलिसांवर गंभीर आरोप

    अहीर यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासित केले की, नोकरी व शेतीला दरवृध्दी प्राप्त करून घेणे हा आपला न्याय अधिकार आहे. सन 2012 मध्ये कोल इंडिया व राज्य शासनाच्या धोरणानुसार कोरडवाहू प्रति एकर जमिनीस रू. 8 लाख व सिंचीत प्रति एकर जमिनीकरिता रू. 10 लाख दरवाढ लागु करण्यात आली होती. farmer land compensation policy Maharashtra

    दरवाढ होणार

    परंतु, जमिनीचे विद्यमान बाजारमुल्य आणि आजचे सरकारी दराच्या तुलनेत वेकोलिद्वारा आजघडीला मिळणारे हे दर अत्यल्प असल्याची भुमिका कोल इंडियाचे अध्यक्ष श्री. पी. मल्लिकार्जूना प्रसाद यांच्या तसेच वेकोलि मुख्यालय, नागपुर यांचे वरिष्ठा प्रबंधनाच्या उपस्थितीत दि. 10 जुलै 2025 रोजी कोलकाता येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाद्वारे दरवाढीचा हा मुद्दा आग्रही स्वरूपात मांडण्यात आला असल्याचे हंसराज अहीर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले. सदर दरवृध्दीबाबत कोल इंडिया प्रबंधनाने सकारात्मक भुमिका स्विकारत ओबीसी आयोगाद्वारे मांडण्यात आलेली भुमिका व्यावहारीक असल्याने ही मागणी तत्वतः मान्य केली असल्याचेही अहीर यांनी यावेळी सांगितले. farm land rate revision coal India project

    Somayya institute of technology

    हा निर्णय कोल इंडियाद्वारे लवकरात लवकर जाहीर व्हावा यासाठी आपण वारंवार पाठपुरावा करीत असल्याचे तसेच ज्या प्रकल्पांचे दर निश्चितीचे करारनामे झालेले नाही त्या प्रकल्पांना ही होणारी दरवाढ लागू राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अहीर यांनी सांगितले. दर निश्चितीच्या करारनाम्यापुर्वी प्रकल्प धारकांनी द्यावयाच्या कौटूंबिक शपथपत्रात असलेला वर्ष 2012 च्या शासन धोरणानुसार, दर मान्य असल्याचा अनावश्यक उल्लेख वगळण्यासाठी वेकोलि प्रबंधनास सुचना व पाठपुरावा करणार असल्याचे सुध्दा अहीर यांनी सांगितले.

    शेकडो शेतकऱ्यांच्या जिवीताला निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेता, कोलगाव येथील उर्वरित 337 हेक्टर जमीन अधिग्रहण व गावाचे पुनर्वसन याविषयासाठी आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीलात तसेच या दरवृध्दीसाठी आमच्या पाठीशी उभे राहावे असा आशावाद उपस्थित शेतकऱ्यांनी अहीर यांचेशी संवाद साधतांना व्यक्त केला.