Tag: MH34

  • police solve aluminium wire theft case । 🚨 २४ तासांत अल्युमिनियम तार चोरी उघडकीस – भिसी पोलिसांनी दाखवली तत्परता

    police solve aluminium wire theft case

    police solve aluminium wire theft case : भिसी ३० ऑगस्ट २०२५ – १७ विजेच्या खांबावर विजेची अल्युमिनियम तार लावणायचे काम जांभूळगाव ते खापरी या गावजवळ समीक्षा अँड डिम्पल इलेकट्रीकल कंपनी चामोर्शी च्या वतीने सुरु होते, यासाठी कंपनीने अल्युमिनियम तार मार्गावर ठेवण्यात आला होता. मात्र २७ ऑगस्ट रोजी तार चोरी गेल्याची तक्रार कंपनीचे सुपरवायझर नितेश गव्हारे यांनी भिसी पोलिसात दिली. पोलिसांनी जलद तपास करीत २४ तासांच्या आत आरोपीना अटक करीत तार जप्त केली.

    चंद्रपूर मनपाची डेंगू तपासणी मोहीम

    जांभूळगाव ते खापरी मार्गावरील विजेची लाईन टाकण्याचे काम सुरु आहे, यासाठी कंपनीने तार आणून ठेवली होती मात्र अज्ञातांनी सदर तार चोरी केली, याबाबत भिसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली. तक्रार प्राप्त झाल्यावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. यावेळी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली, माहितीच्या आधारे पोलिसांनी जांभुळघाट गावातील २१ वर्षीय आनंद गुलाब नेवारे व २४ वर्षीय मंगेश नीलकंठ बोरकर यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी सदर अल्युमिनियम तार चोरी केल्याची कबुली दिली. aluminium wire theft

    ७ आरोपी अटकेत

    तसेच सदर चोरी करण्यासाठी जांभूळगावातील २३ वर्षीय क्रिष्णा रमेश मीटपल्लीवार याने मदत केली, व चोरीचा माल २२ वर्षीय रोशन अण्णाजी हजारे, १९ वर्षीय कुणाल गणेश हजारे यांना विकला व चोरीचा माल हा २६ वर्षीय सागर अण्णाजी हजारे, २१ वर्षीय विजय नंदकिशोर भेंडवाल यांच्या सहकार्याने कुणाल हजारे याने चारचाकी वाहनाने घेऊन जात जांभूळगाव ते खापरी रोडवरील झुडपात लपवून ठेवला.

    भिसी पोलिसांनी यावेळी चारचाकी वाहन क्रमांक एमएच ३४ बीजी ९४९७, अल्युमिनियम तार असा एकूण ६ लाखांचा मुद्देमाल सह ७ आरोपीना २४ तासांच्या आत अटक केली. suspect arrests for aluminium wire theft

    सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात सपोनि मंगेश भोंगाळे, पोउपनि रवींद्र वाघ, पोउपनि भारत थिटे, पोलीस कर्मचारी अजय बगडे, सतीश झिलपे, श्रीकांत वाढई, रेखलाल पटले व वैभव गोहणे यांनी केली.

  • MNS gaining strength in Chandrapur । भाजप-शिवसेना-काँग्रेसला आव्हान : चंद्रपूरात मनसेचा झपाट्याने विस्तार

    MNS gaining strength in Chandrapur

    MNS gaining strength in Chandrapur : चंद्रपूर ३० ऑगस्ट २०२५| तालुक्यातील चोरगाव येथे २९ ऑगस्ट २५ शिवसेना (उबाठा) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गावातील माजी सरपंच सुलोचना कोकाडे आणि प्रतीक चिकाटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) मध्ये औपचारिक प्रवेश करून स्थानिक राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले आहेत. हा पक्षप्रवेश सोहळा प्रतीक चिकाटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला असून, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेत कोकाडे यांनी राजसाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त करत मनसेच्या झेंड्याखाली येण्याचा निर्णय घेतला.

    पोंभुर्णा मध्ये रास्त धान्याचा काळाबाजार, युवासेनेने उचलला आवाज

    गावपातळीवर राजकीय सत्ता आणि पक्षीय निष्ठा यांचे बदलते चित्र हा प्रवेश अधोरेखित करतो. सुलोचना कोकाडे आणि प्रतीक चिकाटे यांचा राजकीय प्रवास ग्रामपंचायतीपासून सुरू झाला होता. स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करताना त्यांनी जनतेशी घट्ट नाळ जोडली होती. त्यामुळे त्यांचा पक्षांतर हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून, त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांमध्ये आणि गावकऱ्यांमध्येही त्याचे परिणाम उमटणार हे निश्चित आहे. Aman Andhewar MNS leadership

    या प्रवेश सोहळ्याला मनसेच्या विविध आघाड्यांतील अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहित सेना जिल्हाध्यक्ष रमेश काळबांडे, जिल्हाध्यक्ष सुनील गुढे, रोजगार व स्वयम रोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, जनहित सेना तालुका सचिव राजू लांडगे, शहर अध्यक्षा वर्षा बोंबले यांच्यासह राकेश जवादे, अमन तुळ व विशाल भसारकर या कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली. या उपस्थितीने कोकाडे यांच्या प्रवेशाला औपचारिक मान्यता तर मिळालीच, पण मनसेच्या संघटनात्मक ताकदीचेही प्रदर्शन झाले.

    राजकीयदृष्ट्या चंद्रपूर जिल्हा हा नेहमीच वेगवेगळ्या पक्षांसाठी प्रयोगशाळा ठरला आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे संघर्षग्रस्त क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या या भागात मनसेला स्थिरावणे कठीण ठरत होते. मात्र गेल्या काही महिन्यांत स्थानिक पातळीवरील नेतृत्वाची चढती कामगिरी, राजसाहेब ठाकरे यांचे प्रभावी भाषणशैली आणि मराठी अस्मितेवर आधारित राजकारण यामुळे मनसेला ग्रामीण भागात थोड्याफार प्रमाणात आशेची किनार दिसू लागली आहे. कोकाडे आणि चिकाटे यांचा प्रवेश हा या बदलत्या समीकरणाला आणखी चालना देणारा टप्पा ठरू शकतो. sarpanch switches party Shiv Sena to MNS

    राजसाहेब ठाकरे यांच्या दूरदृष्टीवर आमचा विश्वास

    सुलोचना कोकाडे यांनी या प्रवेशावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “राजसाहेब ठाकरे यांच्या दूरदृष्टीवर आमचा विश्वास आहे. स्थानिक जनतेच्या प्रश्नांवर नेमकेपणाने आवाज उठवणारा पक्ष म्हणजे मनसे. गावपातळीवरील प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही मनसेच्या बळावर काम करू.” त्यांच्या या भूमिकेतून शिवसेनेबद्दल असलेली नाराजी आणि नवीन राजकीय जागा शोधण्याची गरज प्रकर्षाने दिसून येते.

    राजकारणात सरपंच स्तरावरील बदल अनेकदा मोठे परिणाम घडवतात. कारण अशा नेतृत्वावर स्थानिक पातळीवरील सामान्य नागरिकांचा विश्वास असतो. कोकाडे यांनी मनसेत प्रवेश घेतल्यामुळे चोरगाव परिसरातील पक्षीय स्थितीवर थेट परिणाम होणार असून, आगामी ग्रामपंचायत व विधानसभा निवडणुकांमध्ये हा प्रवेश शिवसेना आणि भाजपसाठी आव्हानात्मक ठरू शकतो.

    मनसे जिल्हा नेतृत्वाने हा प्रवेश स्वागतार्ह ठरवत “ही फक्त सुरुवात आहे” असे संकेत दिले आहेत. कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी यावेळी सांगितले की, “मनसेला ग्रामपातळीवर बळकट करण्याचा आमचा संकल्प आहे. कोकाडे यांसारखे नेतृत्व पक्षात आल्याने चोरगावसह संपूर्ण तालुक्यात मनसेची ताकद वाढेल.” MNS leadership impact Chandrapur politics

    आगामी निवडणुकीत मनसे निर्णायक

    या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय गणिते अधिक गुंतागुंतीची होणार हे निश्चित आहे. एका बाजूला भाजप-काँग्रेसच्या पारंपरिक लढती, दुसऱ्या बाजूला शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणि आता मनसेची झपाट्याने वाढणारी उपस्थिती – या सर्व घडामोडी येणाऱ्या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. MNS gaining strength in Chandrapur

    सौ. सुलोचना कोकाडे आणि प्रतीक चिकाटे यांचा मनसे प्रवेश हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून, ग्रामीण राजकारणाच्या बदलत्या स्वरूपाचे प्रतीक मानला जात आहे. गावकुसातील जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून मनसेची संघटनात्मक चळवळ उभी राहिली, तर हा प्रवेश स्थानिक पातळीवर क्रांतिकारी ठरू शकतो.

  • corruption in ration shop Pombhurna । गरीबांच्या अन्नावर डाका – पोंभुर्णा धान्य घोटाळा प्रकरणात युवासेनेची कारवाईची मागणी

    corruption in ration shop Pombhurna

    corruption in ration shop Pombhurna : पोंभुर्णा – पोंभुर्णा शहर व तालुक्यातील शासनमान्य धान्य दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात धान्याचा काळाबाजार सुरू असून, सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्य सर्रासपणे खासगी व्यापाऱ्यांना व ट्रकमधून बाहेर जिल्ह्यात विकले जात असल्याची गंभीर तक्रार युवा सेना शहरप्रमुख महेश प्रकाश श्रीगिरीवार यांनी पोंभूर्णा तहसीलदार यांचेकडे केली आहे.

    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची चंद्रपुरात पडताळणी सुरु

    सरकारी स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे स्वस्त धान्य गरीब व गरजू जनते च्या घरी न पोहोचता दलाल व व्यापाऱ्यांच्या खिशात जात असल्याने हजारो कुटुंबे स्वस्त धान्यापासून वंचित राहत आहेत. शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या योजनेला हा उघडपणे लुटण्याचा प्रकार ठरत असून, प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पोंभूर्णा युवा सेनेकडून करण्यात आला आहे. black marketing of subsidised food grain

    महत्वाच्या मागण्या :-

    • १) धान्य घोटाळ्यातील सर्व संबंधित दोषी दुकानदार, लाभार्थी व व्यापाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी.
      २) गोडावून व दुकानांची चौकशी करून साठवलेले धान्य तात्काळ जप्त करावे.
      ३) धान्य वाहून नेणारे ट्रक व इतर वाहनांवर कारवाई करून त्यातील माल जप्त करावा.
      ४) हा घोटाळा मोठ्या प्रमाणावर असून, यामध्ये उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी.

    युवा सेनेचा इशारा :-

    जर ७ दिवसांच्या आत प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही, तर युवा सेना पोंभुर्णा तर्फे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील. ” गरीब आणि सामान्य जनतेच्या हक्काचे धान्य लुटणाऱ्या भ्रष्ट यंत्रणेचा आम्ही कडाडून विरोध करू. पोटभर अन्न मिळावे हा जनतेचा हक्क असून, त्या हक्कासाठी युवा सेना रस्त्यावर लढा देईल.” yuvasena ubt

    निवेदन देतांना युवासेना शहरप्रमुख महेश श्रीगिरीवार यांचेसोबत कृषभ बुरांडे, सुरज कावळे व युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.

  • dengue household inspection results । मनपाची डेंग्यू तपासणी मोहीम, चंद्रपुरात किती घरे डेंग्यूने दूषित? जाणून घ्या

    dengue household inspection results

    dengue household inspection results : चंद्रपूर 29 ऑगस्ट २०२५ – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे डेंग्यू व इतर कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी राबविल्या जाणाऱ्या घरांच्या तपासणी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात शहरातील 2 टक्के घरे दुषित आढळुन आली,पहिल्या टप्यात 5 टक्के दुषित घरे आढळल्यानंतर मनपातर्फे मोहीम तीव्र करण्यात आल्याने दूषित घरांची संख्या कमी झाली आहे.

     मनपा कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी रुग्णालयांद्वारे डेंग्यू व इतर कीटकजन्य आजार रुग्णांचा दैनंदिन अहवाल मनपाकडे पाठविला जात असुन,त्यानुसार जुलै महिन्यापासुन शहरात आतापर्यंत टायफाईडचे 12,चिकनगुनियाचे 2 तर डेंग्यूचे 12 रुग्ण आढळले आहेत.मागील काही वर्षांच्या तुलनेत कीटकजन्य आजार रुग्णांच्या संख्येत यावर्षी लक्षणीय घट असुन हे सर्व रुग्ण आता रोगमुक्त आहेत.  

    गडचिरोली मधील लड्डू दत्तक संस्थेत काम करण्याची सुवर्णसंधी

     कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी मनपातर्फे डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविली जात असुन 28 ब्रिडींग चेकर्स,32 एएनएम, 22 एमपीडब्लु,170 आशा वर्कर व स्वच्छता निरीक्षक पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. ब्रिडींग चेकर्सद्वारा अधिकाधिक घरांची दररोज तपासणी केली जात असुन प्रत्येक घरामध्ये सतर्कता बाळगण्याचा इशारा दिला जात आहे. dengue cases drop after intensified inspection drive

     पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात. या उगमस्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करणे व नागरीकांना सचेत करणे यासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु करण्यात आली असुन नागरीकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहु नये यांची काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.  

    डेंग्युची लक्षणे –

    डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यूताप व डेंग्यू रक्तस्रावी ताप हे मुख्य आजार आहेत. ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या खोबणीमधे दुखणे, पाठदुखी, डोकेदुखी, स्नायूमध्ये वेदना, सांधेदुखी ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. वस्तुतः डेंग्यू हा सामान्य आजार आहे परंतु या रोगाबाबत माहिती नसल्याने किंवा अपुरी माहिती असल्याने काही वेळा तो जीवघेणा ठरू शकतो. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

    डेंग्यु टाळण्यास उपाययोजना –

    डेंग्यु डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो त्यामुळे आपल्या घराची तपासणी करावी . पाणी साठवण्याची भांडी कोरडी करणे,डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाकणे, पाणी साठा मोठा असले तर त्यात गप्पी मासे टाकणे आवश्यक आहे. गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी संपवितात ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो. आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा.

  • special adoption agency job openings । 🎓 Counsellor व Caretaker पदांसाठी Special Adoption Agency मध्ये जागा

    special adoption agency job openings

    special adoption agency job openings : गडचिरोली (२९ ऑगस्ट २०२५) : महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त (अनुदानित) अनुज्ञाप्ती क्रमांक : GAD-2/SAA/2024/486 असलेल्या लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था ब्रम्हपुरी संचालित लड्डू विशेष दत्तक संस्था, गडचिरोली येथे तात्काळ काही रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.

    मेरी डिग्री मेरा अभियान, कांग्रेसचे अनोखे आंदोलन

    या भरतीअंतर्गत खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत –

    🔹 उपलब्ध रिक्त पदे

    1️⃣ समुपदेशक (Counsellor)

    • शैक्षणिक पात्रता : BSW किंवा मानसशास्त्र विषयातील पदवीधर
    • पदसंख्या : 1

    2️⃣ आया (Care Taker)

    • शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण
    • अनुभव : किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक
    • पदसंख्या : 1

    📞 संपर्कासाठी माहिती

    इच्छुक उमेदवारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा :
    अधीक्षक, लड्डू विशेष दत्तक संस्था, गडचिरोली
    मोबाईल : 8879699138 / 9422181114

    या भरतीमुळे समाजसेवेची आवड असलेल्या आणि पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना गडचिरोलीत थेट कामाची संधी उपलब्ध होणार आहे.

  • Meri Degree Mera Abhiman । 🏛️ डिग्री लपवू नका, अभिमान बाळगा – काँग्रेसचे आंदोलन चर्चेत

    Meri Degree Mera Abhiman

    Meri Degree Mera Abhiman : चंद्रपूर : (२९ ऑगस्ट २०२५) – शिक्षण आणि डिग्री ही व्यक्तीच्या ओळखीची शान आहे, हे अधोरेखित करण्यासाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गिरणार चौक येथे ‘मेरी डिग्री, मेरा अभिमान’ या अनोख्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या डिग्री हातात घेऊन घोषणाबाजी करत शिक्षणाचा सन्मान करण्याचा संदेश दिला.

    चंद्रपुरात भीषण अपघात, ६ जण ठार

    आपल्या शिक्षणाबद्दल अभिमान बाळगावा

    जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी सांगितले की, आज देशात स्वतःची डिग्री लपविण्याची प्रवृत्ती वाढत आहे, जी सुशिक्षितांमध्ये नैराश्य निर्माण करणारी आहे. या पार्श्वभूमीवर, आपल्या शिक्षणाबद्दल अभिमान बाळगावा आणि उच्चशिक्षितांना राजकारणात व समाजात योग्य सन्मान मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

    या आंदोलनात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शिवा राव, वरिष्ठ नेते के. के. सिंग, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर, अनिरुद्ध वनकर, रामकृष्ण कोंड्रा, शिरीष गोगुलवार, अख्तर सिद्धिकी, नौशाद शेख, रमिश शेख आणि इतर सुशिक्षित कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


  • responsive governance Adi Karmayogi Abhiyan । 🌍 ‘आदि कर्मयोगी अभियान’ : 2047 पर्यंत विकसीत भारतासाठी क्रांतिकारी पाऊल

    responsive governance Adi Karmayogi Abhiyan

    responsive governance Adi Karmayogi Abhiyan : चंद्रपूर, दि. २९ ऑगस्ट २०२५ : सन 2047 पर्यंत विकसीत भारत घडविण्यासाठी, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवा व लोककेंद्रीत विकासाची पुर्तता होणे आवश्यक आहे. त्यासाठीच प्रतिक्रियाशील सुशासन कार्यक्रमाचा भाग म्हणून केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयाने ‘आदि कर्मयोगी अभियान’ सुरू केले आहे. या अभियानात चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहावा, यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य समन्वयातून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले.

    चंद्रपुरात भीषण अपघात ६ ठार

    एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरच्या वतीने नियोजन सभागृह येथे आयोजित तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, ‘आदि कर्मयोगी अभियान’ हे केंद्र शासनाचे अतिशय महत्वाकांक्षी अभियान आहे. या अंतर्गत मास्टर ट्रेनर तयार करून तसेच लोकांचा सहभाग घेऊन प्रत्येक आदिवासी गावातील समस्यांची मांडणी असलेले डॉक्युमेंट तयार केले जाईल. जेणेकरून ‘विकसित भारत – 2047’ च्या व्हीजन डॉक्युमेंटमध्ये त्याचा समावेश करता येईल. त्यासाठी राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि ग्रामस्तरावर तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. Adi Karmayogi capacity building tribal change leaders

    योजनांचे एकत्रिकरण करून व्हीजन डॉक्युमेंट होणार तयार

    या अभियानात 1. पीएम जनमन योजना, 2. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, 3. राष्ट्रीय सिकलसेल उच्चाटन मोहीम आणि 4. एकलव्य निवासी शाळांचा विस्तार आणि शिष्यवृत्ती या व इतर योजनांचे एकत्रिकरण करून व्हीजन डॉक्युमेंट तयार करावयाचे आहे. मुख्य म्हणजे यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांची मुख्य जबाबदारी राहणार आहे. केंद्र आणि राज्य स्तरावरून या अभियानाचा नियमित पाठपुरावा सुरू असून 2 ऑक्टोबर 2025 च्या ग्रामसभेत हा आराखडा मंजूर करून घ्यावयाचा आहे. त्यामुळे यात प्रत्येक यंत्रणेचा सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी योग्य समन्वय व सुक्ष्म नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या. Adi Sewa Kendra tribal service centres scheme 

    प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानात चंद्रपूर जिल्ह्यातील 167 गावे तर पीएम जनमन योजनेत 68 गावांचा समावेशा आहे. आदिवासी गावांमध्ये आरोग्य, शिक्षण, पोषण, रोजगार, पाण्याची उपलब्धता करणे आाणि शासनाशी संपर्क ठेवण्यासाठी ‘आदि कर्मयोगी अभियान’ सुरू करण्यात आले आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. कार्यशाळेला सर्व विभागांचे प्रमुख, जिल्हास्तरीय तज्ज्ञ प्रशिक्षक, गटविकास अधिकारी, नोडल अधिकारी आदी उपस्थित होते. 20 lakh change leaders Adi Karmayogi mission

    ‘आदि कर्मयोगी अभियानाबाबत माहिती’

    आदिवासी भागात तळागाळातील शासन व सेवा वितरणामध्ये आमुलाग्र परिवर्तन घडविणे, आदिवासी समुदायांना सशक्त करण्यासाठी प्रतिक्रियाशील सुशासन कार्यक्रमांतर्गत नेत्यांचे कॅडर निर्माण करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. सेवा, समर्पण आणि संकल्प या तत्वावर हे अभियान राबविले जाणार असून आदिवासी भागांमध्ये प्रतिसादक्षम शासन आणि शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहचवली जाईल. भारतामध्ये 10.5 कोटी आदिवासी नागरीक आहेत, जे 30 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये राहतात. या आदिवासी समुदायांच्या सक्षमीकरणासाठी संपूर्ण भारतात 20 लक्ष परिवर्तनशील नेत्यांचे मिशन आधारीत कॅडर निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

  • highway accident auto truck Marathi news | चंद्रपुरात मोठा अपघात, 6 ठार

    highway accident auto truck Marathi news

    highway accident auto truck Marathi news : राजुरा: (28 ऑगस्ट 2025) राजुरा – गडचांदूर – मार्गावरील कापनगाव जवळ राजुरा येथून पाचगाव कडे जाणा-या एका ॲटोला विरूध्द दिशेने येणा-या हायवा ट्रक ने जबर धडक दिली. या घटनेत ६ प्रवाशी ठार झाले असून एका गंभीर प्रवाश्याला चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

    छोटा मटका जेरबंद

    तर एकावर राजुरा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ वाजता ही दुर्देवी दुर्घटना घडली.

    ऑटो चालक संभ्रमात आणि

    राजुरा येथुन पाचगाव कडे ॲटो चालक व सात प्रवाशी ॲटो ने जात होते. राजुरा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर महामार्गाचे काम सुरू आहे. आज एकाएकी येथे काम करण्यासाठी रस्ता वाहतुकीत बदल करण्यात आला. मात्र याविषयी कसलेही फलक लावले नव्हते. यामुळे ॲटो चालक संभ्रमात पडला आणि हायवे वर ॲटो घेतल्यानंतर हायवा ट्रक ने ॲटोला भिषण धडक दिली. truck collision Rajura Maharashtra

    ही टक्कर एवढी भिषण होती की संपुर्ण ॲटोचा चुराडा झाला. यावेळी तिन प्रवाशी जागीच ठार झाले. तिन जखमींना चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात रेफर केल्यानंतर रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.

    या दुर्घटनेत रवींद्र हरी बोबडे, वय ४८, राहणार पाचगाव, शंकर कारू पिपरे, वय ५०, राहणार कोची, सौ. वर्षा बंडू मांदळे, वय ४१, राहणार खामोना, तनु सुभाष पिंपळकर, वय १८, राहणार पाचगाव, ताराबाई नानाजी पापुलवार, वय 60 वर्ष, राहणार पाचगाव आणि ऑटो चालक प्रकाश मेश्राम, वय ५० वर्ष, राहणार पाचगाव या सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. याव्यतिरिक्त चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात निर्मला रावजी झाडे, वय ५० वर्षे, पाचगाव यांना चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात रेफर करण्यात आले असून भोजराज महादेव कोडापे, वय ४० वर्षे, भुुरकुंडा यांचे वर राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Rajura accident service road auto truck collision

    राजुरा पोलिसांनी याची दखल घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले आणि ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ट्रकचालक अद्याप फरार आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे . ठाणेदार सुमित परतेकी पुढील तपास करीत आहेत.

  • Chota Matka Tiger |छोटा मटका वाघ TTC उपचार केंद्रात दाखल

    Chota Matka Tiger

    Chota Matka Tiger : (28 ऑगस्ट 2025)चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील (बफर) गंभीर जखमी वाघ T-126 ला यशस्वीरित्या जेरबंद करण्यात आले आहे. खडसंगी वनपरिक्षेत्रातील कंपार्टमेंट क्र. ५१ मध्ये ही बचाव मोहीम राबवण्यात आली. वाघाला पुढील उपचारांसाठी चंद्रपूर येथील ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC) मध्ये हलवण्यात आले आहे.

    कोरपना तहसील कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण, दारू दुकानाविरुद्ध एल्गार

    वाघाच्या झुंजीत सीएम जखमी

    १२ मे, २०२५ रोजी ताडोबातील खडसंगी बफर परिक्षेत्रात T-126 आणि T-158 या दोन वाघांमध्ये जोरदार संघर्ष झाला होता. या लढाईत T-158 वाघाचा मृत्यू झाला, तर T-126 गंभीर जखमी झाला होता.

    राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) आणि तांत्रिक समितीच्या शिफारशीनुसार, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी T-126 वाघाला जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. मानवी-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आणि अनुचित घटना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

    वनसंरक्षक आणि क्षेत्र संचालक श्री प्रभू नाथ शुक्ल आणि उपसंचालक (बफर) श्री आनंद रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या शीघ्र कृती दलाने (RRT) सहायक वनसंरक्षक श्री. अनिरुद्ध ढगे यांच्या देखरेखीखाली ही बचाव मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान वाघाला कमीत कमी इजा होईल याची पूर्ण काळजी घेण्यात आली.

    profile picture
  • how to apply for a credit card । 💳 क्रेडिट कार्ड म्हणजे काय? संपूर्ण मार्गदर्शन

    how to apply for a credit card

    how to apply for a credit card : ३४ माहिती सेवा (२८ ऑगस्ट २०२५) -आजच्या डिजिटल युगात क्रेडिट कार्ड ही केवळ पेमेंट करण्याची सुविधा नसून आर्थिक सुरक्षितता आणि तातडीच्या गरजांमध्ये मदतीचा मोठा आधार आहे. योग्य वापर केला तर क्रेडिट कार्डमुळे तुमची क्रेडिट हिस्टरी (CIBIL Score) सुधारते, ज्यामुळे भविष्यात कर्ज घेणे सोपे होते.

    गृहकर्ज कसे घ्यायचे? जाणून घ्या पूर्ण माहिती


    🔹 क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

    क्रेडिट कार्ड हे बँक किंवा वित्तीय संस्थेकडून दिले जाणारे असे कार्ड आहे ज्यामध्ये तुम्ही ठराविक मर्यादेपर्यंत (Credit Limit) बँकेकडून पैसे उधार घेऊन खरेदी, बिल पेमेंट किंवा ऑनलाइन व्यवहार करू शकता. नंतर ठराविक कालावधीत (Billing Cycle) ती रक्कम परतफेड करावी लागते.


    🔹 क्रेडिट कार्डचे प्रकार

    1. स्टॅंडर्ड क्रेडिट कार्ड – दैनंदिन खरेदीसाठी
    2. रिवॉर्ड्स क्रेडिट कार्ड – खरेदीवर पॉइंट्स किंवा रिवॉर्ड्स मिळतात
    3. कॅशबॅक क्रेडिट कार्ड – खर्चावर ठराविक टक्केवारीने कॅशबॅक मिळतो
    4. ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड – फ्लाइट्स, हॉटेल बुकिंग, ट्रॅव्हल रिवॉर्ड्ससाठी फायदेशीर
    5. बिझनेस क्रेडिट कार्ड – व्यवसायिकांसाठी विशेष सुविधा
    6. सिक्योर्ड क्रेडिट कार्ड – फिक्स्ड डिपॉझिटवर आधारित, कमी CIBIL असणाऱ्यांसाठी

    🔹 क्रेडिट कार्डचे फायदे

    • कॅशलेस व्यवहार – रोख रक्कम बाळगण्याची गरज नाही
    • इमर्जन्सी मदत – अचानक खर्चासाठी सोपी सुविधा
    • रिवॉर्ड्स व कॅशबॅक – खरेदीवर अतिरिक्त फायदा
    • क्रेडिट स्कोअर सुधारणा – वेळेवर हप्ता भरल्यास कर्ज मिळणे सोपे
    • ऑनलाइन शॉपिंग व बिल पेमेंट्स सोपे credit card benefits

    🔹 क्रेडिट कार्ड वापरताना घ्यावयाची काळजी

    • खर्च आपल्या उत्पन्नानुसारच करा
    • Minimum Payment करून थांबू नका, पूर्ण रक्कम भरा
    • वेळेवर बिल भरावे, अन्यथा जास्त व्याज व दंड लागू शकतो
    • वारंवार कॅश विथड्रॉल टाळा – त्यावर जास्त शुल्क लागू होतं
    • क्रेडिट लिमिटचा 30-40% पेक्षा जास्त वापर करू नये

    🔹 क्रेडिट कार्डचे तोटे (जर योग्य वापर केला नाही तर)

    • जास्त व्याजदरामुळे कर्जाचा बोजा
    • उशिरा पेमेंटमुळे CIBIL Score खराब होतो
    • जास्त खर्चाची सवय लागू शकते
    • वार्षिक फी, हिडन चार्जेसचा फटका credit card interest rates

    🔹 क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता

    • वय 21 ते 60 वर्षे
    • नियमित उत्पन्नाचा पुरावा (Salary Slip/ITR)
    • चांगला CIBIL Score (700 पेक्षा जास्त)
    • आवश्यक कागदपत्रे: आधारकार्ड, पॅनकार्ड, पत्ता पुरावा, बँक स्टेटमेंट

    ✨ निष्कर्ष

    क्रेडिट कार्ड हा उत्तम आर्थिक साधन आहे, पण त्याचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे. वेळेवर बिल भरल्यास आणि मर्यादित खर्च केल्यास ते तुमच्या भविष्यातील कर्जसुविधा व आर्थिक प्रगतीसाठी खूप फायदेशीर ठरते. अन्यथा चुकीच्या वापरामुळे कर्जाचे ओझे वाढू शकते.