Tag: MH34

  • Home Guard Recruitment : आजपासून चंद्रपुरात होमगार्ड भरती

    Home Guard Recruitment : आजपासून चंद्रपुरात होमगार्ड भरती

    Home Guard Recruitment चंद्रपूर जिल्हा होमगार्ड अंतर्गत पुरुष व महिला उमेदवारांची नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी निवड  प्रक्रिया (भरती) 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान सकाळी 4 वाजतापासून पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे होमगार्ड जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू यांच्या अध्यक्षतेखली आयोजीत करण्यांत आली आहे.

    करीअर : चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण-तरुणी होणार व्यावसायिक पायलट

    Home Guard Recruitment होमगार्डचा पदावधी कालावधी हा 3 वर्षाचा असून ही नोकरी नाही. 22 ते  24 ऑगस्ट रोजी सकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत नोंदणीकरीता येणाऱ्या उमेदवारांचाच होमगार्ड निवड  प्रक्रियेकरीता विचार केला जाईल. सकाळी 10 वाजता नंतर नोंदणीकरीता येणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेकरीता प्रवेश दिला जाणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे व धबधबे बंद

    रहिवासी भागातील पथक/ उपपथक सोडून इतर पथकात अर्ज केलेले उमेदवार कागदपत्र पडताळणी  मध्ये अपात्र ठरतील. तसेच इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील. नोंदणीबाबत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/loginl.php  या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.  22 ऑगस्ट रोजी नोंदणी क्रमांक 1 ते 6197 पर्यंत महिला उमेदवार, 23 ऑगस्ट रोजी नोंदणी क्रमांक 1 ते 2964 पर्यंत पुरुष उमेदवार 24 ऑगस्ट रोजी नोंदणी क्रमांक  2966 ते 6200 पर्यंत पुरुष उमेदवार घेण्यात येणार आहे. नवीन होमगार्ड सदस्य नोंदणीचे निकष खालील प्रमाणे असतील.

    आवश्यक कागदपत्रे : 1) शाळा सोडल्याचा दाखला मुळप्रत (बोनाफाईड ग्राहय धरले जाणार नाही.) 2) रहिवासी दाखला 3) तहसीलदार यांचे कडील राशन कार्ड  4) आधार कार्ड 5) 2 पासपोर्ट साईज फोटो.

    महिला सुरक्षा : 31 ऑगस्टला मध्यरात्री चंद्रपुरात निघणार रॅली

    उमेदवार वैद्यकीयदृष्टया पात्र असावा. पोलीस चारित्र्य अहवाल अनुकुल असावा. उमेदवार हे वेतनी सेवेत कार्यरत असतील तर  कार्यालयाचे अथवा मालकांचे संमती ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. संबंधित उमेदवारांस विहित केलेल्या वेळेत धावणे व गोळाफेक शारिरीक चाचणी देणे अनिवार्य आहे. उमेदवारांस नोंदणीचे वेळी तसेच उमेदवाराची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर  करण्यांत येईल. तसेच खेळ, आय.टी.आय., जडवाहन चालक ड्रायव्हिंग लाइसन्स, एन.सी.सी. प्रमाणपत्र इ. असल्यास सोबत आणावे. नोंदणीचे वेळी कोणतीही अपघाती घटना घडल्यास त्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. उमेदवारांना नोंदणी करीता स्व:खर्चाने यावे लागेल, असे जिल्हा समादेशक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

  • Tillu Pump : तर चंद्रपूर शहरातील टिल्लू पंप धारक जाणार काळ्या यादीत

    Tillu Pump : तर चंद्रपूर शहरातील टिल्लू पंप धारक जाणार काळ्या यादीत

    tillu pump नळावरील मीटर काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या व टिल्लु पंपद्वारे पाण्याचा गैरवापर करणाऱ्या ३ नळ जोडणीधारकांवर चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली असुन त्यांचे नळ कनेक्शन खंडीत करून दंड ठोठाविण्यात आला आहे.दंड न भरल्यास सदर नळजोडणी धारकांना काळ्या यादीत टाकल्या जाणार आहे.

    महत्त्वाचे : रास्त धान्य दुकानदारांना न्याय द्या – खासदार प्रतिभा धानोरकर

       
     Tillu pump मनपातर्फे शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक ( मीटर ) लावण्यात आले असुन जानेवारी महिन्यापासुन मीटरचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. वैद्य नगर येथील शिवकृपा फर्निचर जवळील रहिवासी किशोर विठ्ठलराव रिधे,राजेश बागेल व सुरेश नत्थुजी इंगळे यांच्याद्वारे नळ जोडणीवर लावलेले जलमापक (मीटर) काढुन टाकणे तसेच टिल्लू पंप लावुन पाण्याचा अनावश्यक उपसा केला जात असल्याचे मनपा पथकास पाहणी दरम्यान आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून जप्ती करण्यात आली आहे.  


         सर्व नळ जोडणींवर मनपाद्वारे मीटर लावण्यात आले असल्याने पाण्याचा जेवढा वापर होईल तेवढेच देयक येत असुन अनावश्यक खर्च व अनावश्यक पाण्याच्या वापरावर नियंत्रण आले आहे.मात्र काही नागरिक नळाचे देयक कमी करण्याच्या दृष्टीने मीटरला लागुन असलेला पाईप काढतात ज्यामुळे पाण्याचा वापर करतांना मीटर बंद असते व बिल अतिशय कमी येते,शिवाय टिल्लु पंप द्वारे मोठ्या प्रमाणात पाणी एकाच कनेक्शनवर ओढले जाऊन इतर नळधारकांना अतिशय कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतो.  

    अतिशय महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यातील ही पर्यटन स्थळे बंद


          त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम लक्षात घेता मनपातर्फे टिल्लू पंप लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली असुन नळावरील मीटर काढल्यास अथवा विद्युत पंप/ टिल्लू पंप लावला असल्याचे आढळल्यास मनपाच्या जप्ती पथकांद्वारे कारवाई केली जात आहे.

  • Fair grain shopkeeper : रास्त धान्य दुकानदारांना न्याय द्या – खासदार प्रतिभा धानोरकर

    Fair grain shopkeeper : रास्त धान्य दुकानदारांना न्याय द्या – खासदार प्रतिभा धानोरकर

    Fair grain shopkeeper खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्रातील अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न सुरु केला असून आज दि. 21 ऑगस्ट रोजी रास्त धान्य दुकानदारांच्या समस्यांसंदर्भात त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांची भेट घेतली.

    महत्वाची सूचना : चंद्रपूर जिल्ह्यातील ही पर्यटन स्थळे बंद

    Fair grain shopkeeper पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 कोटी नागरिकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमध्ये पाच वर्षांकरीता मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. परंतु हे धान्य ज्या दुकानदारांच्या माध्यमातून नागरीकांपर्यंत पोहचविण्यात येते त्या दुकानदारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने चंद्रपूर व यवतमाळ जिल्हयातील रास्त धान्य दुकानदार संघटनेने खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेत आपल्या समस्यांचे निवेदन दिले. यावर आपण तोडगा काढण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन संघटनेला दिले होते.

    सुरक्षा : महिला सुरक्षेसंदर्भात कठोर कायदे करा – खासदार प्रतिभा धानोरकर

    त्या समस्ये संदर्भात खासदार धानोरकर यांनी आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांची भेट घेऊन रास्त भाव दुकानदारांच्या समस्या संदर्भात चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने वाढवा आयोगाच्या शिफारशीनुसार 460 रु. प्रति क्विंटल कमीशन करणे, 4G ई-पास मशिन यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या कायमस्वरुपी सोडविणे, वरोरा तालुक्यातील दुकानदारांचे कमीशन चे पैसे तात्काळ देणे व ऑफलाईन धान्य वाटप संदर्भात सर्व मागण्यांवर मंत्री महोदयांसोबत चर्चा केली. या सर्व समस्या लवकरच सोडविणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

    खासदारपदी निवडून आल्यावर खासदार प्रतिभा धानोरकर ह्या आपल्या माध्यमातून अनेक समस्यांना वाचा फोडत न्यायासाठी थेट शासनदरबारी जात आहे, जातनिहाय जनगणना, बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल, मूर्ती विमानतळ याबाबत धानोरकर सतत पाठपुरावा करीत आहे.

  • Classification of Scheduled Castes : एससी / एसटी आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या विरोधात आज बहुजन समाज पार्टीचे आंदोलन

    Classification of Scheduled Castes : एससी / एसटी आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या विरोधात आज बहुजन समाज पार्टीचे आंदोलन

    Classification of Scheduled Castes देशभरात बुधवार दिनांक 21ऑगस्ट 2024 रोजी भारत बंदची हाक देण्यात आली असून, दलित आणि आदिवासी संघटनांनी हा बंद पुकारला आहे. भारत बंदच्या या आंदोलनामध्ये बहुजन समाज पार्टी सहभागी झाली आहे. चंद्रपूर बहुजन समाज पार्टी च्या वतीने एस सी, एस टी आरक्षण वर्गीकरण रद्द करण्याचा करीत मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे केले.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील ही पर्यटन स्थळे बंद

    SC/ST आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला होता. एससी एसटी अंतर्गत वर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिले आणि त्याविरोधातच ही भारत बंदची हाक देण्यात आली.

    Classification of Scheduled Castes देशाच्या सुप्रीम कोर्टातील सात जजेस च्या बेंचने 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जाती-जमाती चे वर्गीकरण करून त्यांना क्रिमिलियर लावणे संदर्भात निर्णय दिला. हा निर्णय भारतीय संविधानाच्या विरोधात असून असंवैधानिक आहे. त्यामुळे आपण विनाविलंब संसदेचे विशेष सत्र बोलावून हा निर्णय रद्द करावा, तसेच आरक्षणाला भारतीय संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकावे. जेणेकरून यापुढे अनुसूचित जाती-जमातीच्या संविधानिक आरक्षणाशी कोणी छेडछाड करणार नाही.

    राजकीय आंदोलन : गृहमंत्री, शिक्षणमंत्री राजीनामा दो – राष्ट्रवादी कांग्रेसचे आंदोलन

    आज देशभरात विविध संघटनाच्या माध्यमातून बंद पुकारण्यात आला, चंद्रपुरात बसपा जिल्हाध्यक्ष शिरीजकुमार गोगूलवार यांच्या नेतृत्वात शांतीपूर्व आंदोलन छेडण्यात आले. जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत देशाचे महामहिम राष्ट्रपती यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी शेकडो बसपा कार्यकर्ते उपस्थित होते.

    आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार संसदेत आरक्षणाच्या मुद्द्याला अनुसरून संसदेत सर्वपक्षीय एक विशेष बैठक बोलावून एका नव्या कायद्याची आखणी करण्यात यावी. या कायद्याला संविधानाच्या यादीमध्ये समाविष्ट करत त्याला संरक्षित करून घ्यावं. याशिवाय सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निर्णयावर पुनर्विचार करून सदर निर्णय रद्द करावा अशीही मागणी करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार एससी, एसटी आणि ओबीसींच्या संविधानिक अधिकारांना संरक्षण देण्यात यावं अशी विशेष मागणी आहे.

    महिला सुरक्षा : चंद्रपुरात महिला सुरक्षेची नागरिक घेणार शपथ


    या प्रसंगी बहुजन समाज पार्टी चे जिल्हा प्रभारी प्रशांत रामटेके, जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर साठे,
    जिल्हा संयोजिका अल्का शिंदे, चंद्रपूर विधानसभे चे सर्व पदाधिकारी, शहराचे सर्व पदाधिकारी व बहुजन समाज पक्षाचे शेकडो कार्यकर्ता उपस्थित होते..

  • chandrapur tourism : चंद्रपूर जिल्ह्यातील ही पर्यटन स्थळे बंद

    chandrapur tourism : चंद्रपूर जिल्ह्यातील ही पर्यटन स्थळे बंद

    chandrapur tourism जिल्ह्यातील नदी,  तलाव, धरणे, धबधबे, गडकिल्ले, जंगल व इत्यादी ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी येत असतात. मान्सून कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच जीवित व वित्तहानी होऊ नये, यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव जिल्ह्यातील धबधबे व पर्यटन स्थळे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहे. तसेच संबंधित पर्यटन स्थळे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

    बदलापूर – गृहमंत्री व शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा – राष्ट्रवादी कांग्रेसची मागणी

    Chandrapur tourism पर्यटन हा जिल्ह्याच्या विकासाचा एक महत्त्वाचा घटक आहे. जिल्ह्यामध्ये पर्यटन वाढीचा प्रयत्न करीत असताना ‘सुरक्षित व जबाबदार पर्यटक’ हे सूत्र अवलंबिणे आवश्यक आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रामुख्याने प्रशासनाची आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धबधबे, तलाव तसेच गड किल्ल्यांवरील प्रेक्षणीय स्थळांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वनविभाग, पुरातत्व विभाग, शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इतर आवश्यक यंत्रणांनी सोबतच उपविभागीय अधिका-यांनी संबंधित स्थळांना भेट देऊन आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने पाहणी करावी. धबधबे, तलाव, नदी, डोंगरांच्या कड्यावर असलेले प्रेक्षणीय स्थळे या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र निश्चित करून सुरेक्षेच्या दृष्टीने काही अंतरावर नियंत्रण रेषा आखावी व त्या नियंत्रण रेषेच्या पुढे पर्यटक जाणार नाही, अशी व्यवस्था करावी. सदर क्षेत्र हे प्रतिबंधात्मक असल्याचे फलक स्पष्टपणे लावण्यात यावेत.

    महिला सुरक्षा : चंद्रपुरात मध्यरात्री निघणार महिला सुरक्षा रॅली

    Chandrapur tourism पर्यटकांनी काय करावे आणि काय करू नये, याबाबतचे सूचनाफलक संबंधित स्थळांवर लावण्यात यावे. महसूल, नगरपालिका, रेल्वे, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभागांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आपत्तीप्रवण जल पर्यटनाच्या ठिकाणी पट्टीचे पोहणारे, शोध व बचाव पथक, जीवरक्षक, लाइफ जॅकेट्स, लाइफ बॉईज, रेस्क्यूबोटी इत्यादी तैनात ठेवावे. संबंधित उपविभागीय दंडाधिकारी व कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी याबाबत विविध विभागांशी समन्वय ठेवून उपाययोजना कराव्यात.

    गिर्यारोहण, जल पर्यटन इत्यादी ठिकाणी त्या त्या स्थानिक परिसरातील सामाजिक संस्था, अशासकीय संस्था, गिर्यारोहक, प्रशिक्षित आपदामित्र, स्थानिक स्वयंसेवक आदींची मदत घ्यावी व गर्दीच्या ठिकाणी त्यांची नेमणूक करावी. त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने प्रथमोपचार सुविधा असलेल्या रुग्णवाहिका यांची देखील व्यवस्था करावी. जेणेकरून जीवित आणि टाळता येऊ शकेल. उपविभागीय दंडाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी आहेत, त्यामुळे संबंधित उपविभागीय दंडाधिका-यांनी प्रत्येक पर्यटन स्थळी, गर्दीच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच आवश्यकता असल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत योग्य आदेश निर्गमित करावेत.

    बहुतांश पर्यटनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होते, त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या रस्त्यांबाबत सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना कराव्यात. यात रस्त्याची दुरुस्ती, गतिरोधक, दिशादर्शक आदींचा समावेश असावा. पर्यटनच्या ठिकाणी कार्यरत असलेले हॉटेल व्यवसायिक, टॅक्सी, रिक्षा चालक संघटना, गाईड, स्वयंसेवी संस्था आदींना विश्वस्त घेऊन स्थानिक पातळीवर करावयाच्या उपायोजनांचा आराखडा तयार करावा.

     चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटन स्थळ जंगलांमध्ये आहे, त्यामुळे वन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामधील असुरक्षित स्थळे तात्पुरती बंद करावी. जी ठिकाणे पर्यटनासाठी सुरू ठेवण्यात येणार आहे, त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सूचना लावाव्यात.

    वर नमूद केलेल्या सर्व उपाययोजनाखेरीज स्थानिक परिस्थितीनुसार इतर उपाययोजना आवश्यक असल्यास त्याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा. जिल्ह्यामध्ये भविष्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये पर्यटनाच्या ठिकाणी जीवितहानी होणार नाही, यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात. या आदेशाची सर्व संबंधितांनी काटेकोर अंमलबजावणी करावी. कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा झाल्यास संबंधित अधिकारी आणि विभाग प्रमुख जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.

  • Badlapur sexual assault case : गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या – राष्ट्रवादी कांग्रेसची मागणी

    Badlapur sexual assault case : गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या – राष्ट्रवादी कांग्रेसची मागणी

    Badlapur sexual assault case राज्यातील बदलापूर येथे प्राथमिक शाळेतील 4 वर्षीय 2 मुलीवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात महिला सुरक्षेचा संदेश देणारी निघणार रॅली

    त्यांनतर पालकांचा रोष उफाळून आला, 10 तास रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले, पीडित मुलींच्या पालकांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी 12 तास पोलिसांनी ताटकळत ठेवले. 10 तास रेल्वे रोको आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, आतापर्यंत या घटनेनंतर 38 आंदोलकांना अटक केली असून 300 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

    Badlapur sexual assault case या घटनेचे पडसाद चंद्रपुरात पडले असून शरद पवार राष्ट्रवादी कांग्रेस गटाने राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन करण्यात आले.

    यावेळी बेबीताई उईके यांनी बदलापूर प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले, आम्हाला लाडकी बहीण योजना नको आधी लाडक्या बहिणीला सुरक्षित करा, या प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

    राज्यात सध्या महिला अत्याचार घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, सरकार अश्या प्रकरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अपयशी ठरली आहे, सध्या राज्यात सरकार द्वारे लाडक्या बहीण योजनेचे इव्हेंट सुरू करण्यात आले मात्र अद्यापही लाडक्या बहिणीला सुरक्षित कसे ठेवणार यावर ठोस पावले उचलण्यात आली नाही.

    चंद्रपुरात जागृती मशाल मंच द्वारे 31 ऑगस्टला मध्यरात्री महिला सुरक्षेचा संदेश देणारी रॅली काढण्यात येणार आहे, जिल्ह्यातील महिला व मुली सुरक्षित रहाव्या व प्रत्येक महिला व मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे अशी शपथ सुद्धा यावेळी घेण्यात येणार आहे.

    चंद्रपुरात राष्ट्रवादी कांग्रेसचे निदर्शने

    राष्ट्रवादी कांग्रेसच्या निदर्शने आंदोलनात शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल, महिला अध्यक्ष शिल्पा कांबळे व राष्ट्रवादी कांग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

  • woman safety message : महिला सुरक्षा संदर्भात चंद्रपुरात निघणार जागरुकता रॅली

    woman safety message : महिला सुरक्षा संदर्भात चंद्रपुरात निघणार जागरुकता रॅली

    woman safety message कलकत्ता येथील मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर वर अत्याचार करून हत्या करण्यात आली होती, या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात पडले, या अमानुष घटनेनंतर देशभरातील आई-वडिलांना एकच प्रश्न पडला की आता आपण मुलींची सुरक्षा करायची कशी? अश्या घटनेतील आरोपीना आता ठेचायला हवे अशी संतापजनक प्रतिक्रिया नागरिक देत आहे.

    अवश्य वाचा : महिला सुरक्षेसंदर्भात कठोर कायदे करा, खासदार प्रतिभा धानोरकर


    woman safety message चंद्रपूर शहरात या घटनेचा अनेक सामाजिक संघटनांनी निषेध दर्शविला, पण आता चंद्रपूर जागृती मशाल मंच तर्फे जिल्ह्यातील महिला व मुली सुरक्षित रहाव्या यासाठी शहरात मध्यरात्री शांतता रॅली काढण्यात येणार आहे.
    जागृती मशाल मंचाची संकल्पना कलकत्ता येथील घटनेनंतर आकारात आली.

    महत्वाचे : राखी च्या भरवश्यावर राहू नका, स्वतःची सुरक्षा स्वतः करा, डॉक्टर बहिणीने दिला अनोखा संदेश


    विशेष म्हणजे या रॅलीत कुणाचाही विरोध होणार नाही तर स्त्री सुरक्षेची शपथ यामध्ये घेतल्या जाणार आहे.
    पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक स्वतः या रॅली मध्ये सहभाग घेणार आहे.
    आज 20 ऑगस्टला याबाबत जागृती मशाल मंचतर्फे पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी माहिती दिली.


    31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत ही रॅली गांधी चौक ते प्रियदर्शिनी चौक पर्यंत काढण्यात येणार आहे.
    गोस्वामी पुढे म्हणाल्या की या रॅली चा एकच उद्देश्य आहे प्रत्येक महिलांच्या सुरक्षेची जबाबदार आपण सर्वांची आहे, महिलांच्या सुरक्षा आणि हक्कांबद्दल जागरूकता पसरविणे.
    नागरिकांनी आता एकजूट व्हायला हवे, चंद्रपुरातील नागरिक महिला सुरक्षेच्या समर्थनात एकत्र आहे हे दाखवीत प्रत्येक महिला आपल्या कुटुंबातील सदस्य आहे हे मानणे.

    रॅली चे स्वरूप काय?

    संघटित व असंघटित क्षेत्रात कण करणाऱ्या प्रत्येक महिला, रात्री उशिरा काम करणाऱ्या महिलांना सुरक्षित वाटावे याची सार्वजनिक हमी देणे, संपूर्ण समाजाने महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी, भीतीशिवाय महिकाना स्वतंत्र फिरण्याचा अधिकार असला पाहिजे.
    या पार्श्वभूमीवर सदर रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.
    ‘तू घाबरू नकोस आम्ही तुझ्या सोबत आहो” हा नारा सर्व चंद्रपूर वासी देणार आहे, तुमची सुरक्षा आमची जबाबदारी हे मुली व स्त्रियांना आश्वासित करण्याचा एक उद्देश्य आहे.
    आयोजित पत्रकार परिषदेत एड प्रीतिशा साधना, अश्विनी खोब्रागडे, डॉ.नसरीन मावाणी आदि उपस्थित होते.

  • Haryana Pattern: वीज कंत्राटी कामगार म्हणतात राज्यात ‘हरयाणा पॅटर्न” लागू करा

    Haryana Pattern: वीज कंत्राटी कामगार म्हणतात राज्यात ‘हरयाणा पॅटर्न” लागू करा

    Haryana Pattern वीज कंत्राटी कामगारांनी 12 ऑगस्ट पासून विविध मागण्यांसाठी आंदोलन उभारले आहे, 12 ऑगस्ट पासून चंद्रपूर वीज वितरण कार्यालय समोर साखळी उपोषण करीत आज 20 ऑगस्टला पालकमंत्री यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ जिल्हाध्यक्ष हेमराज गेडे यांनी दिला होता. मात्र पोलीस प्रशासनाने ठिय्या आंदोलनाला नकार दिल्याने मनपा समोर आंदोलन करण्यात आले.

    महत्त्वाचे : महिला सुरक्षेसंदर्भात कडक कायदे करा, खासदार प्रतिभा धानोरकर यांची पंतप्रधान मोदी कडे मागणी


    Haryana Pattern राज्याचे तीन वीज उद्योग महानिर्मिती, महापारेषण व महावितरण मध्ये काम करीत असलेल्या कंत्राटी कामगाराना न्याय मिळवून देण्यासाठी बरेच वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे मात्र वीज कामगाराना अद्यापही न्याय मिळाला नाही.


    त्यामुळे साखळी उपोषण, ठिय्या आंदोलन असे नियोजन करण्यात आले होते मात्र आज पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आंदोलन कर्त्यांनी मनपसमोर ठिय्या आंदोलन करीत नियोजन भवन येथे पालकमंत्री मुनगंटीवार यांचे कार्यकारी अधिकारी यांना सदर मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
    प्रत्येक वीज वितरण कंपनी मध्ये हरियाणा पॅटर्न राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
    जर मागण्या आंदोलनामुळे मान्य झाल्या नाही तर ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळ पायी मोर्चा व बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार अशी माहिती हेमराज गेडे यांनी दिली.

    काय आहे हरियाणा पॅटर्न?

    कंत्राटदार मुक्त जॉब सिक्युरिटी, वेतनात वाढ करावी, वीज कंपनीच्या होऊ घातलेल्या भरती मध्ये वयात वाढ, आरक्षण व मार्क द्यावेत, असे विविध कंत्राटी कामगारांच्या हिताचे निर्णय हरियाणा राज्यात घेतले जातात ती पद्धत आपल्याकडे हरियाणा पॅटर्न म्हणून राबवावी अशी मागणी कामगारांनी केलेली आहे.

  • Mahila Suraksha : महिला सुरक्षेसंदर्भात प्रत्येक राज्याने कठोर कायदे करावे – खासदार प्रतिभा धानोरकर

    Mahila Suraksha : महिला सुरक्षेसंदर्भात प्रत्येक राज्याने कठोर कायदे करावे – खासदार प्रतिभा धानोरकर

    Mahila Suraksha कलकत्ता येथील मेडीकल कॉलेज मध्ये घडलेली घटना निंदनिय असून आरोपींवर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तथा गृह मंत्री अमित शाह यांचे कडे केली आहे.

    अवश्य वाचा : आता आपण ही बनू शकता व्यावसायिक पायलट, चंद्रपुरात होणार प्रशिक्षण

    Mahila suraksha कलकत्ता येथील घटना मन हेलावणारी असून या घटनेचा कितीही निषेध केला तरी कमी आहे. या घटनेच्या संदर्भाने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून यासाठी प्रत्येक राज्याने देखील प्रयत्न केला पाहिजे. यासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री जे.पी. नढ्ढा यांना प्रत्र लिहून आरोग्य यंत्रणेला सुरक्षा प्रदान करुन आरोपींना देखील कडक सजा व्हावी अशी भावना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.


    महिला ह्या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. देशाच्या विकासात महिलांचा वाटा मोठा आहे परंतु त्या जर सुरक्षी राहील्या नाही. तर देशात अराजकता निर्माण होईल. याकरीता प्रत्येक राज्यातील सरकार ने देखील तसेच सरकार ने देखील महिला सुरक्षेसंदर्भात कडक कायदे करावेत, असे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र राज्यात महिला सुरक्षेसंदर्भात शक्ती कायदा लागू करण्याकरीता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आमदार असतांना विधानसभेत मागणी केली होती. वरील प्रकरणी केंद्र सरकार ने दखल घेऊन तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी खासदार प्रतिभा धनोरकर यानी केली आहे.

    कलकत्ता येथील प्रकरण काय?

    कोलकाता येथील आर. जी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. या घटनेचा देशभरातून निषेध केला जातो आहे. या घटनेवरुन देशभरातले डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं शनिवारी पाहण्यास मिळालं. अशातच या महविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी या प्रकरणात काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.

    पोलीसांनी एकच आरोपी संजय रॉय याला अटक केली आहे. रॉय हा एक 33 वर्षीय सिव्हिक वॉलंटियर असून त्याला हॉस्पिटलच्या विविध विभागात प्रवेश होता. पोलिसांनी त्याच्याकडून ब्लूटूथ इयरफोनचा तुकडा जप्त केला. CCTV फूटेजच्या आधारावर आरोपीला ओळखण्यात आले. संजय रॉयला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायिक कोठडी सुनावली आहे. त्याला बलात्कार आणि हत्या या कलमानुसार आरोपित केले आहे.

  • professional pilot : चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण-तरुणी बनणार व्यावसायिक पायलट

    professional pilot : चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण-तरुणी बनणार व्यावसायिक पायलट

    professional pilot नागपूर फ्लाईंग क्लब अंतर्गत चंद्रपूर फ्लाईंग समितीच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील 12 वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र या विषयासह) झालेल्या 10 विद्यार्थाना व्यावसायिक पायलट प्रशिक्षणाकरीता विहीत नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे. याबाबतची सविस्तर माहिती chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. व्यावसायिक पायलट  प्रशिक्षणाकरीता अर्ज  29 जुलै ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरायचे होते. आता अर्ज भरण्यास 23 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

    महत्वाचे : गडचांदूर येथील डॉक्टर बहिणीने दिला महत्वाचा संदेश, स्वतःची रक्षा स्वतः करा

    व्यावसायिक पायलट प्रशिक्षणाकरिता

    विहीत नमुन्यातील अर्ज http://chandaflying.govbharti.org या संकेत स्थळावर अर्ज भरावयाचे आहेत. जिल्हा निवड समिती, चंद्रपूर यांनी घेतलेल्या निर्णयानुसार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने आता 23 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत अर्ज भरण्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे, असे चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी कळविले आहे.

    प्रक्रियेचा कालावधी : अर्ज सादर करावयाचा कालावधी 23 ऑगस्ट 2024 पर्यंत.

    परीक्षा शुल्क : प्रत्येक विद्यार्थ्यास ऑनलाईन पेमेंट पध्दतीने 1 हजार रुपये शुल्क आकारण्यात येईल.

    लाभार्थी/ उमेदवार निकष : 1) उमेदवार महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असावा/असावी.

    2) उमेदवाराची वयोमर्यादा किमान 18 वर्षे ते 28 वर्षे (1.1.2024रोजी) 3) 12 वी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,गणित हे विषय घेऊन अनुसुचित जमाती करीता किमान 65 टक्के गुणासह व अमागास करीता किमान 75 टक्के गुणासह प्राप्त करून पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेला /झालेली उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.

    अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे : महाराष्ट्र राज्याचे विशेषत: चंद्रपूर जिल्ह्यातील डोमीसाईल (अधिवास) प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला, 10 वी व 12 वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र व मार्कशिट, मुख्याध्यापक / शाळेचे प्राचार्य/ राजपत्रित अधिकारी यांनी दिलेले चारित्र्याचे प्रमाणपत्र, चंद्रपूर जिल्ह्याचे स्थानिक रहिवासी असल्याबाबतचे तहसिलदार यांचे रहिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड, अनुसुचित जमातीचे प्रवर्गाकरीता जातीचे प्रमाणपत्रव जात वैधता प्रमाणपत्र, अंतिम प्रवेशपात्र झालेल्या उमेदवारांनी DGCA Approved Medical Practitioner यांचे कडून वैद्यकीय प्रमाणपत्र व पोलीस विभागाकडून चारित्र्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून सादर करणे आवश्यक राहील.

    professional pilot ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत : 1) प्रस्तुत पदांकरिता फक्त http://chandaflying.govbharti.org या अधिकृत संकेतस्थळावरून विहित पध्दतीने भरलेले ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील व इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. 2) सदर संकेत स्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी स्वत: उमेदवाराची राहील. 3) ऑनलाईन अर्ज करतांना, शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे. तथापि, ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांची पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. 4) ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना http://chandaflying.govbharti.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 5) ऑनलाईन पध्दतीने अर्ज करताना स्वत:चा अद्यावत विहीत नमुन्यातील पासपोर्ट फोटो व सही स्कॅन करून http://chandaflying.govbharti.org मधील सुचनेनुसार ‍विहीत पध्दतीने अपलेाड करणे अनिवार्य आहे. 6) ऑनलाईन अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांक व वेळेनंतर अर्ज भरण्याची लिंक बंद केली जाईल. 7) निवड झालेल्या उमेदवाराने कागदपत्रे पडताळणीस स्वत: उपस्थित राहावे. 8) अर्जदाराने भरतीप्रक्रियेदरम्यान राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास अशा उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.

    जिल्हा उपसमिती, चंद्रपूर फ्लाईंग स्टेशन यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेमधून गुणानुक्रमे उमेदवारांची निवड करण्यात येईल. वरील निवड प्रक्रियेमध्ये बदल करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, चंद्रपूर तथा अध्यक्ष जिल्हा उपसमिती, चंद्रपूर फ्लाईंग स्टेशन समिती यांना राहतील, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.