Chandrapur mahakali mahotsav चंद्रपूरच्या मातेची पालखी निघावी हा संकल्प केला होता, त्याची सुरुवातही झाली. मात्र, या महोत्सवाला इतके भव्यत्व मिळेल याची कल्पना नव्हती. हे केवळ लोकसहभागामुळेच शक्य झाले. आपण दिलेल्या साठीनेच चंद्रपूरचा हा महोत्सव देशपातळीवर पोहोचला आहे. या महोत्सवाचे नियोजन चंद्रपूरकरांनी हातात घेऊन पाच दिवस निःस्वार्थ सेवा दिली. या ऐतिहासिक भव्य महाकाली महोत्सवाचे खरे शिल्पकार चंद्रपूरकरच असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
Chandrapur mahakali mahotsav पाच दिवस चाललेल्या श्री माता महाकाली महोत्सवाचा 9,999 कन्यापूजन आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि महोत्सवात सेवा देणाऱ्या चंद्रपूरकरांच्या सन्मान कार्यक्रमाने समारोप करण्यात आला. या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
महिलांच्या आधारासाठी शक्तीसदन योजना
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, यंदा महोत्सवाचे तिसरे वर्ष साजरे केले. पाच दिवसांच्या महोत्सवामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. नागरिक आणि माता भक्तांनी केलेले सहकार्य कौतुकास्पद होते. हा चंद्रपूरकरांचा महोत्सव बनला आहे. पुढच्या वर्षी आपण पुन्हा या महोत्सवात याच उर्जेसह सहभागी होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मातेची नगर प्रदक्षिणा पालखी या महोत्सवाची आत्मा आहे. यंदाच्या पालखी शोभायात्रेची भव्यता आणि नियोजनबद्धता महोत्सवाला वेगळ्या उंचीवर नेणारी ठरली, असेही त्यांनी सांगितले. (Chandrapur mahakali mahotsav)
9999 कन्यांचे पुजन आणि भोजन
श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने आयोजित महोत्सवात 9 हजार 999 कन्यांचे कन्यापूजन आणि कन्याभोजन कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्व शक्तिरुपी कन्यांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले. श्री माता महाकाली महोत्सव धार्मिक आणि उत्साही वातावरणात पार पडला.
माता महाकाली महोत्सवात जिल्हाभरातील 9 हजार 999 कन्यांचे कन्यापूजन आणि भोजन कार्यक्रम घेण्यात आला. यात विविध शाळांतील विद्यार्थिनींनीही सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी महाकाली मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. कन्यापूजनानंतर शक्तिरुपी कन्यांना महोत्सव समितीच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली. या आयोजनात सहकार्य करणाऱ्या पालकांचेही समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
school girls गरजू विद्यार्थिनींची शैक्षणिक वाटचाल सहज व सोपी होण्यासाठी आज २००२ शाळकरी मुलींना आज सायकल वाटप करण्यात येत असुन पुढील विजयादशमीस यापेक्षा अधिक म्हणजे ५ हजार गरजू मुलींना सायकल वाटप करणार असल्याचे मा.आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत प्रत्येक पायडल शिक्षणाच्या दिशेने सायकल वाटप सोहळ्यात ते बोलत होते.
school girls ज्या समाजात महिलांचा सन्मान होतो तोच समाज खऱ्या अर्थाने संपन्न समजला जातो.माता महांकाली महोत्सवाच्या माध्यमातुन ९९९९ कन्यापुजन असो वा शाळकरी मुलींना सायकल वाटप असो, स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याचे भाग्य मला लाभले आहे. शिक्षण पूर्ण न केल्याची वेदना फार मोठी असते याची जाणीव मला आहे त्यामुळेच अनेक गरजु विद्यार्थी ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांना पुढील वर्षी सायकल देऊन त्यांचा शैक्षणिक प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही आमदार महोदयांनी सांगितले.
सर्वांच्या सह्कार्यातून शहराच्या विकास करण्याची संधी मला प्राप्त झाली आहे. पवित्र दीक्षाभूमीच्या विकासासाठी ५६ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजुर करून आणला आहे. विद्यार्थ्यांना वाचनासाठी ११ ठिकाणी अभ्यासिका करण्याचा संकल्प आहे त्यातील ८ अभ्यासिका सुरु झाल्या आहेत याचा आनंद आहे. ज्याला कुणाचा आधार नाही त्याच्याकडे अम्माचा टिफिन जातो. आमदार निधीचा वापर हा शहराच्या विकासासाठी होईल याची सर्वांनी खात्री बाळगावी. school girls
हाजी सरवर हत्याकांड बाबत पत्रकार परिषद
आपले प्रत्येक पाऊल हे वंचितांच्या विकासाच्या दिशेने राहील असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी शाळकरी मुली व त्यांच्या पालकांनी आनंद व्यक्त केला. सकाळी ८ वाजेपासुन आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नाश्ता देण्यात आला. कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी प्रास्ताविक केले. अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सायकल वाटप सोहळा पार पडला.
कार्यक्रमास उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त रवींद्र भेलावे, शहर अभियंता विजय बोरीकर,सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,अक्षय गडलिंग, संतोष गर्गेलवार,चांदा क्लब सचिव डॉ.कीर्तीवर्धन दीक्षित,नागेश नित,चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील विविध शाळांचे विद्यार्थी,शिक्षक उपस्थीत होते
Haji Sarwar massacre ऑगस्ट महिन्यात चंद्रपूर शहरात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवीत भरदिवसा क्रूर हत्याकांडाची घटना घडली, यामध्ये कुख्यात गुंड हाजी सरवर यांची गोळ्या घालून व धारदार शस्त्राचे वार करीत हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर आरोपीनी स्थानिक गुन्हे शाखेत आत्मसमर्पण केले होते, पोलिसांनी याप्रकरणी अनेक आरोपीना अटक केली.
Haji Sarwar massacre नकोडा निवासी हाजी सरवर शेख यांचा 12 आगस्ट 2024 ला बिनबागेट, येथील होटल शाही दरबार येथे गोळया झाडुन तीक्ष्ण हत्यारांने निर्मम हत्या करण्यात आली होती. सदर प्रकरणात आता पर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली तर एक आरोपी फरार आहे. या प्रकरणात मुलाचा खुण करण्यामागे कोणाचा हात आहे आणि कोण सदर आरोपींना आर्थिक मदत देत होता व त्यांना शस्त्र कोण पुरविले? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे, याबाबत हाजी सरवर यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक आरोप व खुलासे केले आहे.
यासंदर्भात सीआईडी तपास करण्याची मागणी सलमा बेगम सरवर शेख यांनी पत्रकार परीषदेत केली आहे. घटनेपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात अग्निश्स्त्रांचा वापर करून खून करणे किंवा खुनाच्या प्रयत्न करणे सारखे गुन्हे सतत घडत होते. त्यामुळे जिल्हा पोलीस विशेषतः स्थानिक गुन्हे शाखा यांनी शस्त्र जप्तीची मोहिम राबविली होती व सावधानता बाळगल्याचे जनतेला सांगण्यात आले होते. (Haji Sarwar massacre)
हाजी सरवर चे मारेकरी शस्त्र घेवून दुस_या जिल्ह्यातून चंद्रपूर शहरात दाखल झाले, दोन दिवस मुक्काम केला. तेव्हा पोलीस व अपराध शाखा पूर्णत अनभिज्ञ कसे होते? खून केल्यानंतर जवळचे शहर पो. स्टे. किंवा रामनगर पो. स्टे सोडून मारेकरी सरळ स्थानीय गुन्हा शाखा येथे का गेले?. (Haji Sarwar massacre)
पत्रकार परिषद
आरोपी समीर हा सराईत गुन्हेगार आहे. चंद्रपूर जिल्ह्या बाहेर इतर खुनाचे गुन्हे नोंद आहेत. तो गुन्हा केल्यानंतर तिथेच आत्मसमर्पण करतो जिथे पहिले पासून त्याचा संपर्क असतो व सर्वकाही ठरलेला प्लान होता. सर्व बाबींचे विचार केले असता स्था. गु. शाखेची भूमिका हि संशयास्पद आहे. म्हणून स्था. गु. शाखेचे भूमिकेची सखोल तपास होणे गरजेचे आहे. तसेच स्था. गु. शा. पूर्वी पासून आरोपींचा संपर्कात होते किंवा कसे हे जाणून घेण्याकरीता त्यांचे CDR व SDR काढणे सुद्धा गरजेचे आहे. वरील सर्व बाबींचा विचार करून हाजी सरवर खुनाचा गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआईडी) कडून किंवा स्वतंत्र तपास यंत्रणे कडून करण्याची मागणी हाजी सरवर ची पत्नी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. (Haji Sarwar massacre)
त्या पुढे म्हणाल्या की वर्ष 2012 मध्ये हाजी सरवर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता? त्यांचा सुद्धा या प्रकरणात सहभाग असू शकतो हे पोलिसांनी आपल्या तपासात घ्यायला हवे, आरोपी समीर हा ज्या वाळू घाटावर काम बघत होता तो घाट एका नेत्याचा आहे, तो त्याची पाठराखण करायचा, त्याबाबत त्या नेत्याचा यामध्ये सहभाग असू शकतो? यावर पोलिसांनी सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, या हत्याकांडाचा मास्टरमाइंड कोण? याबाबत पोलिसांनी खुलासा करावा, जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मी माझे मूल बाळ सोबत घेत पोलीस अधीक्षक कार्यालय पुढे आमरण उपोषण करणार असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला.
Bhim geet प्रसिद्ध भीमगीत गायिका कळूबाई खरात उद्या चंद्रपूरात, आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विपश्यना केंद्राचे भूमिपूजन, बाबूपेठ येथे भीमगीताचे आयोजन
Bhim geet बाबूपेठ येथील आंबेडकर नगर येथे असलेल्या धम्मभूमी महाविहार येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी विपश्यना केंद्रासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाचे उद्या, रविवारी सायंकाळी सहा वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार आहे.
या निमित्ताने भव्य बुद्ध-भीमगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सुप्रसिद्ध गायिका कळूबाई खरात आणि प्रसिद्ध गायक राहुल शिंदे हे बुद्ध-भीमगीत गायणार आहेत.
बाबूपेठ येथील आंबेडकर नगर येथे असलेल्या धम्मभूमी महाविहार येथे विपश्यना केंद्र तयार करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी विपश्यना केंद्रासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. या निधीतून येथे तयार होणार असलेल्या विपश्यना केंद्राच्या कामाचे भूमिपूजन उद्या रविवारी सायंकाळी ६ वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते होणार आहे.
यानिमित्त महाथेरो डॉ. सुमनवंत्तो यांच्या वतीने भव्य बुद्ध-भीमगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या रविवारी या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध भीमगीत गायिका कळूबाई खरात आणि राहुल शिंदे चंद्रपूरात येणार असून, या कार्यक्रमाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन धम्मभूमी महाविहारच्या वतीने करण्यात आले आहे.
Congress candidate बल्लारपूर विधानसभेसाठी काँग्रेसची उमेदवारी डॉक्टर अभिलाषताई गावतुरे यांना मिळावी – प्रवीण (बाळूभाऊ) खोब्रागडे, डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांना बल्लारपूर, पोंभुर्णा, मूल विधानसभा मतदार संघासाठी अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रवीण (बाळूभाऊ) खोब्रागडे यांनी आज जाहीर पाठिंबा घोषित केला
Congress candidate दुर्गापूर येथे डॉ. अभिलाषाताई गावतुरे मित्र परिवार द्वारा आयोजित महाराष्ट्रातील प्रसिद्ध नामवंत लोकशाहीर संभाजी भगत यांच्या ‘विद्रोही आंबेडकरी शाहिरी जलशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन दुर्गापूर मध्ये करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण (बाळूभाऊ) खोब्रागडे म्हणाले की मागील पंधरा वर्षांपासून सातत्याने फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये अभिलाषा ताई गवतरे यांचे मोठे योगदान आहे आणि बहुजनांचे प्रतिनिधी विधिमंडळामध्ये जाऊन पुरोगामी चळवळीला बळकटी मिळाली पाहिजे. Ballarpur
पक्षाची बांधिलकी सोडून ज्याप्रमाणे संविधान वाचवण्यासाठी लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला आंबेडकरी जनतेने साथ सहयोग दिला होता आता सुद्धा ही परिस्थिती तशीच आहे व आंबेडकरी जनतेच्या मनातील इच्छा बल्लारपूर विधानसभेसाठी डॉ. अभिलाषाताई यांना प्रतिनिधित्व देण्याची आहे , म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने आंबेडकरी जनतेचा मान राखून डॉक्टर अभिलाषाताई गावतुरे यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली पक्षश्रेष्ठींकडे असा पाठपुरावा सुद्धा केल्याचे त्यांनी सांगितले. विद्रोही शाहीर संभाजी भगत यांच्या विद्रोही आंबेडकरी गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
Maharashtra Telugu Sahitya Academy राज्य सरकारने ‘महाराष्ट्र तेलुगु साहित्य अकादमी ‘ स्थापना केली असून त्याबद्दल फेडरेशन ऑफ तेलगू असोसिएशन ने नुकतेच मंत्रालयात भेट घेत सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.
Maharashtra Telugu Sahitya Academy तेलगू फेडरेशनचे अध्यक्ष श्री.जगनबाबू गंजी यांनी सांगितले की ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या या तेलगू साहित्य अकादमीमुळे राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या तेलगू भाषिकांना एक हक्काचे साहित्यिक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. राज्यात या आधी पासूनच हिंदी, सिंधी आणि गुजराती या तीन भाषिक साहित्य अकादमी कार्यरत आहेत. त्यात आता तेलगू आणि बंगाली साहित्य अकादमीची भर पडली आहे.
तेलगू अकादमीच्या स्थापनेत पुढाकार घेतल्याबद्दल ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार फेडेरेशन ऑफ तेलुगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (एफ-टॉम) ने नुकताच मंत्रालयात केला. यावेळी अध्यक्ष जगनबाबू गंजी यांच्यासोबत प्रधान सरचिटणीस अशोक कांटे, संगेवानी रवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी तेलगू आणि मराठी या भाषा भगिनी आहेत, महाराष्ट्राच्या जडणघडणीत तेलगू भाषकांचाही मोठा वाटा आहे, असे सांगितले. तेलुगू मराठी भाषेचे सांस्कृतिक संबंध ऐतिहासिक आहेत, असे सांगून ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू तंजावरचे राजे सरफोजीराजे भोसले यांनी तेलगूतूनही अनेक नाटके, कथा, कादंबऱ्या, कविता लिहिल्या आहेत, याकडे लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश या शेजारच्या राज्यात असलेल्या साहित्य परिषदेसारख्या संस्थांसोबत, तेलुगु आणि मराठी भाषिकांच्या विचारांची देवाण घेवाण करण्यात ही नवीन तेलगु अकादमी सहाय्यभूत ठरेल. Maharashtra Telugu Sahitya Academy
एफ-टॉम चे अध्यक्ष श्री जगनबाबू गंजी यावेळी म्हणाले की तेलगू भाषक समाजाचे मुंबईच्या उभारणीत, उद्योगधंद्यात, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, कला, नाट्य, चित्रपट क्षेत्रात मोठे योगदान आहे. मुंबईतल्या अनेक ऐतिहासिक इमारती तेलुगु भाषिकांनी उभारल्या आहेत. या संदर्भात मनोहर कदम यांच्या पुस्तकात नोंदी नमूद आहेत. सामाजिक चळवळीत, स्वातंत्र्य लढ्यात, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक तेलुगु भाषिक शहीद झाले आहेत, असे ते म्हणाले. बालगंधर्वांची अनेक नाटके तेलुगु भाषेत भाषांतरीत करून सादरही झाली आहेत, अशी ही माहिती त्यांनी दिली. तेलगु अकादमीच्या स्थापनेत सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबतच मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांचेही आभार मानले आहेत.
नवीन तेलगू साहित्य अकादमी वर लवकरच अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
Moharli gate tadoba ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ही आपल्यासाठी परमेश्वराची देण आहे. जगभरातील लाखो पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये येतात. व्याघ्र दर्शनासाठी आलेला पर्यटक येथून चंद्रपूरचे नाव कायमचे सोबत घेऊन जातो. येथे आलेल्या पर्यटकांच्या दृष्टीने ताडोबा आणि चंद्रपूरचे नाव हे त्यांच्या आयुष्याचा ठेवा असावा. त्यासाठी पर्यटकांसोबत आपली वर्तणूक चांगलीच असली पाहिजे. कारण इथे येणारा प्रत्येक पर्यटक आपल्यासाठी देवासमान आहे, अशी भावना राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
Moharli gate tadoba मोहर्ली येथे पर्यटन प्रवेशद्वार, संकूल, निसर्ग माहिती केंद्र व इतर सुविधांचे लोकार्पण ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा बनबल प्रमुख शोमिता विश्वास, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, वन अकॅडमीचे संचालक एम.एस. रेड्डी, क्षेत्रसंचालक तथा मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी येल्लू, उपसंचालक (बफर) पियुषा जगताप, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, प्रसिध्द डॉक्टर तथा निसर्गप्रेमी रमाकांत पांडा, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळाचे सदस्य प्रकाश धारणे, अरुण तिखे, मोहर्लीच्या सरपंच सुनीता कातकर, पद्मापूरच्या सरपंच आम्रपाली अलोने आदी उपस्थित होते.
ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज अतिशय आनंदाची बाब आहे. चंद्रपूर नेहमीच पुढे राहावा, असाच आपला प्रयत्न असतो. वाघ हा पर्यावरणाचा मित्र असून ताडोबा ही आपल्याला परमेश्वराची देण आहे, त्याचे रक्षण आपल्याला करायचे आहे. वाघाचे संरक्षण केले म्हणूनच जिल्ह्यात वाघ वाढले. चंद्रपूर पर्यटनाच्या माध्यमातून पुढे जावे, यासाठी सिंगापूरच्या धर्तीवर आपण चंद्रपुरात सफारी करीत आहोत. सफारीसाठी आलेले पर्यटक सैनिक शाळा, आर्मी म्युझियम, बॉटनिकल गार्डन, वन अकादमी, एसएनडीटी विद्यापीठ, आदींचा आनंद घेऊ शकणार आहेत. चंद्रपुरात वाघांची संख्या सर्वाधिक आहे.’ चंद्रपूरच्या विकासासाठी पूर्ण शक्तीने काम करणार आहे. मोहर्ली, ताडोबा, बफर झोन, ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी आपण पूर्ण शक्तीने काम करीत आहोत. तसेच प्रत्येक गावाला स्वयंपूर्ण करण्याचा आपला मानस आहे. आपण सर्वजण मिळून ताडोबाचा विकास आंतरराष्ट्रीय स्तरावर करुया. यासाठी सर्व वनमजूर, वन अधिकारी, वनरक्षक, वनसेवक, रोजंदारी करणारे कर्मचारी आदींचे मोठे योगदान आहे, असेही पालकमंत्री म्हणाले. (Moharli gate tadoba)
जिप्सी असोसिएशनला 25 लक्ष देणार : वन विभागात आपण अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. एफडीसीएमच्या माध्यमातून वन कर्मचाऱ्यांना राहिलेला फरक देण्यात आला आहे. प्रत्येक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना वाहन देण्यासाठी आपण आग्रही भूमिका मांडली. तसेच ताडोबा फाउंडेशन मधून जिप्सी असोसिएशनला 25 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिप्सी असोसिएशनची वागणूक चांगली असली तरच पर्यटकांचे समाधान होईल व जिल्ह्याचे नाव उंचावेल.
चंद्रपुरात दिक्षाभूमिसाठी एल्गार मोर्चा
निसर्ग पर्यटन केंद्राला स्व. रतन टाटा यांचे नाव : प्रसिद्ध उद्योगपती स्व. रतन टाटा यांचे चंद्रपूरशी व्यावसायिक नाते नाही. तरीही त्यांचे चंद्रपूरसोबत वेगळेच ऋणानुबंध होते. रतन टाटा यांनी राज्यपालांच्या राजभवनात मोर संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून दिला. (ratan tata) तसेच त्यांनी प्राण्यांच्या रेस्क्यू सेंटरसाठी 25 कोटी दिले. सरकार आणि टाटा ट्रस्टच्या माध्यमातून चंद्रपूर येथे कॅन्सर केअर हॉस्पिटल उभे राहत आहे. त्यासाठी टाटांनी 100 कोटीची देणगी दिली आहे. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या आर्किटेकसाठी टाटा यांनी 3 कोटी दिले. कृषी व्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यांनी येथील 90 गावे दत्तक घेतली. स्व. रतन टाटा यांचे स्मारक चंद्रपुरात करण्यात येणार आहे, अशी माहिती ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली. त्याचवेळी निसर्ग माहिती केंद्राला स्व. रतन टाटा यांचे नाव देण्याची घोषणाही त्यांनी केली. (Ratan tata)
ग्राम परिस्थितीकी विकास समिती यांना धनादेश वाटप : यावेळी ग्राम परिस्थितीकी विकास समित्यांना प्रत्येकी 3 लक्ष 50 हजारांचा धनादेश ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यात खुंटवडा, भोसरी, काटवल, वडाळा, कोकेवाडा, बिलोडा, किन्हाळा, सोनेगाव, आष्टा, निंबाळा, चेकबोर्ड, मामला, हळदी, अर्जुनी, वायगाव, झरी, घंटाचौकी, दुधाळा, मोहर्ली, घोडेगाव, मुधोली, आगरझरी, सितारामपेठ, भांबेरी आदी गावांचा समावेश होता. (Ratan tata)
गुराख्यांना स्मार्ट स्टिकचे वाटप : यावेळी गुराख्यांना वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते स्मार्ट स्टिकचे वाटप करण्यात आले. यात मारुती जांभुळे, गणेश श्रीरामे, बुद्रुक कुलसंगे, अंकुश केदार, नरेंद्र डडमल, प्रकाश कन्नाके, लक्ष्मण तोफे, जयंत गडमल, विश्वनाथ मरसकोल्हे, मारुती आत्राम, राहुल आत्राम, वासुदेव सिडाम, परशुराम मडावी आदींचा समावेश होता. तत्पूर्वी, वनमंत्र्यांच्या हस्ते अनंत सोनवणे लिखित ‘एक होती माया’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी तर संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी केले.
Yuva Sena दिनांक 11 ऑक्टोबर रोजी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना -युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या आदेशाने तसेच कार्यकारणी सदस्य हर्षलजी काकडे, पूर्व विदर्भ विभागीय सचिव सिनेट सदस्य निलेश बेलखेडे व चंद्रपूर युवासेना विस्तारक, संदीप रियाल (पटेल) यांच्या मार्गदर्शनात तसेच चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी आढावा बैठक जेष्ठ नागरी संघ सभागृह येथे पार पडली.
Yuva sena चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा या तिन्ही विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबद्दल विचार करता सर्व पदाधिकारी कडून त्यांच्या विधानसभेचा आढावा घेण्यात आला तसेच यावेळी विधानसभेत आपला भगवा फडकवायचा असून त्यासाठी सर्व पदाधिकारी, युवासैनिक व शिवसैनिक जोमाने काम करून आपले कर्तव्य पार पाडावे व मशाल घरोघरी पोहोचवावी.
शिक्षण, आरोग्य व रोजगार या बद्दल त्रिसूत्री कार्यक्रम राबवून युवक युवतीना सहकार्य करून युवासेनाचे कार्य करावे अशी सूचना यावेळी विभागीय सचिव सिनेट सदस्य इंजि.निलेश बेलखेडे यांनी केली. Yuva sena
जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी यांच्या कामाबद्दल विस्तारक संदीप रियाल पटेल यांनी समाधान व्यक्त करीत यापुढे संघटनात्मक बांधणी वर विशेष लक्ष दिल्या जाऊन पदाधिकारी यांनी चांगल कार्य करून युवासेना च्या माध्यमातून घर तिथे युवासैनिक राबवून पक्षाचे विचार घरोघरी पोहोचवा असे मार्गदर्शन केले.
युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांनी जिल्ह्यातील विधानसभा पदाधिकारी यांचा परिचय करून देत आजवरच्या कार्याचा आढावा वरिष्ठ पदाधिकारी यांच्या समोर ठेवला व युवा सेनेच्या माध्यमातून यापुढे चांगल कार्य जिल्ह्यात केल्या जाणार याबद्दलचा विश्वास पदाधिकारी यांना दिला.
यानंतर वरिष्ट पदाधिकारी यांनी युवासैनिकांसोबत चर्चा करीत त्त्यांचे मनोगत ऐकून त्त्यांचे मनोबल वाढवण्यात आले. यावेळी युवासेना मध्ये चंद्रपुर जिल्यातील अनेक युवकांनी प्रवेश घेतला.
यावेळी उपस्थित पदाधिकारी जिल्हा चिटणीस सुमितभाऊ अग्रवाल,चंद्रपूर विधानसभा येथील उपजिल्हा प्रमुख बंटी कमटम , तालुका प्रमुख सूरज शेंडे शहर प्रमुख शहबाज शेख , वैभव काळे ,शहर समन्वयक प्रज्वल आवडे ,उपतालुका प्रमुख विवान रामटेके , उपशहर प्रमुख संघदीप रामटेके, उपशहर प्रमुख सार्थक शिर्के, बल्लारपूर विधानसभा येथील तालुका प्रमुख नीरज यादव, शहर प्रमुख अनिकेत बेलखोडे, शहर प्रमुख पोंभुर्णा महेश श्रीगिरवार , शहर प्रमुख मूल अमित अलियानी तालुका प्रमुख मूल रितिक संगमवार, राजुरा विधानसभा येथील उपजिल्हा प्रमुख राजुरा कुणाल कुडे, तालुका प्रमुख राजुरा अमित मालेकर ,शहर प्रमुख राजुरा स्वप्नील मोहुर्ले ,शहर प्रमुख विवेक राणा गोंडपिपरी, वतन मदार यांच्या सह युवा सैनीकांची प्रामुख्यानी उपस्थिती होती.
Elgar morcha 11 ऑक्टो. ला समस्त आंबेडकरी समाजाचा महामोर्चा काढण्यात आला, ह्या मोर्चात हजारो आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते, चंद्रपुरातील दिक्षाभूमीची जागा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाला अपुरी पडत असून प्रशासनाने चांदा क्लब मैदान व शासकीय विश्रामगृह हे त्यादिवशी खुले करीत विश्रामगृह येथे बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक निर्माण करावे अशी मागणी घेऊन आंबेडकर अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
Elgar morcha 14 ऑक्टो. 1956 ला नागपूर येथे तर 16 ऑक्टो. 1956 ला चंद्रपूर येथे लाखों लोकांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दिक्षा दिली. सध्या स्थितीत दिक्षाभूमीची जागा 15 व 16 ऑक्टो. च्या धम्मचक्र अनुवर्तन कार्यक्रमासाठी जागा अपुरी पडत असल्याने जागेची कमतरता दूर करण्यासाठी चांदा क्लब ची जागा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी शासकीय विश्राम गृहाची जागा देण्याची मागणी आंबेडकरी समाजाने महामोर्चा द्वारे केली आहे.
चांदा क्लब येथील मद्य परवाना व जुगार परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी आजच्या महामोर्चा मध्ये करण्यात आली.
गांधी चौकातून सुरू झालेला हा मोर्चा शहराचे भ्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला, आयोजित मोर्च्यात सहभागी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रवीण खोब्रागडे म्हणाले की दिक्षाभूमीजवळ बनविलेला पूल तोडण्यात यावा, बाबासाहेब आंबेडकर याचं भव्य स्मारकाची निर्मिती करण्यात यावी अन्यथा याहून मोठे आंदोलन आम्ही उभारू असा इशारा दिला.
यावेळी भूमिपुत्र ब्रिगेडच्या अभिलाषा गावतुरे, बसपा जिल्हाध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार, प्रवीण खोब्रागडे, बंडू नगराळे, डॉ राकेश गावतुरे यांची उपस्थिती होती.
Dhamma chakra sohala चंद्रपूर शहरामधील दीक्षाभूमी मैदान येथे 15 व 16 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमाला जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनुयायी मोठया संख्येने येत असतात.
Dhamma chakra sohala यादरम्यान वाहतुक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. तसे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पारीत केले असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
चंद्रपूर शहरातून दीक्षाभूमी परिसराकडे जाणाऱ्या रहदारीचा मार्ग 15 ऑक्टोबर 2024 चे सकाळी 8 वाजता पासून 17 ऑक्टोबर च्या सकाळी 8 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्याचा तसेच सर्व प्रकारच्या वाहनाची रहदारी वळवण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. Dhamma chakra sohala
अवजड वाहनाकरीता रहदारीचा मार्ग : नागपूरकडून चंद्रपूरकडे येणारी सर्व प्रकारची जड वाहने ही हॉटेल कुंदन प्लाझा येथून सीटीपीएस मार्गे नेहरू नगर वरून मुल रोडला जातील. मुलकडून नागपूरकडे जाणारी जड वाहने ही बंगाली कॅम्प – सावरकर चौक – वरोरा नाका उड्डाणपुल या मार्गाने जातील किंवा नेहरु नगर वरून सीटीपीएस मार्गे नागपूरकडे जातील. तसेच गरजेनुसार एम.ई. एल. नाका चौक येथे सदर वाहने थांबवण्यात येतील. बल्लारशाकडून नागपूरकडे जाणारी जड वाहने बंगाली कॅम्प – नेहरुनगर वरून सीटीपीएस मार्गे नागपूरकडे जातील किंवा पलीकडे बंगाली कॅम्प डी.आर. सी. बंकर, बायपास रोड येथे दीक्षाभूमी मार्गावरील गर्दी पाहून थांबवण्यात येतील. Dhamma chakra sohala
शहरातील दुचाकी व चारचाकी (हलकी) वाहनाकरीता रहदारी व्यवस्था : जुना वरोरा नाका चौक ते आंबेडकर महाविद्यालय, मित्रनगर चौक – टि.बी दवाखाना पर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाकरीता (सायकल सहीत) बंद करण्यात येत आहे.पाण्याची टाकी –विश्रामगृह- जुना वरोरा नाका हा मार्ग सर्व प्रकारचे वाहनाकरीता (सायकल सहित) दोन्ही बाजुने बंद करण्यात येत आहे. करीता नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने (जड वाहने वगळून) वरोरा नाका- उड्डान पुल –सिध्दार्थ हॉटेल- बस स्टॅड- प्रियदर्शनी चौक मार्गे शहराकडे जातील. Diksha bhumi
रामनगर, मित्रनगर,आकाशवाणी, स्नेहनगर, वडगाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याची टाकी-दवा बाजार –संत केवलराम चौक- दाताळा रोड मार्गे पर्यायी रस्त्याने आपली वाहने (जड वाहने वगळून) घेवून जावीत. त्याचप्रमाणे जटपूरा गेटकडून रामनगर मार्गे जुना वरोरा नाकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी आपली वाहने पाण्याची टाकी –प्रियदर्शनी चौक- बस स्टॅड- सिघ्दार्थ हॉटेल- उड्डान पुल मार्गे नागपूरकडे जातील.
दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या बौध्द बांधवाची गर्दी पाहता पाण्याची टाकी चौक- जुना वरोरा नाका ते आय.टी.आय. कॉलेज तसेच वरोरा नाका चौक – मित्रनगर चौक ते संत केवलराम चौक व मित्रनगर चौक ते जिल्हा स्टेडीयमपर्यंत या सर्व परीसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहील. तसेच सदरचा सर्व परीसर “नो पार्कींग व नो हॉकर्स झोन” म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यामुळे निर्देशित काळात सदर परिसरात कोणतेही वाहने, हॉकर्स लावण्यात येवू नये. Diksha bhumi
दीक्षाभूमी, संत केवलराम चौक तसेच दीक्षाभूमी ते जिल्हा स्टेडियम, या दरम्यान राहण्याऱ्या रहिवाशांनी आपली वाहने रस्त्याच्या बाजुला उभी न करता घोषित करण्यात आलेल्या पार्किंगमध्ये ठेवावीत.
आयटीआय कॉलेज ते जिल्हा स्टेडियमपर्यंत तसेच वरोरा नाका दर्ग्याच्या उजव्या बाजुने जाणरा रस्ता –पुठ्ठेवार हॉस्पीटल- बुक्कावार हॉस्पीटल- वरोरा नाका ते पिंक प्लॅनेट पर्यंत नो- पार्किंग झोन व नो- हॉकर्स झोन म्हणुन घोषित करण्यात येत आहे.
दीक्षाभूमी सोहळयास येणाऱ्या नागरिकांकरीता वाहन पार्किंग स्थळ : 1.नागपूर रोडने दीक्षाभूमीकडे येणारे वाहनाकरीता शकुंतला लॉन, जनता कॉलेज पटांगण, जनता कॉलेज समोरील ईदगाह मैदान येथे वाहन पार्किंग स्थळ निश्चित करण्यात आले आहे. 2. शहराकडून दिक्षाभूमी कडे येणारे वाहनाकरीता सेंट मायकल स्कुल मैदान, सिंधी पंचायत भवन, न्यु इंग्लिश ग्राऊंड, 3. वडगांव, आकाशवाणी व लगतच्या परिसरातून दीक्षाभूमीकडे येणारे वाहनाकरीता लोकमान्य टिळक हायस्कूल (जिल्हा स्टेडियमच्या मागे) जिवन साफल्य गृह निर्माण सहकारी संस्था (मनोमय दवाखानच्या पाठीमागे) आणि 4. मुलरोड, बंगाली कॅम्प ,तुकूम या परिसरातून येणारे वाहनांकरीता कृषी भवन जवळील मैदान/ ट्रॅव्हल्स स्टॅन्ड येथे वाहन पार्किंग स्थळ ठरवून देण्यात आले आहे.
तरी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळयामध्ये सहभागी सर्व बौध्द बांधव /अनुयायी व जनतेने वरील वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. तसेच ठरवून दिलेल्या पार्कींग व्यवस्थेमध्येच आपली वाहने ठेवून वाहतुक व्यवस्थेचे पालन करावे. शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यास पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.