Tag: MH34

  • Chandrapur Bjp Worker : चंद्रपुरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कारण…

    Chandrapur Bjp Worker आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपमध्ये प्रवेश करून महायुतीतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत असून शहरी भागासह ग्रामीण भागात कार्यकर्त्यांनी प्रचारात पुढाकार घेत बैठकींचा तडाखा लावला आहे.

    राजकीय : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदभरतीचा घोळ, आरोप प्रत्यारोप

    Chandrapur Bjp Worker या बैठकींना नागरिकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काल पार पडलेल्या बैठकांमध्ये भाजपचे चंद्रपूर विधानसभा प्रमुख प्रमोद कडू, तालुका अध्यक्ष नामदेव डाहुले, भाजप नेते अनिल डोंगरे, महिला आघाडी अध्यक्ष सविता कांबळे, भाजपचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, राकेश पिंपळकर, विजय बलकी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

        विधानसभा निवडणुकीची रंगत आता वाढू लागली असून सर्वच पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांनी प्रचारात चांगली आघाडी घेतली असून मतदारसंघातील शहरी भागासह ग्रामीण भागातही बैठकांचे सत्र सुरू केले आहे. Chandrapur Bjp Worker

    गुन्हेगारी : सावधान, सोनं खरेदी करताय तर मग ही बातमी वाचा

    भाजप कार्यकर्ते निवडणुकीत स्वतःला झोकून देत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत अनेक बैठकांमध्ये योग्य ते मार्गदर्शन केले आहे, परिणामी भाजप कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागल्याचे दिसत आहे.

       दरम्यान, शहरातील भिवापूर वार्ड येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांशी संवाद साधला. तर मोरवा, येरुर, साखरवाही येथे भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकींनाही आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे कौतुक केले आणि हा उत्साह मतदानाच्या दिवसापर्यंत कायम ठेवण्याचे आवाहन केले.

    भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण ताकदीने कामाला लागला आहे. मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपण मोठा निधी उपलब्ध करून देत दिला असून यातून येथे मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पुढेही ग्रामीण भागाच्या सर्वसमावेशक विकासाचा संकल्प आपला आहे. पक्षाचा विचार आणि आपली विकासकामे मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम आमचा प्रत्येक कार्यकर्ता करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकींना ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • ladki bahin yojana money : तर लाडक्या बहिणींना प्रतिमाह मिळणार अडीच हजार रुपये

    ladki bahin yojana money राज्यातील महायुती सरकार काळात अल्पवयीन मुली व महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशातच राज्यातील महीला भगिनींच्या समर्थनार्थ कठोर कायदे करून योग्य सुरक्षा पुरावीण्याऐवजी महायुती सरकारने सत्ताकाळात शासन तिजोरीवर डल्ला मारत सत्तेच्या मदमस्तीत जनतेला वाऱ्यावर सोडले.

    ladki bahin yojana money राज्यातील महायुती सरकार काळात अल्पवयीन मुली व महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशातच राज्यातील महीला भगिनींच्या समर्थनार्थ कठोर कायदे करून योग्य सुरक्षा पुरावीण्याऐवजी महायुती सरकारने सत्ताकाळात शासन तिजोरीवर डल्ला मारत सत्तेच्या मदमस्तीत जनतेला वाऱ्यावर सोडले.

    राजकीय आरोप : सिडीसीसी बँक पदभरती प्रकरणी आरोप प्रत्यारोप

    आता निवडणुकीच्या तोंडावर महायुतीकडून आमच्या महिला भगिनींना “लाडकी बहीण’ म्हणून काही महिन्यांपूरते दीड हजार देऊ करत त्यांची मते वळविण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला जात आहे. अशा हेकेखोर, स्वार्थी, लुटारु व राज्याची अस्मिता गहाण ठेवणाऱ्या महाभ्रष्ट महायुतीला आता मतदानातून धडा शिकविणे काळाची गरज आहे.

    जर राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आली तर प्रतिमाह अडीच हजार रुपये दिले जाईल अशी ग्वाही राज्याचे विरोधी तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. त्यांनी ब्रम्हपुरी तालुक्यांतील मालडोंगरी येथे आयोजित कार्यकर्ता बैठकी प्रसंगी भाऊबीज निमित्ताने उपस्थीत महिला भगिनिंशी संवाद साधला. ladki bahin yojana money

    पुढें बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, माझी आजवरची राजकीय कारकीर्द ही विकासासह, समाजकारण व जनसेवेसाठी समर्पित आहे. माझ्या विधानसभा क्षेत्रांतील महिला भगिनिंसाठी महीला बचत गट, उमेद कार्यकर्त्या आशा वर्कर, महीला गृहउद्योग, व इतर भगिनींसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न चालविले.

    यात महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कार्पेट निर्मिती व इतर लघु रोजगारासाठी विकास निधी उपलब्ध करून दिला.

    सोबतच ब्रम्हपुरी शहरात गारमेंट्स व्यवसायाला चालना देऊन भविष्यात अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना सन्मानाने जगण्यासाठी माझी धडपड सुरू आहे.महायुती कडून “लाडकी बहीण’ हा केवळ निवडणूकी पुरता लॉलीपॉप असुन त्यांच्या खोट्या अमिषाला बळी पडू नका. आगामी काळात महाराष्ट्रात आमची सरकार येताच महालक्ष्मी योजने अंतर्गत महिलांना २५०० प्रतिमाह लाभ देणार. ladki bahin yojana money

    सोबतच शाळकरी मुली, महीला यांना विशेष संरक्षण देणारे कठोर कायदे करून महिलांना सन्मानाने बिनधास्त जगण्यासाठी आधार देणार. देशाचे संविधान वाचवण्यासाठी आमच्या लढ्यात सहभागी होऊन आपण महाविकास आघाडीचा भाग व्हा. असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. ladki bahin yojana money

    यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वासु सोंदरकर, कम्युनिस्ट पक्षाचे विनोद झोडगे, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, जिल्हा बँक उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष सुरज मेश्राम, डॉ.नितीन उराडे, अनुसूचित जाती सेलचे प्रमोद मोटघरे, किसान काॅंग्रेस तालुकाध्यक्ष वामन मिसार, कृउबा किशोर राऊत यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

  • Cdcc bank chandrapur : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक पदभरती वरून आरोप-प्रत्यारोप

    Cdcc bank chandrapur चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदभरती वरून सध्या चांगलंच राजकारण तापलं असून मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी संचालक मंडळ पैसे द्या पद घ्या ही प्रक्रिया राबवित असल्याचा आरोप करीत बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर कारवाई करीत त्यांची विधानसभेची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे.

    Cdcc bank chandrapur या आरोपावर बँकेचे अध्यक्ष संतोष रावत म्हणाले की सदर भरती प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने होत असून यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होत नाही आहे, मी निवडणुकीत उमेदवार असल्याने मला हेतुपुरस्सर बदनाम करण्याचा डाव विरोधी पक्षमार्फत सुरू असल्याची प्रतिक्रिया रावत यांनी दिली.

    मनसेचे राजू कुकडे यांचे आरोप काय?

    चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेमध्ये येत्या 15 ते 17 नोव्हेंबर ला 360 पदाकरिता होत असलेली परीक्षा ही वादात सापडली आहे, कारण उच्च न्यायालयात ही भरती प्रक्रिया टी.सी.एस या नामांकित कंपनी मार्फत पारदर्शकपणे पार पाडू असे बँकेमार्फत शपथपत्रावर लिहून देण्यात आले होते आणि त्यानंतरच न्यायालयाने या भरतीस मान्यता दिली, मात्र बैंक अध्यक्ष संतोषसिंग रावत व संचालक मंडळाने ठराव घेऊन आपल्या मार्जिच्या ITI या कंपनीला नोकर भरतीच्या परीक्षेचे काम देऊन न्यायालयाचा अवमान केला आहे.

    अवश्य वाचा : ब्रह्मपुरी मध्ये भाजप पक्षाला खिंडार

    शासनाच्या लाभाच्या अनेक योजना बैंक राबवित असल्याने शासन निर्णयानुसार मागासवर्गीय असलेल्या ओबीसी एससी, एसटी व एनटी उमेदवारांना आरक्षण लागू असतांना त्यांचे आरक्षण रद्द करून आणि अवैध पद्धतीने शैक्षणिक व वयोमर्यादेत बदल करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून 30 ते 50 लाख रुपये ITI कंपनी एजंट व संचालक मंडळाकडून घेतले जात आहे, त्यामुळे या भरतीस पात्र असणाऱ्या सर्व सामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याने आचारसंहितेत बेकायदेशीरपणे घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेची चौकशी करून ही पद भरती रद्द करण्यात यावी अन्यथा जिल्ह्यातील सर्व ओबीसी, एसएसी, एसटी व एनटी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मनसे तर्फे बैंकेच्या भ्रष्ट संचालक मंडळा विरोधात आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे. Cdcc bank chandrapur

    दरम्यान 30/10/2024 ला आचारसहिंता असतांना बैंक अध्यक्ष संतोषसिंग रावत यांनी बैंकेतर्फे गटसचिव व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे व्यवस्थापक व कार्यालयीन नियमीत, कंत्राटी कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करून मतदारास प्रलोभन दिल्याचे स्पष्ट होत असल्याने त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी पण त्यांनी केली.

    मागील कित्तेक वर्षांपासून चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेत नोकर भरती झाली नसल्याने बैंकेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे बोलल्या जात होते, मात्र जेंव्हा जेंव्हा पद भरती करण्याची घोषणा व्हायची तेंव्हा तेंव्हा न्यायालयीन व तांत्रिक बाबीमुळे पद भरती राखडली, आता या पद भारतीला मार्च 2024 ला सहकार आयुक्त पुणे यांच्याकडून टी.सी.एस या नामांकित कंपनी मार्फत परीक्षा घेण्याकरिता मान्यता मिळाली असतांना पाच महिन्यांनतर आचारसहिंता काळात बैंकेचे अध्यक्ष संतोससिंग रावत यांना विधानसभा निवडणुकीत फायदा होण्यासाठी ही पद भरती होत असल्याचे दिसत आहे. Cdcc bank chandrapur


    दरम्यान सध्याचे बँकेचे संचालक मंडळ २०१२ साली अस्तित्वात आले होते व त्यांची ५ वर्षाची मुदत २०१७ सालीच संपली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नोकर भरती प्रक्रिया राबविणे यासारखे धोरणात्मक निर्णय घ्यायचा अधिकार या संचालक मंडळास नाही. बैंकेने जाहिरात काढताना शासनाने ठरवून दिलेल्या आरक्षण धोरणानुसार सर्व प्रवर्गासाठी जागा आरक्षित केल्या नाहीत. कारण यांना गेल्या ५ वर्षांपासून बँकेत तात्पुरत्या स्वरूपात कामावर घेतलेल्या आणि ज्यांच्याकडून नोकरीच्या बदल्यात पैसे घेतले आहेत अशांची निवड यांना करावयाची आहे.

    या जुन्या लोकांना नोकरी देता यावी म्हणून अवैध पद्धतीने वयोमर्यादा शिथिल करणे, शैक्षणिक पात्रतेत बदल करणे व फॉर्म भरण्याची मुद्दत वाढविणे या गोष्टी केल्या आहेत. यामुळे चुकीचे आरक्षण, अवैध पद्धतीने शैक्षणिक व वयोमर्यादेत केलेले बदल हे भरतीस पात्र असणाऱ्या सर्व सामान्य विद्यार्थ्यांवर अन्यायकारकच आहे.

    संचालक मंडळ व नोकर भरती विरोधात न्यायालयात याचिका

    मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बैंकेने दिलेल्या शपथपत्रानुसार नोकर भरतीची कार्यवाही होतांना दिसत नसून न्यायालयाची परवानगी न घेता चुकीच्या पद्धतीने भरती केली जात असल्याबाबत उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. दरम्यान न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होत असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य कार्यवाही करण्याच्या सूचनाही शासनाने बँकेला दिल्या आहेत. या बैंकेच्या संचालक मंडळाची मुदत 2017 लाचं संपून आता जवळपास 6 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असल्याने बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून कायद्यानुसार निवडणुका घ्याव्यात याबाबतची याचिका सुद्धा न्यायालयात अंतिम टप्प्यात आहे. Cdcc bank chandrapur

    बँकेचे विद्यमान अध्यक्ष रावत हे सध्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान आचारसंहिता लागू झाल्यानंतरही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत 19 ऑक्टोबर असतांना पैसे देणाऱ्या विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी ती 22 ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर बँकेच्या अध्यक्ष आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही भरती प्रक्रिया घाई घाईने उमेदवारांना पैशांच्या बदल्यात नोकरी देण्यासाठी राबविली असल्याचे स्पष्ट होते व बैंकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांचा या भरती प्रक्रियेतून निवडणुकीसाठी मोठा निधी उभा करण्याचा मानस असल्याचे सिद्ध होते. Cdcc bank chandrapur

    परंतु ही सर्व भरती प्रक्रिया अवैधरित्या, चुकीच्या पद्धतीने पैशासाठी राबविली जात असल्याने याबाबत शासन, निवडणूक आयोग, न्यायालय, पोलीस विभाग या विविध स्तरांवर अनेक लोकांनी तक्रारी केल्या आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर लवकरच कारवाई होईल आणि भरती प्रक्रिया रद्द होईल त्यामुळे जिल्ह्यातील ओबीसी एससी, एसटी व एनटी च्या सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या भरती प्रक्रियेतून नोकरी लावण्याचे आमिष कोणी देत असेल तर त्या भूलथापांना बळी पडू नका. Cdcc bank chandrapur

    किंबहुना असे कोणी आमिष दाखवत असेल तर त्याची तक्रार पोलिसांकडे करा आणि या चुकीच्या आणि आर्थिक लाभासाठी बेकायदेशीरपणे मागासवर्गीयांचे हक्काचे आरक्षण संपविणाऱ्या बैंक अध्यक्ष संतोषसिंग रावत व संचालक मंडळ यांच्या विरोधात एकत्र या असे आवाहन मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी केले आहे. Cdcc bank chandrapur

    नियमाबाह्य संचालक मंडळ?

    चंद्रपूर जिल्हा बँकेच्या सार्वत्रिक निवडणुका 2012 मध्ये 5 वर्षासाठी झाल्या. वास्तविक पाहता 2017 मध्ये निवडणूक काही न्यायालयीन अडथळा निर्माण झाल्याने अजुनपावेतो निवडणुका झाल्या नाही. या 12 वर्षाच्या कालावधीत संचालक मंडळाविरुद्ध 4 पोलीस/ACB च्या कार्यवाह्या,न्यायालयात चार्ज शीट दाखल, म.रा.सहकारी कायद्याच्या कलम 88 अंतर्गत आर्थिक नुकसान ₹3.47 कोटी वसुलीची कार्यवाही, कलम 79 चे निर्देश इत्यादी अनेक तक्रारी असतांना त्याच संचालक मंडळाकडून नोकर भरती करण्यास सहकार विभाग सहकार्य करून भष्ट्राचारास खतपाणी घालत आहे. Cdcc bank chandrapur

    बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांची प्रतिक्रिया काय?

    विधानसभा निवडणुकीत मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने विरोधकांचे षडयंत्र – संतोषसिंह रावत यांचा आरोप

    मूल – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकर भरती उच्च न्यायालय आणि शासनाच्या निर्देशान्वये पादर्शकपणणे सुरू असतांना काही मंडळी विधानसभा निवडणुकीत मी उमेदवार असल्याने विरोधकांच्या आमिषाला बळी पडून आपल्याला हेतुपुरस्सर बदनाम करू पाहत आहेत. बँकेच्या नोकर भरती बाबत ज्यांना आक्षेप आहे. त्यांना कायदेशीर मार्ग मोकळा आहे. असे मत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले आहे. Cdcc bank chandrapur

    प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी ग्राहकांची मागणी आणि बँकेची निकड लक्षात घेवून शासनाने दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ रोजी ३६० पदे भरण्यास परवानगी दिली, शासनाच्या परवानगी आदेशानुसार बँकेने कार्यवाही सुरू करताच काही जणांनी दबावतंत्राचा वापर करून भरती प्रक्रियेला स्थगिती आणली. याविरूध्द बँक प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात रिट पिटीशन दाखल केली. दाखल रिट पिटीशन नुसार सर्व दस्तऐवजांची पडताळणी करून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने शासनाने बँकेच्या नोकर भरती बाबत दिलेले स्थगिती आदेश रद्द करीत शासन तालीकेतील संस्था/एजंसीकडून बँकेची नोकर भरती करण्यास मान्यता दिली. Cdcc bank chandrapur

    त्यानुषंगाने बँक प्रशासनाने शासनाच्या तालीकेवर असलेल्या टीसीएस कंपनीला नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्यास इच्छुक असल्यास संम्मती कळविण्यास विनंती केली. त्यानुसार प्रथमता टिसीएस कंपनीने होकार दर्शविल्याने टिसीएस कंपनीच्या मागणीनुसार त्यांना आवश्यक असलेली माहिती पुरवून बँकेने करारनामा करण्यास टिसीएस कंपनीला कळविले असता टिसीएस कंपनीने प्रतिसाद दिला नाही. याबाबत बँकेने पाच ते सहा वेळा नोकर भरती संदर्भात टिसीएस कंपनीशी पत्रव्यवहार केला. परंतू टिसीएस कंपनीने करारनामा करण्यास प्रतिसाद दिला नाही. Cdcc bank chandrapur

    या सर्व घडामोळीत पाच ते सहा महिण्यांचा कालावधी लोटून गेल्यानंतर बँक प्रशासनाने पुन्हा शासनाशी पत्रव्यवहार केला. त्या दरम्यान शासनाने राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती करीता नव्याने सहा संस्था/एजंसीचे पॅनलची नामावली बँकेला कळविली. टिसीएस कंपनीने बँकेशी करारनामा न केल्यामूळे बँकेने शासनाच्या तालीके मधील इतर संस्थाशी पत्रव्यवहार करून नोकर भरती संदर्भात प्रस्ताव मागविले. Cdcc bank chandrapur

    प्राप्त प्रस्तावाची छाणनी अंती सर्वात कमी दर असलेल्या कंपनीचे दरपत्रक मान्य करत त्या एजंसीकडून नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मान्य करण्यांत आल्यानंतर बँकेच्या नोकर भरती बाबत नियमानुसार व पारदर्शपणाने कार्यवाही सुरू केली. नोकर भरती संदर्भातील ही प्रक्रिया विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीपासून सुरू आहे. आचारसंहितेच्या कालावधीत राज्यातील इतरही विभागाकडून नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्यांत येत आहे, त्यामूळे बँकेच्या नोकर भरती संदर्भात आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचा आरोप निराधार असल्याचेही मत संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले. Cdcc bank chandrapur

    शासनाच्या विधी व न्याय विभाग तसेच सहकार आयुक्त यांचे निर्देशाप्रमाणे ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडे शासनाचे भाग भांडवल नाही, त्या बँकाना आरक्षण अधिनियम २००१ लागु होत नाही, त्यामूळे आरोपकर्त्यांनी नोकर भरती प्रकियेत आरक्षणा संदर्भात भ्रम निर्माण करून जनतेची दिशाभूल करू नये. असा सल्ला संतोषसिंह रावत यांनी दिला.

    गटसचिवांना सानुग्रह अनुदान वितरीत केल्याच्या मुद्द्याचे खंडण करतांना संतोषसिंह रावत यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका शेतकरी बंधु आणि भगिनींना पिक कर्ज व शेती पुरक कर्ज बँकेला संलग्न असलेल्या सेवा सहकारी संस्था/वि.का./आदिवासी वि.का. संस्थांच्या मार्फतीने करीत असतात. संबंधीत संस्थेचे गटसचिव यांना त्यांच्या दैनदिन कामात प्रौत्साहन मिळावे करीता बैंक कित्येक वर्षांपासून दिवाळीच्या काळात दिवाळीचा सण उत्साहाने साजरा करता यावा म्हणून सानुग्रह अनुदान वितरीत करीत आहे. त्यानुसारच गटसचिवांना सानुग्रह अनुदान वितरीत करण्यांत आले. Cdcc bank chandrapur

    यामध्यें कोणत्याही प्रकारच्या आचारसंहितेचे उल्लंघन झाले नाही. याची जाणीव असतांना काही मंडळी शासनाच्या सदर पत्राचे अवलोकन किंवा वास्तविकता न तपासता नोकर भरती बाबत पुरावे असल्याचे पोकळ वल्गना करून विधानसभा निवडणुकीत निष्कारण त्रास देण्याच्या उद्देशाने आपल्याविरूध्द बिनबुडाचे आरोप करीत आहे. हे विरोधकांचे षडयंत्र असल्याचे मत बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले.

  • Mla Vijay Wadettiwar : ब्रह्मपुरीत भाजपला खिंडार

    Mla Vijay Wadettiwar राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांची सामाजिक बांधिलकी, सर्व समाजाला न्याय देण्याहेतू सुरु असलेले अथक प्रयत्न, सामान्यांप्रती असलेली आपुलकी, सामान्य कार्यकर्त्यांची जाण व क्षेत्रात सुरू असलेल्या विकास कामांचा झंजावत तसेच भोई समाजाला  यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत हजारोंच्या संख्येने मिळवून दिलेले घरकुले अशा विविध कार्यामुळे प्रेरित होऊन ब्रम्हपूरी तालुक्यातील रणमोचन येथील भोई समाजाच्या अनेक भाजप कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

    Mla Vijay Wadettiwar गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपूरी तालुक्यात हजारोंच्या संख्येने असलेल्या भोई समाज बांधवांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घरकुल मिळवून दिले. तसेच सर्व समाजाप्रती त्यांची आदर भावना, ब्रम्हपूरी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय, मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी विवीध विकासकामे, रोजगार, शिक्षण, आरोग्य अशा विविध कार्यातून त्यांनी मतदारसंघातील जनतेची मने जिंकली आहे.

    गुन्हेगारी : रामनगर पोलिसांची धडक कारवाई

    विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सर्वसमावेशक सामाजिक, राजकीय व विकासात्मक दूरदृष्टीकोण तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अपेक्षांची जाण असणारा नेता म्हणून या सामाजिक भावनांनी प्रेरित होवून रणमोचन येथील भोई समाजाच्या भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. Mla Vijay Wadettiwar

    आयोजित प्रवेशाप्रसंगी मार्गदर्शन पर बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, मी सामन्यातून आलो असल्याने मला सामान्य कार्यकर्त्यांची जाण आहे. मला प्रत्येक समाजाला समान न्याय देणे, त्यांचा हक्क मिळवून देण्याची शक्ती ही तुमच्या कडूनच मिळाली आहे. तुमच्या विश्वासाला मी तडा जावू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

    यावेळी सर्व कार्यकर्त्यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काॅंग्रेस पक्षाचा दुपट्टा टाकून काँग्रेस पक्षात प्रवेश स्वीकारत स्वागत केले. Mla Vijay Wadettiwar

    आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, बाजार समितीचे संचालक सोनू मेश्राम,अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सरचिटणीस डि.के.मेश्राम, माजी सरपंच मंगेश दोनाडकर, विलास मेश्राम, संदीप मांदाळे, माजी उपसरपंच तारकेश्वर तोंडरे, ग्राम काॅंग्रेस अध्यक्ष संजय प्रधान, पुरूषोत्तम मैंद, महेश प्रधान, परमात्मा संगतसाहेब, नामदेव गुरनूले, अमित दोनाडकर व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

    यावेळी पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये विकास मेश्राम, देवानंद मेश्राम, रामचंद्र मेश्राम, गिरीधर दिघोरे, दिगांबर दिघोरे, दिनेश दिघोरे, सावजी मेश्राम, सुखदेव मेश्राम, जगदीश मेश्राम, विनोद मेश्राम, सुरेश शिवुरकार, सुभाष मेश्राम, दादाजी मेश्राम, आनंदराव मेश्राम, पंकज मेश्राम, कार्तिक मेश्राम, वामन मेश्राम, मनोहर तोंडरे, किशोर मैंद यांसह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

    भाजपला खिंडार

  • ram nagar police : रामनगर पोलिसांचे अवैध धंद्यावर कारवाई सत्र

    ram nagar police विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच पोलिसांचे अवैध धंद्याविरुद्ध कारवाई सत्र सुरू झाले, चंद्रपुर पोलीस दलातील रामनगर पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व अवैध रेती वाहतुकीवर कारवाई केली आहे.

    ram nagar police 30 ऑक्टोबर रोजी रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवैध सुगंधित तंबाखू घेऊन जाणाऱ्या युवकाला अटक केली, एक युवक दुचाकी वाहनाने सुगंधित तंबाखू घेऊन जात असल्याची माहिती सहायक पोलीस देवाजी नरोटे यांना मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत बंगाली कॅम्प रोड येथे दुचाकी क्रमांक MH34 BU 8946 ला थांबवित त्याची झडती घेतली असता सदर वाहनात प्लॅस्टिक च्या चुंगडी मध्ये 18 हजार 760 रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व एकूण मुद्देमाल 88 हजार 760 सहित 21 वर्षीय अजय राजू झाडे रा. इंदिरानगर, पंचशील चौक याला अटक केली.

    राजकीय : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात रडीचा खोटा डाव

    आरोपी युवक अजय झाडे हा बाबूपेठ मार्गाने बंगाली कॅम्प कडे सुगंधित तंबाखूची वाहतूक करीत होता.

    दुसऱ्या कारवाईत रामनगर पोलिसांनी 1 नोव्हेंबर ला गुन्हे शोध पथक गस्तीवर असताना बंगाली कॅम्प चौक ते सावरकर चौक मार्गे अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रक क्रमांक MH34 BG 2216 मधील चालक प्रवीण बाबुराव गुरनुले व नरेश विलास वाढई यांना ट्रक मध्ये असलेल्या रेती परवाना बाबत विचारले असता त्यांनी रेतीचा परवाना नसल्याचे सांगितले. ram nagar police

    विशेष बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील एकही वाळू घाटाचा लिलाव झाला नसल्याने अधिकृतपणे वाळू घाट सुरू झालेले नाही, त्यामुळे रामनगर पोलिसांनी दोन्ही आरोपीस ताब्यात घेत 5 ब्रास रेती किंमत 30 हजार व हायवा ट्रक किंमत 25 लाख असा एकूण 25 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ram nagar police

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक असिफ रजा शेख यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सपोनि देवाजी नरोटे, पोलीस कर्मचारी हिमांशू उगले, पेतरस सिडाम, शरद कुडे, सचिन गुरनुले, प्रशांत शेंदरे, आनंद खरात, लालू यादव, अमोल गिरडकर, हिरालाल गुप्ता, रविकुमार ढेंगळे, संदीप कामडी, पंकज ठोंबरे, मनीषा मोरे, ब्युलटी साखरे यांनी केली.

  • Candidate Vijay Wadettiwar : सरकारला सत्तेतून हद्दपार करा – विजय वडेट्टीवार

    Candidate Vijay Wadettiwar आगामी २० नोव्हेंबर रोजी राज्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी तालुक्यांतील विविध गावातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत राज्यातील भ्रष्ट महायुती सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी काँग्रेस काळात झालेला विकास, नागरीकांना मिळालेल्या विवीध योजनांचा लाभ व संपुर्ण विकासाबाबत माहिती देऊन जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले.

    राजकीय : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात रडीचा खोटा डाव

    Candidate Vijay Wadettiwar राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. अशातच काँग्रेस नेते, तथा राज्याचे विरोधी पक्षनेते , आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी तालुक्यांतील उदापूर, निलज, पारडगाव, रणमोचन, रुई, बेटाळा, खरकाडा, पाचगाव येथील ग्राम काँग्रेस कमिटी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक घेऊन संवाद साधला.

    यावेळी मार्गदर्शनपर बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील भ्रष्ट महायुती सरकार काळात सत्ताधाऱ्यांकडून राज्याची तिजोरी लुटल्या गेली. Candidate Vijay Wadettiwar

    आता निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने, विवीध प्रलोभने दाखवून जातकरणाच्या गुंत्यात गुरफटण्याचा रडीचा डाव, मनुवादी विचारांच्या भाजपवाल्यांनी सुरु केला आहे.यांच्या भूलथापा व खोटारड्या आमिषांना आपल्या विधानसभा क्षेत्रांतील नागरीकांना बळी न पडू देता गेल्या १० वर्षात मी खेचून आणलेला कोट्यावधींचा विकास निधी, पुर्णत्वास आलेली लोकउपयोगी विकास कामे, सामजिक कार्य, यांची इत्यंभूत माहिती व काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण तसेच विकासात्मत विचार जनसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून राज्यातील भ्रष्ट सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन त्यांनी उपस्थीत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. Candidate Vijay Wadettiwar

    आयोजित बैठकीस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वासु सोंदरकर, कृउबा संचालक किशोर राऊत, कृउबा संचालक सोनू मेश्राम, अॅड आशिष गोंडाणे, अनुसूचित जाती सेलचे मुन्ना रामटेके, किसान काॅंग्रेस तालुकाध्यक्ष वामन मिसार, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष गुड्डु बगमारे, कृउबा संचालक दिवाकर मातेरे, कृउबा संचालक संजु राऊत, अण्णा ठाकरे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष मोहसीन कुरेशी, निनाद गडे, अतुल राऊत, देवचंद ठाकरे, प्रा.चंद्रशेखर गणवीर, रविंद्र ढोरे, योगेश ढोरे, योगेश तुपट, विजय नाकतोडे, मंगेश दोनाडकर, विलास मेश्राम, पिंटू पिल्लेवान, दादाजी ढोरे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

  • Chandrapur Assembly Election : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात रडीचा खोटा डाव..!

    Chandrapur Assembly Election प्रेम आणि युद्धात सगळं मान्य असतं, अशी म्हण आहे मात्र ही म्हण राजकारणात शिरल्याने त्यामध्ये सगळंच मान्य असते अशी प्रचिती सिद्ध होत आहे.

    Chandrapur Assembly Election नुकतेच राज्यात विधानसभा निवडणुकीचा शंखनाद झाला, अनेक इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली मात्र त्यामध्ये अनेकांना तिकीट नाकारण्यात आले, विशेष बाब म्हणजे राष्ट्रीय पक्षात हा प्रकार मोठ्या प्रमाणात घडला असून आता त्याच पक्षातील बंडखोर आव्हान द्यायला तयार झाले आहे, मात्र हे करताना चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात रडणारे नेते असा उदय झाला, आणि त्या भावनेत खोट्या शब्दांचा एक उड्डाणपूल निर्माण करण्यात आला मात्र आप जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी त्या खोट्या उड्डाणपूलाला काही क्षणात जमीनदोस्त केले.

    चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवार हे रिंगणात आहे, निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करीत जोरगेवार यांनी तिकीट हिसकावली असे रडगाणं सध्या चंद्रपुरात जोरात वाजतंय, आणि ते खुद्द भाजपचे माजी सदस्य ब्रिजभूषण पाझारे वाजवीत आहे. Chandrapur Assembly Election

    त्यांनी नुकतंच स्थानीय वाहिनीला मुलाखत दिली की माझ्यावर जोरगेवार यांनी अन्याय केला, माझ्या तोंडचा घास त्यांनी हिसकावून घेतला, ज्या दिवशी जोरगेवार यांच्या आई अम्मा उर्फ गंगुबाई जोरगेवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाला त्यादिवशी मी त्यांच्या चरणी स्पर्श करीत तुमच्या मुलाने माझ्यावर अन्याय केला मात्र मला आशीर्वाद द्या अशी माहिती पाझारे यांनी त्या मुलाखतीत सामायिक केली.

    अम्मा चं निधन झालं त्यावेळी आमदार किशोर जोरगेवार हे राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाच्या संपर्कात होते, त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला होता, पण ऐनवेळी त्यांना थांबण्यास सांगितले, जोरगेवार घरी परतले व आपण आता अपक्ष निवडणूक लढू असे सांगितले पण नियतीला काही वेगळंच मान्य होते, भाजपच्या जेष्ठ नेत्यांनी जोरगेवार यांना उमेदवारी देण्याचा निर्धार केला. Chandrapur Assembly Election

    विशेष बाब म्हणजे भाजपच्या सर्व्हेत जोरगेवार हे अव्वल स्थानी होते, ग्रामपंचायत, महानगरपालिका, जिल्हापरिषद निवडणूक किंवा विधानसभा व लोकसभा यामध्ये भाजप आपला सर्व्हे करतो त्यामध्ये ज्या नावाला पहिल्या क्रमांकाची पसंती मिळते त्याला पक्ष उमेदवारी देत असतो.

    मात्र हे पाझारे समजू शकले नाही त्यांनी भावनेच्या भरात अम्मा चं नाव काढलं आणि चुकले, त्यांनी खोटं भाष्य का केलं असावं? हा चर्चेचा विषय आहे, पण जिल्ह्यातील राजकारण्यांनी प्रामाणिकपणे निवडणूक लढवावी, आपण कोणत्या मुद्द्यावर लढू शकतो यावर विचार करावा अशी प्रतिक्रिया आप चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी समाजमाध्यमातून दिली आहे. Chandrapur Assembly Election

    जनता अश्या खोट्या राजकारणाला बळी पडणार नाही, प्रामाणिक पणे काम करा असा सल्ला राईकवार यांनी दिला आहे.

    स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखती मध्ये पाझारे म्हणतात की चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे, रस्ते नाही, पाण्याची समस्या कायम आहे पण पाझारे साहेब आपण सलग 30 वर्षे भाजपात होता, पालकमंत्री आपले होते तर त्यांना सदर बाब आपण लक्षात का आणून दिली नाही? अमृत पाणी पुरवठा योजना ही केंद्राची आहे त्यावर आपण सत्तेत असताना कधी बोलला काय? प्रदूषणावर आपण आपली भूमिका कधी मांडली काय? जटपुरा गेट च्या वाहतूक कोंडीचा विषय खुद्द पालकमंत्री मुनगंटीवार यांनी हाती घेतला होता त्यावर अनेकदा बैठका घेण्यात आल्या, आमदार जोरगेवार यांनी सुद्धा अनेक प्रयत्न वाहतूक कोंडी सुटावी यासाठी केले होते, मात्र त्या काळात आपण कुठे होता? याचा थांगपत्ता नाही. Chandrapur Assembly Election

    आपण दर विधानसभा निवडणुकीमध्ये काही दिवसांपूर्वी सक्रिय होतात आणि नंतर असक्रिय होतात हे जनतेने बघितले आहे.

    ब्रिजभूषण पाझारे यांना तिकीट नाकारले त्यानंतर ते धाय मोकलून रडले, माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर जोरगेवार यांनी अन्याय केला असं रडगाणं त्यांनी सुरू केले आहे, पण वर्ष 2009 मध्ये किशोर जोरगेवार यांना विधानसभेचे तिकीट नाकारले होते त्यावेळी ते रडले नाही पण पक्षासोबत लढले, व नाना श्यामकुळे यांना विजयी करून दाखविले. Chandrapur Assembly Election

    वर्ष 2014 पूर्वी जोरगेवार यांनी पुन्हा पक्षाला तिकीट मागण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी त्यांना पुन्हा नाकारले मात्र त्यांनी भाजपला राम राम करीत शिवसेनेतून निवडणूक लढवली आणि 50 हजार मते प्राप्त करीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

    गुन्हेगारी : चंद्रपुरातील खंजर भाई जवळ मिळाली बंदूक

    वर्ष 2014 ते 2019 पर्यंत किशोर जोरगेवार जनतेत गेले, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्या पूर्ण कशा होतील यावर अनेक आंदोलने केली आणि 5 वर्षांनी अपक्ष म्हणून त्यांनी 72 हजारांचे मताधिक्य घेत भाजपच्या उमेदवाराचा विजयी रथ थांबविला. जोरगेवार त्या काळात रडले नाही ते जनतेच्या समस्या सुटाव्या यासाठी लढले आणि जिंकले.

    कोरोना काळात त्यांनी गोर गरीब जनतेची मदत केली, निराधार नागरिकांना पोटभर जेवण मिळावे यासाठी अम्मा का टिफिन सुरू केला व आजही तो उपक्रम सुरू आहे. आपण म्हणता 200 युनिट पूर्ण झाले नाही पण सोलर आल्याने जोरगेवार यांनी जनतेला सबसिडी मिळावी यासाठी प्रयत्न का केला नाही असा पोरकटपणाचा प्रश्न यावेळी उपस्थित केला, पाझारे जी प्रधानमंत्री सुर्यघर योजनेत 3 kv सोलर साठी 78 हजारांची सबसिडी आहे हे आपण विसरला वाटतं. Chandrapur Assembly Election

    आपण निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उभे आहेत प्रामाणिकपणे निवडणूक लढली तर आपल्याला त्याचा लाभ होणार, भाजप सोडल्यावर सुद्धा आपण भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीला जात आहे, त्यांच्यासमक्ष रडत आहे, जनतेत तरी जा, कारण जनता आपला आमदार ठरविणार आहे, भाजप कार्यकर्ते नाही, आपण पक्ष सोडला पण कार्यकर्ते नाही अशी प्रचिती लोकांच्या मनात निर्माण होऊ नये म्हणजे झालं.

    या सर्व प्रकरणी प्रामाणिक राजकारण म्हणजे कसं आणि काय हे आप जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी चांगलंच समजविले आहे.

    क्रमशः…

  • BJP candidate Kishor Jorgewar : आमदार किशोर जोरगेवार यांचा झंझावात

    BJP candidate Kishor Jorgewar भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. ही निवडणूक कोणत्याही एका उमेदवाराची नसून भाजपची आणि पर्यायाने प्रत्येक कार्यकर्त्याची आहे.

    BJP candidate Kishor Jorgewar आपल्या संघटनेच्या बांधणीतून प्रत्येक घरी पक्षाचे विचार पोहोचवायचे असून विजयाचा संकल्प करत पक्षाच्या धोरणांचा प्रचार प्रभावीपणे करण्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    गुन्हेगारी : चंद्रपुरातील खंजर भाई जवळ मिळाली बंदूक

     भारतीय जनता पक्षाच्या पाचही मंडळांची स्वतंत्र बैठक पार पडली. या बैठकीला संबोधित करताना आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा महानगर अध्यक्ष राहुल पावडे, विधानसभा प्रमुख प्रमोद कुडू, महिला मोर्चा महानगर अध्यक्ष सविता कांबळे, महामंत्री किरण बुटले, बंगाली कॅम्प मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, बाबुपेठ मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, सिव्हिल लाईन मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, बाजार मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, तुकुम मंडळ अध्यक्ष पुरुषोत्तम सहारे, वंदना हातगावकर, सायली येरणे, अमोल शेंडे, विश्वजीत शहा, जितेश कुळमेथे, रुपेश पांडे, मुकेश गाडगे, राशिद हुसेन, प्रतिक शिवणकर, मुन्ना जोगी, सलिम शेख, मंगेश अहिरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. BJP candidate Kishor Jorgewar

     यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आपला पक्ष न्याय, समानता आणि विकासावर आधारित विचारधारेवर उभा आहे. आपल्या एकतेने हाच विचार समाजात पोहोचवायचा आहे. आपल्या पक्षाच्या धोरणांतून समाजाचा सर्वांगीण विकास कसा होईल, हे प्रत्येक व्यक्तीला पटवून सांगण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्यासारखे एकजुटीने कार्य करणारे कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या पाठीशी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आपल्या चेहऱ्यांवर असलेला आत्मविश्वास आणि उत्साह पाहून मला विश्वास आहे की कोणतेही आव्हान आपल्याला थांबवू शकणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. BJP candidate Kishor Jorgewar

     आज भारतीय जनता पक्षाच्या पाचही मंडळांची बैठक संपन्न होत आहे. हे मंडळ खऱ्या अर्थाने पक्ष मजबुतीचे केंद्र आहेत. पक्षाकडून आलेला आदेश या मंडळांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आपली जबाबदारी अधिक असणार आहे. या पाचही मंडळांत येणाऱ्या वार्डांमध्ये आपण अनेक विकासकामे केली आहेत. मूलभूत सोयी-सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. याचा मोठा फायदा आपल्याला जमिनीच्या स्तरावर काम करताना होणार असल्याचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

    या बैठकीला भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Sambhaji Brigade : भूषण फुसे यांच्या नेतृत्वात असंख्य नागरिकांचा संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश

    Sambhaji Brigadeभूषण फुसे यांच्या नेतृत्वावर विश्वास वाढला, गडचांदूरात शेकडो युवक, पुरुष व महिलांचा संभाजी ब्रिगेड पक्षा मध्ये प्रवेश


    Sambhaji Brigade गडचांदूर – कोरपना तालुक्यात संभाजी ब्रिगेडमध्ये युवक, पुरुष व महिलांचे इनकमिंग सुरू झाले असून सामाजिक कार्यकर्ते भूषण मधुकरराव फुसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गडचांदूरात शेकडो युवक, पुरुष व महिलांचा संभाजी ब्रिगेड पक्षा मध्ये प्रवेश केला.

    गुन्हेगारी : चंद्रपुरातील खंजर भाई कडे मिळाली बंदूक

    शिवश्री भूषण मधुकरराव फुसे यांनी दुपट्टा टाकत सर्वांचे स्वागत केले. कोरपना तालुक्यातील चेन्नई खुर्द येथील मनसे उपाध्यक्ष दशरथ गेडाम, जांभुळदरा येथील कोरपना तालुका सोसायटी अध्यक्ष चंदुलाल शेडमाके यांनी सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्ष प्रवेश केला.

    गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्र पिंजून काढत जनसंपर्क वाढविला आहे. डिस्को डांस, लावणी, डिस्को दांडिया, ठुमका, झुमका, नट्या, पार्ट्या अश्या कार्यक्रमांना बगल देत भूषण फुसे यांनी सामाजिक चळवळीतून प्रा. लक्ष्मण यादव. प्रा. वसंत हंकारे, भक्तिमय माता जगराता, कोणतीही गाजावाजा न करता गरजवंतांना वेळोवेळी सहाय्य्य, गोर, गरीब कष्टाळू लोकांचे कामे न करणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना तंबी, वेळ प्रसंगी दे दणका अश्या कामांना बघत शोषित-वंचित लोकांचा मोठा वर्ग भूषण फुसे यांच्या कडे आकृष्टल्या जात आहे. त्याचीच हि परिणीती असून गडचांदूरात शेकडो युवक, पुरुष व महिलांचा संभाजी ब्रिगेड पक्षा मध्ये प्रवेश घेतला.

  • Local Crime Branch : चंद्रपुरातील “खंजर’ भाई जवळ मिळाली बंदूक

    Local Crime Branch राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रशासन निवडणुकीच्या कामाला लागले असून पोलीस प्रशासन सुद्धा गुन्हेगारी वृत्ती ठेचण्याच्या मोहिमेत अग्रेसर दिसत आहे.

    राजकीय : कार्यकर्त्यांनी केला निर्धार, अब की बार किशोर जोरगेवार

    Local Crime Branch आदर्श आचारसंहितेच्या काळात स्थानिक गुन्हे शाखा अवैध धंद्यावर कारवाई सत्र राबवित आहे, या सत्रा दरम्यान गुन्हे शाखेने ‘खंजर” भाई कडून बंदूक व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

    22 वर्षांचा तरुण जो मजुरी करतो त्याच्याजवळ बंदूक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या तरुणाला शोधणे सुरू केले.

    महाकाली कॉलरी प्रभागातील आनंद नगर येथे राहणाऱ्या 22 वर्षीय शुभम उर्फ खंजर भाई संजय वासेकर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने wcl area रेती बंकर, बाबा नगर बायपास येथे ताब्यात घेत त्याच्या जवळून गावठी देशी कट्टा व एक जिवंत काडतूस असा एकूण 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    आरोपी खंजर भाई वर आर्म ऍक्ट अंतर्गत विविध कलमांव्ये शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.