Tag: MH34

  • Battle of the Constitution : ही मनुस्मृती विरुद्ध संविधानाची लढाई – विजय वडेट्टीवार

    Battle of the Constitution गेल्या दहा वर्षात केंद्रातील मोदी सरकारने जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून केवळ व्यापारी हित जोपासत देशातील गोरगरीब जनतेला महागाईच्या आगीत झोकले.

    Battle of the Constitution आज तरुणांपुढें रोजगाराचा गंभीर प्रश्न, मुली, महिलांवरील वाढलेले अत्याचाराचे प्रमाण, बेपत्ता झालेल्या  महिलांचा अजूनही शोध नाही. याचा राज्यातही समान अनिष्ट परीणाम जाणवत आहे.

    भाजपचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस चंद्रपुरात

    या विवीध कारणांमुळे देश व राज्यातील जनता प्रचंड त्रस्त झाली आहे. आता होऊ घातलेली महाराष्ट्राची निवडणूक हि देशाला नवी दिशा देणारी असुन मनुस्मृतीच्या विळख्यातून देश वाचवायचा असेल तर मनुस्मृती विरूध्द सुरु असलेल्या संविधान बचावच्या लढाईत सहभागी व्हा असे आव्हान राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.ते सावली तालुक्यांत कार्यकर्ता संवाद बैठकीत मार्गदर्शनक म्हणून बोलत होते. Battle of the Constitution

    विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी  सावली तालुक्यातील सिर्सी, साखरी, हरंबा, लोंढोली, कडोली, डोनाळा, उपरी, कापसी, नीलसनी, व्याहाड (बूज) वाघोली (बुटी) गाव भेटीतून काँग्रेस तसेच महाविकास आघाडी व सर घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची संवाद साधला.

    यावेळी मार्गदर्शनपर बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजपा तथा महायुतीने प्रत्येकाला १५ लाख देऊं अशी खोटी आमिषे दाखवून केंद्रात सरकार स्थापन केली. यानंतर स्वाय्यत संस्थांना हाताशी धरून पक्ष फोडीसाठी कट कारस्थान रचून महाराष्ट्राच्या संस्कृतीला बदनाम केले. पक्ष फोडले, लोकांची घरे फोडली.शिवरायांचा पुतळा निर्मितीत कमिशन खोरी करून त्यांचा अपमान केला. Battle of the Constitution

    खोटी आश्वासने पोकळ योजना, जाती धर्मामध्ये विभागून सत्ता प्राप्तीसाठी वाट्टेल ते प्रकार महायुती कडून सुरु आहे. मात्र देशांतील व महाराष्ट्रातील सुज्ञ जनता यांनी महायुतीला नाकारून लोकसभेत संविधान वाचवण्यासाठी लढाई लढली. हेच महापापी सरकार आता 15 लाखावरुन 1500 वर आले असून महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडून लाडकी बहीण योजना घेऊन मिरवत आहे. अशी टीका देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील महायुती सरकारवर केली.

    संकट अजूनही टळलेले नाही. येत्या 20 नोव्हेंबर रोजी देशातील व राज्यातील बहुजनांना गुलाम बनवू पाहणाऱ्या,महाराष्ट्राचे वैभव व स्वाभिमान गुजरात चरणी गहाण ठेवणाऱ्या महाराष्ट्रातील सत्तापीपासू महायुतीला आपल्या मतदानातून धडा शिकवून त्यांची जागा दाखवा असे आवाहनही त्यांनी उपस्थित त्यांना केले.

    आयोजित बैठकीस सावली तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहने, राकेश गड्डमवार, विजय कोरेवार, किशोर गड्डमवार, कृष्णा राऊत,किशोर कारडे, संजय मेश्राम, अविनाश भुरसे, किशोर घोटेकर,तथा महाविकास आघाडी पदाधिकारी, सर्व ग्राम काँग्रेस अध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Today Chhath Puja : छट पूजा कार्यक्रमात आमदार जोरगेवार यांची उपस्थिती

    Chhath Puja प्रकृतीचे महत्त्व पटवून देणार्या छट पूजा उत्सवांसाठी घाटांचा विकास करण्याचा संकल्प – आ. किशोर जोरगेवार, छट पूजेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांमध्ये किशोर जोरगेवार यांची हजेरी

    Chhath Puja छट पूजा ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून, आपली श्रद्धा, संस्कृती आणि कुटुंबाचे बळ एकत्र येण्याचा पर्व आहे. आपल्या छट पूजेचा उत्सव हा सूर्यदेवाच्या आराधनेचा पवित्र सोहळा असून, सूर्यदेवाच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात प्रकाश, ऊर्जा, आणि समृद्धी नांदावी, अशी कामना करत प्रकृतीचे महत्त्व पटवून देणाऱ्या छट पूजेसाठी चंद्रपूरातील घाटांचा विकास करण्याचा आपला संकल्प आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

    कांग्रेसवर कडाडले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार


    दर वर्षी प्रमाणे यंदा ही चंद्रपूरात छट पूजा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. रामाळा तलाव, महाकाली काॅलरी, लालपेठ शिव मंदिर, दुर्गापूर येथे छट पूजेच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित राहून पूजा अर्चना केली. Chhath Puja


    यावेळी ते म्हणाले, “चंद्रपूरात उत्तर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. या शहराच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. आज आपला पवित्र सण आहे. आपण नेहमीच या सनानिमित्त आपल्याकडून आलेल्या सूचनांची दखल घेतली आहे. घाट स्वच्छता आणि सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे नेहमीच आमचे प्रयत्न राहिले आहेत.

    चंद्रपुरातील अट्टल गुन्हेगार कारागृहात स्थानबद्ध

    या समाजाचे आपल्यावर विशेष प्रेम राहिले आहे. मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात सर्व समाजाला समान न्याय देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे आपल्याला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आमचे प्रथम प्राधान्य राहील आणि पुढेही आपल्या हाकेला साथ मिळणार,” असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.


    छट पूजेचा पवित्र पर्व आपल्याला संयम, श्रद्धा आणि सहनशीलतेची शिकवण देतो. सूर्यदेवाच्या उपासनेतून मिळणारी ऊर्जा केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीही प्रेरणा देते. छट पूजा ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे, आणि मातृशक्तीच्या सामर्थ्याचा प्रतीक आहे.

    माताभगिनींनी आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी घेतलेले हे तप, हे व्रत यामध्ये एक समर्पण भाव असतो. त्यांचे धैर्य आणि श्रद्धा हे समाजासाठी एक प्रेरणादायक उदाहरण आहे, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

  • Exclusive Sudhir Mungantiwar : कांग्रेसवर कडाडले सुधीर मुनगंटीवार

    Sudhir Mungantiwar काँग्रेस राजवटीत गरीब आणखी गरीब होत गेला आणि नेते धनवान होत गेले. डीबीटीसारख्या योजना आणल्या असत्या तर ही वरकमाई बंद झाली असती. पण आपलं पाप लपविण्यासाठी काँग्रेस खोटा डाव खेळत आहे, अशी टीका राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

    Sudhir Mungantiwar संविधान बदलेल अशी भीती काँग्रेस दाखवत आहे. पण संविधानाची पायमल्ली करीत काँग्रेसनेच आणीबाणी लागू केली होती, याचाही मुनगंटीवारांनी आवर्जून उल्लेख केला.

    चंद्रपुरात कुख्यात गुन्हेगारांची दहशत, पोलिसांनी केले स्थानबद्ध

    एका मुलाखतीत ते बोलत होते. इंदिरा गांधी यांच्या काळापासून बेरोजगारीचा प्रश्न आहे. तेव्हापासून हा प्रश्न काँग्रेसने चिघळत ठेवला. मात्र महाराष्ट्रात बेरोजगारीच्या मुद्द्यावर महायुतीचं सरकार व्यापकपणे काम करीत आहे. मोठे उद्योग महाराष्ट्रात येत आहेत. काँग्रेसच्या राजवटीत विदर्भाचा विकास झाला नाही. पण आता चंद्रपूरसह विदर्भातील खेड्यापाड्यांपर्यंत विकास पोहोचला आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले. Sudhir mungantiwar

    काँग्रेसकडून भ्रष्टाचाराला खतपाणी
    काँग्रेसने भ्रष्टाचाराला खतपाणीच घातले. मात्र नरेंद्र मोदी यांचे सरकार येताच डीबीटी योजना सुरू झाली. आता कोणत्याही अधिकाऱ्याच्या हातात रोख रक्कम येत नाही. प्रत्येक योजनेचे पैसे थेट लाभार्थी व्यक्तीच्या खात्यात जातात, याचाही त्यांनी उल्लेख केला.

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात केटलीने वाढविले टेन्शन

    गरिबी नव्हे गरीब हटले
    काँग्रेसने सामान्यांचा पैसा लुटला. एवढा की कुबेराचा खजिनाही त्याच्यापुढे छोटा दिसेल. काँग्रेसने फक्त गरीबी हटाओचा नारा दिला. गरिबी तर हटली नाही, मात्र गरीब हटले. अगदी नेहरूपासून तर आता राहुल गांधी यांच्यापर्यंत हाच नारा सुरू आहे. खरंच गरीबांचे दु:ख दूर करण्यासाठी इतके वर्ष लागतात का, असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

  • pravin kakade : प्रवीण काकडे यांच्या उपस्थितीत असंख्य युवकांचा कांग्रेस पक्षात प्रवेश

    pravin kakade महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच बिगुल वाजल्यापासून राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात प्रचाराला सुरुवात झाली आहे.

    pravin kakade वरोरा विधानसभा क्षेत्राला महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारावर बंडखोरीचे ग्रहण लागले असले तरी वरोरा विधानसभा क्षेत्रातील जनतेचा महाविकास आघाडीचे, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रविण काकडे यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

    प्रामाणिक राजकारणाला विरोधक घाबरले

    महाविकास आघाडीचे उमेदवार प्रविण काकडे यांनी प्रचाराचा नारळ फोडला असून प्रचारादरम्यान आज दि. 07 नोव्हेंबर 2024 रोजी असंख्य युवकांनी कॉग्रेस पक्षावर तसेच खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रविण काकडे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात रितसर प्रवेश केला.

    यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना प्रविण काकडे म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा धर्म निरपेक्ष पक्ष असून सर्व समावेशक आहे. तुम्ही माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही. कुठल्याही कठीण प्रसंगी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

    चंद्रपुरातील अट्टल गुन्हेगाराला केले स्थानबद्ध

    यावेळी मुकेश चांदेकर, दिपक चव्हाण, कपिल राऊत, मोसिन शेख यांसह अनेक युवकांनी प्रवेश घेतला. या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षात नविन ऊर्जा संचारणार आहे.

  • honest politics : राजुरा विधानसभा क्षेत्रात प्रामाणिक राजकारणावर विरोधकांनी खेळला रडीचा डाव

    honest politics गडचांदूरात ॲड. वामनराव चटपांच्या बॅनरची विटंबना, विरोधकांचे खालच्या स्तराचे राजकारण निषेधार्ह- विलास धांडे

    honest politics गडचांदूर: विधानसभेची रणधुमाळी गाजू लागली आहे. दिवसेंदिवस ॲड. वामनराव चटप यांना मिळणाऱ्या जनतेचा पाठिंबा वाढताना दिसतोय. ॲड. वामनराव चटप यांची प्रचारातली आघाडी बघून विरोधकांचे धाबे दणाणले आहे. ॲड. वामनराव चटप यांचे गडचांदूर शहरातील पोलीस स्टेशन जवळ प्रचार बॅनर लागले आहे.

    चंद्रपुरातील कुख्यात गुन्हेगाराला पोलिसांनी केले स्थानबद्ध

    बॅनरवरील ॲड. वामनराव चटप यांच्या फोटोला शेण फासण्याचे कुटील काम अज्ञात व्यक्तीने केले आहे. इतक्या खालच्या स्तराचे विरोधकांचे राजकारण निषेधार्ह असल्याचे म्हणत शेतकरी संघटनेने गडचांदूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. honest politics


    तीनदा आमदारकी भूषविणारे ॲड. वामनराव चटप यांचा जनमाणसात मोठा आदर आहे. नागरिक व कार्यकर्ते या घटनेविषयी संतप्त असून रोष व्यक्त करीत आहे.

    फेक नरेटिव्ह वापरत भाजपचा रडीचा डाव


    शेतकरी संघटनेचे विलासराव धांडे, रत्नाकर चटप, नरेश सातपुते, अरुण रागीट, अतुल थोटे, मोरेश्वर अस्वले, अरुण काळे, अविनाश डोहे, अनिल कौरासे, गजानन टेकाम आदींनी याविषयी लेखी तक्रार ठाणेदार यांना दिली असून दोशींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • Important notices : जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या महत्वाच्या सूचना

    Important notices मतदानाच्या दिवशी निवडणूक प्रक्रियेवर सर्वसाधारण नियंत्रण ठेवण्यासाठी विविध पथके कार्यान्वित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिका-यांना पथकाबाबत पुर्तता करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

    Important notices विधानसभा मतदारसंघाकरीता मतदारसंघ नियंत्रण कक्ष : प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये नियंत्रण कक्षाची स्थापना करणे. नियंत्रण कक्ष प्रमुख म्हणून एका अनुभवी वरिष्ठ अधिका-याची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करणे तसेच त्यांचे नाव, संपर्क क्रमांक, मेल आयडी जिल्हा नियंत्रण कक्षाकडे सादर करणे.

    चंद्रपुरात या गुन्हेगारांची दहशत, पोलिसांनी केले स्थानबद्ध

    सदर अधिका-याला जिल्हा नियंत्रण कक्षातील समन्वय अधिका-यांच्या संपर्कात राहण्याबाबत निर्देशित करणे. नियंत्रण कक्षाअंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघाकरीता मतदानाच्या दिवशी सर्व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याकरीता विविध पथकांची नेमणूक करणे. Important notices

    संपर्क व्यवस्था पथक : पथक प्रमुख म्हणून एका जबाबदार अधिका-याची नेमणूक करावी. पथक प्रमुखांनी क्षेत्रीय अधिकारी व मतदान केंद्राध्यक्ष यांना संपर्क साधून आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे मतदानाची आकडेवारी व इतर अहवाल प्राप्त करून घेण्यासाठी अधिकारी व कर्मचा-यांनी नेमणूक करावी. या पथकास आवश्यक ते नमुने उपलब्ध करून द्यावे व कामकाजाबाबत आवश्यक प्रशिक्षण घ्यावे.

    मुलभूत सोयी-सुविधा/ साहित्य समन्वय पथक : सदर पथक प्रमुखाने मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रावर मुलभूत सोयीसुविधा, मतदानाशी संबंधित साहित्य/ ईव्हीएमची पुरेशी व्यवस्था असल्याबाबत खात्री करावी व ज्या सुविधा उपलब्ध नाहीत, त्या तात्काळ उपलब्ध करून घ्याव्यात. जेणेकरून मतदान प्रक्रियेमध्ये कोणताही खंड पडणार नाही. पथक प्रमुखांना या कामासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. सर्व सोयीसुविधा उपलब्ध असल्याचा अहवाल मतदानाच्या चार दिवसांपूर्वी म्हणजे 16 नोव्हेंबर पर्यंत निवडणूक निर्णय अधिका-यांना सादर करावा. Important notices

    असंख्य महिलांचा आमदार जोरगेवार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

    वेबकास्टींग मॉनेटरिंग पथक : पथक प्रमुखांना सहाय्य करण्यासाठी वेबकास्टींग असणा-या प्रत्येक 40-50 मतदान केंद्राच्या मॉनेटरिंग करीता एका कर्मचा-याची नेमणूक करावी. मतदान केंद्रावर घडणा-या आक्षेपार्ह बाबी निदर्शनास येताच सदर बाब मतदान केंद्राचे नाव, नंबरसह संबंधित पथक प्रमुखांच्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी यांना अवगत करावी. Important notices

    जीपीएस मॉनेटरींग पथक : 8 ते 10 क्षेत्रीय अधिका-यांच्या मॉनेटरींग करीता एका कर्मचा-याची नेमणूक करावी. सर्व क्षेत्रीय अधिकारी फिरते राहतील तसेच कोणताही क्षेत्रीय अधिकारी मतदान केंद्र व्यतिरिक्त दुस-या ठिकाणी थांबणार नाही, याबाबत मॉनेटरींग करावे. कायदा सुव्यवस्था / मतदान केंद्रावरील तक्रारी / ईव्हीएमबाबत तक्रारी, संपर्क व्यवस्था पथकामधील नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्यास संबंधित क्षेत्रीय अधिका-यांना कळविण्याची कार्यवाही करावी.

    मिडीया मॉनेटरींग पथक : पथक प्रमुख म्हणून एका जबाबदार अधिका-याची नेमणूक करणे व त्यास सहाय्य करण्यासाठी पुरेशा कर्मचा-यांची नियुक्ती करणे. मतदानाच्या दिवशी संबंधित विधानसभा मतदार संघामध्ये प्रसारीत होणा-या बातम्या तात्काळ संबंधित निवडणूक निर्णय अधिका-यांच्या निदर्शनास आणून देणे. मतदानासंबंधित बातम्यांचे निरीक्षण करण्याकरीता स्थानिक केबल नेटवर्कसह राज्य/राष्ट्रीय पातळीवरील बातम्या प्रसारीत होणारे चॅनल्स व टीव्हीसंच उपलब्ध करून द्यावेत.

    जलद प्रतिसाद पथक : पथक प्रमख म्हणून तहसीलदार यांची नेमणूक करावी. मतदान केंद्राचे भौगोलिक दृष्ट्या स्थान व मतदान केंद्रावर तात्काळ पोहचणारे दळणवळणाचे मार्ग गृहीत धरून आवश्यक तेवढ्या जलद प्रतिसाद पथकाची नेमणूक करणे. सदर पथकामध्ये मतदान प्रक्रियेबाबत जाणकार व ईव्हीएम- व्हीव्हीपॅट कार्यप्रणाली अवगत असणा-या कर्मचा-याची नेमणूक करावी. आवश्यकतेच्या वेळी सदर पथक आवश्यक त्या ठिकाणी / मतदान केंद्रावर पोहचून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विषयाची हाताळणी करण्याबाबत नियेाजन करावे. Important notices

                मतदानाच्या दिवशी नियंत्रण व नियोजनाबाबत सर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिका-यांनी योग्य कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहे.

  • Illegal sand smuggling : वाळू माफियाचा डाव प्रशासनाने उधळला

    Illegal sand smuggling चंद्रपूर जिल्ह्यात वाळू घाटाचे अद्याप लिलाव न झाल्याने रेती माफिया सतत अवैधरित्या वाळूचा उपसा करीत प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची चोरी करीत आहे.

    बल्लारपूर मतदारसंघात केटलीने वाढविले टेन्शन


    Illegal sand smuggling चंद्रपूर जिल्ह्यातील पोम्भूर्णा, चिचपल्ली, सावली, घुग्गुस, पडोली, भद्रावती, तिरवंजा, छोटा नागपूर, पठाणपुरा गेट बाहेरील जमनजट्टी या ठिकाणी वाळू माफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे.


    निवडणुकीची आचारसंहिता लागल्यावर सुद्धा वाळू माफियाने हैदोस माजविला मात्र घुग्गुस मध्ये नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार यांनी वाळू माफियावर 7 नोव्हेंबर ला मध्यरात्री धडक कारवाई करीत 5 ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई केली.

    सुगंधित तंबाखु तस्करी महिलेला अटक


    घुग्गुस येथील वर्धा नदीच्या चिंचोली घाट परिसरात रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती.
    माहितीच्या आधारे महसूल प्रशासनातील नायब तहसीलदार गादेवार यांच्या पथकाने चिंचोली घाटावर धडक देत 5 ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई केली. Illegal sand smuggling


    यामध्ये ट्रॅक्टर क्रमांक Mh34 ap 2264, mh L 7066, Mh34 AL 1685, Mh34 L 9542 व चेसिस क्रमांक NKTH00969 या वाहनाचा समावेश आहे. रेतीची अवैध वाहतूक करण्याऱ्या या वाहनावर कारवाई करीत 6.5 लाखांचा दंड वसूल करण्यात येईल अशी माहिती नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार यांनी दिली.


    ही यशस्वी कारवाई तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे, तलाठी नवनाथ गोडघासे, श्याम खरात व अनुप वगारे यांनी केली.

  • Trending Now Kettle symbol : या मतदारसंघात केटलीने वाढवले टेंशन

    Kettle symbol जनतेला आता खऱ्या अर्थाने प्रामाणिक आणि आपल्या नेतृत्वाची ओळख पटू लागली आहे हे आपली लोकशाही बळकट होत असल्याचं आणि जनतेमध्ये जागृती होत असल्याचं लक्षण आहे.


    Kettle symbol मुल येथील बल्लारपूर 72 विधानसभेच्या अपक्ष बहुजनांच्या आणि जनसामान्यांच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अभिलाषा ताई यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली.

    सुगंधित तंबाखु तस्करी प्रकरणी महिलेला अटक


    गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा सातत्याने प्रामाणिकपणे जे काम अभिलाषा ताई गावतुरे करीत आहेत त्याची पोचपावती म्हणूनच जणू जनता त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी करून देत आहे. Kettle symbol


    गेल्या 30 वर्षापासून मतदारसंघांमधील जनता हजारो समस्यांनी ग्रस्त आहे आणि येथील असलेले आमदार आणि विद्यमान पालकमंत्री सपशेल अपयशी ठरलेले आहेत जे प्रश्न जनप्रतिनिधींनी सोडवायचे असतात त्या प्रश्नासाठी अभिलाषा ताई गावतुरे स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

    चंद्रपूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीने फोडला भाजपचा फुगा


    भूमिपुत्र ब्रिगेडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन असेल करियर गायडन्स असेल गावोगावी वाचनालयाचा आणि अभ्यासिकेचा उपक्रम असेल विद्यार्थ्यांच्या बसेसच्या प्रॉब्लेम असेल अभिलाषा ताई यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत राहिले आहेत जे निवडून आलेले जनप्रतीनिधीही करत नाही ते प्रश्न ते स्वतः उचलतात नवेगाव मोरे येथे दोनशे विद्यार्थ्यांसाठी फक्त दोन शिक्षक होते अभिलाषा ताईंनी आंदोलन करून तेथील शाळेला तीन शिक्षक मिळवून दिले. Kettle symbol

    मामल्याच्या विद्यार्थ्यांना चंद्रपूरच्या शाळेत जायसाठी बस नव्हती विद्यार्थ्यांना घेऊन परिवहन विभागासमोर त्यांनी आंदोलन करून तिथे बस उपलब्ध करून दिली. शेतकऱ्यांच्या पिक विमा च्या प्रश्नावर आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या प्रश्नांना घेऊन एक मोठे आंदोलन उभारले वाघांच्या हल्ल्यामध्ये ठार होतले असलेल्या शेतकऱ्यांच्या आणि गुराख्यांच्या प्रश्न मोठ्या प्रमाणावर उचलून धरला मेंढपाळांच्या चराईच्या प्रश्नावर अगदी वनविभागाच्या प्रधान सचिवांपर्यंत धाव घेऊन तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. Kettle symbol


    आपल्या डॉक्टरांच्या मोठ्या चमुच्या माध्यमातून अतिदुर्गम जंगलातील गावोगावी जाऊन वैद्यकीय सेवा प्रदान केल्या
    पाणीपुरवठा विभागाच्या मजुरांच्या शोषणाचा प्रश्न त्यांनी जिल्हा परिषद च्या प्रशासनासमोर लावून धरला आणि त्यांना न्याय मिळवून दिला.


    शाळेच्या खाजगीकरणाचा प्रश्न असो किंवा नोकऱ्यांच्या कंत्राटीकरणाचा प्रश्न सर्व समाजाचे नेतृत्व करत अभिलाषा ताईंनी अनेक आंदोलने उभी केली 26 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ओबीसी जनगणनेसाठी निघालेल्या विशाल ओबीसी मोर्चाचे नेतृत्व सुद्धा अभिलाषा ताई आणि डॉक्टर राकेश गावतुरे यांनी केले.


    विधानसभेतील आदिवासी समाजातील लोकांवर प्रशासनाद्वारे आणि वनविभागाद्वारे जेव्हा अन्याय अत्याचार करण्यात आले आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले तेव्हा सर्वप्रथम अभिलाषाताई गावतुरे यां त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या या सर्व कार्यक्रम आणि आंदोलनाच्या माध्यमातून विधानसभेतीलच नव्हे तर सर्व जिल्ह्यातील ओबीसी आंबेडकरी आदिवासी अल्पसंख्यांक आणि सर्व समाजामध्ये अभिलाषा ताईंचा चाहता वर्ग प्रचंड प्रमाणात निर्माण झालेला आहे.


    आणि म्हणून गावोगावी गल्लोगल्ली त्यांच्या प्रचार सभेला मतदार प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत आज मुल येथे झालेल्या हजारो लोकांच्या रॅलीने सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या मनात धडकी भरत आहे.

  • VBA Ballarpur : चंद्रपूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीने फोडला भाजपचा फूग्गा

    VBA Ballarpur बल्लारपूर – गेल्या अनेक वर्षापासून बल्लारपूर तालुक्यासह जिल्ह्यात वंचित पक्षाने जनसेवेचे निरंतर कार्य करीत पक्ष बळकट करून टाकत वाढविली असल्याने भाजप,काँग्रेस पक्षाच्या भीती निर्माण झाली असून त्यामुळेच समाजात निलंबित केलेल्या कार्यकर्त्यांना पुढे करून संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजप करीत आहे.

    VBA Ballarpur बल्लारपूर तालुक्यातील रमेश लिंगलपल्लीवर या कार्यकर्त्याने लोकसभेत काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचा प्रचार करीत असल्याचे आढळून आले.त्यानंतर त्यास पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका ठेऊन त्यास पक्षातून निलंबित करण्यात आले असून त्याचा वंचित शी कसलाही संबंध नाही.असे वंचितचे जिल्हाध्यक्ष सोमाजी गोंडाने यांनी स्पष्ट केले आहे.

    16 बुद्ध विहारात अभ्यासिका, आमदार जोरगेवार यांचा पुढाकार

    रमेश लिंगलपल्लीवर याने विधानसभा निवडणुकीत भाजपात प्रवेश केल्याचे समजते.ती वंचित सोडून भाजपात 200 कार्यकर्त्यांसह प्रवेश केल्याचे सांगत सुटला आहे. वास्तविक त्यास पक्षातून कधीचेच काढून फेकण्यात आले असल्याने त्याचा तिळमात्र संबंध वंचितशी नाही. त्याचे जाण्यामुळे पक्षाला कुठलाच परिणाम होत नसून सतत पक्ष फेरबदल करीत असल्याने त्याची किंमत कुठेही होत नसल्याने केवळ संभ्रम निर्माण करीत असल्याने त्यांचेवर वंचित भाव देत भाजपात आपली पत निरामन करण्यासाठी बेताल व्यक्तव्य करीत आहे. VBA Ballarpur

    या निवडणुकीत वंचितचे सतीश मालेकर यांना उमेदवारी जाहीर केली असून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील वंचितचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात मुसंडी मारत इतर पक्षाला घाम फोडला आहे.अशात काही उमेदवारांनी वंचितला बदनाम करण्यासाठी नतभ्रष्ट लोकांना पुढे करून मतदारात वास्तविक प्रचार करण्यासाठी पुढे करून डाव साधण्याचा प्रयत्न करीत आहे.अशांना वंचितचा कार्यकर्ता व मतदार भीक घालणार नाही. VBA Ballarpur

    सुगंधित तंबाखूची रक्षा करणाऱ्या महिलेला अटक

    स्वाभिमानी कार्यकर्ता कधीच आंबेडकरी विचाराशी तडजोड व प्रतारणा करणार नाही. भाजप व काँग्रेस पक्षाच्या वंचित बहुजन आघाडीची भीती वाटत असून त्याच पक्षात फुटीचे खिंडार पडत आहे. तळागाळातील जनतेच्या समस्या व ओबीसी,एससी, आदिवासींचे आरक्षण संपविण्याचा घाट भाजप,काँग्रेस रचत असून आता हा समाज या पक्षातील उमेदवाराना नाकारण्याचा पवित्रा घेतला आहे.

    न्याय,हक्क व आरक्षणाच्या लढाईत बहुजन उतरला असून येथील जातिवंत पक्षाच्या उमेदवाराच्या पायाखालची माती घसरली आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात वंचित अबाधित असून बेताल कार्यकर्त्यांच्या जाण्याने वंचितला काहीही परिणाम होणार नाही हे निर्विवाद सत्य आहे.

  • Latest Chandrapur abhyasika : तर राज्यात चंद्रपूर पहिले मतदारसंघ असणार – आमदार किशोर जोरगेवार

    Chandrapur abhyasika तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेली करुणा, अहिंसा, आणि समतेची शिकवण आपल्या जीवनात आणि समाजात प्रकाश पेरणारी आहे. मतदारसंघातील बुद्ध विहारांमधून आता शिक्षणाचा संदेश जावा या हेतूने आपण १६ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिकांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

    Chandrapur abhyasika एकाच मतदारसंघातील १६ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिका असणारे चंद्रपूर कदाचित राज्यातील पहिले मतदारसंघ ठरेल, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    चंद्रपुरात 2 गुन्हेगारांची खुनी फाईट

     महाकाली कॉलरी येथील आनंद बौद्ध महिला सेवा समिती, भिवापूर येथील करुणा बुद्ध विहार आणि तक्षशिला बुद्ध विहारांच्या वतीने स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आनंद बौद्ध महिला सेवा समितीच्या वतीने आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजप महिला महानगर अध्यक्षा सविता कांबळे, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार,  कल्याणी किशोर जोरगेवार, सायली येरणे, भाग्यश्री हांडे, नंदा पंधरे, अमोल शेंडे, ताहिर हुसेन, विमल कातकर, नीलिमा वनकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

     यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, मागील पाच वर्षांत मी सतत आपल्या संपर्कात होतो. ही गर्दी याचेच फलित आहे. सर्व समाजाचा सर्वसमावेशक विकास हेच आपले ध्येय राहिले आहे. आपण बाबुपेठ येथे भव्य विपश्यना केंद्र तयार करत असून हे केंद्र विदर्भातील उत्तम केंद्रांपैकी एक असणार आहे. Chandrapur abhyasika

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात परिवर्तनाची लाट

    मतदारसंघातील १६ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिका तयार करण्याच्या दिशेने आपले प्रयत्न होते. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने यात यश आले आहे. १६ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिकांसाठी आपण साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असल्याचेही यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

     आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी बुद्ध विहारांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. येथे केवळ आध्यात्मिक बळच मिळत नाही, तर सामाजिक आणि मानसिक बळही मिळते. आपल्या समाजातील नवीन पिढीने या शिकवणीचा आदर करून एक उत्तम समाज घडवावा.

    तथागत गौतम बुद्धांनी दिलेल्या विचारांचा प्रसार करून समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या आपल्या प्रयत्नात आमचे नेहमी योगदान राहील, असे ते यावेळी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.